फलश्रुती भाग ४ - मोसंबी

Submitted by दिनेश. on 10 May, 2011 - 04:21

पडू आजारी मौज हीच वाटे भारी..

अशा काही ओळी असलेली एक जूनी कविता होती. आजचे फळ, मोसंबी यासंबंधात अनेकजणांच्या आजारपणाच्याच आठवणी असतील.

साधारणपणे हॉस्पिटलच्या बाहेर विकायला असणारे फळ (बाकिची केळी आणि शहाळी) अशीच याची ख्याती आहे. एकमेकांना इतर प्रसंगी भेट देण्यासाठी, पण सहसा ही फळे खरीदली जात नाहीत.

मोसंबीचा ताजा रस मिळणार्‍या गाड्या या मुंबईत साधारण २५ वर्षांपूर्वी दिसायला लागल्या. पण त्याचबरोबर या फळात थोडा बदलही झाला. पुर्वी हे फळ, पिवळेजर्द झाल्याशिवाय बाजारात येत नसे. पण या गाड्या आल्यानंतर मात्र, हिरव्या सालीची फळे बाजारात येऊ लागली. या गाड्यांवर ती सोलूनच ठेवलेली असतात. मग ग्राहक आला कि त्या हातयंत्रात दोन तीन फळे घालून रस काढला जातो. आता त्यात बर्फ़, पिठीसाखर, चाट मसाला वगैरे घालून बियर ग्लासातून पेश केले जाते. आता यात आरोग्याचा विचार किती केला जातो, त्याची कल्पना करा.

पण पुर्वी घरोघरी मोसंबीचा रस काढायचे एक हातयंत्र असायचे. साधारण वर आलेला एक कळस, त्याच्या आजूबाजूला तो रस गाळण्यासाठी सोय. आमच्याघरी हे प्रकरण काचेचे होते. पुढे ते प्लॅस्टीक, मग स्टील मधे पण निघाले. याचा वापर कितीसा होत असे हा एक प्रश्नच आहे, पण घरोघरी ते असे हे मात्र खरे.

पण संत्रे जितक्या सहजासहजी सोलता येते तितक्या सहजासहजी मोसंबे सोलता येत नाही. शिवाय सोलले तरी त्याच्या कापा, लवकर सूट्या होत नाहीत. पण त्याचा काढला तर रस मात्र भरपूर निघतो.

पण तो खाण्याची एक अनोखी पद्धत नायजेरियात बघितली. आणि मी त्या प्रकारच्या प्रेमातच पडलो. तिथे असताना सरासरी रोज दोन मोसंबी मी खात असे (तिथे त्यांना ऑरेंज म्हणतात आणि आपल्या संत्र्याला तिथे टॅंगरीन म्हणतात.)

तिथे त्याचे अमाप पिक येते. ट्र्क भरभरुन हि फळे तिथल्या बाजारात येतात. आणि ती खाण्याची खास पद्धत अशी.

मोसंबीची वरची पातळ साल अगदी नजाकतीने काढण्यात येते. त्यासाठी ते पीलर वगैरे वापरत नाहीत, तर साधा चाकू वापरून, फळ गोलाकारात फ़िरवून साल काढली जाते. त्या लोकांचे हे कौशल्य बघण्यासारखे असते. हाऊसमेडच्या कौशल्याचा तो एक मापदंड आहे तिथे.

अशी सोललेली मोसंबी, पाचाच्या गटात विकायला ठेवलेली असतात. हा गट पण खाली त्रिकोणात तीन व त्यावर दोन असाच रचलेला असतो, आणि विकत घेताना तो एक गटच विकत घ्यावा लागतो. मला त्यांचे हे कौशल्य बघायला इतके आवडायचे कि मी मुदाम न सोललेली मोसंबी निवडून, माझ्या डोळ्यादेखत सोलून घेत असे.

