मु.पो. तेर्से बांबार्डे

Submitted by Yo.Rocks on 16 May, 2011 - 13:06

मु.पो. तेर्से बांबार्डे, तालुका - कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग... म्हणजेच कोकणात असलेला एक गाव.. माझाच गाव ता... Happy गेली पाच वर्ष जाउक जमणा नाय.. तसा माका तर गणपतीतच कोकणात जाउक आवडता.. पण म्हटला उन्हाळ्यातच जाउन येउ.. तसापण शालेय शिक्षणानंतर उन्हाळ्यात कधीच गावी गेलो नव्हतो.. म्हणान जमात तसा फक्त तीन दिवसाचो मुक्काम करुन इलय.. या भेटीत हातात डिजीकॅम असल्याने जास्तच उत्सुकता Happy
मुंबईत्सून गावाकडे जाताना एकदा गोवा गाडीत बसला की मगे कधी मुंबईच्या बाहेर पडतोय असा असा वाटीत रवता.. रस्त्यात लागणारे वळणावळणाचे घाटरस्ते, नद्या, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी कौलारु घरे, आंबा-फणस-काजी यांनी बहरलेली झाडे इ... सगळा चित्र कसा मस्त डोळ्यासमोर येता नि कधी एकदाचो गावी पोचतय म्हणान मन कासावीस होउन जातय..
एकदा घरी पोचलय की मगे न्हाणीघरातल्या गरम पाण्याने फ्रेश होउन लगेच स्वयंपाक घरात मांडी घालून पाटावर बसूचा नि समोर ताटातल्या 'उकड्या तांदळाची पेज नि वालीच्या गराची उसळ' खाण्यासाठी रेडी !! नि ढेकर इलो की मगे भटकंतीसाठी बाहेर पडूचा!! Proud त्यातलेच काही निवडक प्रची..

प्रचि १

(न्हाणीघर ... आता घरोघरी संडास बाथरुम बांधलेले आसत.. पण पाणी गरम करुक काळवंडलेलो माठ व्हयोच )

प्रचि २

(उन्हाळ्यात ह्या हमखास दिसणारा ह्या दृश्य.. सुकी लाकडा, शेणी नि कुडी.. नि मागे घर दिसताहा ता आमचा "मांगर" - पावसात या घरातच शेतकामे उरकली जातात.. जा मी अजून कधी बघूक नाय..)

प्रचि३

(शेणाने सारवलेला आंगण नि मध्ये असणारी तुळस )

प्रचि ४

(सुप्रभात.. थोडासा उजाडला की ह्यांच्या कामांका सुरवात.. )

प्रचि ५

(आमच्या घराजवळच गर्द झाडीत असणारी देवळी.. माझा आवडता ठिकाण.. इथेच मगे दुपारी वार्‍याने होणारी पानांची सळसळ नि पक्ष्यांची नॉन स्टॉप सुरु असणारी किलबिल ऐकत एक डुलकी घेतोच..)

प्रचि ६

(शेतातून जाणारी पाऊलवाट.. खरे तर पावसात इला की दोन्ही बाजूस भातशेतीचे पांघरलेले हिरवे गालीचे दिसतले..)

प्रचि ७

(भाटीयेवरची नारळांची बाग)

प्रचि ८

(नि तिकडेच असणारे वालीच्या शेंगांचे मळे.. इथे पण पावसानंतर सगळे कसे हिरवे हिरवे..)

प्रचि ९

(कुडी..)

प्रचि १०

(मायबोलीवरील भाऊंनी आपल्या डिजीटल चित्रातून "साकव" ची ओळख करून दिली आहेच.. हाच तो साकव.. )

प्रचि ११

(ह्या साकवावरून पावसात चालताना जपूनच.. नायतर व्हाळात पडलोच समजूचा..)

प्रचि १२

(आंबा,फणस इ. झाडे वगळता बहुसंख्याने आढळणारे ऐनाचे झाड.. .)

प्रचि १३

(काळ्या ढगांमुळे सुर्यदेवांनी केलेले वेषांतर.. Happy )

प्रचि १४

(कोंड- नदीच्या खोलगट भागात टिकून रवलेला पाणी..)

प्रचि १५

(गुरांका पण अंघोळ व्हयीच..)

प्रचि १६

(उन्हाळ्यातही पाणी टिकवून धरणारी नदी.. पावसात माका या अँगलने फोटो काढूचा तर होडीयेत बसूक लागात..)

प्रचि १७

(आटलेल्या नदीचे पात्र)

प्रचि १८

(वेळ सूर्यास्ताची.. मी तर तिन्ही दिवसांचे सूर्यास्त टिपण्याचे मनाशी पक्के केले होते..)

प्रचि १९

(नदी ओलांडूक होडीची गरज उन्हाळ्यात तरी नाही)

प्रचि २०

(सूर्य मावळलो आता गुरांका घेउन घरी जाउची वेळ.. )

प्रचि २१

(अंधार पडला म्हणान काय झाला.. कामं सुरूच रवतत)

प्रचि २२

(शेतातून आणलेल्या मिर्च्यांचे देठ कापण्याचा काम..)

