बहाणा
आज पुन्हा भरून आलीस
वाटलं बरसशील अवीरत..
ऊसन्या हातांनी अडविले
म्हणून अडखळलीस सरीगत.. ?
आज काय बहाणा?
प्रश्ण जुनाच आहे.
तसे जुनेच बरेच काही आहे-
कोरड्या क्षणांचे डोह तुडूंब करून
श्वासांवर ओलेतीच निजायचीस
ओसंडलेले, ओथंबलेले,
सुरकुत्यांवर स्पर्श काही झिंगलेले..
तो एकच पसारा तुझ्या खास आवडीचा
बाकी सारे कसे "आवरून" ठेवायचीस.
तसे जुनेच बरेच काही आहे-
आलेच जरा "आवरून"..
त्या ऊत्तरावर मग अनेक युगे घुटमळायची
त्यांचे सांत्वन करायला ही गर्दी जमायची
मग लाँग ड्राईव्ह वर तुझ्या नजरेतून रस्ता शोधायचा
गाडीच्या आरशांची अगदी अडगळ वाटायची
तो एकच रस्ता तुझ्या खास आठवणीतला
बाकी सारे कसे "विसरून" जायचीस
तसे जुनेच बरेच काही आहे-
"विसरशील" का रे..?
त्या प्रश्णावर किती मोक्ष झाले
त्या प्रत्त्येक मोक्षाच्या सांत्वनाला ही गर्दी जमायची
म्हणे objects in mirror are closer than they appear
काल ड्राईव्ह करून येताना आरसेच जवळ आले
objects सारे "धूसरच" झाले.
तसे जुनेच बरेच काही आहे-
"धूसर" हा दृष्टिदोष आहे,
नाही ती एक अवस्था आहे
या वादाला कीती अंधळे आले
क्रॉसींग करताना किती बघे आले
ते पहिले पाऊल तुझ्या अस्तित्वाचे
बाकी सारे "ठसे" करून गेलीस
आताशा ठसे ऊमटवत फिरायचे
कधी जमिनीवर, कधी आभाळावर
त्यातलाच एक भेटीस आला
अजूनही ओला...
बुडवून गेला.
हाच काय तो नविन बहाणा.
तसे जुनेच बरेच काही आहे.
वा आवडली.
वा आवडली.
निव्वळ फिलगुड कविता !
निव्वळ फिलगुड कविता !
<<काल ड्राईव्ह करून येताना
<<काल ड्राईव्ह करून येताना आरसेच जवळ आले
objects सारे "धूसरच" झाले.<<
<<ते पहिले पाऊल तुझ्या अस्तित्वाचे
बाकी सारे "ठसे" करून गेलीस<<
सहियेत ओळी!! खासच!
आताशा ठसे ऊमटवत फिरायचे कधी
आताशा ठसे ऊमटवत फिरायचे
कधी जमिनीवर, कधी आभाळावर
त्यातलाच एक भेटीस आला
अजूनही ओला...
बुडवून गेला >>
मस्तच
धन्यवाद! >>>>निव्वळ फिलगुड
धन्यवाद!
>>>>निव्वळ फिलगुड कविता !
म्हणजे काय?
वा!! सुरुवात जबरदस्त
वा!! सुरुवात जबरदस्त आहे.
>>काल ड्राईव्ह करून येताना आरसेच जवळ आले
माझ्यासाठी ही कविता इथपर्यंतच..