Submitted by सांजसंध्या on 9 May, 2011 - 09:26
इथे कवितेवरच्या कविता पोस्ट कराव्यात. स्वतःच्या, सहित मित्र / मैत्रिणींच्या , मान्यवरांच्या कवितांचेही स्वागत आहे. खरं तर ही कल्पना तुषार जोशी यांनी ऑर्कूटवर मांडली होती.. कल्पनेचं श्रेय त्यांचंच आहे.
( टीप : कॉपीराईट प्रकरणामुळे परवानगी घेतली नसल्यास लिंक दिली तर चालेल असं वाटतं. )
गुलमोहर:
शेअर करा
सुरूवात करू का ? माझीच कविता
सुरूवात करू का ? माझीच कविता आहे ही
मज दर्शन दे हे कविते..
मैलोमैलींचे रण पेटते
उजाड वाटा शोधत फिरते
निष्पर्ण बनी विनविते
मज दर्शन दे हे कविते.. | १ |
घनजलदांची वर्दी होती
दामिनींची गर्दी होती
परि.. कोरडीच मी फिरते
मज दर्शन दे हे कविते.. | २ |
भरूनी वाहे यमुनामाई
रानी माझ्या ओलही नाही
मी मिटुनि डोळे रडते..
मज दर्शन दे हे कविते |३ |
ओळखीचे सूर पाव्याचे
गंधित गाणे नील कान्ह्याचे
मी निळाईत त्य़ा भिजते
मज दर्शन दे हे कविते.. | ४
|
संध्या
०३ जुलै २०१०
तुमची कवितेवरची कविता ...येऊ
तुमची कवितेवरची कविता ...येऊ द्या ना इथे
छान! एवढी कविता रचली तरी..
छान! एवढी कविता रचली तरी.. 'मज दर्शन दे हे कविते..'..?
तशी ही तहान एकावर भागणार नाही.
अवा: कालच मी पाहीलेली 'कविता' अबुधाबित आली.
अरे हे काय....?
अरे हे काय....?
रूसली ही पोर तिच्या..
रूसली ही पोर तिच्या.. भावनांना वाव नाही.
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी ..
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर माझे
गझलेला दाद नाही
हरविले शब्द माझे
माझी मला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेचे नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
संध्या
०३ ऑक्टोबर २०१०
ऑर्कूट अकाऊंटबरोबर माझ्या
ऑर्कूट अकाऊंटबरोबर माझ्या कविताही डिलीट झाल्यात..
लगेच नाचू नका आनंदाने.. नवीन लिहू शकतो अजूनही