Submitted by श्यामली on 29 January, 2009 - 23:18
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा
मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने
मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण
मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर
मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल
--श्यामली
गुलमोहर:
शेअर करा
मस्त!
मस्त! शेवटचं कडवं खूपच आवडलं!
छान
छान
मन एक सान
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन साजण साजण
साजण येण्याची चाहुल आहे का ही 
गाली चढते तोरण
........... अहा क्या बात है !! आमची श्यामली आता नाजुक साजुक पण लिहायला लागलीये म्हणायची
सहीय!
सहीय! श्यामले, खूप म्हणजे खूपच आवडली.
>>मन माय मन
>>मन माय मन तात
मन सखीचा गं हात
वा!
मन रानभर
मन रानभर नक्षी!!!
फारच गोड झाली आहे कविता!
वरच्या
वरच्या सर्वांना अनुमोदन
>>मन रानभर
>>मन रानभर नक्षी
>>मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने
>>मन आस मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल
मस्त ! आता वेगळीच झाली ही कविता
तरीही
मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण
ह्या कडव्यात ओळींचा निदान काहीतरी परस्परसंबंध असायला हवा होता असे वाटले.
तसेच
मन एक सान पक्षी म्हटल्यानंतर
मन पिसारा पिसारा मधे जागा वाया घालवण्याऐवजी मन "छोटाच पिसारा " आणि मग मन "केवढा" पिसारा हे सान पक्षी व रानभर नक्षी शी जास्त संयुक्तिक झाले असते असे वाटले.
पण एकंदर कविता छानर. शेवट बदललास हे बरं केलंस .
शुभेच्छा
मस्त
मस्त शामली! मनाच अचुक वर्णन
मनःपूर्वक
मनःपूर्वक धन्यवाद दोस्त्स

एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनासाठी ड्राफ्ट करताना, मन उधाण वा-याचे या गाण्याबद्दल काय लिहावं विचार करत असताना "मन एक सान पक्षी..... या चार ओळी सुचल्या,
मग पुढे सुट्या सुट्या मन... मन... वगैरे वगैरे!
अर्थाचा खरोखरच विचार केला नव्हता मी. आता वैभवचा अभिप्राय वाचल्यावर मात्र जाणवलं ,अर्थाकडेही जरा जास्त लक्ष द्यायला हवं होतं. विचार करत्ये.
अजून एक कडवं होतं, लयीत बसेना म्हणून उडवलं
कल्लास
कल्लास श्यामली
आवडली खुपच.
खुप छान!
खुप छान!
वैभवशी
वैभवशी १००% सहमत पण ... कवितेचा नाजूकपणा आणि नजाकत औरच!
बापू करन्दिकर
संदीप
संदीप खरेच्या
"मन नाजूकशी माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात" ची आठवण झाली!
बापू करन्दिकर
"मन कैरीची
"मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण"
ह्या ओळी खुप आवडल्या...
शामली छान
शामली छान कविता ! काल परवा तुझं गाणं सुद्धा ऐकलं..
छान !!
खुप आवडली.
खुप आवडली. अगदी मनापासून..
अजून एक कडवं होतं,>>>> ते उडवलेल कडव काय असावं बर ?

मन बहरिन (बोहारीण नव्हे)
सहज , आणि
सहज , आणि वाचल्यावर लगेच हृदयाचा ठाव घेणारी कविता..
पण काही ठिकाणी यमक जुळलेले असल्यास अधिक खुलेल..
जसे..साठवे आणि नव्याने हे यमक जुळत नाही..
मन आठवे, साठवे
काही जुने, काही नवे..
किंवा थोडे जुने, थोडे नवे.. असे काहीसे..
मनी येताच साजण
गाली चढते तोरण..हे कसे वाटते?
मन जखम, जखम
मन घालते फुंकर.. हे यमक जुळविण्यासाठी..
मन जरी हे जखम,
लावी मनच मलम... असे केल्यास..?
-मानस६
शेवटचे
शेवटचे कडवे फार छान. कविता आवडली
पुन्हा
पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद मंडळी




बापू खूप मोठी काँप्लीमेंट आहे ही! कसलं छान वाटलं वाचून
डॅफोचे दोनदा धन्यवाद
लक्ष्मिकांत , बहारिन बहारिन!
मानस, हं! विचार करतेय.
श्यामली,
श्यामली, मी मिसली इतकी गोड कविता. झक्कस लय आहे... आवडलीच. शेवटचं कडवं फार सुंदर.
श्यामली
श्यामली कविता झक्कास! अगदी बहिणाबाई आठवल्या
मी ही
मी ही मिसली हि कविता.
लय.. लै भारी आणि शेवटचं कडव खूपच आवडलं.
श्यामली, सु
श्यामली,
सुरेख जमलीये कविता..
बाकी वैभवच्या सूचना आहेतच..
छान
छान
शलाका,
शलाका, सानिका,माणिक्,किरू,कुलदीप कविता वाचून् त्यावर आवर्जून अभिप्राय दिलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
>>मन भास मन
>>मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल>>
सुंदरच....
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.
मन
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल >>> खुप छान श्यामली
अशक्य सही
अशक्य सही लिहीलंय... लय म्हणजे लयच भारी!
बहिणाबाईंची याद आली वाचून!
-योगेश
मन माय मन तात मन सखीचा गं
मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर
मनाचे श्लोक
Pages