बालगंधर्व

Submitted by चीकू on 7 May, 2011 - 09:18

कोणी हा चित्रपट बघितला आहे का? सुबोध भावे च्या सकाळ मधील लेखनामुळे खूप उत्सुकता वाढली आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालगंधर्वांच्या जीवनशैलीविषयी गेल्या लोकप्रभात एक लेख आहे, ती एक वेगळीच बाजू होति. शिवाय ते लेखन तात्कालिन समीक्षकांनीच केल्यामूळे खोटे असायची शक्यता नाही. (स्पॉयलर : त्या लेखाने कदाचित चित्रपटाचा प्रभाव कमी होईल. म्हणून लिंक देत नाही.)

दिनेश ते सगळे कदाचित खरे असेलही.

माणुस गेल्यानंतर माणसाची कला मागे राहते, त्याचे दोष विसरले जातात. बालगंधर्व व्यक्तीगत जीवनात कसेही असले तरी त्यांनी रंगभुमीवर लोकांना जो आनंद दिलाय तो महाराष्ट्रात तरी विसरला जाणार नाही.

आज दुबई मध्ये हा चित्रपट पहायची संधी मिळाली तेही दुबै मा.बो. करांसोबत.

एकंदरीत सुबोध भावे याचा उत्कृष्ट अभिनय आणि सुंदर संगीत (गीते) या बळावर चित्रपट तरून जातो. किंवा संपूर्ण चित्रपट सुबोध भावेचा आहे. अगदी त्यातील स्त्रीपात्रांपेक्षाही त्याने ऊभी केलेली स्त्री पात्रे जास्ती विश्वसनीय, खरीखुरी वाटतात. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे वाटते.

बाकी संपूर्ण पूर्वार्ध आवडला, मध्यंतरानंतर मात्र जाम बोअर वाटला. शिवाय प्रचंड दु:खद बनवला आहे. एकंदरीत दु:खद छटा शेवट्पर्यंत व्यापून रहाते. ईथे वर स्वाती ने म्हटल्याप्रमाणे-
>> त्यांच्या आयुष्यातले कठीण आणि दु:खदायक चित्रिकरणच जास्त झालंय असं वाटलं.
म्हणजे, कलाकार म्हणून त्यांची असामान्यता, एकमेवाद्वितिय असणे यापेक्शा त्यांच्या झालेल्या चूका, फसवणूक यांवर जास्त भर दिला गेला..

खेरीज एडीटींग वा तांत्रिक चूका देखिल जाणवल्या. त्यात सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे बालगंधर्वांच्या पत्नी त्यांच्या लहान मुलीला पाळण्यात झोपवताना सहज "अरे संसार संसार" या ओळी गुणगुणताना (शब्द नव्हे निव्वळ सूर) दाखवलय. पण ते गुणगुणणे कींवा चाल ही नंतर १९५० च्या दशकात आलेल्या "संत बहिणाबाई" या चित्रपटातील आहे. बालगंधर्वांचा बराचसा काळ हा स्वातंत्र्यपूर्व, त्यातही लग्न आणि पहिले मूल हे १९४० च्या दशकातील असल्याने त्या वेळी त्यांची पत्नी ती "फेमस" चाल गुणगुणेल याची सुतराम शक्यता नाही. बहिणाबाईंचा काळही स्वातंत्र्यपूर्व, पण म्हणून त्या कवितेचे शब्द तेच असले तरी चाल मात्र नंतर आलेल्या चित्रपटातील गीतासारखी असेल ही शक्यता १% देखिल असणे अवघड वाटते.
नेमकी चित्रपटनिर्माते स्वतः नितीन देसाई तिथे ऊपस्थित असल्याने मी त्यांना चित्रपट संपल्यावर हा प्रश्ण विचारला पण ते समाधानकारक ऊत्तर देवू शकले नाहीत.
याशिवाय बालगंधर्वांचे ऊतार आयुष्यात स्वताच्या कुटूंबाला सोडून गोहरजान कडे रहाणे अगदीच फास्ट ट्रॅक दाखवलय.. त्यांच्या चित्रपटातील एकंदर व्यक्तीरेखेपूढे तो भाग अजीबातच कंव्हिंसिंग वाटत नाही. (बालगंधर्व चित्रपटात त्यांना गोहर"बाबा" म्हणताना दाखवलय.. काही झेपलं नाही).

