"ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक......"
आधी तर कळेच ना, भर हापिसात एवढ्या जोरात कुठला रेडा, रेडीला आळवतोय ते. समोरच्या क्युबिकलमधली बकरी (हो बकरीच, रेडी म्हणावी इतकी वाढलेली नाहीये अजुन) डोळे विस्फारून माझ्याकडे बघायला लागली. मी चाट पडलो, पटकन पेपर स्टँडला लटकवलेला गॉगल हातात घेतला आणि माझा चेहरा बघीतला. व्यवस्थित होता. (अजून तरी पिताश्रींनी जा तोंड काळे करा असा हुकूम या आज्ञाधारक बालकाला दिलेला नाहीये). मी तिला डोळ्यांनीच खुणा करत विचारलं..
"काय्ये?"
तोपर्यंत हापिसातले इतर थोबडे माझ्याकडे लागले होते.
"तुम्हारा सेलफोन बज रहा है पागल."
तीने आनंदाने सांगितले आणि लक्षात आले की आपला पोपट झालाय. माझाच बोंबल्या बोंबलत होता. सकाळी बहुदा नेटवरून हे गाणं डाऊनलोड करुन घेतलं तेव्हाच चुकुन रिंगिंग टोन म्हणून सेट केलं गेलं होतं आणि त्यानंतर हा पहिलाच फोन असल्याने लक्षातच आलं नव्हतं. मी बावळ्यासारखा तिच्याकडे बघत उभा राहीलो. तीने डोळे मोठे केले तेव्हा भानावर आलो आणि फोन घेतला...
"मगु, .... दिना मनिगे बा. मुख्यवागिरदु केलसा इदे. " (चिरंजीव, .... तारखेला घरी या, महत्त्वाचं काम आहे?) त्या बाजुला आमचे परमपुज्य पिताश्री होते.
"याव दिना ? इल्ला, इल्ला आगुदिल्ला. आगुदिल्ला आगुदिल्ला. रजे शिगुदिल्ला. मत्तोंदु दिना नोडी." ( कुठली तारिख? नाही, नाही शक्य नाही? जमणार नाही? रजा नाही मिळणार? नंतरचा एखादा दिवस ठरवा.) मी ठामपणे नकार कळवला. आतुन मात्र हललो होतो. आता फुले पडणार..........!
मग फोनवर जे काही ऐकावं लागलं त्यापेक्षा ही जमीन दुभंगून मला पोटात घेइल तर बरे असे वाटले. पण हापिस चौथ्या मजल्यावर असल्याने तेही शक्य नव्हते. पण शेवटी पिताश्रींना माझे म्हणणे ऐकावेच लागले. प्रसंगच तसा होता....
माझ्यात " मर्दानो, परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. आता लढा नाहीतर मरा!" असे पळणार्या मावळ्यांना ठणकावून सांगणारा सुर्याजी मालुसरे संचारला होता ना.
********************************************************************
"ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक......"
यावेळेस मात्र मी लगेचच बोंबल्याचा गळा दाबला. (सायलेंट केला) आणि कॉल उचलला...
"अबे चिकणे, तय्यार हो जा...!" (हा नक्की आमचा येडा असणार, प्रत्येक वेळी मला चिकण्या म्हणून विनाकारण काँप्लेक्स देण्यात याला काय आनंद (आसुरी) मिळतो कुणास ठाऊक?
मी पटदिशी बोलून गेलो की "मी कायम रेडीच असतो." तशी पुढची बकरी परत माझ्याकडे बघायला लागली. तसा मी पटकन सावरून घेतले. म्हणजे मी तयारच असतो बे, पण कशासाठी?"
"बॉस, पुन्हा एकदा बाईक टूर... यावेळी थेट राजस्थान!"
"हल बे, येडा झाला का काय? भर पावसाळ्यात सह्याद्री पालथा घालायचा सोडून , वाळवंटात काय गठुडं पुरलय व्हय? आपण नाय 'रेडी'! म्हणजे जमणार नाही यावेळेस? तुमचं तुम्ही जा....! मला रजा नाही मिळणार आता."
तसा तिकडून क्षणभर फोन नि:शब्द झाला. गेले दोन महीने मीच मागे लागलो होतो राजस्थानला बाईक टुर काढुया म्हणून आणि आता मीच नाही म्हणत होतो.
