ही रुढ अर्थाने कथा नाही, लेखही नाही. हे कन्फ़ेशन आहे, एका केलेल्या न केलेल्या, असलेल्या नसलेल्या गुन्ह्याचे.
कोड्यात नाही ठेवणार तुम्हाला कारण एकदा कन्फ़ेशन द्यायचच म्हंटल्यावर मग काय करायचेय झाकपाक.
बिरबल आणि माकडीणीची कथा तशी सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे आहे त्याच माकडीणीचे कन्फ़ेशन. आपण सोई साठी तिला माकडीणीची कथा म्हणूयात.
तर माकड माकडीणीच ते पहिल वहील पिल्लू असतं. जगातल्या सगळ्याच सामान्य जोडप्या प्रमाणे ती दोघे देखील आनंदाच्या परमोच्च शिखरावर असतात.पण! एक मोठ्ठा पण त्यांच्या आणि त्यांच्या भाग्याच्या मधे असतो.
एकदिवस त्यांचा डॉक्टर त्यांना सांगतो "सॉरी, वुई कान्ट गो अहेड, वुई हॅव टू टर्मिनेट". कधी कधी अती भावनिक न होता एखादी गोष्ट सांगायला परक्या भाषेचा आधार बरा असतो.
शॉक! कानावरुन नुसतेच शब्द जातायत. काय सांगितल आत्ता डॉक्टरांनी? "वुई हॅव टू टर्मिनेट" म्हणजे?????
डोक्टर काहीतरी समजावतात, "लाखात एखादी केस अशी असते......."
लाखात एखादी मग ते आम्हीच का? मन आक्रंदत. मग सुरु होतो प्रवास, एका डॉक्टर कडुन दुसर्याकडे...दुसर्याकडुन तिसर्याकडे. पण गोळाबेरीज एकच. सगळेच डॉक्टर त्यांना लवकर निर्णय घ्यायला सांगतात. प्रोबॅबिलीटी, वय आणि इतर अनेक घटकांच्या आधारे समजावतात "तोच" निर्णय योग्य कसा ते.त्यांचही चुक नाही म्हणा, त्यांच्या संपुर्ण आयुष्यात अशा कितीतरी "केसेस" त्यांनी हाताळलेल्या असतात.
पण, माकड माकडीणीच काय? काय ठरवायच त्यांनी? शारिरीक, मानसीक अपंगत्व असलेल पिल्लू, ज्याच्यावर ईलाज नाही असं त्याचं आजारपण आणि धोकादायक बाळंतपण? की "टर्मिनेशन" आणि ईलाज पुढच्या निरोगी बाळंतपणासाठी?
हेच ते कन्फ़ेशन, बिरबलाची गोष्ट उजवी ठरते आणि माकडीण आपला जीव वाचवते.
पुढे काय? बिरबल गोष्टी सांगून संपवतो पण तुम्हाला ठावुक आहे का त्याची गोष्ट जिथे संपते तिथे तिची गोष्ट सुरू होते.
पुढच्या निरोगी बाळाच दान पदरात पडुनही तिच्या मनात अपराधीपणाचा सल रहातोच. असं अपराधी वाटणं पण एक अपराध वाटायला लागतो, म्हणून हे कन्फ़ेशन.
तिच्याही नकळत दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं तिच्यातच झगडत असतात. तिच्यातला कौन्सलर तिला सतत सांगत असतो हा अपराधीपणा काढून टाकण्यासाठी. भूतकाळाचा विचार न करता वर्तमान आणि भविष्य जपण्यासाठी.
तिलाही कुठेतरी पटतं पण वळत नाही, भूतकाळाशी जोडलेली नाळ तोडणं जमत नाही, म्हणुन हे कन्फ़ेशन..तिचं तिच्यासाठीच आणि थोडसं बिरबलाच्या गोष्टीसाठी. पुर्णविरामाच्या पुढे असणार्या टिंबांसाठी. तिच्या बरोबर सतत असणार्या अपराधीपणासाठी जो कदाचीत तिच्याबरोबर कायम रहाणार.