बाकी ईतरही काही गीते काढून त्या जागी जास्त ईतर तपशील वा गोष्टी वगैरे दाखवल्या असत्या तरी चित्रपटाला अधिक वेग मिळाला असता असे वाटते. (परवरदीगार हे शंकर महादेवनच्या आवाजातील सुंदर गीत आहे.. पण त्याने चित्रपट पूढे जात नाही.. निव्वळ जागा भरली जाते!)

आनंद भाटे लाजवाब. बराचसा न्याय दिला आहे बालगंधंर्वांच्या गीतांना.
मला सर्वात आवडलेल गीत/ठुमरी आर्या अंबेकरने गायलेले- परियेवा के पायल सजनी

चित्रपटाचे दृष्य मूल्य ऊच्च आहे यात वाद नाही आणि नितीन देसाई या नावाशी ते ईमान राखून आहे. हा चित्रपट कधी कधी तुकडे जोडून बनवलेली डॉक्यू वाटतो पण नितीन देसाईंकडून भविष्यात चांगले चित्रपट पहायला मिळतील अशी खात्री आहे. त्यांच्या कंपनीला व टीम ला शुभेच्छा!

एकुणातच सिनेमा मला आवडला. तो सगळ्याच बाजुंनी सुंदर होण्यामागे सगळया टीमचे कष्ट, कौशल्य, संशोधन आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि त्यांना मनापासुन धन्यवाद.
ज्या माणसानं आपल्या पहिल्याच बाळाच्या मृत्युनंतरदेखिल 'माझ्या दुखा:चा भार मी भामिनीवर पडु द्यायचा नाही' म्हणत नाटक आणि मायबाप रसिकांशी इमान राखलं त्यानं शालु, अत्तरं किंवा दागिन्यांच्या बाबतीत पैशासारख्या गोष्टीचा विचार कसा करावा? खरच त्यांना प्रामाणिक आणि व्यवहाराची बाजु सांभाळुन घेणारी माणसं मिळायला हवी होती असं वाटत राहीलं. काय विलक्षण आयुष्य जगलाय हा माणूस!
मला गाण्यातलं फारसं कळत नाही त्यामुळे त्याबाबतीत काही लिहीण्याचा आगाऊपणा मी करू नये. मला सगळीच गाणी आवडली. दुरदर्शनच्या कृपेनी जवळजवळ सगळी ऐकली होतीच पण 'दया छाया घे' मात्र कधीच ऐकलं नव्हतं. पु.लं. च्या 'गुण गाईन आवडी' मधे त्याबद्दल वाचलं होतं. ते गाणं आणि नांदी पहिल्यांदाच ऐकायला मिळाली.
सुबोध! तो जितका गोड दिसतो त्यापेक्षा त्याचा अभिनय जास्त चढत जातो. स्त्रीवेषात असो की पुरूषवेषात तो सुरेख वागतो, बोलतो. जराशा म्हातारपणाकडे झुकलेल्या नारायणरावांचं चालणं बघा. केवळ सुंदर दिसणं नाही तर तो खरच बालगंधर्व जगलाय. क्या बात है! केशवराव गेले हे कळल्यावर बालगंधर्वांची जी रिअ‍ॅक्शन सुबोध नं दिलीय ती मला जबरी आवडली. दु:ख, निराशा, क्षणभर हतबल, जरा काही चांगलं व्हायला सुरवात होतेय तर हे असं का आणि मग अ‍ॅक्सेप्टन्स. हे सगळं एक अक्षरही न बोलता. सहीच!
बालगंधर्वांच्या कपडेपटाबद्दल वर बर्‍याच जणांनी म्हंटलय ते बरोबरच वाटलं. मागे बंद्/नाडी असलेले,जरदोसी वर्क,केलेले ब्लाऊज, साड्या याबद्दलही अनुमोदन. मात्र इतरांचे क्रीम कलरचे बुशशर्ट, धोतर, बंड्या, टोप्या, बायकांच्या साड्या, संस्थानिकांचे कपडे मस्त वाटले. त्या काळात असल्याचं फिलींग आलं.

