ही रुढ अर्थाने कथा नाही, लेखही नाही. हे कन्फ़ेशन आहे, एका केलेल्या न केलेल्या, असलेल्या नसलेल्या गुन्ह्याचे.
कोड्यात नाही ठेवणार तुम्हाला कारण एकदा कन्फ़ेशन द्यायचच म्हंटल्यावर मग काय करायचेय झाकपाक.
बिरबल आणि माकडीणीची कथा तशी सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे आहे त्याच माकडीणीचे कन्फ़ेशन. आपण सोई साठी तिला माकडीणीची कथा म्हणूयात.
तर माकड माकडीणीच ते पहिल वहील पिल्लू असतं. जगातल्या सगळ्याच सामान्य जोडप्या प्रमाणे ती दोघे देखील आनंदाच्या परमोच्च शिखरावर असतात.पण! एक मोठ्ठा पण त्यांच्या आणि त्यांच्या भाग्याच्या मधे असतो.
एकदिवस त्यांचा डॉक्टर त्यांना सांगतो "सॉरी, वुई कान्ट गो अहेड, वुई हॅव टू टर्मिनेट". कधी कधी अती भावनिक न होता एखादी गोष्ट सांगायला परक्या भाषेचा आधार बरा असतो.
शॉक! कानावरुन नुसतेच शब्द जातायत. काय सांगितल आत्ता डॉक्टरांनी? "वुई हॅव टू टर्मिनेट" म्हणजे?????
डोक्टर काहीतरी समजावतात, "लाखात एखादी केस अशी असते......."
लाखात एखादी मग ते आम्हीच का? मन आक्रंदत. मग सुरु होतो प्रवास, एका डॉक्टर कडुन दुसर्याकडे...दुसर्याकडुन तिसर्याकडे. पण गोळाबेरीज एकच. सगळेच डॉक्टर त्यांना लवकर निर्णय घ्यायला सांगतात. प्रोबॅबिलीटी, वय आणि इतर अनेक घटकांच्या आधारे समजावतात "तोच" निर्णय योग्य कसा ते.त्यांचही चुक नाही म्हणा, त्यांच्या संपुर्ण आयुष्यात अशा कितीतरी "केसेस" त्यांनी हाताळलेल्या असतात.
पण, माकड माकडीणीच काय? काय ठरवायच त्यांनी? शारिरीक, मानसीक अपंगत्व असलेल पिल्लू, ज्याच्यावर ईलाज नाही असं त्याचं आजारपण आणि धोकादायक बाळंतपण? की "टर्मिनेशन" आणि ईलाज पुढच्या निरोगी बाळंतपणासाठी?
हेच ते कन्फ़ेशन, बिरबलाची गोष्ट उजवी ठरते आणि माकडीण आपला जीव वाचवते.
पुढे काय? बिरबल गोष्टी सांगून संपवतो पण तुम्हाला ठावुक आहे का त्याची गोष्ट जिथे संपते तिथे तिची गोष्ट सुरू होते.
पुढच्या निरोगी बाळाच दान पदरात पडुनही तिच्या मनात अपराधीपणाचा सल रहातोच. असं अपराधी वाटणं पण एक अपराध वाटायला लागतो, म्हणून हे कन्फ़ेशन.
तिच्याही नकळत दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं तिच्यातच झगडत असतात. तिच्यातला कौन्सलर तिला सतत सांगत असतो हा अपराधीपणा काढून टाकण्यासाठी. भूतकाळाचा विचार न करता वर्तमान आणि भविष्य जपण्यासाठी.
तिलाही कुठेतरी पटतं पण वळत नाही, भूतकाळाशी जोडलेली नाळ तोडणं जमत नाही, म्हणुन हे कन्फ़ेशन..तिचं तिच्यासाठीच आणि थोडसं बिरबलाच्या गोष्टीसाठी. पुर्णविरामाच्या पुढे असणार्या टिंबांसाठी. तिच्या बरोबर सतत असणार्या अपराधीपणासाठी जो कदाचीत तिच्याबरोबर कायम रहाणार.
खरच कौन्सलर म्हणतो तसं स्वत:ला माफ़ करायला ती कधी शिकणार?
