नमस्कार लोक्स
देवभूमी उत्तरांचलमधील खटिमा, नैनिताल, राणीखेत, अल्मोरा, कौसानी या परीसराची भटकंती करून आलो. त्यातीलच काहि निवडक प्रचिंची चित्रसफर येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. आशा आहे कि हि सफर तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर पहिल्या भागाची सफर खटिमा येथील "नानकमत्ता साहिब" गुरूद्वाराने करूया.
===============================================
===============================================
"उत्तरांचल (उत्तराखण्ड) " उत्तरप्रदेशमधून २००० साली वेगळे झालेले भारतातील २७वे राज्य. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले प्राकृतिक सुंदरता असलेले भारतातील एक राज्य.
हिंदुंचे पवित्रस्थान हरिद्वार, ऋषिकेश, पंचप्रयाग, बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री असलेल्या या राज्याला देवभूमी उत्तरांचल असेहि म्हणतात. हिंदूंच्या पवित्र नद्या गंगा व यमुना यांचे उगमस्थानही येथेच आहे. या शिवाय जिम कॉर्बेट, राजाजी यांसारखी प्रसिद्ध नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर, हर कि दून, हेमकुंड साहिब, नैनिताल, कौसानी, राणीखेत, मसूरी सारखी हिलस्टेशन, अशी ठिकाणेहि या राज्यात आहे. पर्यटनासाठी विविध पर्याय असलेले हे राज्य.
माझ्या भारतभ्रमण यादीमध्ये हि पहिल्या क्रमांकावर असलेले हे राज्य बघण्याची खुपच इच्छा होती. अचानक तसा योग जुळुन आला. आमचा एक मित्र उत्तरांचलचा आहे त्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाचे
आमंत्रण दिले तेंव्हाच माझा आणि इतर २ मित्रांचा उत्तरांचल फिरण्याचा कार्यक्रम पक्का झाला. एप्रिलपासुन नविन सुट्ट्या चालु झाल्याने सुट्टीचा काहि प्रॉब्लेम नव्हता. ४ मे ते १५ मे असा १२ दिवसांची टूर ठरली. मायबोलीकर आणि आंतरजालावरून माहिती गोळा केली. वेळ वाचावा आणि अधिक भटकता यावे म्हणुन मुंबई ते दिल्ली आणि परत असा प्रवास विमानाने करावयाचा ठरला. सगळी तयारी झाली आणि ३ तारखेला रात्री ९:५० च्या गो एअरवेजच्या फ्लाईटने दिल्लीकडे निघालो. साधारण १२ वाजता दिल्लीला पोहचलो. विमानतळावर उतरण्याआधीच "बाहेरील तापमान ३५ डिग्री आहे" अशी अनाऊन्स्मेट झाली आणि दिल्लीच्या गर्मीची चाहूल लागली. विचार केला रात्री बारा वाजता ३५ डिग्री मग दिवसा काय?????.
दिल्ली ते खटिमा* (अंतर ~३०० किमी) जाण्यासाठी आधीच बूक केलेली स्कॉर्पियो सुमारे अर्धा-पाऊण तास उशिरा आली :(. दिल्लीवरून गाझियाबाद, मुरादाबाद, रामपूर, रुद्रपूर, खटिमा असा ६ तासाचा प्रवास मुरादाबाद येथील बेक्कार ट्रॅफिकमुळे १० तासाचा झाला. बेक्कार अशासाठी कि कुठली गाडी कुठल्या दिशेने जातेय हेच कळत नव्हत. उभ्या, आडव्या कशाही गाड्या जात येत होत्या आणि त्यात भर म्हणजे हेवी वेट गाड्यांची आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांची. असा जा अत्यंत कंटाळवाणा प्रवास एकदाचा संपला आणि आम्ही खटिमाला मित्राच्या घरी गेलो. मस्तपैकी आंघोळ उरकुन, नाश्ता करून झोपलो. संध्याकाळी त्यांच्या रिवाजाप्रमाणे (कुमाऊ) संगीत, मेहंदी असे लग्नाचे कार्यक्रम होते. रात्री बारा वाजेपर्यंत धम्माल चालु होती. दुसरा दिवस लग्नविधी (बारात, पगफेरे, जयमाला, रीसेप्शन) यात गेला.
(*खटिमा हे उत्तरांचल राज्यातील उधमसिंग नगर जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असुन हिमालयाच्या तेरई प्रदेशात हा भाग येतो. या शहरापासुन जवळच असलेल्या बनबसा गावापासुन नेपाळ (महेन्द्रनगर) अंदाजे ४-५ किमी अंतरावर आहे. भारत-नेपाळे सीमेवर शारदा नदीवर घातलेला बांध आणि तेथुन दिसणारे दृष्य मनोहर आहे. फोटोग्राफिला येथे बंदी आहे. )
प्रचि १
प्रचि २
शादी — लड्डु मोतीचूर का
प्रचि ३
लग्नात पारंपारिक "नथनी" आणि पेहराव घालुन सजलेल्या पहाडी (कुमाँऊ) स्त्रिया. नवरीच्या नाकातही अशीच भलीमोठी नथनी होती.
प्रचि ४
पारंपारीक नृत्य करताना कुमाँऊ लोक. हातात ढाल/तलवार घेऊन नाचणार्यांना "छलिया" आणि या नृत्य प्रकाराला "छलिया नृत्य" असे म्हणतात कुमाँऊ लग्न समारंभात हा नृत्यप्रकार पाहिजेच असतो. या नृत्याचा व्हिडियो येथे पहा.
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
===============================================
नानकमत्ता साहिब गुरूद्वारा
===============================================
दोन दिवस काहि भटकता आले नाही. तिसर्या दिवशी आम्ही खटिमापासुन अंदाजे १५-१७ किमी अंतरावर असलेल्या "नानकमत्ता साहिब" या गुरुद्वार्याला भेट देण्याकरीता गेलो. शरयु नदीवर बांध घालुन येथे पाणी अडवलेले आहे. त्यालाच नानकसागर असे नाव दिले. याच बंधार्यावरून पुढे साधारण ३-४ किमी अंतरावर नानकमत्ता या गावी "नानकमत्ता साहिब" हा गुरुद्वारा आहे. पूर्वी याचे नाव "गोरखमता" होते. पुढे १६व्या शतकात गुरूनानाक यांनी येथे भेट दिल्यावर याचे नानकमत्ता असे ठेवण्यात आले. संपूर्ण गुरुद्वारा हा संगमरवर दगडांनी बांधला आहे. याच परीसरात एक पुरातन पिंपळाचे झाड आहे.
प्रचि ९
प्रचि १०
शरयू नदी
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
(पुढिल भागात "नैनिताल" :-))
===============================================
===============================================
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!
Pages