मासे ३३) कालेटं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 June, 2011 - 02:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालेटं
मसाला
हळद
मिठ
तळण्यासाठी तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

कालेटं ही तळुनच जास्त चांगली लागतात म्हणून तळण्याची पाककृती देत आहे.
कालेट आधी साफ करुन घ्यावीत त्यासाठी कालेटांची खवले काढावीत. खवले जास्त नसतात. डोके व शेपुट काढून पोटातील घाण काढावी. मग तिन पाण्यातुन स्वच्छ धुवुन घ्यावीत. कालेटांना मिठ, हळद, मसाला चोळून घ्यावा.

नंतर तवा चांगला गरम करुन त्यावर तेल सोडून हवी असल्यास लसुण पा़कळ्यांची फोडणी द्यावी. फोडणी नको असल्यास गरम तेलात कालेट मस्त शॅलो फ्राय करावीत.

दोन्ही बाजू जास्तीत जास्त ४-५ मिनीटे मध्यम आचेवर तळाव्यात.

ही आहेत तयार कालेटं फ्राय. खायला या.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन तरी हवीच कारण हा मासा बारीक असतो.
अधिक टिपा: 

कालेटं ही ओळखायला अगदीच सोप्पी. त्यांचा लाल्-गुलबट रंग असतो. ही खाल्याने रक्त वाढते असे म्हणतात. कालेट स्वस्त व चवदार असतात. शक्यतो हे तळूनच चांगले लागतात.

मसाला लावताना थोडा लिंबाचा रस लावला तरी वेगळी टेस्ट येते.

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागुतै याला आम्ही 'लेपटी' म्हणतो.....मसाल्यात विनेगार-जिंजरगार्लिक पेस्ट वपरतो.

खर्पुसवुनच भारी लागतो अगदी 3D%20Smiles%20(46).gif

नाही ग नीलू बोंबिल सारखा गुळगुळीत नसतो हा कडकच असतो.

चातक नविन नाव सांगितल्याबद्दल धन्स. पण व्हिनेगर का वापरतात ?

जागू, तू पण अधून मधून व्हिनीगर वापरुन बघ. मसाल्याचा स्वाद जास्त खुलतो, शिवाय माश्याचा हिवस वास कमी होतो. असा मासा टिकतोही चांगला. (माश्याचे बारिक काटे व्हीनीगर मधे विरघळतात.)

पण व्हिनेगर का वापरतात ? >>खास कारण नाहीय... लिंबुचेच काम करते व्हिनेगार.. पण्...पारंपारीक नेहमीच्या चविपेक्षा वेगळी चव येते. तळलेले मासे खुपवेळ कडक आणि ताजे राहतात.

तसा 'खर्पुसवुन' तळलेला कोणताही मासा दिसला की मी....tongue0022.gif

हाय रे दैवा, बघताक्षणी प्रेमात पडावं असं रुप ह्या माशाला देवाने का बरे दिले नाही?? आता जागु म्हणतेय म्हणजे चव चांगली असणार पण रुपडं काही डोळ्यांना चांगलं दिसत नाही Sad

एक चप्पट मासा असतो लालसर रंग नी काळे खवले. आपल्या तळहाताएवढा लांब.. कोळीण त्याचे साल सोलुन काढते. आतले त्याचे रुप हलव्यासारखे दिसते. मला हा मासा लेपट्या वाटलेला. मी एकदा आणलेला बहुतेक. चवीला ठिकठाक असतो.

जागु ते प्लेटमध्ये ठेवलेले मासे साफ केलेले आहेत? Uhoh क ओरिजिनल दिसायलाच असे असतात?
पोटातली घाण काढायची म्हणजे नक्की काय करायचं? Uhoh

काहीही म्हण, माश्यांच्या इतर पाकृ प्रमाणे ही काही फार बरी वाटली नाही..
का माहीत नाही Sad

साधना, आम्हि त्यालाच लेपटि म्हणतो, आणी करायचि पध्दत चातकानी दिलिय तीच. पण मी नेहमी व्हिनेगार. नाहि वापरत लिंबुच वापरते. ठाण्यात तर बरेचदा मिळतात हे मासे. सा.बा. आणतात.

काहीही म्हण, माश्यांच्या इतर पाकृ प्रमाणे ही काही फार बरी वाटली नाही..

अगं पाकृ चांगली आहे, पण रॉ मटेरिअल डोळ्यांना माजलेल्या किड्यांसारखे दिसतेय त्यामुळे प्रॉब्लेम आहे Happy

साधना, आम्हि त्यालाच लेपटि म्हणतो,

अगं, मग लेपटे नक्की कोणाला म्हंतात, कालेट्यांनाच लेपटे म्हणतात की मी वर्णन केलेल्या माशाला लेपटे म्हंतात???

पण रॉ मटेरिअल डोळ्यांना माजलेल्या किड्यांसारखे दिसतेय त्यामुळे प्रॉब्लेम आहे >>>> :पळून जाणारी बाहुली:

अगं, मग लेपटे नक्की कोणाला म्हंतात >>>>> अग, ते तु म्हणते त्याला लेपटि म्हणतात. पण पाकृ चातकानी दिलिय ती. मला फोटो अपलोड करता येत नाहिये. पण जर लेपो गुगुलल तर दिसेल तो फिश आणि पाकृ पण (गोव्याची पध्दत).

अश्विनी आता दिसलीस पळून जाताना.

दक्षे घाबरु नकोस तुझ्यासाठी अजुन दुसरे मासे आहेत.

अग प्लेट मध्ये आख्खे मासे आहेत.
अन्जली लेपटे बघायला पाहीजेत.

साधना खर सांगायच तर मी पहिल्यांदाच खाल्ले हे मासे ते तसे दिसतात म्हणुन मी कधी नेले नव्हते. पण मी काही ओळखिच्या लोकांकडून ऐकल की ते चविला छान असतात म्हणून नेउन ट्राय केले. खरच चांगले लागतात.

नविन नविन मासे कळतायत जागु.>> अगदी माझ्या आता मासेप्रेमी मैत्रींणीना मीच नविन नविन तुझ्या क्रुपेने सांगत असते. अर्थात पाठांतर करून Happy

तळलेला भारी दिसतोय मासा.

साधना, बघताक्षणी प्रेमात पडावं असं रुप देवाने माशाला दिलं असतं तर ह्रिथिक रोशनला काय दिलं असतं ? Proud

जागू हे मासे आम्ही नाही खात गावी ज्यावेळी लॉंच जाते त्यावेळी हे मासे सुद्धा भेटतात पण ते आम्ही टाकून देतो. आणि भरपूरच असतील तर खत म्हणून माडात पुरतो.

अश्विनी ने सांगितले त्याला माजीही सहमती आहे.

Pages