Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मदत समिती काही नीट काम करत
मदत समिती काही नीट काम करत नाही हल्ली
माझ्या आजे सासर्यांना हेवी
माझ्या आजे सासर्यांना हेवी डायबेटीस आहे. त्यांच्या ब्रेकफास्ट साठी काही रेसेपी सुचवा प्लीज ........
पेसरट्टू, नुसत्या डाळी वापरून
पेसरट्टू, नुसत्या डाळी वापरून केलेले आडाई, डाळ इडली, डाळ वाटून केलेला ढोकळा, चपातीच्या पिठात वेगवेगळ्या भाज्या (बटाटे आणि मटार वगैरे सोडून) पराठे, मटकी-मुगाची उसळ असे चालू शकेल.
पल्लवी८६, डॉक्टर अशा
पल्लवी८६, डॉक्टर अशा पेशंटसाठी दिवसभराचा आहार लिहून देतात. तो काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. (माझी आई गेली १० वर्षे तो पाळतेय.) त्यांना काय आणि किती खाल्ले तर चालेल ते एकदा विचारुन घ्या. त्या घटकांना अनुसरुन इथे पाककृति देता येतील.
दिनेशदा, त्यांचे वय ८१ आहे.
दिनेशदा, त्यांचे वय ८१ आहे. डॉक्टरांनी गोड, भात, बटाटा ही नेहमी प्रमाणे पथ्ये सांगितली आहेत. ती इतर जेवणाच्या वेळेस पाळतोच पण ब्रेकफास्टला नेहमीच उपीट, पोहे, शेवयाचे उपीट इतकेच होते. वेगळ काय करता येइल ?
थॅंक्स मिनोती, डाळ इडली ची पा. कृ. टाकाल का?
वरती निळी अक्षरे आहेत त्यावर
वरती निळी अक्षरे आहेत त्यावर क्लिक केले की पाककृतीच्या लिंक्स ओपन होतील.
पेसरट्टू जर न आंबवता केले तर
पेसरट्टू जर न आंबवता केले तर चालेल का?
डाळ इडलीची रेसेपी नक्की ट्राय करेन.
पल्लवी, राजगिर्याच्या
पल्लवी, राजगिर्याच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, कुरमुरे, पोहे, वगैरे दूधात भिजवून खाता येतात. नाचणीच्या पिठाचे डोसे, ढोकळा, तांदळचे कदंबम, खिमटी, उकडून घेतलेली कडधान्ये.. पण हे सगळे दिवसाच्या आहाराचा तक्ता लक्षात घेऊनच. कमी गोड असणारी फळे जसे कलिगंड, टरबूज, पपई वगैरे.
धन्यवाद दिनेशदा .... तांदळचे
धन्यवाद दिनेशदा ....
तांदळचे कदंबम ची रेसेपी टाकाल का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25649
इथे लिहिलेय.
कदंबम ची रेसेपी छानच
कदंबम ची रेसेपी छानच आहे.
जिरे मिर्याच्या फ्लेवरने चवही चांगली येइल.
कुरमुरे, पोहे, तांदळाचे
कुरमुरे, पोहे, तांदळाचे कदंबम, खिमटी यात सगळ्यात तांदूळ आहे. डायबेटीस असलेल्या व्यक्तीला कसे चालेल?
डायबेटीसला तांदू़ळ पूर्ण
डायबेटीसला तांदू़ळ पूर्ण वर्ज्य करायला सांगत नाही हल्ली. सगळे खायचे पण प्रमाणात, असा सल्ला देतात.
आईला तक्ता दिला आहे, त्यात आहे हे सगळे.
नाचणीची ताकातली आंबील,
नाचणीची ताकातली आंबील, ज्वारीच्या पिठाची उकड, गव्हाच्या पिठाचा फुलका, शेवयांचा उपमा, दलियाचा उपमा, व्हीट फ्लेक्स / पफ्स नुसते दुधातून, दाल शोरबा (डाळ व भाज्यांचे दाटसर सूप) असे पदार्थही डायबेटिसला चालतात.
भाजणीचे पदार्थ, जसे थालिपीठ, चालू शकतात. मिश्र पिठांची धिरडी करता येतील.
बरं!!
बरं!!
वालाच्या डाळीची आमटी कशी
वालाच्या डाळीची आमटी कशी करतात ? आधी किती वेळ भिजवुन ठेवायची ?
माझ्याकडे जी साखर आणली गेली
माझ्याकडे जी साखर आणली गेली आहे तिला गोडेतेलाचा वास येतोय ...दुकानातूनच घेताना न पहाता घेतल्याने सगळा गोंधळ झालाआहे. ती साखर कशातही घाला इतका उग्र वास येतोय ..आणूनही खूप दिवस झालेत मी सध्या माहेरी असल्याने दुकानदाराकडे जाऊन परत करायचे कष्ट नवरोबा करणार नाहीत याची खात्रीच आहे. साखर जवळ जवळ २ किलो आहे काय करू? उपाय सुचवा...
स्वप्ना, ती साखर, तळणीच्या
स्वप्ना, ती साखर, तळणीच्या गोड पदार्थात वापरावी लागेल. जर जास्त दिवस ठेवली, तर आणखी खवट वास यायला लागेल. आताच खवट वास येत असेल, तर न वापरणेच योग्य.