आता ते खाण्यासाठी, देठाकडची छोटीशी चकती कापायची. मग तिथून रस चोखायला सुरवात करायची. सोलल्यामूळे ते मोसंबे जरा मऊसर झालेले असते, तर हाताने जराजरा दाबून तो रस काढायचा, आणि प्यायचा. मूळातच तिथली मोसंबी रसाळ आणि गोड असतात. शिवाय बिया न कापल्या गेल्याने, त्यात कडवटपणा अजिबात नसतो. असे करत सगळा रस चोखून झाला, कि हवे तर त्याचा चोथा खायचा.

असे खाणे तिथल्या माझ्या अनेक भारतीय मित्रांना जमत नसे. मोसंबी दाबता दाबता जर नख लागले किंवा जास्त दाब दिला तर तिथे छिद्र पडून, तिथूनही रस बाहेर येत असे. त्यामूळे ते लोक कापून खाणेच पसंत करत असत.

तर हे असे साधेसे फळ. आहे लिंबू वर्गातलेच. तापात आणि कावीळीत उत्तम. यातला आंबट नसलेला रस, तहान भागवतो. आंबट नसल्याने आम्लपित्त,उलटीची भावना होत नाही.

याचा उगम भारतातच झाला असे मानतात आणि भारतभर अनेक जाती लागवडी खाली आहेत. याशिवाय मध्य अमेरिका, भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश, इतर आशियाई देशातही याची लागवड होते. याला इंग्लीशमधे जरी स्वीट लाईम म्हणत असले तरी आंबट लिंबाचाही काही वेळा तसाच उल्लेख केला जातो.

पिकलेल्या मोसंब्याला स्वत:चा असा एक स्वाद असतो. पण तो लिंबाइतका वा संत्र्याइतका तीव्र नसतो. त्यामूळे याचे स्वतंत्ररित्या सरबत, इसेन्स, जाम वगैरे करत नाहीत, संत्र्याच्या पाकवलेल्या सालीसोबत कधीकधी याचीही साल असते.

फ्रूट सलाद वगैरेमधे पुरक फळ म्हणून हे वापरतात खरे, पण ते सोलण्याचा तसा त्रासच असतो. पाककृतींमधे पण हे फळ, खास असे वापरलेले दिसत नाही.

यामधे शर्करा बर्‍या प्रमाणात असतात. फॉस्फोरस जास्त प्रमाणात असतो. मॅग्नेशियम, जस्त आणि कॅल्शियम थोड्याफ़ार प्रमाणात असतात. तसे पोषणाच्या दृष्टीने फ़ार महत्वाचे फळ नाही हे.

या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी.

असे एक साधेसे फळ. याचे शास्त्रीय नाव Citrus limettioides

आपल्याकडे मिळणारे फळ आणि भूमध्य समुद्राच्या परिसरात मिळणारे फळ, यात थोडासा फरक असतो.
या फळात देठाकडे आणखी एक छोटे फळ असते. वर कापलेल्या मोसंबीमधे ते दिसते आहे. (खरे तर लिंबूबर्गातील फळे अशी म्हणजे, उभी कापायची नसतात. अशी कापली तर त्यातून रस काढता येत नाही. पण केवळ छोटे फळ दिसावे, म्हणून मी तशी कापली आहे.)

जूळ्या भावंडात एखादा साधा असावा आणि एखादा दिखाऊपणा करणारा असावा, तसे मोसंबी आणि संत्र्याचे आहे. त्याचा विचार करु पुढच्या भागात.

भारतातील पिवळ्याजर्द मोसंबीचा, रसवाल्याचा वगैरे फोटो असेल तर अवश्य द्या.

