नमस्कार लोक्स
देवभूमी उत्तरांचलमधील खटिमा, नैनिताल, राणीखेत, अल्मोरा, कौसानी या परीसराची भटकंती करून आलो. त्यातीलच काहि निवडक प्रचिंची चित्रसफर येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. आशा आहे कि हि सफर तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर पहिल्या भागाची सफर खटिमा येथील "नानकमत्ता साहिब" गुरूद्वाराने करूया.
===============================================
===============================================
"उत्तरांचल (उत्तराखण्ड) " उत्तरप्रदेशमधून २००० साली वेगळे झालेले भारतातील २७वे राज्य. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले प्राकृतिक सुंदरता असलेले भारतातील एक राज्य.
हिंदुंचे पवित्रस्थान हरिद्वार, ऋषिकेश, पंचप्रयाग, बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री असलेल्या या राज्याला देवभूमी उत्तरांचल असेहि म्हणतात. हिंदूंच्या पवित्र नद्या गंगा व यमुना यांचे उगमस्थानही येथेच आहे. या शिवाय जिम कॉर्बेट, राजाजी यांसारखी प्रसिद्ध नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर, हर कि दून, हेमकुंड साहिब, नैनिताल, कौसानी, राणीखेत, मसूरी सारखी हिलस्टेशन, अशी ठिकाणेहि या राज्यात आहे. पर्यटनासाठी विविध पर्याय असलेले हे राज्य.
माझ्या भारतभ्रमण यादीमध्ये हि पहिल्या क्रमांकावर असलेले हे राज्य बघण्याची खुपच इच्छा होती. अचानक तसा योग जुळुन आला. आमचा एक मित्र उत्तरांचलचा आहे त्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाचे
आमंत्रण दिले तेंव्हाच माझा आणि इतर २ मित्रांचा उत्तरांचल फिरण्याचा कार्यक्रम पक्का झाला. एप्रिलपासुन नविन सुट्ट्या चालु झाल्याने सुट्टीचा काहि प्रॉब्लेम नव्हता. ४ मे ते १५ मे असा १२ दिवसांची टूर ठरली. मायबोलीकर आणि आंतरजालावरून माहिती गोळा केली. वेळ वाचावा आणि अधिक भटकता यावे म्हणुन मुंबई ते दिल्ली आणि परत असा प्रवास विमानाने करावयाचा ठरला. सगळी तयारी झाली आणि ३ तारखेला रात्री ९:५० च्या गो एअरवेजच्या फ्लाईटने दिल्लीकडे निघालो. साधारण १२ वाजता दिल्लीला पोहचलो. विमानतळावर उतरण्याआधीच "बाहेरील तापमान ३५ डिग्री आहे" अशी अनाऊन्स्मेट झाली आणि दिल्लीच्या गर्मीची चाहूल लागली. विचार केला रात्री बारा वाजता ३५ डिग्री मग दिवसा काय?????.
दिल्ली ते खटिमा* (अंतर ~३०० किमी) जाण्यासाठी आधीच बूक केलेली स्कॉर्पियो सुमारे अर्धा-पाऊण तास उशिरा आली :(. दिल्लीवरून गाझियाबाद, मुरादाबाद, रामपूर, रुद्रपूर, खटिमा असा ६ तासाचा प्रवास मुरादाबाद येथील बेक्कार ट्रॅफिकमुळे १० तासाचा झाला. बेक्कार अशासाठी कि कुठली गाडी कुठल्या दिशेने जातेय हेच कळत नव्हत. उभ्या, आडव्या कशाही गाड्या जात येत होत्या आणि त्यात भर म्हणजे हेवी वेट गाड्यांची आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांची. असा जा अत्यंत कंटाळवाणा प्रवास एकदाचा संपला आणि आम्ही खटिमाला मित्राच्या घरी गेलो. मस्तपैकी आंघोळ उरकुन, नाश्ता करून झोपलो. संध्याकाळी त्यांच्या रिवाजाप्रमाणे (कुमाऊ) संगीत, मेहंदी असे लग्नाचे कार्यक्रम होते. रात्री बारा वाजेपर्यंत धम्माल चालु होती. दुसरा दिवस लग्नविधी (बारात, पगफेरे, जयमाला, रीसेप्शन) यात गेला.