खरच कौन्सलर म्हणतो तसं स्वत:ला माफ़ करायला ती कधी शिकणार?
---------------------------------------------------
ही कथा वजा लेख माझ्या मनाच्या तळाशी बरेच दिवस पडुन होता, कागदावर उतरवायचा की नाही ह्या संभ्रमात तसाच होता बिचारा. मग दादचं "घडी" वाचल आणि विचार आला, ह्या घडीलाही होडी करुन पाण्य़ात सोडायला हवी. तेव्हा प्रथम त्या घडीची होडी झाली. परत ती तिथे काही दिवस माझ्या डायरीचं पान अडवून बसली. तिला असं उघड्या पाण्यात सोडायचा धीर होईना. मग मंजूच "निवाडा" वाचलं आणि वाटलं अशा अजुन किती "यशू " असतील त्यांच्या साठी तरी ही होडी पाण्यात सोडायलाच हवी. मग कुणी तिला "इललॉजीकल म्हणो, किंवा कोणी काही.
कदाचीत तिची स्वत:ला माफ़ करण्याची सुरुवात असेल ही, तिच्या पद्धतीने केलेली.
आता ते कन्फ़ेशन म्हणून जगापुढे मांडल्यावर ती असही म्हणू शकत नाही "माझ्या" नजरेने बघा म्हणून. असो पटल तर घ्या नाहीतर सोडुन द्या. ती जाईलच तरुन एकदा पाण्य़ात पडल्यावर.
(रेखाटनः पल्लवी देशपांडे)
MANAL SPASHUN GELI.PAN
MANAL SPASHUN GELI.PAN MAKADINICHA DECISION YOGYA HOTA.APANG MULALA JANM DEUN APANCH TYALA APANG AYUSHYA JAGANYACHA SHAAP DYAYACHA TYAPEKSHA MANAT APARADHI PANACHI SAL BARICH MHANAYACHI.
लेखच इतके
लेखच इतके अप्रतीम असतात की त्यावर आपोआपो व्हिज्युअल सुचतं.
कविता,
कविता, पल्ले, सही.... एकदम सही

वरच्या सर्वांना अनुमोदन
हाय कविता,
हाय कविता,
जगण्यातल्या अनेक अडचणीतली ही एक. समजा असा विचार केला की, तसे न करता जन्म दिला असता तर्?काय झाले असते भविश्य तिचे व बाळाचे? कधीतरी बाळच म्हणाले असते का मला जन्म दिलास्?असेल तिच्याकडे याचे उत्तर? म्हणूनच असा विचार करायचा होते ते चान्गल्यासाठीच..... सर्वान्च्याच. स्वताला दोश देणे सोपे नसते व त्याने आपलेच खच्चीकरण होते म्हणून्च पाठी न पाहता पुधे........(लिहीताना चुकतेय)
चल बाय
शुभेच्छा .
शुभेच्छा .
(कविता,
(कविता, काहीतरी गोंधळ आहे. माझी इथे आधी दिलेली पोस्ट दिसत नाहीये कुठे... )
सुरेखच लिहिलय.
आई बनण्याची प्रक्रिया त्या पहिल्या क्षणापासून सुरू होते... ज्य क्षणी आपण आई बनणार आहोत हे नुस्तं कळतं. मधेच कुठेतरी तो प्रवास अर्धवट सोडावा लागण्याच्या यातना ह्या फक्तं तो आपलाच प्रवास अर्धवट टाकावा लागण्याच्या नाहीत तर... कुणी इवलं बोट धरून तो प्रवास पुढे नेणार होतं.. त्याचा रस्ताच आपण आपल्या हाताने पुसल्याच्या... निष्ठूर, निर्दयी... यातना आहेत, त्या.
