Submitted by अनिल७६ on 5 June, 2011 - 07:53
तुच माझा पाऊस ..
तसा तु आमच्याकडे आता खुप कमीवेळा येतो
तरीही मनाला नेहमीच भरपुर आनंद देऊन जातो
तु येताना नेहमीच खुप पाऊस आणावस अस मनाला वाटतं
पण कधी कधी तु तसा येऊनही फक्त निराश करुन जातो
तु कधी कधी अचानक येऊन असा अंगावर कोसळतो
मग पुढे न भरुन येणारं नुकसान देखील करतो
तु कधी कधी नको असताना अवेळीही येतो
सुरळित चाललेलं सगळं बिघडवुन जातो
तु कधी कधी जा म्हंटल्यावरही परत जात नाही
तरीही पुन्हा या जीवाला तु हवाहवासा वाटतो
आजकाल तु तसा पुर्वी सारखा जोराचा कुठे येतो
मीही मग त्या जुन्यां आठवणींवर दिवस काढतो
(न.वि.- मी ही कविता (?) मला सुचेल तशी लिहिली असल्यामुळे, चुका या असणारच, तुमच्या सुचनांच/दुरुस्त्यांच नक्कीच स्वागत आहे.)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तु कधी कधी जा म्हंटल्यावरही
तु कधी कधी जा म्हंटल्यावरही परत जात नाही
तरीही पुन्हा या जीवाला तु हवाहवासा वाटतो ....आहा मस्तच...
खरय पावसाबरोबर आठवणीही येतात्...जा म्हणट्ल तरी ही जात नाहीत...
अगदी हव्याहव्याश्या वाटणा-या...
सावरी
अनिल साहेब प्रयत्न छानच आहे!
अनिल साहेब प्रयत्न छानच आहे! आवडली कविता
सावरीजी,चातकजी अगदी मनापासुन
सावरीजी,चातकजी अगदी मनापासुन धन्यवाद !

छानै तुमचा पाऊस!
छानै तुमचा पाऊस!
(No subject)
तुमच्या सुचनांच/दुरुस्त्यांच
तुमच्या सुचनांच/दुरुस्त्यांच नक्कीच स्वागत आहे..
मला हे खूप आवडलं. बस्स असंच ठेव आणि लिहीत रहा. पुलेशु
मस्त.
मस्त.
खूपच छान आवडली
खूपच छान
आवडली
कविता कराविशी वाटणे यात अनिल
कविता कराविशी वाटणे यात अनिल ५०% टक्के यश आहे. उरलेले पन्नास टक्के लोकांना ती पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणे यात आहे.
पहिले ५०% हे १००% आहेत अस मानल नाही तर नक्की कवितेचा दर्जा सुधारु शकेल.
पुढिल कवितांसाठी शुभेच्छा !
छान. पुलेशु.
छान. पुलेशु.
पाऊस हवाहवासा..!
पाऊस हवाहवासा..!
नितीन चंद्र यांच्याशी सहमत
नितीन चंद्र यांच्याशी सहमत आहे.
पाऊस, उत्साह, ढग अशा सर्वांवर लागू पडावी अशी कविता!
स्वच्छ व साधी! मात्र लय बिघडत आहे व त्यामुळे गद्यासारखी वाचावी लागली इतकेच!
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
चांगली कविता आहे. लिहित राहा.
चांगली कविता आहे. लिहित राहा.
मॄदुगंधा,मंदार्,किरणजी,जागु,म
मॄदुगंधा,मंदार्,किरणजी,जागु,मी मुक्ता,अमित्,ठमादेवी

कविता वाचल्याबद्दल (झेलल्याबद्दल) सर्वांचे मनापासुन आभार !
नितीनजी,बेफिकीरजी

आपले विशेष आभार !
आपण माझी कविता वाचताना जो त्रास झाला असेल त्याबद्दल मी दिलगीर आहेच.
माझी या पुढची कविता येण्यास मी नक्कीच ५-६ महिने तर सहज घेईनच, तरी चिंता नसावी.
मस्ताय अनिल! लिहित रहा!!
मस्ताय अनिल! लिहित रहा!! पु.ले.शु.
अरे वा!!! अनिल, तुम्ही पण
अरे वा!!! अनिल, तुम्ही पण कविता करायला लागलात? सही ना!
आवडली पावसाची कविता!
पु.ले.शु.
छान, कविता आवडली!
छान, कविता आवडली!
मस्त... नितीन आणि किरण्यकेला
मस्त...
नितीन आणि किरण्यकेला अनुमोदन....
आर्या,सानी,गणेश,चिमुरी
आर्या,सानी,गणेश,चिमुरी मनापासुन धन्यवाद !

अरे वा ! मस्त ! आवडली !
अरे वा ! मस्त ! आवडली !