तीन दिवसाची हिरोशिमा ट्रीप. त्यातला एक दिवस पूर्ण मियाजीमाला जायचे असे ठरवूनच गेलो होतो.
मियाजीमा म्हणजे म्हणे देवाचे बेट.इथले इत्सुकुशिमा नावाचे देऊळ फार प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापासून हे बेट पवित्र बेट म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य लोकांना या बेटावर येण्यासही बंदी होती.केवळ भिक्षु आणि साधू यांनाच या बेटावर प्रवेश होता. या बेटाचे पावित्र्य जपण्यासाठी या बेटावर म्हणे मृत्यू आणि जन्म दोन्ही गोष्टींना मनाई होती आणि आहे. अजूनही प्रेग्नंट स्त्रिया आणि अतिशय म्हातारी किंवा खूप आजारी माणसे बेटावरून हिरोशिमाच्या मुख्य भागाकडे जातात अशी माहिती गुगल सांगते.या बेटावर स्मशानही नाहीये. मृत्यू आणि जन्म अपवित्र का आणि चुकून एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय हे मात्र अनुत्तरीत आहे.
इथल्या जंगलातली झाडे तोडायलाही पूर्ण बंदी होती. ती बंदी अजूनही आहे कि नाही हे माहीत नाही. पण नसावी कारण त्याशिवाय रस्ते, दुकाने हे झालेच नसते. बेटावर हरणे भरपूर आहेत. त्याशिवाय आम्हाला एक कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी दिसला पण नक्की ओळखता आला नाही.इथले जंगल अजूनही दुर्गम आणि अतिशय सुंदर शांत आहे.
बहुतेक जपानी देवळांच्या दरवाज्याच्या समोर एक उंच लाकडी किंवा दगडी गेट सारखे वाटणारे खांब असतात. बहुतेक वेळा केशरी रंगात रंगवलेले हे खांब बघितले कि मला देवळासमोर तोरणं लावलेली आहेत असेच वाटते. या खांबाचा अर्थ भौतिक जगातून पवित्र जगात जाणारा रस्ता असा काहीसा होतो असे ऐकले आहे. या गेटला जपानीमध्ये तोरीइ म्हणतात.
तर या इत्सुकुशिमा मधली ओ तोरीइ खूप मोठ्ठी आहे आणि ही समुद्रात आहे.ओहोटीच्या वेळेत या ओ तोरीइ पर्यंत चालत जाता येते. मात्र भरतीच्या वेळेस ही समुद्रात तरंगत असल्यासारखी दिसते. पूर्वी बेटावर येणाऱ्या लोकांना या तोरीइ मधून बोट घेऊन यावे लागे. हे मंदिरही एखाद्या बंदराप्रमाणे आहे. बोट घेऊन आल्यावर उतरायला धक्का सुद्धा आहे. भरतीचे पाणी ओ तोरीइ पार करून पार इत्सुकुशिमाच्या देवळाच्या खालपर्यंत पोचते. त्यावेळी हे सम्पूर्ण देऊळ पाण्यावर उभे असल्यासारखे दिसते. भौतिकाकडून आधी भौतीकाकडे असा प्रवास दाखवण्यासाठीच हे देऊळ जमिनीपासून दूर पाण्यावर असल्याप्रमाणे बांधले आहे असे म्हणतात.
युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदलेले देऊळ आणि ओ तोरीइ दोन्ही लाकडी आहेत. ओ तोरीइ camphor (म्हणजेच कापूर का?)च्या लाकडापासून बनवली आहे. त्याशिवाय या ओ तोरीइचे वैशिष्ठ असे म्हणतात कि ती जमिनीमध्ये गाडलेली नाही. ती नुसती समुद्राच्या वाळूवर ठेवलेली आहे. रुंद तळ असल्याने स्वत:चा भार तोलत ती शेकडो वर्षे उभी आहे. समुद्राच्या भरती ओहोटीचा तिच्यावर काही परिणाम होत नाही.
या ठिकाणी भेट द्यायचे बरेच दिवसापासून मनात होते. आम्ही बोटीमधून आलो तेव्हा ओहोटी होती आणि ओ तोरीइ च्या जवळ लोकही दिसत होते. पण बोटीतून उतरून तिथे जाई पर्यंत भरतीचे पाणी चढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ओ तोरीइला हात लावता आला नाहीच. अक्षरश्: सेकंदा सेकंदाला पाणी पुढे येत होते. इथे यायचे म्हणून मी मुद्दाम गमबुट घालून आले होते. त्यामुळे थोड्याफार पाण्यात उभे राहून फोटो काढता आले. पण फार वेळ उभे रहाण्यात अर्थ नव्हता.अगदी आत्ता वाळू दिसत असलेला भाग क्षणात घोटाभर पाण्यात बुडून जात होता. आजचा बहुतेक वेळ अगदी पावसाळी हवा आणि आकाश भरून आलं होतं. असलं आकाश असलं कि फार खराब फोटो येतात. पण नशिबाने थोडीशी साथ दिली आणि काही मिनिटे तरी निळ्या आकाशाचा एक तुकडा दिसला.त्या निळ्या तुकड्यांबरोबर ढगाळ हवे मुळे एक वेगळाच कुंद असा परिणाम मिळत होता.
