मु.पो. तेर्से बांबार्डे

Submitted by Yo.Rocks on 16 May, 2011 - 13:06

मु.पो. तेर्से बांबार्डे, तालुका - कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग... म्हणजेच कोकणात असलेला एक गाव.. माझाच गाव ता... Happy गेली पाच वर्ष जाउक जमणा नाय.. तसा माका तर गणपतीतच कोकणात जाउक आवडता.. पण म्हटला उन्हाळ्यातच जाउन येउ.. तसापण शालेय शिक्षणानंतर उन्हाळ्यात कधीच गावी गेलो नव्हतो.. म्हणान जमात तसा फक्त तीन दिवसाचो मुक्काम करुन इलय.. या भेटीत हातात डिजीकॅम असल्याने जास्तच उत्सुकता Happy
मुंबईत्सून गावाकडे जाताना एकदा गोवा गाडीत बसला की मगे कधी मुंबईच्या बाहेर पडतोय असा असा वाटीत रवता.. रस्त्यात लागणारे वळणावळणाचे घाटरस्ते, नद्या, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी कौलारु घरे, आंबा-फणस-काजी यांनी बहरलेली झाडे इ... सगळा चित्र कसा मस्त डोळ्यासमोर येता नि कधी एकदाचो गावी पोचतय म्हणान मन कासावीस होउन जातय..
एकदा घरी पोचलय की मगे न्हाणीघरातल्या गरम पाण्याने फ्रेश होउन लगेच स्वयंपाक घरात मांडी घालून पाटावर बसूचा नि समोर ताटातल्या 'उकड्या तांदळाची पेज नि वालीच्या गराची उसळ' खाण्यासाठी रेडी !! नि ढेकर इलो की मगे भटकंतीसाठी बाहेर पडूचा!! Proud त्यातलेच काही निवडक प्रची..

प्रचि १

(न्हाणीघर ... आता घरोघरी संडास बाथरुम बांधलेले आसत.. पण पाणी गरम करुक काळवंडलेलो माठ व्हयोच )

प्रचि २

(उन्हाळ्यात ह्या हमखास दिसणारा ह्या दृश्य.. सुकी लाकडा, शेणी नि कुडी.. नि मागे घर दिसताहा ता आमचा "मांगर" - पावसात या घरातच शेतकामे उरकली जातात.. जा मी अजून कधी बघूक नाय..)

प्रचि३

(शेणाने सारवलेला आंगण नि मध्ये असणारी तुळस )

प्रचि ४

(सुप्रभात.. थोडासा उजाडला की ह्यांच्या कामांका सुरवात.. )

प्रचि ५

(आमच्या घराजवळच गर्द झाडीत असणारी देवळी.. माझा आवडता ठिकाण.. इथेच मगे दुपारी वार्‍याने होणारी पानांची सळसळ नि पक्ष्यांची नॉन स्टॉप सुरु असणारी किलबिल ऐकत एक डुलकी घेतोच..)

प्रचि ६

(शेतातून जाणारी पाऊलवाट.. खरे तर पावसात इला की दोन्ही बाजूस भातशेतीचे पांघरलेले हिरवे गालीचे दिसतले..)

प्रचि ७

(भाटीयेवरची नारळांची बाग)

प्रचि ८

(नि तिकडेच असणारे वालीच्या शेंगांचे मळे.. इथे पण पावसानंतर सगळे कसे हिरवे हिरवे..)

प्रचि ९

(कुडी..)

प्रचि १०

(मायबोलीवरील भाऊंनी आपल्या डिजीटल चित्रातून "साकव" ची ओळख करून दिली आहेच.. हाच तो साकव.. )

प्रचि ११

(ह्या साकवावरून पावसात चालताना जपूनच.. नायतर व्हाळात पडलोच समजूचा..)

प्रचि १२

(आंबा,फणस इ. झाडे वगळता बहुसंख्याने आढळणारे ऐनाचे झाड.. .)

प्रचि १३

(काळ्या ढगांमुळे सुर्यदेवांनी केलेले वेषांतर.. Happy )

प्रचि १४

(कोंड- नदीच्या खोलगट भागात टिकून रवलेला पाणी..)

प्रचि १५

(गुरांका पण अंघोळ व्हयीच..)

प्रचि १६

(उन्हाळ्यातही पाणी टिकवून धरणारी नदी.. पावसात माका या अँगलने फोटो काढूचा तर होडीयेत बसूक लागात..)

प्रचि १७

(आटलेल्या नदीचे पात्र)

प्रचि १८

(वेळ सूर्यास्ताची.. मी तर तिन्ही दिवसांचे सूर्यास्त टिपण्याचे मनाशी पक्के केले होते..)

