बाळासाहेब
___________________________बाळ केशव ठाकरे-बाळ ठाकरे,बाळासाहेब, हिंदुहृदयसम्राट- येक व्यंगचित्रकार ते कोणत्याही पदाशिवाय आपली ताकद निर्माण करणारा राजकारणी. कुणासाठी हे नाव प्रःतस्मरणिय तर कुणासाठी द्वेशाचा , तिरस्काराचा विषय. पण ते नाव वगळुन महाराष्ट्राचा इतिहास कधिच लिहला जाणार नाही. राजकारण म्हणजे गजकरण पासुन सुरु होऊन २०% राजकारण आणि ८०% समाजकारण म्हणता म्हणता गाडी १०० % राजकारणाकडे कधी वळली त्याचा आलेख राजकिय समिक्षक मांडतील पण त्याना सोडुन गेलेले साथिदार सुद्धा त्यांच्याबद्दल क्वचितच अनादाराने बोलतील.
गिरणीकामगार संपातली शिवसेनेची भुमिका वादग्रस्त, राज्यसभेवर पाठवलेले अमराठी खासदार, परप्रांतीयांबद्दल वेळोवेली बदललेली भुमिका हे सगळे येका बाजुला केले तरी येकेकाळी लोकलच्या फर्स्ट क्लास मधे मार्मीक हातात घेऊन बसायला लागायचे हे सांगणारे कैक मराठी सापडतील.
वडपावच्या गाडी पलिकडे मराठि उद्योजकता नाही पोचली पण त्याने मराठि टक्का शिल्लक राहायला नक्किच मदत केली.
दसरामेळाव्याला उपस्थीत राहिलेल्या प्रत्येकाचे मत जिंकता नसेल आले पण आजही तब्येतीची साथ नसताना प्रत्येक परिक्षेच्या घडिला याच सेनापतीला पुढे यावे लागते याला त्यांची लोकप्रियता मानायचे कि राजकिय अगतिकता हाच खरा प्रश्न
अरे वा!
माझी फर्माइश लगेच पुरी झाली तर

चित्र जमलय रे पण मला डावी बाजु उजव्या बाजुपेक्षा खाली वाटत आहे.
मला चित्रकलेतल काही कळत नाही पण जाणकार तुला सांगतील की काय चुक आणि काय बरोबर.
खाली लिहिलेला मजकुर मस्त आहे.
अजय
अजय, स्केच जबरी आहे!
छान हे
अजय, चित्र रेखाटन चान्गल जमल हे!
खास करुन चष्म्यावरील फ्लॅशचे रिफ्लेक्शन आणि आतिल डोळे!
एक लक्षात ठेवायला हवे की या महाराष्ट्राने, कुत्र्यान्च्या छत्रीप्रमाणे उगवुन नामशेष झालेले अनेक पक्ष बघितले आहेत, पण राजकीय दडपशाहीच्या त्या अभुतपूर्व काळात शिवसेना स्थापन करुन ती वाढवणे सोपे नव्हते, स्थापने नन्तर उण्यापुर्या पाच सहा वर्षात आणिबाणी लागू करण्यात आलेली, यावेळेस, टिकून रहाण्यासाठी, तत्वान्शी नव्हे तर, उघड घेतल्या जाणार्या राजकीय जाहीर भुमिकान्बाबत तडजोड म्हणा वा छुपेपणा म्हणा, प्रत्येक पक्षालाच करावा लागतो, अन तसा तो केला तर त्या बदलत्या भुमिका होत नाहीत. आधी मराठी माणसान्चे एकीकरणाद्वारे सशक्तीकरण, नन्तर वेळ आल्यावर हिन्दुत्वाचा उघड पुरस्कार या बाबी एका निश्चित सुत्रानुसारच होत गेल्या हेत असे मला वाटते. वर्तमानपत्रिय पत्रकारितेतील कुणाच्या तरी पायाशी वाहिलेल्या "केतकरी" शब्दच्छलावर आपली मते बनविणे धोक्याचे ठरते. कर्नाटकात आत्ता जो घोळ चालला हे तसा देवेगौडाटाईप राजकीय भ्रष्टाचार/व्यभिचार तरी शिवसेनेने कधी केल्याचे बघण्यात आलेले नाही.
आजही, सन्कटाच्या काळात मुम्बईत कोणत्या सरकारी व्यवस्था नव्हेत तर शिवसेनेच्या शाखा लोकान्ना आधारभूत वाटतात. आरएसएसला दडपशाहीच्या असन्ख्य ठेचा बसल्यात, त्या ठेचान्वरुन पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे शहाणे होवुन जर शिवसेनेने, स्थापने पासुन गेल्यावर्षात३०/३५ वर्षात, अस्तित्वाच्या लढाईसाठी काही रास्त राजकीय तडजोडी केल्या असतील, भुमिकात बदलत्या काळानूरूप बदल केला असेल तर ते वावगे कसे काय बरे???????
दुर्दैवाने, देशात वा राज्यात, हुकमी मतान्च्या मोहापाई, जातीपातीत विद्वेष वाढेल अशाच कृती व निर्णय केन्द्र व राज्य सरकारान्नी घेतलेत. हिन्दू कार्डाला विरोध म्हणुन मन्डल आले, ते आणताना कसल्या भरीव उद्दिष्टान्चे आशय त्यामागे होते असे नाही तर केवळ राजकीय साठमारी होती, अशा परिस्थितीत दसरा मेळाव्याच्या गर्दीचे मतात रुपान्तर व्हावेच अशी अपेक्षा का?
एनिवे, तुझ्या चित्राचे कौतुक एका शब्दात, अन बाकी वैखरीचा पसाराच जास्त, जरा विचित्रच हे ना???
दुमत नाही
लिंबु- कॉलेजात असताना भा वि सेनेची/सेनेची कार्य्पद्धत जवळुन पाहिलेय त्यामुळे 'केतकरी' अग्रलेखांवर माझे मत निच्छितच बनवलेले नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक पक्षाने जमेल तश्या कोलांट्या उड्या मारल्यात त्यामुळे सेनेचा अप्वाद करायचे काहीच कारण नाही. माझा मुद्दा फक्त समाजकारणा कडुन राजकारणाकडे वळण्याबद्दल होता आणि तो तुलाही मान्य असावा.
झकास, लिंबु, गजानन देसाई- प्रतिक्रियांबद्दल आभार
शिवसेना
लिम्बुटीम्बु
आनद दिघे साहेबा बद्द्ल तुझे मत काय आहे
विजय, मत
विजय, मत द्यायची ही जागा नाही, पण मला ज्ञात असलेल्या त्या काळातल्या शिवसेनेच्या बिनीच्या सर्वच नेत्यान्बद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे!
चित्र छनच
चित्र छनच आहे. मि लिम्बुटिम्बुला विचारु इच्छिते कि तु आनन्द दिघे साहेबाना तु ओळखत असशिल तर त्यान्च्याबद्धल तुझ मत काय आहे? नाहि तर उद्धवजीन्बद्धल तुला काय वाटत ते सान्ग.