त्या पहिल्या क्षणापासूनचा आपला शारिरिक आणि मानसिक प्रवास, आपल्या अन त्या इवल्या पावलांचे न उमटलेले ठसे... खुणा पुसायच्या असतात... सोप्पं नाहीये ते.
कविता... घडी खरीच! अशाच काही घड्या, काळाच्या प्रवाहावर सोडून द्यायच्या असतात. ती होडी सोडून देण्यामागे पळपुटेपणा नाही... जे ते करू शकतात, तेच मनाने खर्याअर्थी समर्थ...
खूप खूप सुंदर उतरलय सगळं. साध्या सोप्प्या शब्दांत, मनाच्या अगदी आत.. आतलं!
लेख आणि
लेख आणि रेखाचित्र,
दोन्हीही अप्रतिम..
अतिशय
अतिशय मनभावी.हृदयस्पर्शी.
लेख फार आवडला.
सुरेख ....
सुरेख ....
बिरबलाची
बिरबलाची माकडीण नसती तर... तरीही कथा उत्तम आली असतीच. आत्ताही माकडीण वगळून दुसऱ्यांदा वाचली तेव्हाही मला ती आवडली. आणखी गहिरी करता आली असती हा भाग वेगळा. तशी शक्यता प्रत्येक कलाकृतीमध्ये असतेच.
माकडीण अशासाठी नको कारण तेथे तिच्यासमोरचा पेच थोड्या वेगळ्या स्वरूपाचा होता. ती माकडीण होती, माणूस नव्हे. येथे माणूस आहे माकडीण नाही हा एक फरक आणि दुसरा त्यातूनच येणारा म्हणजे नैतीक-अनैतीकतेची संकल्पना. माणसाकडच्या विचारांची तुलना माकडीणीकडच्या विचारांशी होऊ शकत नाही. अशाही आयांची उदाहरणे आहेत की ज्यांनी आपल्या सशक्त मुलांसाठी बलीदान दिले आहेच. माकडीणीच्या मुद्याची ही मर्यादा आहे. म्हणून तो मुद्दा वगळून मी बाकीचा भाग पुन्हा वाचला आणि तो चांगलाच आला.
धन्यवाद
धन्यवाद श्रावण. असेच प्रतिसाद येऊद्यात.
आणखी गहिरी करता आली असती हा भाग वेगळा. तशी शक्यता प्रत्येक कलाकृतीमध्ये असतेच.>> हम्म! खरय.
बिरबलाची माकडीण नसती तर... तरीही कथा उत्तम आली असतीच.>> असतीही कदाचीत. पण इथे माकडीण एक रुपक म्हणून आहे (कदाचीत मांडता नसेल आल मला नीट)
त्या आईची ती बोच आहे.
माकडीणीच्या मुद्याची ही मर्यादा आहे.>> असेलही किंवा माझ्या मांडणीचा कच्चा दुवा असेल तो.
हं
हं श्रावणचं जे म्हणणं आहे तसंच माझंही मत आहे. फक्त कारण वेगळं. माझ्या आठवणीप्रमाणे बिरबलाच्या गोष्टीतलं माकडीणीचं पिल्लु आधीच जन्माला आलेलं आणि निरोगी आहे.
इथे कथेतली परिस्थिती तशी नाहीये ना? एका व्यंग असलेल्या बाळाला जन्म द्यावा की नको असा पेच आहे असं वाटलं.
बाकी लिहीलं हे चांगलंच केलंस. मन मोकळं होणं महत्त्वाचं.
~~~~~~~~~
कविता -
कविता - पल्लि ,
मस्त जमल आहे दोन्हीहि कथा आणी रेखाटन.
नेमक्या शब्दात मोजक आणी समर्पक लिहिल आहेस ..
अर्थात अशीवेळ कोणावर हि येउ नये हिच प्रार्थना.
[सहज आठवले
[सहज आठवले म्हणुन]
'लुळे-पांगळे' जन्माला आलेले मुल माकडीण कधीच सांभाळत नाही. काहीतरी मार्ग काढुन त्याला मारुनच टाकते. असे व्यंकटेश माडगुळकरांच्या एका कादंबरीत वाचले होते. तसा एक प्रसंग त्या कादंबरीत आहे.