पाणी नुकतेच चढत असताना या दगडावरून सहज जाता येत होते. आम्ही इथून दोन चार मिनिटात देवळाच्या आत पोचलो तोपर्यंत मात्र हे दगडही पाण्यात बुडून गेले होते. अजून देऊळ मात्र वाळूतच दिसत होते.
संध्याकाळी सहा वाजता पुन्हा भरती असणार होती त्याआधी पुन्हा एकदा देवळात गेलो. यावेळी मात्र हे देऊळ पूर्ण पाण्यात उभे होते आणि ओ तोरीइ अगदी पार समुद्राच्या मध्ये असल्यागत वाटत होती. इथे सूर्यास्त बघण्याचा माझा प्लान होता. पण सूर्य अधिक ढगात लपल्याने सूर्यास्त काही दिसलाच नाही.
-------------------------
हे लेखन इथेही पाहता येईल
लेखनाचे आणि फोटोंचे सर्व प्रताधिकार सुरक्षित.
फोटो अपडेट केले आहेत.
फोटो अपडेट केले आहेत.
सुंदर वर्णन आणि माहिती.
सुंदर वर्णन आणि माहिती. प्रकाशचित्रेही मस्तच. पहिल्या प्रचित आकाश मस्त दिसतयं पण तो ब्राईटनेस जास्त जाणवतोय? कि तसाच आहे?
बेटावर हरणे भरपूर आहेत.>>> हे
बेटावर हरणे भरपूर आहेत.>>> हे लिहिलं नसतंस तर विचारणारच होते. अगदी आपल्या आसपासच फिरत असतात.
मी गेलेय इथे. बरीच वर्ष झाल्याने नीट्सं काही आठवत नाहीये. फोटोही मिळतील बहुतेक.
सावली फोटो मोठ्या आकारामधे
सावली फोटो मोठ्या आकारामधे हवे होते. लहान आकारात फार काही छान वाटले नाहीत.
नादखुळा, पांढरे आकाश तसेच
नादखुळा, पांढरे आकाश तसेच ब्राईट होते.
सायो
केपी अजुन मोठे टाकता येणार नाहीत फोटो
सहियेत फोटो सावली. हिरोशिमा
सहियेत फोटो सावली.
हिरोशिमा आणि मियाजिमा दोन्ही अविस्मरणीय आहेत.
सही आहे एकदम..
सही आहे एकदम..
मलाही वर्णन वाचून मियाजिमाला
मलाही वर्णन वाचून मियाजिमाला जायची खूप इच्छा होतेय. बाकी फोटो चांगलेत पण कमी आहेत.
सुंदर फोटो पण कमी आहेत.
सुंदर फोटो पण कमी आहेत. देवळाच्या आतले नाहित का ?
हा कमानीचा आकार खूप ओळखीचा वाटतोय. कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय. (सिंगापुरला का ?)
फोटो दिसत नाही आहेत.
फोटो दिसत नाही आहेत.
सुंदर !
सुंदर !
मस्त असणार हे ठिकाण...
मस्त असणार हे ठिकाण... पहिल्या फोटोतील दगडांची पाऊलवाट (स्टेपिंग स्टोन्स) आवडले. आणि सर्वात शेवटच्या फोटोतील पाण्यावर उमटलेले मावळत्या सूर्याचे रंग, ती देवळाची फ्रेम....आणि मागच्या धूसर डोंगररांगा...
मस्त फोटो आणि त्याला साजेसे
मस्त फोटो आणि त्याला साजेसे वर्णन
आडो, दिनेशदांना अनुमोदन. थोडे अजुन फोटो पाहिजेत.
पहिला फोटो फार आवडला.
पहिला फोटो फार आवडला.
मस्त फोटो सावली. तुझी
मस्त फोटो सावली. तुझी काँपोझिशन्स नेहेमीच मस्त असतात.
मस्त फोटो आणि वर्णन!
मस्त फोटो आणि वर्णन!
मस्त
मस्त
फोटो छानेत.
फोटो छानेत.
