अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, गौतम, हा टीव्ही माझ्या कलीगने मी येण्याच्या आधी विकत घेतला होता त्यामुळे मला काहीच माहित नाही. हा, आता चुकून एखादं बटन दाबून हा अलार्म सेट झाला असेल तर कल्पना नाही. पण एक मात्र खरं की असं त्याआधी किंवा नंतर कधीही झालं नाही.

>>रात्रीतुन कधीही चालु होतो मधनच, पुर्ण स्वीच ऑफ केलेला असला तरी. आणि म्हणतो "यु हॅव्ह रीच्ड युवर डेस्टीनेशन" आणि आपोआप बंद होतो.

हे बाकी भारी आहे. एकदम टर्मिनेटर सारखं वाटलं. माझी हे ऐकून प्रथम पाचावर धारण बसली असती. Sad

विशाल, सॉल्लीड्च आहे मग हा अनुभव!

आमच्या सध्याच्या घरात नुकतेच रहायला आलो होतो तेव्हाची गोष्ट. साधारण सकाळचे ११-३० झाले होते. घरात कोणीही नव्ह्ते. नवरा ऑफीसात, लेक शाळेत, बाई तिला आणायला गेलेली. मी कॉम्युटरवर होते. आणि अचानक बाथरूममध्ये फ्लशचा आवाज आला. काय दचकले! सॉल्लिड घाबरले. म्हटलं भूत आलं तं आलं डायरेक्ट निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला कुठं गेल? पण मग लगेच लक्षात आलं आमच्या बिल्डिंगमध्ये ऑटो फ्लशचा प्रॉब्लेम होता. बर्‍याचजणांचा घरात असं होत होतं आणि आमच्याकडे ते पहिल्यांदाच झालं. Proud

हो रे विशाल, माझं गाव उस्मानाबादेतलं, अगदी आत, सरमकुंडीपासूनही साधारण ३० किमी अंतरावरचं विझोरा. तु म्हणालास तसं माझ्या आजोबांकडे पण ४ गावची जोसकी होती. त्यांनाच काय आम्हालाही अजून लोक रस्त्यात जरी भेटले तरी देवा म्हणून पाया पडायला बघतात.

मी कॉम्युटरवर होते. >>>

मामे, तुला अशी काँप्युटरच्या बोकांडी बसलेली बघून घाबरलं असेल ते आणि मग त्या भितीला मोकळी वाट करुन देण्यासाठी तिकडे गेलं असेल Proud

खरय दीपाली, अशा वेळी खुप ऑकवर्ड अवस्था होते मग.

>>पण मग लगेच लक्षात आलं आमच्या बिल्डिंगमध्ये ऑटो फ्लशचा प्रॉब्लेम होता.

माझ्या एका मैत्रिणीच्या परदेशातल्या घरातल्या टॉयलेटमध्ये असाच प्रॉब्लेम होता. आम्ही सगळे गप्पा मारत लिव्हिंग रूममध्ये बसलो होतो आणि एकदम वरच्या मजल्यावरून फ्लशचा आवाज. तिची मुलगी आमच्याबरोबरच होती. मी मैत्रिणीला "वर कोण आहे?" असं विचारल्यावर ती म्हणाली "कोई नही". मग तिचा नवरा म्हणाला "ये होता रहता है". माझा घाबरलेला चेहेरा पाहून "अरे, वो प्लंम्बींगका प्रॉब्लेम है" असं एक्स्प्लेनेशन दिलंन त्याने. पण माझ्या नजरेसमोर हॅरी पॉटरमधलं ते पाईपातून फिरणारं Moaning Myrtle चं भूत आलंच.

मामी... Lol

>>रात्रीतुन कधीही चालु होतो मधनच, पुर्ण स्वीच ऑफ केलेला असला तरी. आणि म्हणतो "यु हॅव्ह रीच्ड युवर डेस्टीनेशन" आणि आपोआप बंद होतो.
=:)) भुतालाही GPS ची गरज पडते म्हणजे Happy

आशू, धाग्यांत प्रसंग १ म्हणून लिहीलयंस! या प्रसंगाला हजार प्रतिसाद झाल्यावर पुढच्या हजारासाठी प्रसंग २ ठेवलांय कां???

आणखी एक असाच ऐकिव किस्सा...
खेडेगावातून चेटुक वगैरे प्रकार खुप चालतात म्हणे. त्यातलाच एक..

