भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी: नक्षत्रांचे देणे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारतरत्न पंडीत भिमसेन जोशींवरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम बहुदा अलिकडचा आहे का..? कुणी संपूर्ण पाहिला का..? आमचा हुकला. सुंदर क्लिप्स आहेत. विशेषतः शंकर महादेवन चे बोलणे आणि "याचसाठी केला होता अट्टहास" हे भजन अप्रतिम वाटले. full of expressions. आवश्य पहा/ऐका:

    http://www.youtube.com/watch?v=oRVRepOkB1A&feature=channel

    पंडीत भिमसेन जोशींवर घेतलेल्या मुलाखतीतील या क्लिप मधील

      http://www.youtube.com/watch?v=QkNXV46amwE&feature=channel पंडीत हरीप्रसाद चौरासीयांनंतर बोलणारे व्यक्तीमत्व म्हणजे सूरमणी पंडीत नारयणराव देशपांडे. भिमसेनांचे तीन दशकांचे शिष्य. भिमसेनजींबरोबर अनेक मैफीलीत जगभर साथ केलेले, हिंडलेले. सुदैवाने देशपांडे यांचेबरोबर अनेक वेळा तबल्यावर साथ संगत करायचे भाग्य लाभले. तेव्हा प्रत्त्येक वेळी त्यांन्नी भिमसेनजींच्या अतीशय विलक्षण अनुभव, आठवणी सांगितल्या.. आज आपल्याला भिमसेनजी हे एक Legendary गायक म्हणून दिसतात. पण वेगवेगळ्या गुरूंकडून गाणं शिकताना त्यांन्नी काय खस्ता खाल्या आहेत, किती खडतर दिवस काढले आहेत (गुरूघरी विहीरीवर पाणी भरणे, कपडे धुणे, इथपासून सर्व..)हे सर्व ऐकल्यावर अंगावर काटा येतो. आजकालच्या instant saregamapa च्या जमान्यात असं तप, तपश्चर्या, अक्षरशः संगितीक ढोर मेहेनत, कुणी केली असेल ही कल्पना करवणार नाही... शंकर महादेवन म्हणूनच जे बोलला ते अगदी १००% पटलं. गीत, संगीत या प्रांतात, भिमसेनजी सारख्या इतरांन्नी किती काय काय देवून ठेवलं आहे...पुढील हजारो पिढ्यांना ते पुरून उरेल... पण आपण अडकलो आहोत, looks, presentation, posters, scripting, sms च्या जंजाळात... आज त्याचाही व्यापार धंदा झालाय. कशासाठी..? गीत संगीताचा आनंद घ्या, जमल्यास द्या... ती एक अनुभूती आहे.. तो आनंद द्विगुणीत करा!
विषय: 
प्रकार: 

पुण्यात गेल्या महिन्यात हा कार्यक्रम पाहिला होता. या कार्यक्रमात शंकर महादेवन नव्हते. बाकी संच तोच होता.
'नक्षत्रांचे देणे' या मालिकेतील काही कर्यक्रम खरोखर देखणे झाले आहेत. पण पुनरागमनाचा हा कार्यक्रम मात्र अतिशय वाईट होता. थोड्याफार प्रमाणात आनंद भाटे वगळता इतर सर्व गायकांचं गाणं अजिबात रंगलं नाही. श्रीनिवास जोशी यांनी सर्वाधिक गाणी म्हटली. केवळ पंडीतजींचे पुत्र म्हणून बहुदा त्यांचं हे गाणं सहन केलं जातं. पंडीतजींच्या कन्याही या कर्यक्रमात गायल्या. एवढं बेसूर गाणं मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. असो. मुंबईचा कार्यक्रमही फारसा बरा झाला नाही असं अनेकांकडून ऐकलं.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

म्हणजे शंकर च गाणं नंतर add केलय वाटत?..असो.. फक्त क्लिप्स बघण्याचा मग हा फायदाच समजायला हवा. Happy
बाकी तुला खूपच आवडलेला दिसतोय कार्यक्रम?:)

नाही. शंकर महादेवन मुंबईच्या कार्यक्रमात होते. 'नक्षत्रांचे देणे' हा कार्यक्रम मुंबईच्या अगोदर पुण्याला असतो. आणि मुंबईच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जातं.