(*खटिमा हे उत्तरांचल राज्यातील उधमसिंग नगर जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असुन हिमालयाच्या तेरई प्रदेशात हा भाग येतो. या शहरापासुन जवळच असलेल्या बनबसा गावापासुन नेपाळ (महेन्द्रनगर) अंदाजे ४-५ किमी अंतरावर आहे. भारत-नेपाळे सीमेवर शारदा नदीवर घातलेला बांध आणि तेथुन दिसणारे दृष्य मनोहर आहे. फोटोग्राफिला येथे बंदी आहे. )
प्रचि १
प्रचि २
शादी — लड्डु मोतीचूर का
प्रचि ३
लग्नात पारंपारिक "नथनी" आणि पेहराव घालुन सजलेल्या पहाडी (कुमाँऊ) स्त्रिया. नवरीच्या नाकातही अशीच भलीमोठी नथनी होती.
प्रचि ४
पारंपारीक नृत्य करताना कुमाँऊ लोक. हातात ढाल/तलवार घेऊन नाचणार्यांना "छलिया" आणि या नृत्य प्रकाराला "छलिया नृत्य" असे म्हणतात कुमाँऊ लग्न समारंभात हा नृत्यप्रकार पाहिजेच असतो. या नृत्याचा व्हिडियो येथे पहा.
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
===============================================
नानकमत्ता साहिब गुरूद्वारा
===============================================
दोन दिवस काहि भटकता आले नाही. तिसर्या दिवशी आम्ही खटिमापासुन अंदाजे १५-१७ किमी अंतरावर असलेल्या "नानकमत्ता साहिब" या गुरुद्वार्याला भेट देण्याकरीता गेलो. शरयु नदीवर बांध घालुन येथे पाणी अडवलेले आहे. त्यालाच नानकसागर असे नाव दिले. याच बंधार्यावरून पुढे साधारण ३-४ किमी अंतरावर नानकमत्ता या गावी "नानकमत्ता साहिब" हा गुरुद्वारा आहे. पूर्वी याचे नाव "गोरखमता" होते. पुढे १६व्या शतकात गुरूनानाक यांनी येथे भेट दिल्यावर याचे नानकमत्ता असे ठेवण्यात आले. संपूर्ण गुरुद्वारा हा संगमरवर दगडांनी बांधला आहे. याच परीसरात एक पुरातन पिंपळाचे झाड आहे.
प्रचि ९
प्रचि १०
शरयू नदी
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
(पुढिल भागात "नैनिताल" :-))
===============================================
===============================================
या सर्व सफरीत "फोटोग्राफी" हि
या सर्व सफरीत "फोटोग्राफी" हि माझी सेकंड प्रायोरीटी होती.
हा परिसर निवांतपणे पाहणे आणि अनुभवने याला मी जास्त प्राधान्य दिले.
योगेश, सेकंड प्रायोरीटी मुळे
योगेश, सेकंड प्रायोरीटी मुळे थोडासा अपेक्षाभंग झाला आहे रे मित्रा. फोटोग्राफीमधे काही फोटोमंधे ब्लर आणि डार्कनेस इफेक्ट जाणवतो आहे. तो बघ जरा. अर्थात नैनितालच्या भागामधे ती कसर तू भरून काढशीलच.
नैनितालचा वृतांत जरा सविस्तर लिही. पुढच्या भारतभेटीमधे उत्तर भारताची भ्रमंती निश्चित करतो आहे.
प्रचि ३२ आणि प्रचि २६ मधे मस्त अँगल पकडला आहेस. थोडेसे आफ्टर इफेक्ट्स ट्राय करून बघ.
नाखु अगदी बरोबर. अगदी शोधुन
नाखु अगदी बरोबर. अगदी शोधुन काढुन मला २ फोटो बरे वाटले. २५ व २८.
मस्त सुरुवात जिप्स्या... येऊ
मस्त सुरुवात जिप्स्या...
येऊ दे अजुन...
वाहे गुरु कि फतेह ! चला
वाहे गुरु कि फतेह !
चला सुरवात तर छानच झाली.
सुंदर सुरुवात.. मोतीचूर के
सुंदर सुरुवात.. मोतीचूर के लड्डू.. वॉव..
गुरुद्वारा आणी भोवतालचा परिसर सुरेख आणी मनात शांती निर्माण करणारा आहे..
योगेश, नादखुळा ला
योगेश,
नादखुळा ला अनुमोदन...
उत्तराखंड ची मी मोठ्या आतुरतेने वाट पहात होतो.