प्रचि २३ कोकणमेवा -

माझा दुर्भाग्य असा की आंबे कच्चेच होते.. फणस, रतांबे, करंदा (करवंदा), जाम असा सगळा खाऊक गावला..
या भेटीत विविधरंगीपक्षी दिसले नाय तर नवलच.. भटकंती करताना त्यांका कॅमेर्‍यात टिपूचा म्हणजे मस्तच टाइमपास..:)

प्रचि २४

कोकणाता कितीही फिरला तरी कमीच.. नि खयपण गेला तरी मन रमतेच.. मगे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असो वा घराकडची नदी असो.. तेव्हा परतीच्या प्रवासाला निघूचा म्हणजे साहजिकच कठीण ! नि तुमचा मुक्काम जास्त दिवस असेल तर जीवाची जास्तच घालमेल !! त्यात निघताना सगळ्या थोर व्यक्तींचे आशिर्वाद घेउन निघताना घराकडच्या लोकांच्या पापण्या ओलावलेल्या.!.घरी पोचलस की लगेच फोन कर म्हणत निरोप देणारी मंडळी.. 'पुन्हा कधी येणार' म्हणत अगदी रस्त्यापर्यंत सोडूक येणारी बच्चाकंपनी.. खराच.. कठीण असतो तो प्रसंग.. गाडीत बसला की अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक चालू होतो.. नि मुंबई येउच नये असा वाटीत रवता.. बरा. मुंबईत पोहोचेस्तोवर मोबाईलवर दोन तीनदा फोन येउन जातो.. खय आसस ? पोचलास की नाय ? विचारपुस होतेच.. नि एकदा मुंबईत इला की गावच्या दौर्‍याचो कितीपण हँगओवर असांदे.. ऑफीस गाठावेच लागते.. Happy

गुलमोहर: 

योरा, उद्याच गावाक चलंलय, तेव्हा झब्बुक तयार र्हव....

मगे सांगा नको, आधी सांगल्यान नाय म्हणून.....

मोठ्या मनाने क्षमा करशील अशी आशा आहे. >> दिनेशदा.. कशाला लाजवताय मला.. उलट तो फ र क चा फोटो सॉलिड फरक दाखवतोय.. आवडेश एकदम Happy

गिरी.. वाट बघतय रे.. नि आंब्याच्या दोन पेटी वायच घेवान ये आमच्यासाठी.. ट्रेकींगची आगाउ तयारी Wink

अफलातून ! तो साकव डेंजरस दिसतोय. मी केशवराजच्या साकवावरुन गेले होते फार्फार पुर्वी. तो मात्र दणकट होता.

Rock एकदम Rock
जबरदस्तच.....................

लयच मस्त आसा तुमचा गाव.माकाव गावाक जाताना बरा वाटता पण येतना लय वायट वाटता.
तुमी "कुडी "म्हणतास ना त्याका आमच्या कडे "उटी"म्हणतत.आणी ती काकी वळता हा त्याका काय म्हणतत आता आठवत नाय हा पण खळ्यात माटव घालुक त्याचो उपयोग होता.
मस्तच गावाक गेल्यासारा वाटला. Happy

फोटो आणि वर्णन अप्रतिम. शब्द खुंटलेत. हे असं गाव असणं किती भाग्याचं आहे. दिनेशदांनी टाकलेले फोटो पाहून पावसाळ्यानंतर कोकणात जायची इच्छा होते आहे. हा योग आमच्या भाग्यात कधी येणार आहे देव जाणे!

परबिणी.. आमी झापा म्हणतोव गो तेका.

गब्बर.. कायौ म्हण पण गावाकडे चल.

केश्विनी, तु गेल्यानंतरची अवस्था काय आसा गो? Light 1

सुरेख फोटोग्राफी यो! Happy
सर्व आवडले......४ आणि १७ माझे इंस्टन्ट फेवरेट !
आणि लिहीलंस पण एकदम झकास!

अप्रतिम..
या गवचय भेटीत एकदम मज्जा माडी केलस मरे.. Happy रानमेव्याचो फोटु बघुन माका पोटात कालवला नुस्ता.. Proud हेवो वाटता तुझो आज.. बघ रागाने गाळिये घातलय आता कुठे पडा नुको.. Proud

रॉक्स्या, सिंधुदुर्गात याक तुझा तेर्सा बांबर्डा नि दुसरो हां तां येताळ बांबर्डा.. तुज्या गांवाक ह्या नांव कशांन पडला तेचो जरा ठाव घेशीत? .. आनि हंयसर कुनाक जर ठाव असतला तर जरा खरडांक घ्येवा!! हांव पन निघालो फुडल्या भेस्तरवारांक... मेल्या फोटो काढून आमचो धूर काढतांस!! येतांना पावसाक घेऊन येतंय.....

Pages