घरात पुरण पोळीचा बेत होता. थोरली काकी (थोरली काकी म्हणजे माझी थोरली चुलत आज्जी) चुलीसमोर बसुन पोळ्या लाटत होत्या. समोरच एक पांधरेशुभ्र कापड सारवलेल्या जमीनीवर अंथरले होते. पोळी भाजली की काकीआज्जी ती त्या कापडावर टाकायची. १०-१२ पोळ्या पडल्या की आधी चिल्ली-पिल्ली बसवून घ्यायची नंतर मोठ्यांचा नंबर. असा नेहमीचा उपक्रम असे. काकीआज्जी एका मागुन एक पोळ्या करतेय पण कापडावर काही दहाच्याचर पोळ्या दिसेनात. जेव्हा लक्षात आले तेव्हा काकी घाबरली......
तेवढ्यात गावचा चांभार कशासाठी तरी घरी आला होता. पुरण पोळीचा वास आल्यावर तो थांबला. "काकी, चार पोळ्या द्या ना बांधून, माझी बी पोरं खातील खुशीनं." म्हणुन त्याने काकीआज्जीकडे मागणी केली. त्यावर आज्जीने त्याला परिस्थिती सांगितली. तसा तो गंभीर झाला. त्याला या क्षेत्रात बरीच गती आहे म्हणे. (अंबादास चांभार अजुनही जिवंत आहे, त्याच्याच कडुन हा किस्सा ऐकलेला)
"काकी, हे चेटूक हाये. तुमी केलंल्या पोळ्या कुणीतरी दुसरंच खातया बगा. आस्लं काम करणारी गावात तुमची इमलकाकीच हाय बगा. (विमलकाकी म्हणजे आमच्याच भावकीतली एक विधवा होती, तीला असल्या कामात चेटूक, भानामती ई. गती होती असे म्हणतात.) . पर म्या करतो उपाय. काळजी नगासा करु." चांभाराने एक उपाय सांगितला.....
"घ्रातल्या कुणालातरी त्येंच्या घरला पाटवा. मी जाईन मागनं, फकस्त ती काय करतेया ते बगायचं. जर तकडंबी पोळीचा सैपाक चालु आसंन तर तिला म्हणावं बसु का मी बी जेवायला. ती व्हय म्हनली की कायतरी करुन मला येवुन सांगा फकस्त. मग मी पकडतू तिला बरुबर." तो लगेचच आपल्या घराकडे गेला.
त्यानंतर भास्कर तात्या, माझे चुलत आजोबा त्या विमलकाकीकडे गेले. तर खरोखरच तिथे पुरणपोळीचा बेत चालु होता. घरातली ४-५ जण जेवायला बसलेली. आजोबांनी चांभाराने सांगितल्याप्रमाणे जेवण्याची इच्छा व्यक्त केली. तिला नाहीही म्हणता येइना. आजोबांनी सांगितले घरात पण पोळीचा बेत आहे, पण तिथे वेळ लागणार आहे. आधी पोरं-सोरं खावुन झाल्यावर मिळेल. विमलकाकीने नाईलाजाने हो म्हटले. काहीतरी कारण काढून लगेचच आजोबांनी बाहेरच उभ्या असलेल्या अंबादासला खुण केली. आणि ते जेवायला बसले.
इकडे अंबादासने त्याच्या बायकोने केलेल्या ३-४ पुरण (?) पोळ्या आज्जीला आणुन दिल्या. त्या कापडावरच्या सगळ्या पोळ्या उचलुन त्याच्या जागी त्या पोळ्या ठेवायला सांगितल्या. आणि स्वतः धावतच विमलकाकीच्या घरी गेला. तिथे गेल्या गेल्या त्याने तिथेही पोरांसाठी पोळ्या मागितल्या. विमलकाकीने नाईलाजानेच नुकत्याच पडलेल्या चार पोळ्या त्याला दिल्या. त्यातली एक त्याने तिथेच तुकडा तोडून खायला सुरूवात केली. तर त्यात पुरणाच्या ऐवजी चामड्याचे बारीक केलेले तुकडे निघाले....!
विमलकाकी काय ते समजुन गेली आणि तिने आजोबांचे पाय पकडले....!

ती चेटूक करून इकडे काकीआज्जीने केलेल्या पोळ्या परस्पर गायब करुन आपल्या घरच्यांना खाऊ घालत होती. म्हणुन आंबादासने आपल्या बायकोला घरी पोळ्या करायला सांगितल्या, पण त्यात पुरणाच्या ऐवजी चामड्याचा चुरा भरला आणि त्या पोळ्या काकीआज्जीला आणुन दिल्या. विमलकाकीच्या चेटुकाने त्याही पोळ्या पळवल्या आणि ती पकडली गेली.