"अबे, ठिक आहेस ना? का मारला सकाळी-सकाळीच एक चपटी?"
"तसं नाही बे, त्या दिवशी नाही जमणार... ! त्याच्यानंतर महिन्याभराने ठरवा."
मी आधीच मार्जीन घेवून ठेवले कारण सकाळीच पेटलेले पिताश्री कुठली तारिख ठरवताहेत काहीच कल्पना नव्हती, त्यावेळीही नाही म्हणलो असतो. तर पुण्यात येवुन बायकोसमोर काढली असती आमची त्यांनी.
********************************************************************************
च्यायला यांना पण आत्ताच काढायची होती ही टूर?
मंडळी ....... या तारखेला तुम्हीही काही कार्यक्रम, टूर, सहल ठरवली असेल तर आत्ताच सांगतोय कॅन्सल करा. नाहीतर माबोच्या अप्सरेच्या जागी घारुआण्णांना दंड घेउन ढिंक चिका..ढिंक चिका...ढिंक चिका ढिंक...... करायला लावीन आणि सक्तीने सगळ्यांना बघायला बसवीन.
मग...? सोलापूरचा गब्बर म्हणत्यात आपल्याला!
अरे हो आण्णा, कितने आदमी होना रे तुमको ववि के लिये? मेरी बंदुक लाव तो इदरको...
अभ्भी के अभ्भीच सबका रजिस्ट्रेशन कर डालते है!
चला माबोकर्स , तय्यार व्हा...
यंदाच्या पावसाळ्यात मायबोलीकरांच्या हक्काच्या वर्षाविहाराला.........
स्थळ आणि दिनांक लवकरच जाहीर केले जाईल.
"कोण बे तो जागा आणि दिनांक कळल्याशिवाय यायचं का नाही कसं ठरवायचं म्हणणारा?" सोलापूरी गब्बरशी गाठ आहे. कुठं जायचं ते लवकरच सांगतो. तोवर आपापल्या जागा इथंच पक्क्या करून ठिवा. नायतर ठाकुरअण्णालाच नाव सांगीन. कळ्ळं?
ववि संयोजक
अरे वा लय भारी
अरे वा लय भारी
नमस्कार,सर्वांनी दिलेल्या
नमस्कार,सर्वांनी दिलेल्या पोस्टस आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
असाच उत्साह वविची उपस्थिती, टीशर्टसची खरेदी आणि अर्थात ववि वृत्तांतापर्यंत काय असु दे!!
आपल्या सर्वांच्या सहभागामुळे दरवर्षी च्यारीटीची रक्कम आपण सतत वाढती देत आहोत यंदाही असेच सहकार्य मिळेल अशी आशा करतो.
लवकरच वविचे ठिकाण/तारीख व इतर माहीती तसेच टीशर्ट संदर्भत अधिक माहीती या बाफ वर वेळोवेळी येत राहील.
ललिता प्रीति>> योग्य तो बदल केला गेला आहे
वविला यायचं तर कन्नड शिकाव
वविला यायचं तर कन्नड शिकाव लागेल का?
वॉव.. नुस्ती दवंडी ऐकूनच
वॉव.. नुस्ती दवंडी ऐकूनच उत्साहाचं वारं वाहू लागलेलं दिस्तंय..
वविला यायचं तर कन्नड शिकाव
वविला यायचं तर कन्नड शिकाव लागेल का?
घरी कानडी ऐकाव लागत ते काय कमी आहे ?
वविला यायचं तर कन्नड शिकाव
वविला यायचं तर कन्नड शिकाव लागेल का?
>>>> तिथल्या तिथे सोलापुरकरांनी कन्नडचा क्लास घ्यावा.
व वि संयोजन समिती चं एक धागा
व वि संयोजन समिती चं एक धागा होतं ना, त्याचं कोणि लिंक देऊ शकतं का, मला सापडत नाहिये.
म्हमई नं बस अरेंजमेंट साठी मी प्रयत्न करतो.
आता काय कन्नड पाऊस पाडणार
आता काय कन्नड पाऊस पाडणार काय? मायबोलीने बहुतेक कानडी-मराठी लोकांना पाठिंबा वजा दिलासा दिलेला दिसतोय. असोत. सोलापूरी आहेत म्हणजे निव्वळ राडा होणार आहे. 'बे' चा एकच पाडा येतो त्यांना.. तोच ऐकावा लागणार प्रत्येक वाक्याच्या शेवटी. अबे, काय बे , चल बे .. ऑल दि बेस्ट सोलापुरकर्स.