हो दिनेशदा आईचेही हेच म्हणणे
हो दिनेशदा आईचेही हेच म्हणणे आहे. थोडापाक करून ठेवेन म्हणतेय केशर, वेल्दोडे घालून पण जर खवट वास येत असेल तर मात्र फेकून द्यावी लागेल बहुतेक..मी अजून पाहिली नाहिये आता पुण्याला गेल्यावर पाहिन ..
आणखी एक उपाय, खरं तर प्रयोग.
आणखी एक उपाय, खरं तर प्रयोग. यातली थोडी साखर मोठ्या भांड्यातील पाण्यात विरघळवून, ते भांडे फ्रिजमधे ठेवायचे. तेलाचा अंश वर येईल, तो काढून टाकायचा. (ओतून किंवा टिश्यू पेपरने ) बाकीच्या पाण्याला वास येत नसेल तर त्याचा पाक करता येईल, किंवा ते पाणी लिंबू सरबतात वापरता येईल.
पल्लवी, माझ्या आजोबांना हि
पल्लवी, माझ्या आजोबांना हि डायबेटिस आहे, माझी आज्जी त्यांच्यासाठी तिखट दलिया करते.... i think त्याची रेसिपी तिने रामदेव बाबांच्या कोणत्या तरी कार्यक्रमात ऐकली होती..... i don't know exactly.... तिला विचारून सांगते उद्याच.....
तिखट दलिया मी पण करते, सांजा
तिखट दलिया मी पण करते, सांजा करतो त्या पध्दतीने. हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात कढीपत्ता, मिरची घालुन दलिया भाजते, रंग बदलला आणि खमंग वास सुटल्यावर गरम पाणी घालते. चवी प्रमाणे मिठ, साखरेची चिमुट घालुन झाकण ठेवुन शिजवते. पाणी थोड जास्त लागत कारण दलिया रव्यापेक्षा जाड असतो. तसच आवडी आणि उपलब्धते नुसार कधी मटार, पावटे, फ्लॉवर, टोमॅटो घालते.
डायबिटीससाठी पा.कृं.चं एका
डायबिटीससाठी पा.कृं.चं एका ठिकाणी कलेक्शन करता येईल का ?
किराणा दुकाणात काजु-कणी
किराणा दुकाणात काजु-कणी मिळते... १६०/ किलो. काय करतात त्याचे?
हॉटेलवाले नेतात म्हणे
मधुमेहा सोबत जीवन असा एक
मधुमेहा सोबत जीवन असा एक ग्रुप इथे आहे त्यातच ह्या पाकक्रूतींचा संग्रह केला तर कसे? गरजूंना हातासरशी माहिती मिळेल.
वर्षा जिथे जिथे काजूचे वाटप
वर्षा जिथे जिथे काजूचे वाटप लागते तिथे या कण्या वापरता येतात. आइसक्रीम टॉपिंग म्हणुनही चालतात. मार्झिपान, काजू कतली मधे वापरता येतात.
काजू कतली मधे वापरता येतात.
काजू कतली मधे वापरता येतात. >> अरे देवा... मी आत्ताच २५० ग्रॅम काजु आणले कतली साठी.. आणी ५० ग्रॅम कणी... काय प्रकार असतो ते पहायला.. दुकानदार म्हणत होता.. त्यात साल वगैरे असते. आता घरी गेल्यावर उघडुन पाहते

रच्याकने मार्झिपान म्हणजे काय
माझे दिर स्विडनला चाललेत काहि
माझे दिर स्विडनला चाललेत काहि महिन्यांसाठि. त्यांच्याबरोबर खाण्याचे काय काय देता येइल ?
शेंगदाण्याची , लसणाची चटणी दिल्यास किती दिवस टिकेल ? आणि देताना प्लॅस्टिकचे कंटेनर वापरले तर चालेल का? लवकर सांगा प्लिज, दोनच दिवस उरलेत.
धन्यवाद साक्षी, स्निग्धा.
धन्यवाद साक्षी, स्निग्धा. दलियाच्या उपम्याची रेसेपी आवडली. तसेच दलिया गव्हाचा असल्यामुळे पौष्टीक पण आहे.
रुणुझुणु व अश्विनीमामी नक्कीच अस कलेक्शन कराव कारण मधुमेहा सोबत जीवन इथेच मी पहिल्यांदा पाहील पण काहीच मिळाल नाही म्हणून इथे प्रश्न टाकला.
खरच त्याचा खूप उपयोग होइल.
वर्षा, मार्जिपान म्हणजे केकवर
वर्षा, मार्जिपान म्हणजे केकवर घालायचे एक डेकोरेशन. ते लाटता येते. जास्त माहिती लाजो देऊ शकेल.
प्रतिभा, अनेक देशात खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी आहे. आधी नीट चौकशी करावी लागेल. शक्यतो कंपनीचे पॅकबंद पदार्थ नेले तर चालतात.
तिथली हवा थंड असल्याने पदार्थ टिकायचा प्रश्न नाही. फ्रिजमधे ठेवायचे.
Pages