एक होता दगड! जाता जाता एका पांडूने पान खाऊन टाकली पिंक त्यावर! दगड हिरमुसला. कारण त्याच्यावर लालसर डाग पडला. बाकीचे दगड हासले. पांडू रोजच यायचा जायचा. रोज पिंका! कारण पांडूचे घर जिथे होते तिथून बरोब्बर पान थुंकायला येईल अशा ठिकाणी हे चार पाच दगड होते. वर्षभरात त्या दगडांचा म्हसोबा झाला.
आज तिथे जत्रा भरते.
पंचक्रोशीतले दगड मिरवत येतात. बायकांच्या अंगात येतं! व्यवसाय निघतात. फुगे, साखरफुटाणे, फुलाच्या वेण्या, बिड्या इत्यादी! आता कुणाची टपरी कुठे हे ठरले आहे तरी जागेवरून भांडतात.
हायवे करणार म्हणाले तिथून! आंदोलन झालं! एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी पेपरात जाहीर माफी मागीतली. हायवे रद्द!
वर्गण्या काढून दगडांच्या आजूबाजूला मंदिर बांधलं! माणसं उन्हात अन दगड छपराखाली!
लग्न झाल्यावर पहिला नमस्कार तेथे! म्हणजे नागपूरात लग्न झालं तरी सोलापूरला येऊन नमस्कार करणार!
आता अंतरांमुळे आणि यायला जायला लागणारा वेळ आणि पैसा बघून लोकांनी ठरवलं! असाच एक दगड आपला भागात लालेलाल करून मस्त छपराखाली ठेवायचा.
मग मूळ दगडापेक्षा प्रतिकृती अधिक भव्य झाल्या. दर दहा मैलाला भाषा बदलते. पण दर पाच मैलाला दगड बदलू लागले.
त्यावरून भांडणं! ओरिजिनल कोणता दगड हा विषय!
शेवटी एकदा दगडांचीच सभा झाली.
राहायचं कुठे??
जिथे जाऊ तिथे ओरिजिनॅलिटीवरून मारामार्या!
एका दगडाने नाक मुरडले. दुसरा त्याला म्हणाला "का रे?"
तर म्हणे 'किती घाण येतीय'!
"अरे ती शेणाचीय, या शेणानेच तर घरं सारवतात"
"पण हे शेण कुणाचंय?"
"ती काय ती गाय"
"ही गाय?? एवढी मोठी?? आपला प्रश्नच सुटला की कुठे जायचं त्याचा?"
मग सगळे दगड सूक्ष्म स्वरूपात गायीच्या पोटात नांदू लागले.
पांडू आजही पिंक टाकतो. म्हातारा झालाय आता. पण त्याला आठवतं! आपला पान खाण्याचा आनंद म्हणजेच तेहतीस कोटी देव! जे काय केलं ते आपण स्वतःच केलंय!
पण सांगणार कुणाला? त्याला स्वतःलाच तर आठ मुलींच्यावर नववा मुलगा झाला त्या दगडाला नवस बोलून!
================================
-'बेफिकीर'!
तेहतीस कोटी ही जुनी देवगणना
तेहतीस कोटी ही जुनी देवगणना झाली आज नवीन अपडेट पहायला हवा..
बाकी मनोरंजक आहे.
चांगलं आहे.
चांगलं आहे.
विषय चांगला मांडलाय. अवांतर
विषय चांगला मांडलाय.
अवांतर -मी सुद्धा त्या पांडूलाच शोधतोय त्याने पिंका टाकल्या नसत्या तर इथे ३३,००००००१ वा देव (माझा नाही ) इथे शाब्दिक कोट्या करत फिरला नसता.
(No subject)
मस्त कविता आहे!
मस्त कविता आहे!
सही
सही
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद
एकदम झकास !!
एकदम झकास !!
नेमकं टोचलं ! सावधान ,
नेमकं टोचलं !
सावधान , बेफिकीरजी ! गाईच्या प्रतिकामुळें 'आ बैल, मार मुझे' म्हटलंय तुम्ही !!!
मार्मिक.
मार्मिक.
(No subject)
सुंदर विषय छान माडंलाय!
सुंदर विषय छान माडंलाय! आवडलं!!!
सही ......... छान....
सही ......... छान....
छान चिमटा काढलाय. मार्मिक.
छान चिमटा काढलाय.
मार्मिक.