मासे ३३) कालेटं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 June, 2011 - 02:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालेटं
मसाला
हळद
मिठ
तळण्यासाठी तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

कालेटं ही तळुनच जास्त चांगली लागतात म्हणून तळण्याची पाककृती देत आहे.
कालेट आधी साफ करुन घ्यावीत त्यासाठी कालेटांची खवले काढावीत. खवले जास्त नसतात. डोके व शेपुट काढून पोटातील घाण काढावी. मग तिन पाण्यातुन स्वच्छ धुवुन घ्यावीत. कालेटांना मिठ, हळद, मसाला चोळून घ्यावा.

नंतर तवा चांगला गरम करुन त्यावर तेल सोडून हवी असल्यास लसुण पा़कळ्यांची फोडणी द्यावी. फोडणी नको असल्यास गरम तेलात कालेट मस्त शॅलो फ्राय करावीत.

दोन्ही बाजू जास्तीत जास्त ४-५ मिनीटे मध्यम आचेवर तळाव्यात.

ही आहेत तयार कालेटं फ्राय. खायला या.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन तरी हवीच कारण हा मासा बारीक असतो.
अधिक टिपा: 

कालेटं ही ओळखायला अगदीच सोप्पी. त्यांचा लाल्-गुलबट रंग असतो. ही खाल्याने रक्त वाढते असे म्हणतात. कालेट स्वस्त व चवदार असतात. शक्यतो हे तळूनच चांगले लागतात.

मसाला लावताना थोडा लिंबाचा रस लावला तरी वेगळी टेस्ट येते.

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाल्ले बाबा.....गावाला गेली होती तेव्हा कोळीन मावशिने बनवुनच दिले.....अवतार बघुन तोंडात घालायची ईच्छा होत नव्हती पण डोळे मिटुन घास तोंडात टाकल्याबरोबर....त्या माशाचे पहिले रुप बिप सर्व विसरायला झालं...आणि ७-८ पोटात गेले पण

जागू, सॉरी पन मला बघून प्रयोगशाळा आठवली.....

मी कधीच पाहिला नाही हा मासा.

आमच्याकडे दिसायला सुद्धा मासा देखणा लागतो. ..चवीचा प्रश्ण आहेच. Happy

Pages