अशा एकेक भन्नाट दंतकथा आहेत आमच्या घरात. खरे खोटे देवच जाणे कारण आता आजोबाही नाहीत आणि आज्जीही. Wink

वा! काय किस्सा आहे..
आमच्या शाळेत एक समाधी होती.. तिथे म्हणायचे की जर तेलच्या खाल्या तर त्या समाधी चा भूत मागे लागायचा.. बर्याच मुलीना experience आला होता. तिथे नेहमी चित्रविचित्र आवाज यायचे म्हनुन आम्ह विद्यार्थिनिना जाऊ द्यायचे नाहित..

तेलच्या खाल्या
म्हणजे काय?

डोंबिवलीला पेंढारकर कॉलेज मागे मैदानाशेवटी एक पडक ब्रिटिशी कालीन घर होत त्याला भुत बंगला म्हणत. तिथे म्हणे पुर्वी चोर दरोडेखोरांना डांबत
तिथून चित्रविचित्र आवाज यायचे. पण ते विद्यार्थी विद्यार्थीनींचेच हे कळल्यावर मात्र कॉलेजने तिकडे जायला बंदी केलेली.
खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!

हेम - अरे तो प्रसंग मी वेगळ्या बाफवर टाकलाय...
http://www.maayboli.com/node/12404
लख लख चंदेरी
सावज - तुमचे किश्श्यांची वाट पहात आहे...
तेलच्या म्हणजे काय

विशाल सॉल्लीड किस्सा! हे असंही होतं? म्हणजे ह्या गोष्टी खर्‍या असतात तर. मज्जाच आहे त्या विमलाकाकीची, स्वैपाक न करता जेवण तय्यार! आणखीही असे किस्से टाका ना.

>>सावज - तुमचे किश्श्यांची वाट पहात आहे...
अनुमोदन. आशूचॅम्प, तुमच्या गडभ्रमंतीच्या वेळी गावकर्‍यांकडून असे किस्से ऐकले असतील तर तेही प्ली़ज टाका ना इथे.

सायलीनं सांगितलेल्या वाड्यातही असं धान्य भरलं तरी गायब व्हायचं - कितीही भरलं तरी पुरायचच नाही वगैरे ऐकून आहोत... खरंखोट घरमालक आणि भाडेकरूच जाणे!

ती चेटूक करून इकडे काकीआज्जीने केलेल्या पोळ्या परस्पर गायब करुन आपल्या घरच्यांना खाऊ घालत होती. म्हणुन आंबादासने आपल्या बायकोला घरी पोळ्या करायला सांगितल्या, पण त्यात पुरणाच्या ऐवजी चामड्याचा चुरा भरला आणि त्या पोळ्या काकीआज्जीला आणुन दिल्या. विमलकाकीच्या चेटुकाने त्याही पोळ्या पळवल्या आणि ती पकडली गेली.

>>> हे सॉल्लीडे! विशालभाऊ, याची स्टेप बाय स्टेप रेसिपी टाका ना. म्हणजे पुपोची नाही तर त्या गायब कशा करायच्या त्याची. रोजचं जेवण करण्याची कटकट नाहीशी होणार असेल तर मीही शिकेन. आमच्या घराच्या आजूबाजूच्या हाटेलातनं जेवणं गायब! कोणाला कळणारच नाही. Happy

मामी Proud

आधी हाटिलात चांगलं जेवण बनतं ह्याची खात्री करुन घ्यायला विसरु नका.>>> हाटिलात जेवण बनतं की अश्याच मार्गानं येतं त्याचीही खात्री करून घ्या. नाहीतर तुम्ही हाटिलातलं पळवायच्यात आणि हाटिलवाला तुमच्या घरातलं Lol Light 1

माझ्या माहितईनुसार तेलच्या म्हणजे गोड पुर्‍या ज्या दसर्‍याच्या दिवशी बनवतात आणी "सोन" वातयल येणार्‍या मुलाना देतात..

माझी मावस बहीण सातवी आठवीत असताना तीला म्हणे देवी दिसायची.. एकदा माझ्या आजीची सोन्याची चैन मिळत नव्ह्ती.. तर हीने चार पाच मिनिटे डोळे बन्द केले आणी आजी ला म्हणलि की पिठाच्या डब्यात बघ आणि च़क्क चैन मिळाली.. मेन म्हणजे आजीने ५ मिनिटा अगोदरच त्याच डब्यातून पीठ काढले होते.. आणि चैन हरवून बराच वेळ झाला होता..माझी आजी तर नन्तर तीच्याशी बोलायला पण घाबरु लागली..

Pages