त्यामुळेच कदाचीत कधी handicapped माकडे बघितल्याचे आठवत नाही.
खूप च छान.....
खूप च छान.....
(No subject)
डोळे उघडले आवडल
डोळे उघडले
आवडल
हे मी आजच वाचलं. मस्त लिहिलय.
हे मी आजच वाचलं. मस्त लिहिलय.
किती सुंदर लिहितेस कविन
किती सुंदर लिहितेस कविन
सगळ्या होड्या सोडून दे आता पाण्यात
काय संवेदनशीलता आहे तुझ्यात
काय संवेदनशीलता आहे तुझ्यात कविन. अगं हे असं सुचायला, केवढं एम्पॅथ असायला हवं. नो वंडर यु आर अ हीलर, एम्पॅथ अँड सायकिक. नो वंडर!!
--------
एकदम डोळ्यात पाणी आलं.
सट्टाककन थोबडीत आहे जे आपलं
सट्टाककन थोबडीत आहे जे आपलं टिचभर दु:ख कुरवाळत बसतात त्यांना. हे असं फिनिक्स पक्ष्यासारखं राखेतून झेप घेणं सगळ्यांना नाही जमणार.
>>>>आई बनण्याची प्रक्रिया
>>>>आई बनण्याची प्रक्रिया त्या पहिल्या क्षणापासून सुरू होते... ज्य क्षणी आपण आई बनणार आहोत हे नुस्तं कळतं.


काहींची आधीपासून सुरुवात होते. खूप स्वप्नं पहातो आपण. कदाचित स्वर्गातून आपलं बाळच आपल्याशी संवाद साधत असतं - आई हरी अप. मी केव्हा येऊ?
मला मुलगी होण्याआधी हे माहीत होतं की तिची रास किंवा लग्न कर्क असणार. माय वे ऑफ ड्रिमिंग
---------------------
पल्ली हा धागा माहीतच नव्हता. धागा वर काढल्याबद्दल, आपले खूप आभार.
रेखाटनही अंगावरती चर्र शहारा आणतं. टोपड्यातलं, ते गोंडस बाळ आणि लाल भडक , प्रवाही ते प्रश्नचिन्ह
अगदी मनस्पर्शी लिहिलंयस, गं.
अगदी मनस्पर्शी लिहिलंयस, गं.
वर वर्षू म्हणतेय तसं - सगळ्या होड्या पाण्यात सोडून दे!
हृदयस्पर्शी आहे.
हृदयस्पर्शी आहे.
येणारे मूल धडधाकट नाही तर त्याला तसे आयुष्य जगायला जगात आणायचे का हा त्याच्या हिताचा केलेला विचार...
ते मूल सांभाळावे तर आपल्यालाच लागणार, त्याचा आपल्यालाही त्रास सहन करावा लागणार तर त्यापेक्षा नकोच ते असा एक स्वार्थी विचार..
कसेही असले तरी ते आपले मूल आहे आणि आपल्याला हवे आहे असे ठरवले तरी आपले उदात्त विचार जपण्याचा नादात आपण त्या मुलालासुद्धा एक हालअपेष्टांचे आयुष्य देत आहोत तर मग तो विचार उदात्त तरी कसा म्हणावा..
फार गुंत्याचे आहे हे.
तटस्थपणे पाहता कठोर वाटला तरी सर्वांचीच सुटका होईल हाच निर्णय योग्य वाटतो.. कदाचित
पण तो योग्य निर्णय घेतल्यावर मनात जो सल राहतो त्यातून आईची सुटका होऊ शकते का याचे उत्तर पुरुष म्हणून आपल्याकडे नाही असे वाटते.
छान लिहीले आहे ऋन्मेष.
छान लिहीले आहे ऋन्मेष.
Pages