सिनेमा पाहतांना काही प्रश्न पडले, "मी फाटकं धोतर नेसेन पण भामिनीला शालु...." वगैरे म्हणणारे नारायणराव चांदीच्या ताटात जेवणावळीचा अट्टाहास का करत असावेत?
"कितीही प्रेमानं दिली तरी भिक्षाच नां ती?" म्हणुन दीड लाखाची थैली नाकारणारे मानी नारायणराव गौहरकडे काय म्हणुन गेले? ती काही फार प्रेमानं त्यांच्याशी वागत होती असं चित्रपटात तरी दिसलं नाही. बायकोशी त्यांचे संबंध (त्याकाळाच्या मानानी) खूपच चांगले असल्याचं दिसलं.
ज्यांना कुणाला कर्ज फेडण्यासाठी नारायणरावांना मदत कराविशी वाटत होती त्यांनी परस्पर ते कर्ज का मिटवुन टाकलं नाही?
असो. अहो सगळं आयुष्य ज्याच्यासोबत जगलो ती व्यक्तीही पूर्ण समजलीच असं १००% म्हणता येत नाही, मग अडीच तासांचा सिनेमा आणि १-२ लेख यातुन तरी एखादा माणूस सगळा कसा समजावा? हा तर दैवी माणूस! सामान्यांच्या मापपट्ट्यांत असामान्याची उंची मोजता येत नाही असं कुणाचं तरी वाक्य आठवतंय.

बालगंधर्व परवा पाहाण्याचा योग आला.. केवळ अप्रतीम! सुबोधबद्द्ल बोलावे तितके कमीच. सगळ्यांचीच कामे छान झाली आहेत. एक दोन तपशीलातले मुद्दे जरा खटकले. उदा. केशवराव भोसले यांचे निधन कोल्हापुरात टॉयफॉईडने झाले होते, मुंबईत ह्रदयविकाराने नाही. तसेच स्त्रीभूमिका करायला लागल्यापासून नारायणरावांनी लांब केस वाढवले होते, ते गंगावन वापरत नसत. लोकांत वावरताना नेहमी फेटा घालून असत. चित्रपटात एकदम छोटे केस दाखवले आहेत.
तसेच काही ठिकाणी बालगंधर्वांचे उदात्तीकरण करण्याचा मोह आवरता आला नाही. केशवरावांचे रूप वा गायकी याची बालगंधर्वांनी प्रयोगाच्या दिवशी मोकळ्या मनाने प्रशंसा केली नव्हती उलट त्या दिवशी केशवराव आपल्यापेक्षा सरस ठरले याचा त्यांच्या मनात जरा राग होता. केशवरावांच्या सर्व पदांस वन्स मोअर मिळाला पण बालगंधर्वांच्या एकाही पदास मिळाला नाही. त्यामुळे नाराज होऊन प्रयोग आटोपल्यावर ते केशवरावांशी न बोलता निघून गेले होते असे वाचनात आहे.
अर्थात हे काही मुद्दे वगळले तर एकूण चित्रपट फार सुंदर झाला आहे. चित्रपटाशी संबंधित सर्वांचे मनापासून अभिनंदन !!

