Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आख्खा मसूर ची रेसिपी सापडत
आख्खा मसूर ची रेसिपी सापडत नाहिये..
काल महाबळेश्वरहून परतताना एका ढाब्यावर दोघात ३ प्लेट आख्खा मसूर हाणून आलोय तरी हाव जात नाही !
शेवग्याच्या पाल्याची भाजी कशी
शेवग्याच्या पाल्याची भाजी कशी करतात कोणी सांगू शकेल का...माज्या परसात त्याचे झाड आहे, बरेच दिवस करीन विचार करते पण कशी करायची माहित नाही, हयात पाला भाजून की कहीतरी काराव लागत एवढाच आठवतय.
अजुन एक म्हणजे त्या झाडाला शेवगा अजुन लागलेल्या में तरी पहिल्या नाहीयेत, पण वास अगद्दी तस्साच येतो
मितान, आख्खा मसूर म्हणजे काय?
मितान, आख्खा मसूर म्हणजे काय?
गीतु, इथे आहे ती भाजी.
गीतु,
इथे आहे ती भाजी. http://www.maayboli.com/node/18177
पानाच्या खाली असलेली शोध सुविधा वापरलीत तर हे तुम्हांलाही शोधता येईल
अख्खा मसुर म्हणजे मसुराची उसळ
अख्खा मसुर म्हणजे मसुराची उसळ का?
धन्स मिलिन्द
धन्स मिलिन्द
लाल (चिरल्यावर आतून) तोंडली
लाल (चिरल्यावर आतून) तोंडली भाजीत वापरतात का?
गीतू, आधी झाड कसले आहे त्याची
गीतू, आधी झाड कसले आहे त्याची खात्री करुन घेतली पाहिजे.
रावी, तसा अपाय होत नाही. पण ती नीट चिरता येत नाहीत म्हणून वापरली जात नाहीत.
लाल तोंडली बरेचदा आंबट असतात.
लाल तोंडली बरेचदा आंबट असतात. आणि कधी कधी त्यातल्या बिया पण जुन झालेल्या असतात त्यामुळे एखादा तुकडा तोंडात टाकून मगच वापरायचे की नाही ते ठरवा.
एखाद दुसरे लाल तोंडले
एखाद दुसरे लाल तोंडले सांबारात मस्त लागते. आमचे अहो फक्त कोवळी हिरवी तोंडली ती ही गोल गोल काचर्या खरपूस परतून असेल तरच खात. लाल तर सोडाच एखादे जून हिरवे तोंडले ही चालत नसे. मग मी अर्धा अर्धा तास तोंडली कोवळी शोधून कापत बसत असे. आता सरळ एका तोंडल्याचे चार लांब भाग, व कांदा, लसूण घालून मस्त रस भाजी करते मी. पुण्यात डेक्कनला चितळे समोर जशी कोवळी तोंडली व काकड्या मिळतात तशी कुठेच नाही मिळत.
@ दिनेशदा..... लिंक मधे
@ दिनेशदा..... लिंक मधे दिल्लेल्या फोटो सारखीच पाने आहेत त्या झाडाची..... म्हणजे तेच असाव अस वाटतय ... कोणत्या season मधे शेंगा लागतात, मी ह्या घरात फेब मधे रहायला आले, ४ महिनेच जालेत
@ अश्विनीमामी ...आता सरळ एका तोंडल्याचे चार लांब भाग, व कांदा, लसूण घालून मस्त रस भाजी करते मी >>>> कशी करतात सांगाल का.... गोल गोल काचर्या खरपूस परतून भाजी मलाही आवडते पण फारच वेळ जातो त्यात .....ही रसभाजी ची ही रेसिपे सांगा न
@ दिनेशदा, अश्विनीमामी,
@ दिनेशदा, अश्विनीमामी, मिनोती - धन्स !
.
मी ही दरवेळी लाल तोंडली टाकुनच देते पण आज जरा जास्तच तशी निघाली. पाहुनच कसतरी होतं.
गितु, निदान फुलोरा तरी यायला
गितु, निदान फुलोरा तरी यायला हवा होता. एप्रिल महिन्यात.
रावी, मी आधी लिहिले होते, पिकून लाल झालेली तोंडली हि प्राचीन साहित्यात स्त्रीच्या ओठाच्या रंगाचा मापदंड होता..... बिंबाधरा म्हणजे बिंबा (तोंडली) सारखे लाल ओठ असणारी स्त्री !