गुलमोहर: 

बुवा मूळात तुम्हाला आम्ही कुठल्या फळाबद्दल बोलतोय ते माहित नाहि तर तुम्ही कशाला वाद घालताय ते सांगता ? तुम्ही चव बघायची सोडून नावात अडकला. वर चार लोकांनी नाव सांगीतले तरी "काय खायचे कळत नाहि?" म्हणता ? तुम्ही इथे अमेरिकेमधे आणि इथले फळ दिनेशनी का शोधायचे ? तुम्हीच खाऊन बघा नि मग लिहा इथे "शेंडा बुडखा कशाला नाहि ते". असो तुमचा "फणस प्रपंच" सुरू असु दे.

हे. मा. शे. पो.

भारतात मिळत असलेली संत्री म्हणजे
Citrus reticulata [साभार गुगल] http://www.citrusvariety.ucr.edu/citrus/ponkan.html

ईथली(अमेरिका) वॅलेन्सिया ऑरेंजेस आणि मोसंबी यात खुप फरक आहे.
तसेच वॅलेन्सिया ऑरेंज आणि Citrus reticulata हे पण एकच नाहीत.

कुठल्या फळाविषयी बोलतो हे मला माहीत नाही हे कनक्लुजन कुठून काढलस? मी एक तर तुला कुठेही सांगायला आलो नव्हतो की तुझा मुद्दा काहीच्या काही आहे वगैरे. तुच पार्ल्यात येऊन बोललास, तेही ठीक आहे.
वरच्या पोस्टी वाचल्या तर तुला कळेल की मी सुरवात नावावरुन केली. नंतर मला स्वीट लाईम किंवा मोसंबी ही संत्रा फॅमिली मधलच असतं हे सांगण्यात आलं (पार्ल्यामध्ये). काही म्हणणं नाही.

तू धडधडीत वर मोसंबी म्ह्णजे वॅलेन्सिया ऑरेंजेस, हवं तर आणून देतो असं म्हंटलायस. ह्यावर मी म्हणत होतो की मोसंबी आणि वॅलेन्सिया ऑरेंजेस हे दोन वेगळी फळं आहेत असं म्हंटलो, तेही ऑनलाईन माहिती शोधून काढून तर तू माझी चेष्टा केलीस. बरं तेही चालेल.चेष्टे बद्दल काही म्हणणं नाही. पण मग मी चेष्टेनी लिहीलेलं चालत नाही का? का बरं?

इथे नेवल ऑरेंजेस आणि वॅलेन्सिया ऑरेंजेस मी खाऊन बघितलेले आहेत पण ते मी संत्रे म्हणून खालले. का? कारण की त्यांची चव, रंग आणी नाव बघून संत्रे म्हणून खालले. आता मला ते बघितल्यावर, खालल्यावर जर मोसंबी सारखे नाही लागले तर ह्यात काय चुकलं?

ह्याउपर मी केव्हाचं , असेल , असू शकतं अशी भाषा वापरत नीट बोलतोय तर तू येऊन चेष्टा केलीस, केली तर केली वरुन मी केली तर इतकं लागायचं काय काम? बाकी तुझा प्रश्न आहे पण मी एरवीच टाईमपास म्हणून चेष्टा केली इतकं मनाला वगैरे लावून घेऊ नकोस.

छान माहीती. मोसंब्यातले मिनी मोसंब मस्त आहे.

ईथे बोरा एवढी मोसंबी सारखी फळे मिळतात>> हो हो इथेही मिळतात किनकान या नावाने. फार मस्त लागतात. ती संत्री का मोसंबी कोण जाणे. गुगल सर्च मधे त्याचे नाव Kumquat

हा ही लेख छान ,रसाळ Happy
इथेही बर्‍याच प्रकारची/ संत्री मोसंबी परिवारातली फळं दिसतात. परवा फोटू टाकीन.. फळबाजारातून चक्कर मारून आल्यावर. ती बोराएव्हढी मोसंबी तर मस्तच लागतात. सालाससकट खातात ही फळं.
तोपर्यन्त नेटवरची..

oranges.jpg

आणी हो.. मंजूडी, पूर्ण कविता टाकल्याबद्दल धन्स गं Happy

ती बोराएवढी असतात ती कुमक्वॅट असे स्पेलिंग, पण सावलीने उच्चार दिलाय तो किमकान.. ती खरेच सालासाक्टच खायची असतात. त्यात बिया दिसल्या नाहीत मला.

