Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रतिभा, लहान लहान
प्रतिभा, लहान लहान प्लॅस्टीकचे एअर टाइट कंटेनर द्यावेत चटण्यांसाठी. रेडी टू इट वगैरे दिलेच असेल ना. तसेच थोडा फार तांदूळ वगैरे दे. अगदीच काही जमले नाही तरी भात करुन खाता येइल.
रच्याकने मार्झिपान म्हणजे काय
रच्याकने मार्झिपान म्हणजे काय
काजुकतलीलाच मार्झिपान म्हणता येईल. जरा पातळ लाटले की झाले
तसे मुळ मार्झिपान बदामाचे करतात पण काजुकतलीचेही छान होते. मोठी पोळी लाटुन, केकवर चिकटण्यासाठी जॅम पसरवुन त्यावर ही पोळी टाकुन केक झाकता येतो व डेकोरेट करता येतो, ह्या पोळीतुन फुले, पाने कापता येतात. त्यासाठी फॅन्सी कटर्स मिळतात.
आता इथले वाचुन लाजोला आठवण येईल मार्झिपान वापरुन काहीतरी करायची. मागे दिवाळीला तिने ओळखा पाहु सिरिजमध्ये केलेल्या काही गोष्टी बहुतेक मार्झिपान वापरुन केल्या होत्या. तिने काही करायचे मनावर घेतले तर बरे होईल. आपल्याला काहीतरी मस्त पाहायला मिळेल.
काजुकतलीलाच मार्झिपान म्हणता
काजुकतलीलाच मार्झिपान म्हणता येईल. >>> असे होय.. काल रात्रीच काजुकतली केली.. आता पुढच्या वेळि केकवर हेच डेकोरेशन
हा केक मार्झिपानने झाकलेला
हा केक मार्झिपानने झाकलेला आहे. वरची फुले मात्र मला सांगता येणार नाहीत, त्याचीच की खोटी ते. पण अशी फुले बनवलेली मी पाहिलेली आहेत.
धन्यवाद दिनेशदा, पल्लवी
धन्यवाद दिनेशदा, पल्लवी ८६.
रेडि टु इट मधे कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत ?
रसोइ मॅजीकचे चांगले आहेत.
रसोइ मॅजीकचे चांगले आहेत. बाकी विशेश ट्राय केलेले नाहीत.
प्रतिभा, पुण्यात असाल तर
प्रतिभा, पुण्यात असाल तर डेक्कन वर वैद्य दुकानात इन्स्टंट उपमा, खिचडी व सर्व चट्ण्या मिळतील. एम टी आर चे रेडिमिक्स बरे असतात.
कचोरीच्या वरच्या पातीसाठी काय
कचोरीच्या वरच्या पातीसाठी काय वापरतात? ऑल पर्पज फ्लोर वापरलं तर चालेल का?
पल्लवी८६ , अश्विनीमामी
पल्लवी८६ , अश्विनीमामी धन्यवाद.
मी मुंबईत आहे, एम टि आर चे रेडि टु इट घेतले.
दाक्षिणात्य पद्धतीने
दाक्षिणात्य पद्धतीने भाज्यांच्या ओल्या चटण्या करण्याची बेसिक रेसेपी कोणाला माहीत आहे का? ( उदा: वांग्याची, हरभरा डाळ घालून, टोमॅटोची, दुधीची ई. .. )
बिटच्या पानांची भाजी करतात
बिटच्या पानांची भाजी करतात काय? करत असतील तर कशी करतात?
रचू,
रचू, http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post_10.html मी अशी करते बीटच्या पानांची भाजी. कधीतरी बारीक चिरुन घालते फोडणीत.
रसोई मॅजिक च्या प्रॉडक्टमध्ये
रसोई मॅजिक च्या प्रॉडक्टमध्ये तिखटपणा अजिबात नाही . अतिशय फिकं वाटलं. दोन वेगवेगळे प्रॉडक्ट्स ट्राय केले होते.
बीटची पानं + मेथी, किंवा
बीटची पानं + मेथी, किंवा बीटची पानं + मुळ्याचा पाला असं घालून पीठ पेरून भाजी पण छान लागते. मिनोतीच्या पद्धतीने पण बीट + चार्ड अशी करते मी कधी कधी .
धन्सं गं मिनोती, मी तुझ्या
धन्सं गं मिनोती, मी तुझ्या पद्धतीने करुन बघेन आता
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) ,
बारिक (अंगठ्यापेक्शा जाड) , आणि लांब हिरव्या वांग्या चे काय करता येईल ? तळून काप किंवा कापाची भाजी करतात का ?
हापूस आंब्याचा रस घालून
हापूस आंब्याचा रस घालून करायच्या शिर्याची कृती होती इथे; ती मिळत नाही आहे. गोड पदार्थांत नाही; शिरा, आंबा ,आमरस या शब्दखुणांतही नाही.
भरत ती आंब्याच्या शिर्याची
भरत ती आंब्याच्या शिर्याची कृती दिपांजलीने मातृदिनानिमीत लिहीली होती. तिच्या पाऊलखुणा>>लेखन बघा.
रोस्टेड उपमा मिक्सचा उपमा कसा
रोस्टेड उपमा मिक्सचा उपमा कसा करायचा? जरा जाडसरच वाटतोय रवा
पाणी दुप्पट लागेल का? निरव ब्रँड आहे.
प्राजक्ता त्या पाकिटावर
प्राजक्ता त्या पाकिटावर लिहिलेय त्यापेक्षा थोडे जास्त पाणी लागते. तो जरा निवला की सगळे पाणी आटते.
कांद्याच्या पातीच्या भाजीची
कांद्याच्या पातीच्या भाजीची कृती (किंवा कृत्या) कुठे सापडतील? मी शब्दखुणांत कांदा बघितला, पात वगैरे काही पर्याय नाही. एका मैत्रिणीने घरी पिकवलेली पात पाठवली आहे. मातेला विचारेपर्यंत ती ताजी राहणार नाही, म्हणून शोधाशोध..
मृदुला १. बेसन/पीठ पेरून
मृदुला १. बेसन/पीठ पेरून कोरडी भाजी करता येईल, ती खूप होत नाही.
२. नेहमीसारखेच पिठले पण कांद्याची पात घालून करता येईल
ग्रेट. पटकन उत्तर दिल्याबद्दल
ग्रेट. पटकन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद रूनी. इथे पीठ पेरून वाल्या कुठल्या भाजीचे उदाहरण सापडतेय का तेच शोधत होते.. (सापडले नाही अजून!)
दुसरे म्हणजे, पिठलेही आत्तापर्यंत कधी केले नाहीये!
पिठले शोधता, म्हाद्या सापडला! त्यात दाण्यांऐवजी पात घालून प्रयोग करायचे ठरवले आहे.
(बाकी डाळीचे पीठ, बेसन वगैरे शब्दखुणांतही काही सापडले नाही..)
थालिपिठं लावा पात घालून.
थालिपिठं लावा पात घालून.
पिठ पेरायचे नसेल तर दाण्याचे
पिठ पेरायचे नसेल तर दाण्याचे कूट घालून पण चांगली होते हि भाजी. नूसती तेलाच्या हिंग हळदीच्या फोडणीवर परतायची. झाकण ठेवून एक वाफ काढायची. मग मीठ, साखर, तिखट टाकायचे आणि दाण्याचे कूट टाकायचे.
मृदुला तुझ्या विपूत कृती दिली
मृदुला तुझ्या विपूत कृती दिली आहे
पिठल्याची कृती पाहून ते
पिठल्याची कृती पाहून ते करायचे आणि पिठले भाताबरोबर पातीचा कांदा आणि पात नुसते कच्चेच खायचे.
धन्यवाद, कृती मिळाली. बेसन
धन्यवाद, कृती मिळाली. बेसन भाजणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. (मी बिन भाजताच वापरले असते!)
दिनेशदा, दाण्याचे कूट किंवा दाणे सुद्धा नाहीयेत. त्यामुळे बेसन हाच पर्याय आहे.
मृदुला मला वाटत पिठल्याला
मृदुला मला वाटत पिठल्याला बेसन भाजत नाहीय सहसा. मी पेरून करायच्या भाजीला थोडेसे भाजून घेते. भाजीत कच्च्या बेसनाची चव मला फारशी आवडत नाही. कच्च लागते.
१६ तारखेला विचारलेल्या
१६ तारखेला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणिही न दिल्यामुळे, परत विचरत आहे
दाक्षिणात्य पद्धतीने भाज्यांच्या ओल्या चटण्या करण्याची बेसिक रेसेपी कोणाला माहीत आहे का? ( उदा: वांग्याची, हरभरा डाळ घालून, टोमॅटोची, दुधीची ई. .. )
???
Pages