प्रचि १९

(नदी ओलांडूक होडीची गरज उन्हाळ्यात तरी नाही)

प्रचि २०

(सूर्य मावळलो आता गुरांका घेउन घरी जाउची वेळ.. )

प्रचि २१

(अंधार पडला म्हणान काय झाला.. कामं सुरूच रवतत)

प्रचि २२

(शेतातून आणलेल्या मिर्च्यांचे देठ कापण्याचा काम..)

प्रचि २३ कोकणमेवा -

माझा दुर्भाग्य असा की आंबे कच्चेच होते.. फणस, रतांबे, करंदा (करवंदा), जाम असा सगळा खाऊक गावला..
या भेटीत विविधरंगीपक्षी दिसले नाय तर नवलच.. भटकंती करताना त्यांका कॅमेर्‍यात टिपूचा म्हणजे मस्तच टाइमपास..:)

प्रचि २४

कोकणाता कितीही फिरला तरी कमीच.. नि खयपण गेला तरी मन रमतेच.. मगे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असो वा घराकडची नदी असो.. तेव्हा परतीच्या प्रवासाला निघूचा म्हणजे साहजिकच कठीण ! नि तुमचा मुक्काम जास्त दिवस असेल तर जीवाची जास्तच घालमेल !! त्यात निघताना सगळ्या थोर व्यक्तींचे आशिर्वाद घेउन निघताना घराकडच्या लोकांच्या पापण्या ओलावलेल्या.!.घरी पोचलस की लगेच फोन कर म्हणत निरोप देणारी मंडळी.. 'पुन्हा कधी येणार' म्हणत अगदी रस्त्यापर्यंत सोडूक येणारी बच्चाकंपनी.. खराच.. कठीण असतो तो प्रसंग.. गाडीत बसला की अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक चालू होतो.. नि मुंबई येउच नये असा वाटीत रवता.. बरा. मुंबईत पोहोचेस्तोवर मोबाईलवर दोन तीनदा फोन येउन जातो.. खय आसस ? पोचलास की नाय ? विचारपुस होतेच.. नि एकदा मुंबईत इला की गावच्या दौर्‍याचो कितीपण हँगओवर असांदे.. ऑफीस गाठावेच लागते.. Happy

गुलमोहर: 

यो एकदम मस्त फोटु Happy
कोंड म्हटल्यार आमच्याकडल्या कोंडीची आठव इली.. खुप पाणी आसता थय नि गच्च झाडांची सावली. थयच जातत बायका कपडे धुवुक. Happy
नदी मस्त आसा रे तुमच्याकडची. काजी, बोंडु, रतांबे, करवंद, फणस नि आंबे. वा वा मस्त गावरान मेवा Happy देवळी मस्त.

योग्या...
खूपच सून्दर...

नीलू...
काजू आणि फणसाच्या मध्ये कसले फळ आहे???...>>>... तो पिकत ईलेलो 'रतांबो' आसा गो!!!...
माका सुरुवातीक तां फळ 'जाफर' किंवा 'जगम' आसा असां वाटलां, पण पानांकडे बघुन तो रतांबो असल्याची खात्री पटली...
वर म्हटलय त्या 'जाफर/ जगम' फळाक पिंगूळी कडे 'आटक्या' देखिल म्हणतत... पण तेचो ह्यो सिझन न्हय... ती फळां साधारण पणे 'डिसेम्बर्-जानेवारी' च्या दरम्यान मिळतत... फळां पिकल्यावर एकदम नाजूक बनतत, कारण तेची साल एकदम 'तलम' आसता. फळाच्या मध्य भागावर ५-६ बियांचो एक पुंजको असता. बी अतीशय टणक आसता. पिकलेल्या फळाचो रंग तांबूस-केशरी-गुलाबी असो मिक्स आसता, चव देखिल आंबट-गोड-तुरट अशी मजेदार आसता. पूर्ण पिकलेलां-गाभुळलेलां फळ खाण्यातच खरी मजा येता... आसो... खूप म्हायती झाली... :स्मित:...

सही रे मित्रा... कधी यायचे तुझ्या गावाला ते सांग..
प्रचि ४ खासच...
पक्षांचे फोटोज् पण मस्त..
आणखिन असतील तर नविन धागा सुरु करुन टाक.

झक्कास प्र.ची.यो. Happy , कोंकण ची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी याचा प्रत्यय आला मित्रा ,
१५-१६ प्रची खल्लासच........ यो सहीच.