तारीख आणि ठिकाण लवकर कळवा. ह्यावेळेस कठीण दिसतयं. तरीही प्रयत्न करू.
मी पण येणारे...
मी पण येणारे...
मि पन येनार मुंबई वरुन कसे
मि पन येनार मुंबई वरुन कसे याय्चे ते कोनि सांगेल का ?
आर्या तुमी पेशल मिमान करून या
आर्या तुमी पेशल मिमान करून या
आणि घ्या... कारण मुंबईवरून बस असते..
यप्पी ... मज्जा ....
यप्पी ... मज्जा ....
आरे पण ववि. कुठे आहे? का
आरे पण ववि. कुठे आहे? का सोलापुरला? (महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण)
मी पण जमवीन बहुतेक...
मी पण जमवीन बहुतेक...
मी ही येणार!!!
मी ही येणार!!!
संयोजकभाऊ, यावेळी यायच
संयोजकभाऊ,
यावेळी यायच आहे..
आता एकदा ठिकाण,दिनांक सांगुन टाकाच !
मी पण येणार ह्यावेळेस!!!
मी पण येणार ह्यावेळेस!!!
अरे वाह ! दवंदी एकदम
अरे वाह ! दवंदी एकदम जोरात....
मी येणार नक्कीच ववि मिसणार नाही..
मी येणार...मी येणार.......मी
मी येणार...मी येणार.......मी येणार.......मी येणार......मी येणार.......मी येणार.....मी येणार...मी येणार.......मी येणार.......मी येणार......मी येणार.......मी येणारमी येणार...मी येणार.......मी येणार.......मी येणार.....
मी येणार...मी येणार.......मी
मी येणार...मी येणार.......मी येणार.......मी येणार......मी येणार.......मी येणार.....मी येणार...मी येणार.......मी येणार.......मी येणार......मी येणार.......मी येणारमी येणार...मी येणार.......मी येणार.......मी येणार.....
यंदा कर्तव्य आहे
यंदा कर्तव्य आहे
आम्ही सुध्दा येणार ..
आम्ही सुध्दा येणार ..
ववि दवंडी पेक्षा ववि धमकी असं
ववि दवंडी पेक्षा ववि धमकी असं नाव द्यायला पाहिजे :फिदी:..... मी येणार!
वैभ्या एकटाच येणार आहेस, की
वैभ्या एकटाच येणार आहेस, की रजनीकांत सारखा रोबोट क्लोन्स घेऊन?
इतक्या वेळा मी येणार लिहिलंयस म्हणून प्रश्न्च पडला..
दक्षे , सोलापूरीला काय
दक्षे , सोलापूरीला काय बोल्लीस तर बघ लई भारी पडलं .आमचं सोलापूर दुन्या भारीय :).मीपण येणार सोलापूरात नक्केच नसेल मुग्धानंद (सोलापूर पर्जन्यछायेचा प्रदेश आहे पर्जन्याचा नाही)
अरेच्चा इथे सोलापूरची बरीच
अरेच्चा इथे सोलापूरची बरीच मंडळी आहेत की!! मी माबोवर येऊन बरच वाचन करते पण चर्चेत भाग पहिल्यांदाच घेत आहे. मी पण मूळची सोलापूरी आहे. ववि ला नाही येउ शकणार पण रिपोर्ट वाचेन.
अरेच्चा इथे सोलापूरची बरीच
अरेच्चा इथे सोलापूरची बरीच मंडळी आहेत की!! >> खरचं की बे... मी पण येणारं... तेव्हढं तारखेचं नि ठिकाणाचं काय ते लवकर कळवा...
लई लई भारी .. बे ... एक्दम
लई लई भारी .. बे ...
एक्दम सोलिड ... काय घपा-घप .. घपा-घप ..लिहलय ..
स्वप्ना, धने, लै भारी. शप्पे
स्वप्ना, धने, लै भारी. शप्पे येति का वविला, नक्की? फोन तर कर मेले.
मी ही येणार... सहकुटुंब...
मी ही येणार... सहकुटुंब...
Pages