मीही परवा पाहिला. आवडला हे सांगणे नलगे.
तरी पण : पूर्वार्धात बालगंधर्व हा कलावंत कसा घडला हे पहायला आवडले असते.
उत्तरार्धात व्यक्ती म्हणून त्यांचा प्रवास अर्थातच काळीज हलवून जातो.
आनंद भाटे : प्रचंड आश्वासक. माझ्या आणि त्याच्या लहानपणी दूरदर्शनवर पाहिलं होतं गंधर्वगीत गाताना. इतक्या वर्षांनी पुन्हा ऐकून, अरे हा ठेवा हरवलेला नाही, चांगला सांभाळलाय असा सुखद धक्का बसला.
अन्यत्र शात्रीय गाण्यांवर उत्कृष्ट अभिनय करणार्‍यांबद्दल लिहिलं गेलं आहे. त्या यादीत सुबोध भावेचं नाव घालता आलं असतं तर चार चांद लग जाते. गातानाचा क्लोज अप अजिबात नाही. Sad तेवढी आणखी मेहनत का नाही घेतली?

आकाशवाणीवर बालगंधर्वांच्या आवाजात नाट्यगीते वाजतात. पण ध्वनिमुद्रणाचा दर्जा Sad

दूरदर्शनवर सुहासिनी मुळगावकरांनी केलेली गंधर्वगीतांवरची मालिका आणि आकाशवाणीवर, ज्यांनी बालगंधर्वांवर डॉक्टरेट केली आहे, अशा एका विदुषींनी(नाव आथवत नाही) सादर केलेली मालिका काळाच्या ओघात टिकल्या असतील का?

मीही काल बघितला बालगंधर्व ..

इकडे सगळ्यांनीं बरंच लिहील आहे आणि श्रुती ने लिहील्याप्रमाणे अशी दैवी देणगी लाभलेल्या कलाकाराबद्दल आपण काय बोलणार ..

पण चित्रपट पूर्णपणे आवडला असंही नाही आणि नाही आवडला असंही नाही .. मला तर अजिबात फारशी माहिती नव्हती त्यांच्याबद्दल त्यामुळे बरंच काही कळलं .. पण मी फार पॉझिटीव्हली प्रभावीत होऊन बाहेर पडले असं वाटत नाही ..

जर कलाकाराची कलाच लक्षात ठेवावी बाकी तपशील नाही तर चित्रपट काढून ते दाखवले तरी का? त्यांच्याबरोबर स्त्रीपात्र रंगविणारे बाकीचे दोन (एक अभिजीत केळकर त्यातला) तर कायम रडतच होते .. मुलगी गेल्यावर बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून गदगदून रडणारे बाल गंधर्व मग म्हातारपणात कसे काय त्या गोहर बाईकडे जातात हा तर एक मोठाच प्रश्न .. केवळ बायको काही वेळा व्यवहारीपणावरून, पैशावरून बोलते म्हणून? त्यांची आई शेवटी म्हणते की ईश्वरी देणगी लाभलेला गंधर्व तो, त्याला सामान्य माणसाच्या आयुष्यात जखडण्याची चूक माझ्याकडून झाली असं .. पण मला हे उदात्तीकरण नाही पटत ..

सुरूवातीला अतिशय सुंदर गाणारा लहान मुलगा ते स्त्रीपात्र अस्खलीतपणे, भव्य-दीव्यपणे साकार करणारा कलाकार हे ट्रांझीशन खरंच कळलं नाही ..

रंगमंचावरचे बालगंधर्व आणि गोहरबाई सोडून बाकी सगळ्यांच्या वेषभूशा फारच छान झाल्या आहेत ..

खुप दिवसानी पाहिला , खुप आवडला! अनेक दिवसानी एक अतिशय चा.न्गली कलाक्रु ती बघायला मिळाली, सुबोध भावेने अप्रतिम काम केलेय तो दिसलाही खुप छान, सचिन न.न्तर स्त्री वेषभुशेत उत्तम दिसलेला सुबोधच असावा..
जरदोजी वर्क केलेल्या सगळ्याच साड्या सुरेख आहेत पण त्या त्याकाळातल्या वाटत नाह्ति त्यामुळे विस.न्गत
वाटतात आणी खटकतात सुद्धा त्याएवजी भरजरी शालू,शेले आणी पैठण्या घ्यायला हव्या होत्या.

Pages