मु.पो. तेर्से बांबार्डे

Submitted by Yo.Rocks on 16 May, 2011 - 13:06

मु.पो. तेर्से बांबार्डे, तालुका - कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग... म्हणजेच कोकणात असलेला एक गाव.. माझाच गाव ता... Happy गेली पाच वर्ष जाउक जमणा नाय.. तसा माका तर गणपतीतच कोकणात जाउक आवडता.. पण म्हटला उन्हाळ्यातच जाउन येउ.. तसापण शालेय शिक्षणानंतर उन्हाळ्यात कधीच गावी गेलो नव्हतो.. म्हणान जमात तसा फक्त तीन दिवसाचो मुक्काम करुन इलय.. या भेटीत हातात डिजीकॅम असल्याने जास्तच उत्सुकता Happy
मुंबईत्सून गावाकडे जाताना एकदा गोवा गाडीत बसला की मगे कधी मुंबईच्या बाहेर पडतोय असा असा वाटीत रवता.. रस्त्यात लागणारे वळणावळणाचे घाटरस्ते, नद्या, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी कौलारु घरे, आंबा-फणस-काजी यांनी बहरलेली झाडे इ... सगळा चित्र कसा मस्त डोळ्यासमोर येता नि कधी एकदाचो गावी पोचतय म्हणान मन कासावीस होउन जातय..
एकदा घरी पोचलय की मगे न्हाणीघरातल्या गरम पाण्याने फ्रेश होउन लगेच स्वयंपाक घरात मांडी घालून पाटावर बसूचा नि समोर ताटातल्या 'उकड्या तांदळाची पेज नि वालीच्या गराची उसळ' खाण्यासाठी रेडी !! नि ढेकर इलो की मगे भटकंतीसाठी बाहेर पडूचा!! Proud त्यातलेच काही निवडक प्रची..

प्रचि १

(न्हाणीघर ... आता घरोघरी संडास बाथरुम बांधलेले आसत.. पण पाणी गरम करुक काळवंडलेलो माठ व्हयोच )

प्रचि २

(उन्हाळ्यात ह्या हमखास दिसणारा ह्या दृश्य.. सुकी लाकडा, शेणी नि कुडी.. नि मागे घर दिसताहा ता आमचा "मांगर" - पावसात या घरातच शेतकामे उरकली जातात.. जा मी अजून कधी बघूक नाय..)

प्रचि३

(शेणाने सारवलेला आंगण नि मध्ये असणारी तुळस )

प्रचि ४

(सुप्रभात.. थोडासा उजाडला की ह्यांच्या कामांका सुरवात.. )

प्रचि ५

(आमच्या घराजवळच गर्द झाडीत असणारी देवळी.. माझा आवडता ठिकाण.. इथेच मगे दुपारी वार्‍याने होणारी पानांची सळसळ नि पक्ष्यांची नॉन स्टॉप सुरु असणारी किलबिल ऐकत एक डुलकी घेतोच..)

प्रचि ६

(शेतातून जाणारी पाऊलवाट.. खरे तर पावसात इला की दोन्ही बाजूस भातशेतीचे पांघरलेले हिरवे गालीचे दिसतले..)

प्रचि ७

(भाटीयेवरची नारळांची बाग)

प्रचि ८

(नि तिकडेच असणारे वालीच्या शेंगांचे मळे.. इथे पण पावसानंतर सगळे कसे हिरवे हिरवे..)

प्रचि ९

(कुडी..)

प्रचि १०

(मायबोलीवरील भाऊंनी आपल्या डिजीटल चित्रातून "साकव" ची ओळख करून दिली आहेच.. हाच तो साकव.. )

प्रचि ११

(ह्या साकवावरून पावसात चालताना जपूनच.. नायतर व्हाळात पडलोच समजूचा..)

प्रचि १२

(आंबा,फणस इ. झाडे वगळता बहुसंख्याने आढळणारे ऐनाचे झाड.. .)

प्रचि १३

(काळ्या ढगांमुळे सुर्यदेवांनी केलेले वेषांतर.. Happy )

प्रचि १४

(कोंड- नदीच्या खोलगट भागात टिकून रवलेला पाणी..)

प्रचि १५

(गुरांका पण अंघोळ व्हयीच..)

प्रचि १६

(उन्हाळ्यातही पाणी टिकवून धरणारी नदी.. पावसात माका या अँगलने फोटो काढूचा तर होडीयेत बसूक लागात..)

प्रचि १७

(आटलेल्या नदीचे पात्र)

प्रचि १८

(वेळ सूर्यास्ताची.. मी तर तिन्ही दिवसांचे सूर्यास्त टिपण्याचे मनाशी पक्के केले होते..)

प्रचि १९

(नदी ओलांडूक होडीची गरज उन्हाळ्यात तरी नाही)

प्रचि २०

(सूर्य मावळलो आता गुरांका घेउन घरी जाउची वेळ.. )

प्रचि २१

(अंधार पडला म्हणान काय झाला.. कामं सुरूच रवतत)

प्रचि २२

(शेतातून आणलेल्या मिर्च्यांचे देठ कापण्याचा काम..)

