''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''
इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...
आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस
वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...
''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''
'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''
.....................................................
संबंधित लेख आजच्या श्री स्वामींच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून लिहिला आहे.. पण हा लेख नेमका कोणत्या कॅटेगरीत येतो हे न समजल्यामुळे मी तो ललित मध्ये टाकीत आहे...
........ वरील लेखात काही चुकले असल्यास माझ्या बालबुद्धीचा आवाका लक्षात घेऊन माफ करावे व माझ्या चुका मला दाखवून द्याव्यात ही नम्र विनंती...
....वैदेही...
श्री स्वामी समर्थ जय जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
|| श्री स्वामी समर्थ जय जय
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळं पाठीशी रे |
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी || १||
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय |
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ||२||
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळूदे |
जगी जन्म म्रुत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा || ३||
खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ||४||
विभूती नयननाम ध्यानांदी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामॄतात |
हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||५||
श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तू
~~~सूचना~~~
श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र म्हण्ताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे, जळत्या उदबत्तीची राख ,
पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी, आणी ते पाणी तीर्थ म्हणून प्यावे. ( असे त्यात सांगितले आहे,
पण मी नुसतच पाणी पिते)
तारकमंत्र दररोज सकाळी एकदा म्हणावा.
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
|| श्री स्वामी समर्थ जयं जयं
|| श्री स्वामी समर्थ जयं जयं स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जयं जयं स्वामी समर्थ ||
|| श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ||
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: | ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कल्कोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक
|| ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने,
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या
निमित्ताने || ८ ||
कुर्हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी
|| ९ ||
श्री स्वामी समर्थ जय जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
एका भक्तानें केला प्रश्न,
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | एसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
shre swami samarta
shre swami samarta
श्री स्वामी समर्थ स्वामी ,
श्री स्वामी समर्थ स्वामी , स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ स्वामी, स्वामी समर्थ
ज्या ज्या स्थळी हे मन जाय
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे
त्या त्या स्थळी ते निज रुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही
सदगुरुनाथ महाराज की जय
अरे वा.. काश्यप गोत्र..
अरे वा.. काश्यप गोत्र.. म्हणजे आमचे गोत्र
दत्तात्रया तुम्ही निराकार
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्त्व्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले |
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कल्कोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ |
जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार |
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे
|| २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
सही चाल्लंय निराली विपु
सही चाल्लंय निराली
विपु बघितलीस का?
निराली, मस्त निराली कॉनसेप्ट.
निराली, मस्त निराली कॉनसेप्ट. लिहीत रहा.
महाराज कर्दळी वनात प्रकटले.
महाराज कर्दळी वनात प्रकटले. मग काश्य्प गोत्र कुठून आले.. एक शंका .
@अश्विनी के हो गं कालच
@अश्विनी के हो गं कालच पाहिली. मला बरेच दिवस हे विपु प्रकरण माहितच न्हवतं. मी नक्की स्तोत्रच्या बाफ वर पोस्ट करीन. ( I am honored )
@monalip हो गं स्वामींची कृपा.
@जागोमोहनप्यारे तुझं उत्तरं बहुतेक पुढ्च्याच ओवीत आहे ( न. १२)
स्वामी सर्वसाक्षी उदार |
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
खरें खोटें देव जाणे | बरें
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी
श्री स्वामी समर्थ जय जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही
दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा
|| ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले |
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी
|| ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी |
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना
|| ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला
|| ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
दोनेक वर्षा पुर्वी रमेश देव
दोनेक वर्षा पुर्वी रमेश देव यान्चा वासुदेव बळवंत फडके हा च्रित्र्पट पाहीला त्यात आद्यक्रांतीकार वासुदेव बळवंत फडके हे गजानन महाराजा पाशी आशिर्वाद घेण्यासाठी जातात तेव्हां महाराज वासुदेव बळवंत फडके यासं हाकलून देतात असे दाखवले होते ह्याचे कारण कोणी सान्गू शकेल काय ?
कारण ह्याच च्रित्रपटात नन्तर वासुदेव बळवंत फडके हे काली मातेची आराधना करतात व माता त्यानां प्रसन्न होते असे दाखवले होते.
गजानन महाराजाचा ब्रिटीशांपासूनच्या स्वातंत्रा ब द्दल का य विचार होता? जाणकारांनी प्रकाश टाकावां.
Pages