तोंडली मध्ये जंगली तोंडलीही
तोंडली मध्ये जंगली तोंडलीही असतात ती कडू असतात. माझ्याकडे आहे तो वेल आणि कित्येक वेळा उपटून तो परत येतोय.
तोंडली, दुधी, पडवळ, शिराळी या
तोंडली, दुधी, पडवळ, शिराळी या सगळ्यांचे जंगली कडू अवतार असतात. रुप तसेच पण चव बघितल्याशिवाय फरक कळत नाही... त्या सगळ्यांना विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील भाज्या म्हणतात.
अख्खा मसुर
अख्खा मसुर http://www.maayboli.com/node/16103
ही असावी
नाही.. आख्खा मसूर म्हणजे भात
नाही.. आख्खा मसूर म्हणजे भात नाही. दाल माखनी सारखा प्रकार होता तो. पण त्यात नारळाचे दूध नि आपला मराठी मसाला होता भरपूर..
आता शोधून टाकतेच इथे रेसिपी..
मी एक अक्खी मसूर उसळ करते ती
मी एक अक्खी मसूर उसळ करते ती अशी - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/05/sprouted-lentil-amati.html
पण ढाब्यावर मी कधी खाल्ला नाही त्यामुळे हेच का ते कल्पना नाही.
इथे एक पर्टूची रेसिपी आहे ती IE मधे वाचा - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/619.html?1150716773
कालच पर्टुच्या पद्धतीने केली
कालच पर्टुच्या पद्धतीने केली होती उसळ. एकदम खल्लास झाली होती. कांदा खोबरं वाटण आणी बडिशेपेचा फारच छान स्वाद येतो.
प्लीज मला कोणीतरी कॅरमल
प्लीज मला कोणीतरी कॅरमल कस्टर्ड कसं बनवायचं ते सांगाल का? कस्टर्ड पावडर आहे घरात ती संपवायची आहे.
चिंगी,कष्टर्ड पावडरच्या
चिंगी,कष्टर्ड पावडरच्या पाकिटावर लिहिलेले असेलच ना. त्यामूळे ते कसे बनवायचे त्याच्या प्रश्न नाही. अलिकडेच मी केक डेकोरेशनच्या बीबी वर कॅरमल बद्दल लिहिले आहे. तसा साखरेचा काळा पाक करुन तो ओल्या केलेल्या मोल्ड मधे टाकायचा. त्यावर तयार केलेले कष्टर्ड ओतायचे आणि ते सेट करायचे. सेट झाले की डिशमधे मोल्ड उपडा करायचा.
दिनेशदा नेटवर पाहीलेल्या
दिनेशदा नेटवर पाहीलेल्या रेसिपीत दुधात अंडी घालुन फेटायचं आणि मग कॅरेमल बनवुन त्यावर हे मिश्रण ओतुन कुकरमध्ये स्टीम करायचं असं सांगितलंय म्हणुन मी गोंधळात पडले आहे.. कस्टर्ड पावडर असेल तर याची गरज नाही का?
चिंगि अग नसते त्यात कस्टर्ड
चिंगि अग नसते त्यात कस्टर्ड पावडरची गरज. माझी आई पण बनवायची असच. आम्ही खरवस म्हणून खायचो. खुप छान लागत. त्यात थोडी वेलची, जायफळ आणि साखर पण घालायची.
ओह्ह.. पण जागु मला तर ती
ओह्ह.. पण जागु मला तर ती पावडर संपवायचीये ना. पावडर वापरुन कस करायचं ते हवंय..
अग मग त्या पॅकेटवर लिहिलेल
अग मग त्या पॅकेटवर लिहिलेल असत ना.
मला कोणी काजू कतलीची पाक्रु
मला कोणी काजू कतलीची पाक्रु देउ शकेल का?
चिंगी,
चिंगी, http://www.indiavisitinformation.com/indian-recipe/pudding/Caramel-Custa... इथे आहे बघ.
विवेक दीप्ति इथे बघः
विवेक दीप्ति इथे बघः
http://www.maayboli.com/node/6220
http://www.maayboli.com/node/2812
धन्यवाद अखी. नक्की करुन बघणार
धन्यवाद अखी. नक्की करुन बघणार
कोल्हापूरला एक हॉटेल आहे
कोल्हापूरला एक हॉटेल आहे अख्खा मसूर नावाचं. मस्त लागतं. पण त्यात नारळाचं दूध घालत नाहीत. झणझणीत कांदा लसूण मसाला असतो. हे मसूर भिजवलेले असतात पण मोड आलेले नस्तात.
Pages