---------------------------------------------------
ही कथा वजा लेख माझ्या मनाच्या तळाशी बरेच दिवस पडुन होता, कागदावर उतरवायचा की नाही ह्या संभ्रमात तसाच होता बिचारा. मग दादचं "घडी" वाचल आणि विचार आला, ह्या घडीलाही होडी करुन पाण्य़ात सोडायला हवी. तेव्हा प्रथम त्या घडीची होडी झाली. परत ती तिथे काही दिवस माझ्या डायरीचं पान अडवून बसली. तिला असं उघड्या पाण्यात सोडायचा धीर होईना. मग मंजूच "निवाडा" वाचलं आणि वाटलं अशा अजुन किती "यशू " असतील त्यांच्या साठी तरी ही होडी पाण्यात सोडायलाच हवी. मग कुणी तिला "इललॉजीकल म्हणो, किंवा कोणी काही.
कदाचीत तिची स्वत:ला माफ़ करण्याची सुरुवात असेल ही, तिच्या पद्धतीने केलेली.
आता ते कन्फ़ेशन म्हणून जगापुढे मांडल्यावर ती असही म्हणू शकत नाही "माझ्या" नजरेने बघा म्हणून. असो पटल तर घ्या नाहीतर सोडुन द्या. ती जाईलच तरुन एकदा पाण्य़ात पडल्यावर.
(रेखाटनः पल्लवी देशपांडे)
छानच
छानच लिहिलंत कविता, अगदी नेमकं..
थोडक्यात,
थोडक्यात, पण प्रभावी मांडणी....
फारच छान
फारच छान लिहीले अहे. थोड्क्यात आणि मनापासुन
अप्रतीम.....
अप्रतीम..... हे सारं खूप कठीण असतं तितकंच जळजळीत वास्तव ........
मी स्वतः ह्यातुन गेले आहे.... एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क तिनदा! प्रत्येक वेळी मी मेले होते.... पण पुन्हा उभी राह्यले. आता मी गोडशा मुलीची अभिमानी आई आहे. जिच्या कुणावर हा प्रसंग आला असेल... तिला म्हणावं, हे सारे दैव आहे, नियती आहे. आपण काही ठरवत नसतो. जे होते ते विधीलिखित असते, आपण निमित्त केवळ. स्वतःला दोष देऊ नये... आनंदी रहावे, इतरांना राहु द्यावे... सदा हसावे. 
कविता ..
कविता,
कविता, साध्या साध्या शब्दात डोळ्यात झणझणीत अंजन घालुन जातेस.
सुरेखच !!!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
धन्स रे
धन्स रे सगळ्यांना, वाटत होत लिहू की नको, चला लिहल तेच बर केल तर!
अगदी
अगदी मनातली सल बोलावी त्याप्रमाणे वाटले.
खरच खूपच सुरेख.
सचिन
कविता सहज,
कविता सहज, छान सुरेख लिहीले आहेस.
कविता, अगदी
कविता,
अगदी मनातलं आहे गं.
आणी अस अपराधी वाटण पण एक अपराध वाटायला लागतो >>> खासच
-----------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
खरच हा
खरच हा निर्णय घ्यायची वेळ आली तेन्व्हा हेच सारे प्रश्न होते -
-> मीच का?
-> माझं काय चुकलं?
-> आई म्हणून सुरुवातीपासुनच कमी पडतेय का?
माकडीणीला माहित तिची व्यथा.. बिरबलाच त्यात काय गेलं?
कविता अगदी
कविता अगदी मनातलं.
माकडीणीला माहित तिची व्यथा.. बिरबलाच त्यात काय गेलं?>अगदी
कविता छान
कविता छान लेख...
ज्याचं जळतं त्यालाच कळतं हेच खरं.
पल्ली .....
पल्ली ..... जादु आहे तुझ्या हातात.. केवढं चपखल रेखाचित्र काढलस
. आई आणि बाळाचे चेहर्यावरचे भाव तर अप्रतिम रेखाटलेस... बाळाच्या मागचा भलामोठा प्रश्नचिन्ह... बापरे केवढा दाहक वाटतोय. ...
पल्ली आणि
पल्ली आणि कविता....दोघींनाही १०० मोदक.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
उत्तम
उत्तम अत्यंत हृदय्स्पर्शी. you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
हे सारं
हे सारं खूप कठीण असतं आणि तितकंच न टाळता येणारे जळजळीत वास्तव.
