Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@_मधुरा_ बेसिक रेसिपी माहित
@_मधुरा_
बेसिक रेसिपी माहित नाही, ही माझी स्वतःची बेसिक रेसिपी आहे. ऑथेंटीसीटी बद्दल शंका घ्यायला भरपुर वाव आहे. :ड
तेलात जिरं, भरपुर हिंग, लाल मिरच्या, उडीद डाळ, हरभरा डाळ, आलं, कांदा परतायचा. त्यात चिरलेला टोमॅटो घालायचा, मिठ घालायचे. आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत परतत रहायचे. गार झाले की मिक्सर मधे फिरवायचे. हौस असल्यात वरुन परत कढिपता, लाल मिरच्यांची मस्त फोडणी द्यायची. वांग्याची वगैरे अशीच करतात वाटतं, फक्त त्यात चिंच घालतात आंबटपणासाठी.
धन्यवाद सानुली करते आता.
धन्यवाद सानुली
करते आता. ऑथेंटीक असलं नसलं काही फरक नाही, चव चांगली लागली की झालं.
वाळवण-साठवण इथे
वाळवण-साठवण इथे सापडलं.
)
आहारशास्त्र आणि पाककृती>विषयवार यादी>पाककृती प्रकार>वाळवण-साठवण
पण त्यात फारसे वाळवणाचे प्रकार नाहीयेत. चिकोड्या, कुरडया, साबुदाण्याच्या चकल्या, पापड, वेगवेगळे सांडगे ( याच धाग्यात पापईचे सांडगे दिसलेत पण ते वाळवण-साठवण मधे नाहीयेत), टिकणारी लोणची हे पदार्थ नाही दिसत आहेत. सगळ्या सुगरण लोकांनो प्लिज टाकाल का?
(यातला सगळ्यात सोपा पदार्थ करुन बघेन मग
सावली, इथे पण पहा थोडे
सावली, इथे पण पहा थोडे
ओह हो जुन्या माबो वर आहे ना
ओह हो जुन्या माबो वर आहे ना
धन्यवाद.
मला पण मदत करा ना
मला पण मदत करा ना प्लीज!
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) , आणि लांब हिरव्या वांग्या चे काय करता येईल ? तळून काप किंवा कापाची भाजी करतात का ?
_मधुरा_, इकडे मी टोमॅटो चटणी
_मधुरा_,
इकडे मी टोमॅटो चटणी लिहीली आहे. मस्त होते.
वांग्याचा कुठलाही प्रकार करता
वांग्याचा कुठलाही प्रकार करता येईल कि (भरीत सोडून). आमच्याकडे ती भज्यांसाठी आणत असत पण त्याचे काप आकाराने फारच बारिक होतात. आता लांबट तूकडे करुन भाजीच करतात.
रावी, वांग्यांना चिरा देऊन,
रावी, वांग्यांना चिरा देऊन, शॅलो फ्राय करून खसखशीची पूड , दाण्याचे कूट्,बारीक चिरलेला कांदा, लसूण घालून मस्त भाजी होते.
दिनेशदा, प्राची धन्स !
दिनेशदा, प्राची धन्स !
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) ,
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) , आणि लांब हिरव्या वांग्या चे काय करता येईल ? तळून काप किंवा कापाची भाजी करतात का ?
माझ्या आधीच्या ऑफिसजवळचा एक सँडविचवाला सॉल्लीड सँडविचेस बनवायचा - विशेषतः मसाला सँडविच ज्यात तो उकडलेल्या बारीक हरभ-याची सुकी उसळ घालायचा. एवढी सुंदर चव कशी येते यासाठी मी त्याच्या मागे बरीच कटकट केल्यावर त्याने मला कुठल्याही भाजीच्या फोडणीत कांद्याबरोबर नेहमी ही वर लिहिलीत ती बारीक वांगी एकदम बारीक चिरुन घालायची, एकदम फर्मास चव येते म्हणुन सांगितलेले. मी थोडे दिवस ट्राय केलेले, चव खरेच सुंदर येते, तेल जर्रासे जास्त घालावे लागते. नंतर कंटाळा केला
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) ,
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) , आणि लांब हिरव्या वांग्या चे काय करता येईल >>>>>
वांगी पातळ चिरुन मिठ व थोडिशि हळद लावुन तेलावर खरपुस भाजुन ( शॅलो फ्राय) घ्यावि. आयत्या वेळि बारीक चिरलेला कांदा, जाडसर कुटलेलि लसुण + मिरेपुड, मिठ (चविनुसार) आणि लिम्बु पिळुन, वांगी टाकुन हलक्या हाताने नीट मिक्स करावे. खुप छान लागते हे सलाद. एका सुदानि मैत्रिणि कडे खाल्ल होते.
मृदुला , कांद्याच्या पातीची
मृदुला , कांद्याच्या पातीची भाजी मुगाची डाळ घालूनही करता येईल किंवा कच्चीच दाण्याचा कूट घालून पछडीही छान होईल.
मृदुला कांद्याच्या पातीची
मृदुला कांद्याच्या पातीची भाजी ईतर पालेभाजी करतो त्याप्रमाणे करावी आणि खायच्यावेळी वरून बारीक शेव घालावी , छान लागते
धन्यवाद मंडळी. काल मी पातीत
धन्यवाद मंडळी. काल मी पातीत डाळीचे पीठ घालणार हे ऐकून दचकलेल्या नवर्याने स्वतःच भाजी केली. पात + कांदा + ढोबळी मिरची + आले + हॉट अँड स्वीट सॉस + मिरपूड इ घालून भाजी. ती पोळीत गुंडाळून रॅप म्हणून खायची (म्हणे). चवीला छान होती. पण पात परतून थोडीच झाली.