संत्रे वेगळे आणि मोसंबी वेगळी. पुढचा भाग संत्र्याबद्दल लिहितोय. पण आपली मोसंबी (पिवळीजर्द, अजिबात आंबट नसलेली, फक्त गोड चव असलेली ) अमेरिकेत मिळतात का ? ती भूमध्य समुद्राच्या आसपास होतात. मध्य अमेरिकेतही होतात.

जागू, आमच्याकडचे ते यंत्र कधीच फुटले. मोसंबीच्या वासाचा हार्मनी साबण माझ्या खुप आवडीचा होता.
पण त्यात मटन टॅलो वापरतात, असे समजल्याने वापरणे बंद केले.

दिनेशदा,हाही लेख छान.
इथे मिळतात ती संत्री की मोसंबी ह्यावर आमचंही अजून एकमत नाही. Happy
तुम्ही ते गोलाकार साल काढण्याचं सांगितलंत ना तसंच साल काढून ,त्याची फुलं बनवून आमच्या स्टाफने आमच्यासाठी केक डेकोरेट केला होता. हा बघा त्या फुलाचा फोटो.
39723_105985946126614_100001456280442_49045_8293761_n.jpg

छान लेख पण छोटा वाटला. संत्री-मोसंबी-लिंबू सगळ्याचा मिळुनच लेख लिहायचा होता...
आता उन्हाळा स्पेशल कलिंगड येउद्या!
या प्रकारच्या फळांच्या नावाबद्दल बरीच गडबड दिसतिये. फ्रान्स बद्दल सांगायचे तर आपण ज्याला मोसंबी म्हणतो ती इथे ऑरेंज म्हणुन मिळतात. याच आतल्या फळाचा रंग पिवळा/केशरी/जांभळा असू शकतो. आपली संत्री म्हणजे इथेली मँडेरीन (सोलायला सोप्पी वै). मँडेरीनचाच एक 'क्लेमाँतीन' नावाचा प्रकार (छोटी संत्री) इथे बरेच लोक कच्ची खातात. दोन्हीचे (ऑरेंज, मँडेरीन) ज्यूस लोकं मोठ्या प्रमाणात पितात. शिवाय पेस्ट्रीस् मधेही वापरली जातात.

दिनेशदा,
आता मी या मोसंबीला (खायचंही) कधीच विसरणार नाही.
अगदी अलिकडच्या काळापर्यंत मला संत्री आणि मोसंबीतला फरक ओळखताना गोंधळ व्हायचा ..
Happy

माझ्या लहानपणी कधी आजारी पडलो तर फळ तर सोडा (कारण ते आजारी पडण्याच वय नसल्यामुळे) पण फक्त (टोमणेवजा) शिव्याच खायला मिळायच्या.
Lol

खडीसाखर मनुका बेदाणा
संत्री साखर लिंबू आणा
साबुदाण्याची खीर कराना
गंमत सारी, मौज हीच वाटे भारी

मंजुडी,
धन्स ! ही छान कविता मला आता वाचायला मिळाली, आता मुलांना तरी निदान त्यांच्या लहानपणी ऐकायला मिळेल.
Happy

वर्षु,
ती बोराएव्हढी मोसंबी तर मस्तच लागतात. सालाससकट खातात ही फळं.
तोपर्यन्त नेटवरची..

बोराएवढी म्हणजे तिकडे म्हणता येत असेल कि, मी आताच एक डझन मोसंबी सहज खाल्ली .
तुर्त मीपण तिकडची २ डझन मोसंबी सध्या नेटवरुन खाऊन घेतो .
Lol

Pages

Back to top