उत्तराखंड म्हटले की डोळ्यासमोर येतो उत्तुंग हिमालय, हिमशिखरे, दाट जंगले, खोल दर्या, त्यातुन खळाळत जाणार्या नद्या... ह्या भागात तरी तसे काही दिसले नाही...
आशा आहे पुढच्या काही भागांत दिसेल...
प्रचि २६ चांगला आहे...
जर का वरचा भाग कापला गेला नसता तर प्रचि ३२ पण चांगला आला असता ...
पुलेशु...
टिप : हे राज्य आता उत्तराखंड ह्या नावाने ओळखले जाते. पहिल्या प्रचि मधील पाटी वर पण तसे लिहिले आहे. शिर्षक बदललेस तर बरे होईल असे मला वाटते.
योगेश भाऊ मस्तरे .किती
योगेश भाऊ मस्तरे .किती दिवसांन पासुन वाट पाहत होतो .
येऊ दे अजुन...
छान आहे
छान आहे
योगेश चांगली सफर होणार आमची
योगेश चांगली सफर होणार आमची सुद्धा तुझ्या नजरेतून, आता तुझ्या कडुन अपेक्षा वाढल्या आहेत
खटिमा परिसराचे गुरूद्वारा व्यतिरिक्त काय स्थळविषेश आहेत का ??
धन्यवाद लोक्स तालचा वृतांत
धन्यवाद लोक्स
तालचा वृतांत जरा सविस्तर लिही. पुढच्या भारतभेटीमधे उत्तर भारताची भ्रमंती निश्चित करतो आहे.>>>>नक्कीच रे
उत्तराखंड म्हटले की डोळ्यासमोर येतो उत्तुंग हिमालय, हिमशिखरे, दाट जंगले, खोल दर्या, त्यातुन खळाळत जाणार्या नद्या... ह्या भागात तरी तसे काही दिसले नाही...>>>धन्स चंदन. उत्तराखंड मध्ये वेळेअभावी मी काहि मोजकीच ठिकाणे ज्या सिक्वेन्सने केली त्याच प्रमाणे येथे प्रदर्शित करत आहे (खटिमा-नैनिताल-राणीखेत-कौसानी-अल्मोरा-खटिमा). जास्तीत जास्त ठिकाणे धावतपळ बघण्यापेक्षा काहि मोजकीच ठिकाणे व्यवस्थित बघायचे असे आम्ही ठरवले होते.
मी जी सफर केली ती कुमॉंऊ प्रांतातली. या भागात हिमालयाचे/हिमशिखरांचे फार लांबून दर्शन होते.
उत्तुंग हिमालय, हिमशिखरे हे गढवाल प्रांतातुन व्यवस्थित दिसत असावे (चुभुद्याघ्या). कौसानी, नैनिताल, राणीखेत या ठिकाणाहुन दिसली पण तेव्हढी क्लियर नव्हते. फोटोहि अगदी धूसर आले आहेत. :(. सगळे वातावरण धूसर होते.
उन्हाळ्याचा सीझन असल्याने खळाळत जाणार्या नद्या पूर्णपणे आटल्या आहेत.
शिर्षकात बदल केलाय.
प्रचि न. २ आवडला..... माझ्या
प्रचि न. २ आवडला.....
माझ्या नजरेत सगळेच फोटो चांगले आहेत. फक्त जिथे कट होतात तिथे नजर अचानक अडकल्यासारखी वाटते.
खटिमा परिसराचे गुरूद्वारा
खटिमा परिसराचे गुरूद्वारा व्यतिरिक्त काय स्थळविषेश आहेत का ??>>>>>>सचिन, खटिमा हे उधमसिंग नगर (रूद्रपूर) जिल्ह्यातील एक महत्वाचे ठिकाण आहे. येथुन नेपाळ (महेन्द्रनगर) ~३०किमी अंतरावर आहे. बिझनेस हब म्हणुनही हे ठिकाण सध्या ओळखले जाऊ लागले आहे. ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेले "पूर्णागिरी", खोल गुहेतील प्राचीन "पाताळ भुवनेश्वर", कुमाँऊची जुनी राजधानी चंपावत, टनकपूर, लोहाघाट, पिथौरागढ (हिल स्टेशन) इ. ठिकाण खटिमापासुन जवळ आहेत. नैनिताल येथुन ११३ किमी अंतरावर तर प्रसिद्ध जिम कॉर्बेट पार्क १५८ किमी अंतरावर आहे.