आता, पचडी आणि शेव वाली कृती करून बघायला (दोन वेळा) पुन्हा पात आणेन.
माझ्याकडे काश्मिरहुन् आणलेले
माझ्याकडे काश्मिरहुन् आणलेले सफरचंदाचे वाळवलेले काप आहेत . घेताना ते नुसते खायलाही बरे लागतात म्हणुन घेतले होते पण घरात ते मी सोडुन कोणीच खाईना
तर प्रश्न असा होता की त्याची म्हणे भाजीही करतात [ म्हणजे दुकानदाराने तसे सांगितल्याचे आठवते आहे ] इथे कोणाला माहीत आहे का ती ब हाजी कशी करतात ते. प्लिज जर माहीत असेल तर लवकर सांगा. फार्फार गरज आहे.
काल मी पातीत डाळीचे पीठ
काल मी पातीत डाळीचे पीठ घालणार हे ऐकून दचकलेल्या नवर्याने स्वतःच भाजी केली
आयडीया मस्त आहे. असेच अजुन काहीबाही मधुनमधुन सांगत जा त्याला नी आयत्या जेवणाचा आनंद घे
मनिषा लिमय, अहो तुम्ही तसेही
मनिषा लिमय,
ह.घ्या.
अहो तुम्ही तसेही काहीही खाता ना(असे मी नाही, तुमची मंडळी म्हणतात ना) मग खा की हे सुद्धा असेच येता जाता... त्यात काय.
मनिषा, ते काप साखरेच्या
मनिषा, ते काप साखरेच्या पाकात घालून व त्यात भाजलेले शेंगादाणे थोडे घालून उपासाला डेझर्ट करता येइल. जसे रताळ्याचे करतो तसे? त्याच्या कात्रीने बारीक सळ्याकापून फ्राय करून वर चाट मसाला मीठ घालून किंचित पिठी साखर घालून. चकणा नव्या पद्धतीचा.
मीरा१० पण आता ते खाऊन खाऊन
मीरा१० पण आता ते खाऊन खाऊन माला कम्टाळा आलाय ना म्हणुन तर भाजी कशी करतात ते विचारलय मी
मामी ते पाकात टाकायच भारीए, थोड करुन बघतेच आता.
पण भाजीची कृटीही हवीये मला
मनिषा लिमये, असे आहे होय. मग
मनिषा लिमये,
असे आहे होय.
मग बटाट्याच्या पद्धतीने भाजी करा हिरवी मिरची, खोबरं घालून. मग काश्मिरी बटाट्याची भाजी म्हणून खपवा तुमच्या ह्यांना वाढून. कळलेच जर त्यांना तर बिलकूल कबूल नका करु भाजी संपेपर्यंत. भाजी जशी संपली की लगेच त्यांना म्हणा, काय पण खाता बघा तुम्ही.
मनिषा, त्याचे लोणचे पण करता
मनिषा, त्याचे लोणचे पण करता येईल. ताज्या सफरचंदाचे लोणचेही छान लागते.
मनिषा, नवीन नियमांप्रमाणे
मनिषा, नवीन नियमांप्रमाणे विपु केलीय !!
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/119784.html?1164714976
या वरील रेसिपीप्रमाणे मला मखमली पूरी करायची आहे, मूळ कृतीत मैद्यात हळद घालून करायची असा उल्लेख आहे. पण जर कलरसाठी हळद किंवा ईतर कोणताही खायचा कलर वापरायचा नसल्यास , कलरसाठी गाजराचा, किंवा बीटाच्या रसात पीठ भिजवून करता येतील काय ?
माझ्याकडे गुलाबजामसाठी केलेला पाक उरलेला आहे, तो वापरता येईल ना यासाठी ? कितीदिवस टिकतील ह्या पुर्या ? कोणी सांगाल का ?
धन्यवाद
गाजराचा तसा रंग येणार नाही.
गाजराचा तसा रंग येणार नाही. बीट उकडून, किसून पिळून त्या पाण्यात पिठ भिजवता येईल. म्हणजे उग्र वास येणार नाही. पिठात रंग घालताना अगदी फिक्कट रंग येईल एवढाच रस घालायचा. तळल्यावर तो जरा डार्क होईल आणि पाकातील साखरेमूळे गुलाबी होईल. पाक जर नीट जमला तर या पुर्या आठवडाभर टिकतील.
गुलाबजामचा पाक वापरता येईल पण त्यात गुलाबजामचे कण असतील तो जरा गाळून घेतलेला चांगला.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
सदर्न फ्राइड चिकन कसे करायचे?
सदर्न फ्राइड चिकन कसे करायचे? आम्ही आत्ताच पोटात घालून अजगर होउन बसलो आहे. लै मस्त क्रिस्पी क्रिस्पी. बरोबर टार्टर सॉस दिला होता.
http://www.foodnetwork.com/re
http://www.foodnetwork.com/recipes/paula-deen/southern-fried-chicken-rec...
घ्या मामी. पॉला काकू सदर्न फूडच्या गॉडेस आहेत. त्यामुळे रेसिपी ऑथेंटिकच.
एकदम धन्यवाद. तू काय आज वरण
एकदम धन्यवाद. तू काय आज वरण भात जेवणार का?
आहाहा !! काय आठवण काढलीत !!
आहाहा !! काय आठवण काढलीत !! वरण भातच करीन म्हणते आता
Pages