समाजात व्यवहार टाळुन कोणालाही जगता येत नाही, आर्थिक व्यवहार हा मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, पैशाशिवाय काहीही शक्य नाही, कारण सगळे विचार, सगळ्या गोष्टी संपत्तीजवळ येऊन थांबतात. आयुष्याच्या एका वळणावर राजुला असचं काहीतरी जाणवायला लागलं होतं. जेव्हा त्याची दोन मुलं शाळेत जायाली, घराचा मासिक हप्ता नियमित भरावा लागत होता, तसचं बायकोचा घरखर्च दर महीन्याला वाढत होता.
राजुला तर साक्षात्कार झाल्यासारखं वाटत होतं. आताच आपल्याला खरं जग कळालं, जगायचं गणित कळायला लागलं आहे असं तो स्वत:ला समजवत होता. काही काळानंतर त्याला असंही वाटायला लागलं होतं की, आजवरच्या आयुष्यात आपण एखाद्या ठिकाणी खिशाला झळ पोहचवुन दुसर्यावर उपकार केले, ते सगळेच वाया गेले. ते माणसं ती गोष्ट अगदी सहज विसरले, जसं काही त्यांचं काम करुन देणं, त्यांच्याशी चांगलं वागणं, ही आपलीच गरज होती किंवा ते त्या योग्यतेचे आहेत असं त्यांना वाटत होतं.
आता घरात असो की दारात माणसं ऐकमेंकांशी प्रेमाने वागत नाहीत तर व्यवहाराने वागतात या निर्णयापर्यंत राजु येऊन पोहचला. कुष्ण देवाने गितेत, माणसाला फळाची अपेक्षा न धरता आपलं कर्म करत राहण्याचा सल्ला दिलेला आहे, पण तसा वागणारा माणुस आपल्या सभोवताली कितीही शोधलं तरी सापडणार नाही, अशी त्याची खात्री झाली तेव्हा तो या वास्तवाने हतबल झाला.
''मी तुझ्यासाठी एवढं केलं तेव्हा तु माझ्यासाठी तेवढं करायला काय हरकत आहे!'' हा विचार कोणी बोलुन दाखवत नसला तरी आपल्याजवळच्या माणसाचा उद्देश तोच असतो. माणसाच्या आयुष्याभराच्या कोणत्याही व्यवहाराला त्याच्याजवळ आर्थिक बाजु किती भक्कम आहे, हीच एक गोष्ट सगळ्या गोष्टीवर आपला प्रभाव टाकते.
खरं तर माणसाच्या आयुष्यात असेही काही क्षण येतात की, त्यावेळी तो आपल्या मनातले विचार, एखादा अनुभव दुसर्याला सांगु शकत नाही, कारण ऐकणाराची प्रतिक्रीया '' आजवर तुला एवढंही कळालं नाही'' अशा स्वरुपाची असु शकते. हा अनुभवही राजुला असाच वाटत होता, म्हणुन त्याला रात्री झोप लागत नव्हती, घरातले सगळे झोपलेले पाहुन तो एकटाच बाहेर पडला.
रोडवरच्या लाईटाच्या उजेडात तो चालु लागला, त्यानं वर पाहीलं तेव्हा आकाशात दुरवर दाट अंधार पसरलेला दिसला, कारण अमावश्या दोन दिवसावर आली होती. ही गोष्ट राजुच्या लक्षात आली नाही कारण तो आपल्याच विचारांच्या तंद्रीत चालत होता.
''प्रेम आणि व्यवहार ह्या एकदम विरुध्द टोकाच्या गोष्टी आहेत कारण प्रेमासाठी मन लागतं अन् व्यवहासाठी धन लागतं. धनाच्या व्यवहारात प्रेम कधीच नसतं, म्हणुन ते चार माणसात दाखवावं लागतं.'' राजुचा स्वतःशीच संवाद चालला होता. राजुनं आकाशात पाहीलं तेव्हा एक तारा दुरवर लुकलुकत होता, तसा एक विचार त्याच्या मनात लुकलुकला, काही माणसं एवढे चतुर असतात की, ''प्रेम दाखवणं'' ते सरावानं शिकुन घेतात.
*****
खुप छान लीहील आहे श्यामराव.
खुप छान लीहील आहे श्यामराव. अगदि सहज आणि ओघवत.
ह्म्मम. विचार करायला भाग
ह्म्मम. विचार करायला भाग पाड्ले. पण अजुन लिहायाला पाहिजे होते यावर.
(No subject)
मस्त विचार
मस्त विचार
अन्नया, चैत्रा, सांजसंध्या,
अन्नया, चैत्रा, सांजसंध्या, रणजित तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी!
असंच काहीतरी लिहलं की प्रतिक्रिया काय येतील, यापेक्षा ते कोणी वाचणार की नाही, हाच प्रश्न मला पडला होता.
मी असंच काहीतरी बरचं लिहुन ठेवलेलं आहे, तुमच्या या प्रतिक्रियामुळे ते इथे टाकायला बळ मिळेल एवढं मात्र नक्की.