ह्म्म्म वाचून आणि प्रचि पाहून
ह्म्म्म वाचून आणि प्रचि पाहून एकदम मन भुतकाळात शिरले आणि नात्सुकाशिई वाटायला लागले.
आम्ही सहकुटूंब जाऊन आलेलो हिरोशिमा, मियाजिमाला. पण रोपवे बंद असल्याने आसमंत तोरीच्या डोळ्यांनी पहाता आला नाही.
सुंदरच.. पहिला फोटो तर खूपच
सुंदरच.. पहिला फोटो तर खूपच आवडला !
मस्त फोटो आणि माहिती.
मस्त फोटो आणि माहिती. धन्यवाद.
सुंदर!!!! पहिला आणि शेवटचा
सुंदर!!!!
पहिला आणि शेवटचा खासच
बेटावरच्या जंगलाचे, हरणांचे फोटो टाका की
मस्त आहेत फोटो आणि माहिती ..
मस्त आहेत फोटो आणि माहिती ..
पवित्रपणा राखण्यासाठी जन्म-मृत्यू दूर ठेवणे की कल्पना intriguing आहे ..
@रैना, हो खरच अगदी
@रैना, हो खरच अगदी अविस्मरणीय. हिरोशिमा वेगळ्या लेखात.
@हिम्सकूल, धन्यवाद
@आडो, ये ना मग इथे.
@दिनेशदा, मलाही पहिल्यांदा पाहिल्यावर हे ओळखीचे वाटले होते. कारण समजत नव्हते. पण गुगल मधे या तोरीइ आणि आपले स्तुप यांचा काहि एक संदर्भ आहे असे वाचले होते. कदाचित तेच कारण असावे.
इथली देवळे आतुन फार काहि वेगळी नसतात. खुप खांब , मोठे पॅसेज. मुर्ती फक्त बुद्धिस्ट देवळात असते. इतर देवळात काय असतं ते मला माहित नाही. अशाच देवळाचे आतले फोटो मी आधी एकदोनदा टाकले आहेत म्हणुन पुन्हा नाही टाकले.
@nshelke पिकासो अल्बम बॅन असतील तुमच्याकडे.
@भाऊ धन्यवाद
@अरुंधती धन्यवाद. हो फार सुंदर आहे हे ठिकाण. इथे किमान एका दिवसाचे वास्त्यव्य करायला हवे असे वाटत होते.
@महेश रोप वे ने वर गेल्यावर फार सुंदर दिसते.
आम्ही गेलो तेव्हा सगळीकडे पुर्ण ढग होते. अगदी दहा फुटांवरचेही दिसत नव्हते. नंतर फक्त काहि मिनीटे जोरात वारा आला आणि ढगांचा पडदा दुर झाला. अप्रतिम समुद्र आणि हिरवी बेटे. पण पुन्हा एकदा काही मिनीटात ढगामागे गेलं सगळं.
@सशल खरतर विचित्र आहे ना. भिक्षुना मृत्यू आणि जन्माला दूर ठेवायची काय गरज.
जिप्सी, शैलजा, नंद्या, स्वाती२,रोहित, सिंडरेला,Yo.Rocks,स्वाती_आंबोळे,लाजो,सशल धन्यवाद
फोटो कमी टाकले कारण जे दाखवायचे होते ते या फोटोत दाखवले असे मला वाटले. खुप फोटो टाकले की नेमके काय दाखवायचे होते त्याकडे दुर्लक्ष होते
जंगलाचे फोटो आणि देवळाचे फोटो यांचा मुड पुर्ण वेगळाच आहे.
जपॅन मधे कधी जायचा योग आला तर
जपॅन मधे कधी जायचा योग आला तर काय काय पहायच ह्यात हे एक पण ठिकाणं आलं, खुप छान सविस्तर माहिती आणी त्या जोडीला फोटोज पण. आवडलं
फार छान आहे जपॅन. मियॅजिमा
फार छान आहे जपॅन.
मियॅजिमा खुप शांत आहे असे दिसते. मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे.
सुंदर आलेत फोटो. पूर्वीच्या
सुंदर आलेत फोटो.
पूर्वीच्या काळी म्हातार्या भिक्षूंना आणि साधुंनापण प्रवेश द्यायचे नाहीत का, त्यांचा बेटावर मृत्यु झाला तर काय करायचे?
सावली खुपच छान फोटो.
सावली खुपच छान फोटो.
लई झ्याक! रंग, काम्पो आवडले.
लई झ्याक!
रंग, काम्पो आवडले.
छान फोटोज् आणी सुंदर
छान फोटोज् आणी सुंदर माहिती...
रच्याकने, काही फोटोत "titled horizon" आहे. ते fix केले तर फोटोज् आणखिन छान दिसतील.
Pages