कविता,फारच प्रभावी मांडणी; सुरेख लिहीले आहेस.
पल्ली, केवढं चपखल रेखाचित्र काढलस. आई आणि बाळाचे चेहर्यावरचे भाव अप्रतिम . विचाराची दाहकता अगदी स्पष्ट होतेय त्यातून.
माकडीणीला माहित तिची व्यथा.. बिरबलाच त्यात काय गेलं?>अगदी खरं
तू अप्रतिम
तू अप्रतिम लिहिलयंस..
>>माकडीणीला माहित तिची व्यथा.. बिरबलाच त्यात काय गेलं?<<
हे फारच करेक्ट..
कविता, माकड
कविता,
माकडीणीलाही काहि व्यथा असू शकते, याचा विचारच नव्हता केला कधी.
खूप वर्षांपूर्वी मी इथेच, माकडीण नावाची कथा लिहिली होती. पण त्यात असा विचार नव्हता.
सुंदर मांडणी.
धन्स धन्स
धन्स धन्स सगळ्यांना परत एकदा धन्स. पल्ली तुला खास ग. काय मस्त रेखाटन आहे ग.
खूप छान
खूप छान लिहिलं आहेस गं.....तुझ्या लेखातली ती कन्फेशनची भावना पल्लीच्या चित्रामुळे जास्तच गडद झालीये.
पल्ले......जियो !!
लेख ,चित्र
लेख ,चित्र दोन्ही खूप छान .लिहिलस ते खूप छान केलस .
अतिशय
अतिशय सुंदर मांडणी. साध्या आणि सोप्या शब्दात.
माकडीणीला आयुष्यभर हे डाचत रहाणारच. पण तिने असा पण एक विचार करावा -- मला जर बाळ जन्माला घालायचय तर मी एक निरोगी बाळाला जन्म देईन.
एक जीव, जो जन्मापासून जीवनाच्या अंतापर्यंत कधीच स्वावलंबी होणार नाही, ज्याच्या आयुष्यात कोणताही आनंद नाही, मिळाली तर अवहेलनाच, अशा जीवाला जाणून्-बुजून जन्माला घालणे म्हणजे जास्त मोठी अपराधीपणाची भावना आहे.
एक नक्की खरं की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पण मी हे विचार लिहिण्यामगे एक कथा आहे. एका जीवाची, जिला कधीच स्वावलंबी होता आलं नाही. तिने मोठेपणी आपल्या आईला टाहो फोडून विचारले की का मला जन्म दिलास? जेव्हा तुला माहित होते की मी कधीच सुखात राहू शकणार नाही. मग मला ही शिक्षा का? आणि आईजवळ उत्तर नव्हते!!!!!!!!
कवे,
कवे, डोळ्यांत पाणी आणलेस ग!! फुलराणी तुला अनुमोदक!! पण माकडीणीच काय ग? दोन्ही बाजुंनी तिची फरफटच. जीवाला जन्माला न घालावे तर ती टोचणी, आणि घातले तर तो जीव मोठा झाल्यावर आपल्याला जवाब मागेल त्याचाही सल!!
कठीण आहे हे सगळं!!
पल्ले रेखाचित्र अप्रतिम.
छान!!!
छान!!!
सगळीच एका
सगळीच एका झाडावरून दुसर्या झाडावर उड्या मारणारी माकड आहेत. जीवनातला फोलपणा कळला की मग माकडाचा माणूस होतो.
Hi kavita Mast lihila
Hi kavita
Mast lihila aahe..
Aani kharach ki Swatala maf karayla shikla pahije aapan
Nahitar he aayushya jagnach awghad hoil nahi ka ?
Tula khup khup shubhechha !!
छानच
छानच लिहीली आहेत कथा अन व्यथा... लेखनशैली आवडली.. एकदम फ्रेश!!!!
पल्ली ने
पल्ली ने लिहिलेले वाचले ना? तुम्ही स्त्री आहात म्हणून कदाचित कठिण वाटत असेल. पण निरोगी बाळाला जन्म देणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर मग ज्या यातना त्या मुलाला भोगायला लागतात त्याला जबाबदार कोण? आपणच! शरद
कविता.....
कविता..... फारच छान लिहिलं आहेस गं.. आजच वाचलं... खुपच आवडलं अगदी.
Pages