क्षण

Submitted by shuma on 3 January, 2008 - 20:15

सारे क्षण अगदी
आतवर भिजलेले
आयुष्याच्या झरोक्यातून
कवडशांत सजलेले
वाट सरली किती जरी
सुगंध आजही ताजा
न चुकता बहरतोच की
मोगरा तुझा माझा
सारे क्षण कसे अगदी
आतवर भिजलेले
वाटा अपुल्या वेगळ्या तरी
संदर्भ इथेच थिजलेले

गुलमोहर: 

सुरेख शमा !! आज बर्याच दिवसांनी !!

वाटा बदलल्या तरी संदर्भ इथेच थिजलेले........ मस्तच

शमा, अग कुठे आहेस? किती दिवसांनी? कविता छानच आहे.

वा शमा. किती दिवसांनी!
मेघा

वाटा अपुल्या वेगळ्या तरी
संदर्भ इथेच थिजलेले
सुंदर, शमा!

सगळ्यांची मनःपूर्वक आभारी आहे
खूप महिन्यांनी मायबोली वर आले व तुम्हा सर्वांची दाद वाचून एक हुरुप आला लिहायला.

शमा

क्या बात है! खासच !
कित्येक वर्षांनी दर्शन?

परागकण

शमा...... अगं किती दिवसांनी गं...... !! खूप खूप छान..... अगदी आतवर पोचणारं Happy

ओय होय....
वाटा अपुल्या वेगळ्या तरी
संदर्भ इथेच थिजलेले

बहोत (च) खूब!
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया