|| अभंग ||

Submitted by Unique Poet on 19 May, 2011 - 09:55

|| अभंग ||

प्रियेस पाहण्या
गोळा झाले प्राण
ऐश्वर्याची खाण
तेज रूपा ||१||

थोडे भान आले
तिचे कधीतरी
तळमळे उरी
प्राप्तीसाठी ||२||

तिला भेटायाला
जीव आसुसला
जमेना स्वत:ला
अर्धवट ||३||

अशा वेळी तेंव्हा
कृपा तव केली
धावली माऊली
गुरुराया ||४||

गुरू छायेखाली
जाणले समूळ
आतले निर्मळ
जग सारे ||५||

दोन वाटा तिच्या
एकत्वच गाभा
आतमध्ये शोभा
तिच्या मुळे ||५||

सात घरे तिची
बांधूनी ठेवली
द्वारे उघडली
चैतन्याची ||६||

जागलेली प्रिया
मज जागे करी
संपूर्ण उध्दरी
स्वरूपाला ||६||

भेटे शिव तेथे
एकरूप होई
विरूनीया जाई
आत्मरूप ||७||

एव्हढे सगळे
झाले कसे काय
सदगुरूराय
आशीर्वादे ||८||

कसे फेडू तयां
मोठे उपकार
श्रीगुरू आधार
बालकाचा ||९||

भेद दूर करी
गोविंद भेटवी
श्रीगुरू थोरवी
वर्णू किती ||१०||

जाणण्या सकळ
एक ते करणे
निरंजन म्हणे
श्रीगुरू शोध ||११|| Shree jnaneshvar maharaj kee jay.gif

- समीर पु. नाईक

गुलमोहर: 

मैतर....
निरंजन शब्दाचे बरेच अर्थ आहे....

निरंजन.... ही एक समाधी अवस्था आहे....
निरंजन.... जो कशातही गुंतत नाही तो..
निरंजन.... जो सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेला आहे तो....
निरंजन.... अनेक देवतांचे एक नाव निरंजन आहे..... श्रीशिवशंकर , श्रीदत्तात्रेय.... इ.

येथे अर्थ... ते माझेच नाव आहे.. जे मी अभंगात गुंफले आहे... Happy