योगेश, १६, २६, ३१, ३२ वगैरे..
योगेश, १६, २६, ३१, ३२ वगैरे.. एकाच वास्तूचे एवढे फोटो टाकण्यापेक्षा त्याचे एकच कोलाज जास्त चांगले वाटले असते, असे मला वाटले. तोच तोचपणा जाणवला.
अरे वा... यु.के. ला जाऊन
अरे वा... यु.के. ला जाऊन आलास.. मी कधी जाणार.. आणि कुठे-कुठे जाणार...
यु.के. ला जाऊन
यु.के. ला जाऊन आलास..>>>>>>रोहन :-), हो रे तिकडच्या गाडीच्या नंबरप्लेटवर "UK" च आहे.
रात्री बारा वाजता ३५ डिग्री
रात्री बारा वाजता ३५ डिग्री मग दिवसा काय?????. >>
17,18,22,25,31 mastach ! next part pls !! सुरवात थोडी थंड झाली आहे पण पुढचे भाग यापेक्षा रॉकींग असतील यात शंका नाही..
>>पुढिल भागात "नैनिताल पुढील
>>पुढिल भागात "नैनिताल
पुढील भागाची वाट पहात आहे. तेव्हढा मोतीचूर लाडवाचा फोटो नस्ता तर चाललं असतं. आता विकेन्डला आणून खावे लागणार
छ्या... कशाला परत आला...
छ्या... कशाला परत आला... कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन तिथेच बसायचं नेट लाऊन...
विमानतळावर उतरण्याआधीच
विमानतळावर उतरण्याआधीच "बाहेरील तापमान ३५ डिग्री आहे" अशी अनाऊन्स्मेट झाली आणि दिल्लीच्या गर्मीची चाहूल लागली.>>> मज्जा घेतली ना गरमी ची...
सुरुवात तर एकदम गरमच झालीय...
सगळे फोटो मस्तच...
२० नं. मस्तच... अस वाटतय कि आता या मिसाईल्स लॉन्च होणार आहेत... ३...२..१.० गो...
प्रतिसादाबद्दल धन्स योगेश,
प्रतिसादाबद्दल धन्स
योगेश, १६, २६, ३१, ३२ वगैरे.. एकाच वास्तूचे एवढे फोटो टाकण्यापेक्षा त्याचे एकच कोलाज जास्त चांगले वाटले असते, असे मला वाटले. तोच तोचपणा जाणवला.>>>>धन्स गजानन.
खरंतर त्या वास्तुचे वेगवेगळ्या (चारही) बाजुने फोटो काढण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे structure सारखेच असल्याने कदाचित तोचतोचपणा जाणवला असेल.
इंद्रा
छान झाली सफरीची सुरुवात.
छान झाली सफरीची सुरुवात. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
छान सुरुवात मला ही
छान सुरुवात
मला ही नॉस्टॅल्जिया देणारी भेट आहे तुमची
आ_भास, रेव्युजी, धन्यवाद
आ_भास, रेव्युजी, धन्यवाद
रेव्युजी, वेळेअभावी तुम्ही सुचवलेले "पाताळ भुवनेश्वर" नाही पहाता आले :(. माहिती काढलेली, खटिमापासुन साधारण १००किमी अंतरावर होते.
पुन्हा जायला काहितरी निमित्त
मस्त सुरुवात प्र.ची.२३ अन
मस्त सुरुवात प्र.ची.२३ अन लाडु आवड्ले , पुढील भागांच्या प्रतिक्षेत
छान आहे वृत्तांत...
छान आहे वृत्तांत...
छान
छान
योगेश, प्रची, आणि वर्णन
योगेश, प्रची, आणि वर्णन नेहमीप्रमाणेच उत्तम. हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचवतोयस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. उर्वरीत भागांची वाट पहातेय. लवकर येऊ देत.
मस्त सगळेच
मस्त सगळेच
सही रे जिप्स्या...मी मुद्दाम
सही रे जिप्स्या...मी मुद्दाम २-३ भाग यायची वाट पाहीली आणि मग वाचायला घेतले....
वरती काही जणांशी सहमत...थोडा तोचतोचपणा जाणवला..पण जिप्सी टच काही फोटोत आहेच...
धमाल फोटो...इथेच रंग दे बसंतीचे शूटींग झाले होते का?
Pages