प्रचि २३ कोकणमेवा -

माझा दुर्भाग्य असा की आंबे कच्चेच होते.. फणस, रतांबे, करंदा (करवंदा), जाम असा सगळा खाऊक गावला..
या भेटीत विविधरंगीपक्षी दिसले नाय तर नवलच.. भटकंती करताना त्यांका कॅमेर्‍यात टिपूचा म्हणजे मस्तच टाइमपास..:)

प्रचि २४

कोकणाता कितीही फिरला तरी कमीच.. नि खयपण गेला तरी मन रमतेच.. मगे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असो वा घराकडची नदी असो.. तेव्हा परतीच्या प्रवासाला निघूचा म्हणजे साहजिकच कठीण ! नि तुमचा मुक्काम जास्त दिवस असेल तर जीवाची जास्तच घालमेल !! त्यात निघताना सगळ्या थोर व्यक्तींचे आशिर्वाद घेउन निघताना घराकडच्या लोकांच्या पापण्या ओलावलेल्या.!.घरी पोचलस की लगेच फोन कर म्हणत निरोप देणारी मंडळी.. 'पुन्हा कधी येणार' म्हणत अगदी रस्त्यापर्यंत सोडूक येणारी बच्चाकंपनी.. खराच.. कठीण असतो तो प्रसंग.. गाडीत बसला की अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक चालू होतो.. नि मुंबई येउच नये असा वाटीत रवता.. बरा. मुंबईत पोहोचेस्तोवर मोबाईलवर दोन तीनदा फोन येउन जातो.. खय आसस ? पोचलास की नाय ? विचारपुस होतेच.. नि एकदा मुंबईत इला की गावच्या दौर्‍याचो कितीपण हँगओवर असांदे.. ऑफीस गाठावेच लागते.. Happy

गुलमोहर: 

सहीsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss एक से एक फोटो. Happy
>>पण पाणी गरम करुक काळवंडलेलो माठ व्हयोच >> येस्स.. आणि त्या पाण्याक येणारो जळलेल्या पतार्‍याचो वास अहाहा!!!

धन्यवाद !
आता पुढचा दौरा गणपतीमध्ये Happy तेव्हा तयार रहा.. Happy

कसले फळ आहे?? >> करवंद आहेत..

पक्ष्यांपैंकी सुतारपक्षी, खंड्या नि बुलबुल सोडले तर बाकीच्यांची नावे कुणाला माहित असतील तर कृपया सांगावीत Happy

मस्त मस्त...
बिबवणे, तेर्से बांबर्डे, साळगाव, माणगाव, झाराप, हुमरस, आकेरी सगळा भाग जाम फिरून झालेलाय.. सगळंच ओळखीचं वाटतंय.. Happy

माका वाटला माज्याच घराचे फोटो काडलंस की कांय!! पाखरांत तुका गरुड (हॉर्नबील) नांय गावलो? खालचे लायनीत डावीकडे टिटवी आसां!! नीलग्याचो पयलो प्रतिसाद बाकी एकदम खरो हां!!! वाळवणाचे फोटो नाय ते.. रखा लावलेली भिरंडा, सोला, आठलां, खोबरां..त्याचेव असले तर प्रचि टाक. सगळे फोटो रॉकींग आसंत.. अजुनंव चलतंले..:)

वॉव!!! एकसे एक सुरेख. त्यातलं प्रचि १५ एकदम क्युट. आणि १७ वरून नजर हटेना. शेवटचे कोकणमेव्याचे आणि पक्ष्यांचे कोलाजही अप्रतिम.

मस्त फोटो.
पहिल्यांदाच कोकणातले वाळलेल्या भातशेतीचे फोटो बघितले, कोकण म्हटले की मी नेहमी गुडघाभर पाण्यातल्या हिरव्यागार भातशेतीचे फोटोच नेहमी बघितलेले आहेत.
प्रचि २१ मधल्या काकु काय करताहेत नारळाच्या झावळ्याचे, त्याचा कुठे उपयोग करतात कौलांवर टाकायला का.

दगड्या एकदम सही. तुका चुर्ना नाय गावांक रे? आनी रातांब्याची सोला आनी रखा लावलले रातांब्याचे बिये खय आसत? झालाच तर फणसाचे पापड, साटा सुद्दा. तु चवतीक जातलय तेव्हा ह्यातला एक्कय प्रोसेस काय्येक गावचा नाय. Sad

बाकी फोटो बगान माका जळ्जळ जावक नाय. Happy मे रोज ह्या सगळां खातंय Happy

खूप खूप सुंदर सगळीच दृश्य मला भरपूर आवडली माझ्या मामाचा गाव पिंगुळी त्यामुळे असेच काही दृश्य आमच्याही गावात आहेतच. बाकी सर्व माहितीही सुंदर मालवणी भाषेत पण मालवणी भाषा एकालाच जास्त मजा वाटते.

मस्त मस्त मस्त वाटलं फोटू पाहूनच.. आणी फोटोंबरोबर कोकणी फोडणी Happy
प्रत्यक्ष कसं वाटेल..
कधी येऊ.. मी पण !मी पण!!

कोकणाता कितीही फिरला तरी कमीच.. नि खयपण गेला तरी मन रमतेच.. मगे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असो वा घराकडची नदी असो.. तेव्हा परतीच्या प्रवासाला निघूचा म्हणजे साहजिकच कठीण >> पयले तुझ्या या वाक्यांका जोरदारसा अनुमोदन देतंय.. Happy
कम नशिब म्हणूचा जो आजतेतूर माका कोकणात फिरूक गावला नाय. अलिकडं असा रस निर्माण होवक लागला... त्यात तु टाकल्याली प्रचि म्हणजे खासच आसंत...
एक न एक चित्रा असा जिवंत होवन डोळ्यासमोर हुबा रवला... Happy

ह्या लेख आवाडत्या १०त गेल्या तां सांगूक होया काय? Happy

पुलेशु!!

Pages