पंडीतजींच्या कारकिर्दीवर ३ तासांचा कार्यक्रम बसवणं अशक्य आहे. पण निदान गायकांची निवड तरी योग्य असायला हवी. श्रीनिवास जोशी आणि शुभा मुळगुंद हे केवळ आपल्या आडनावाच्या जोरावर त्यादिवशी मंचावर होते.
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

हा परवा टीव्हीवर दाखवला तोच कार्यक्रम का? एवढी मनाची पकड घेतली नाही... Sad

शन्कर महादेवन यान्चे गाणे अतिशय अप्रतिम झाले...Jar kunala tyanche he gaane avadale asel tar I also recommend to listen to his song sung in the program > Ugawala chandra punavecha in 'नक्शत्रान्चे देणे - श्रीनिवास खळे'...on Youtube...खूपच छान rendition...

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

मुम्बई चा कार्यक्रम बघण्याचा सुवर्णयोग लाभला. कार्यक्रमाची भट्टी न जमण्याची कारणे माझ्या मते दोन - एक म्हणजे पन्डितजीन्च्या कारकीर्दिचा आवाकाच एवढा प्रचन्ड आहे कि त्याची मोट ३- साडे ३ तासान्च्या कार्यक्रमात बान्धणे कठीणच ...आणि दुसरे म्हणजे निवेदन / सूत्रसन्चालन आणि गायक / गाणी हे एकमेकापासून स्वतन्त्र असल्यासारखे जाणवत होते सम्पूर्ण कार्यक्रमभर...खरे तर विनय आपटे आणि नीना कुलकर्णी असे दिग्गज निवेदक होते..पण जीव काय तो आला नाही...
कार्यक्रमाची अस्सल जान होती ती म्हणजे भीमसेनजीन्च्या जुन्या ध्वनीचित्रफीती...एकदम कातिल..आणि रोमान्चक...
वादक मन्डळी, शन्कर महादेवन, आरति अन्कलीकर या अर्थातच जमेच्या बाजू...

२५ जाने.ला टि.व्ही. वर कार्यक्रमामध्ये पंडीतजींच्या काही जुन्या चित्रफिती ऐकायला मिळाल्या त्या फारच अप्रतिम होत्या.. त्यातल्या पंडितजींनी घेतलेल्या काही ताना तर जीवघेण्या होत्या.. ते ऐकायला मिळणे फारच दुर्मिळ आहे.. तो योग मात्र ह्या कार्यक्रमामुळे नक्कीच जुळून आला..
बाकी एकूण कार्यक्रमाचा दर्जा. Sad काहीच न बोललेले बरे..
पंडितजींचे शिष्य माधव गुडी.. ह्यांनी घेतलेली तान.. अग आई ग्ग... पार म्हणजे पारच वाट.. शब्दच फुटला नाही.. नुसतीच हवा.. घरातल्या सगळ्यांना हसणे आवरत नव्हते ते ऐकल्यावर...

पंडितजींच्या बाबतीत एका गोष्टीचे फार वाईट वाटते... त्यांनी जी काही गाणी गायलेली आहेत ती त्यांच्याशिवाय तितक्या ताकदीने कोणीच म्हणू शकत नाही... त्यांचा वारसा चालवण्यासाठी कोणीच नाही... Sad
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

पंडीतजींची इतकी प्रसीद्ध गाणी असताना ,अशी गाणी का निवडल्या जावीत?

कार्यक्रमाचा दर्जा म्हणून काही असतो हे मुळी लोकाना मान्यच नसावे याचे खरच आश्चर्य वाटते. शंकर महादेवन , आरती अंकलीकर आणि आनंद भाटे यांशिवाय ईतर गायले नसते तर तो श्र्वणीय झाला असता.