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy

रुनी.. हो ते कौलांवर टाकतात.. त्या झावळ्यांना "चुडतं" म्हणतात. खळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे छप्पर केले जाते.. तसेच पावसात घरची भिंत भिजू नये म्हणून घरच्या भिंतीला बाहेरून संरक्षण कवच बनवतात.. काहीजण तर कुंपण घालण्यासाठी पण वापर करतात.. वापर वापराल तसा आहे.. Happy

प्रीमो, हेम.. ते वाळवणाचे फोटो नाय गावले.. आमच्याकडे अजुन रतांबे वगैरे पिकूची आसत.. नायतर ते फोटो इलेच असते हयसर.. Happy

केपी.. पक्ष्यांच्या फोटोंची लिंक देतो नंतर..

चंदन.. तसे फोटो एकदम जास्तपण नाही काढले.. त्रास होतो मग अपलोड करण्यासाठी फोटोंची निवड करताना Happy बघतो जमेल तसे टाकतो..

बाकी इच्छुकांनी जरुर यावे.. कोकण आपलाच असा.. गणपतीनंतर नक्कीच जाऊ Happy

बांबार्डेकरा.. गाजवलस म रे! किती मस्त क्षणचित्रा!

कोकणात कधीय जावचा काय तरी गावताच.. उन्हाळ्यात सगळो लाल, पिवळो रंग.. मगे तोच रंग झाडा-फळा धरततं.. पिवळे-लाल बोंडू, भगवे आंबे, पिवळे गरे, लालसर रतांब आणि करवंदा! रतांब उकलूक बसतत तेवक्ताय सगळा लाल.. आगुळभरली डोणगी. Happy

पावसाळ्यात गेल्या.. सगळा हिरव्यागार.. भाताचे कुणगे.. फजावचो तरवो.. टकलेरची डोणी.. झाडारचे वेली, शेवरा!

रामनवमी म्हणा नको, गणपती म्हणा नको, तुळशेचा लगिन म्हणा नको.. काय ना काय तरी कारणान गावाकडे पावला वळततच. माझो पीठी भात, सोलकढी, गर्‍यागोट्याची भाजी, सुके बांगडे, खतखतला, खापरोळेचो मेनु माका हाक घालताच.. Wink

पुनश्च धन्यवाद Happy
वैभवा.. Proud
हिम्या.. नंतर टाकतो रे

काय ना काय तरी कारणान गावाकडे पावला वळततच.
>> अगदी Happy

यो मस्त प्रची, Happy
माका म्हायत असा सगळे शब्द हा, साकव, वाकव आन सगळाच..
आत्ताच गोव्यात जावान इलय तेव्हा बघितला कुडाळ, सावंतवाडी सगळा. प्रची २२ मधल्या काकू मी बघितलेल्या त्या का काय असा वाटला एक सेकंद. तुमच्या गावाक पण हॉटेला असा काय समुद्रकिनारी? :p

माका पक्की खात्री असा... तू गणपतीत गावाक जाऊन फोटो काढणारच... आणि परत ईल्यावर 'फरक' दाखवणारच... पण त्या आधी दृष्ट काढून ठेव तुझ्या कॅमेर्‍याची :p

<< मेलो जाऊन फिरान येता आणि आमच्या जीवाक घोर लावता >> १०० % अनुमोदन ! Wink
शैल़जांच्या "कोकणसय"सारखी काळजाकच हात घालणारी ही पोस्ट !! खूप आठवणी उफाळून आल्या प्रत्येक प्र.चि. पाहिल्यावर. [ उदा. - प्र.चि. २१ - सुट्टीत आजोबा आम्हां भावंडांकडून अशीच चुडतं 'वळून' घेत; मग प्रकाशाच्या आड तीं सर्व धरून त्यातील ज्यातून कमीत कमी किरण आरपार होत असतील तें 'वळणा'र्‍या/रीला शाबासकीचं खास बक्षीस देत ! विश्वचषकातलं 'मॅन ऑफ द मॅच' असायचं तें आमच्यासाठी !! ]
अफलातून प्र.चि. व जिव्हाळ्याने ओतप्रत भरलेल्या पोस्टबद्दल अभिनंदन व धन्यवाद.

मग प्रकाशाच्या आड तीं सर्व धरून त्यातील ज्यातून कमीत कमी किरण आरपार होत असतील तें 'वळणा'र्‍या/रीला शाबासकीचं खास बक्षीस देत >> वाह ! मस्तच आठवण..

सम्या, इंद्रा.. Proud

धन्यवाद Happy

योगेश, माझ्या या आगाऊपणाला मोठ्या मनाने क्षमा करशील अशी आशा आहे. इंद्रधनुष्य ला फरक
बघायचा होता ना म्हणून.

हे आहे उन्हाळ्यातले कोकण (राजापूरच्या उन्हाळ्याजवळच्या, म्हणजेच गरम पाण्याच्या झर्‍याजवळच्या एका देवळाचा )

आणि पावसाची जादू झाल्यावर

Pages