२६ वर्षे झाली जाईला भेटून. पण आजही तिची आठवण आली कि खुदकन हसूच येतं. १९८१ साली मी ज्यावेळी आर्टिकलशिप सुरु केली, त्यावेळी जाई मला सिनियर होती. मला घडवायची जबाबदारी तिच्यावर होती, आणि तिने तिच्यापरीने माझ्यावर बरीच मेहनत घेतली.
आता थोडे माझ्याबद्दल लिहायला हवे. त्या काळात सी ए ची एंट्रन्स परिक्षा देउन, आर्टिकलशिप सुरु करता येत असे. आता सारखी पदवीधर असायची अट नव्हती. आर्टिकलशिप सुरु करायला मात्र वयाची १८ वर्षे पूर्ण करावी लागत. मी एंट्रन्स जरी पास झालो असलो, तरी १८ वर्षे पूर्ण झाली नव्हती. त्यामूळे मला जरा वाट बघावी लागली.
आर्टीकलशिप म्हणजे जवळजवळ पूर्ण वेळ नोकरी. सकाळी ७ ते १० कॉलेज, मग ११ ते ६ ऑफ़िस असे रोज. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमांत. बारावीपर्यंत उच्च मराठी हा विषय. इंग्रजीत उत्तम मार्क मिळत असले तरी बोलायला अजिबात आत्मविश्वास नसायचा. तर असा मी, आमच्या ऑफ़िसमधे दाखल झालो.
त्यावेळी जाईचे शेवटचे वर्ष होते. सिनीयर क्लार्कने, ज्यूनियरला शिकवायचे अशीच रित होती. तर माझा गुरु म्हणून जाईची नेमणूक झाली.
पहिल्या भेटीत तिने फ़ाडफ़ाड इंग्लीश बोलायला सुरवात केली. ती, म्हणजे जाई खोपकर मराठी असली, तरी इंग्लिश मिडीयममधून शिकली होती. माझ्या गळ्यात आवंढा आणि डोळ्यात पाणी यायचेच तेवढे बाकी होते.
मला तर स्टेशनपर्यंत रस्ताही माहीत नव्हता. तिच्यासोबतच स्टेशनवर निघालो. चर्नी रोड स्टेशनवर तिला बाय करण्यापूर्वी, मी भित भित विचारले, मी समजले नाही तर, तिला मराठीत विचारु शकतो का ?
तिला फ़सकन हसूच आले. म्हणाली, अरे कळले नाही तर तेव्हाच विचारायचेस की, मी काय खाणार होते का ? तशी मी नॉन व्हेज खाते पण तूला नाही खाणार. पण माझे मराठीपण ग्रेटच आहे. असेही तिने सांगून टाकले.
पण दुसर्या दिवशी तिनेच मला सांगितले कि तू आताच बोलायला सुरवात केली नाहीस, तर बोलू शकणार नाहीस. तूझी मार्कशीट बघितलीय मी. एम्ट्रन्सला पण इंग्लीशमधे छान मार्क्स आहेत. मग बोलत का नाहीस ?
मी म्हणालो, कि तेवढा कॉन्फ़िडन्स नाही. तर ती म्हणाली बिंधास्त बोलत जा. काहि चुकले तर मी लगेच सांगीन.मग हळूच म्हणाली, सगळ्यांसमोर नाही सांगणार पण ते तू मनाला लावून नाही घ्यायचेस. मला खरेच आनंद झाला.
आज मी जे आत्मविश्वासाने इंग्लीश बोलतो, त्याचे श्रेय तिलाच.
त्यानंतर जवळजवळ दोन वर्षे आम्ही एकत्र काम केले. तिने अनेक लहानसहान गोष्टी मला शिकवल्या. हे असेच तिच्या आठवणींचे कोलाज.
कॉलेजमधे शिकत असलेले अकाऊंट्स आणि प्रत्याक्षातले काम, यात बरीच तफ़ावत असते. अनेक लहानसहान गोष्टी पुस्तकातून शिकता येत नाहीत. कुठल्याही कागदावर लिहिताना मार्जिन किती सोडायचा. पंच कसे करायचे. सिंगल पंच म्हणजे काय, हे तिने मला न कंटाळता शिकवले.
ती सोडून जाणार असल्याने, तिच्या सर्व असाइनमेंट्स माझ्याकडे आल्या. तिचे सर्व क्लायंट्सही माझ्याकडे आले.
मुलामुलीने सोबत रस्त्यावरुन एकत्र जायचे, हे त्या काळात गिरगावसारख्या ठिकाणी जरा डोळ्यात भरायचे. मी तिला सहज विचारले, कि मी पुढे जाऊ का ? तर ती म्हणाली, अरे वेडासुद्धा आपल्या दोघांवर असा संशय घेणार नाही. आपला जोडा अजिबात शोभणार नाही. मी काळी, तू गोरा. मी जाडी तू पाप्याचे पितर (माझे वजन फक्त ५५ किलो होते त्यावेळी.)
ती तशी सावळी होती, पण स्वत:ला काळी म्हणवून घ्यायची. म्हणायची आईने लहानपणी काजळाची बोटे माझ्या गालाला पुसली. तशी जाडही नव्हती, पण आम्हीच तिला चिडवायचो.
ती ज्या सोसायटीमधे रहायची, तिचे नाव होते गगनदिप, आणि त्याच काळात ग्रांट रोड ला एका रात्री रेल्वे ट्रॅकजवळ एक इमारत कोसळली. दोन तीन दिवस चर्नी रोड ते ग्रांट रोड दरम्यान रेल्वे वाहतूक बंद होती. आम्हाला चालतच जावे लागत होते.
ऑफ़िसमधे आल्या आल्या मी, तिला विचारले काल रस्ता चुकली होतीस का ?
तर तिने लगेच ओळखून उतर दिले. आकशदिप कोसळली, म्हणून विचारतोस का ?
त्या काळात आम्हाला वट्ट ८५ रुपये स्टायपेंड मिळायचा. म्हणजे ६० रुपये स्टायपेंड आणि २५ रुपये कन्व्हेयन्स. सगळे त्यातच भागवायचे. ती सिनियर म्हणून तिला १२५ रुपये मिळायचे. तर आमची कायम तिच्याकडे उधारी असायची.
पण तिने कधीच तगादे लावले नाहीत. उलट ती आपणहून आमचे लाड करायची. (लाड म्हणचे चौपाटीवरची भेळ, सॉफ़्टी, व्हीटीचे काला खट्टा सरबत वगैरे.)
एका ऑडीटला मला कंटाळा आला होता, आणि लवकर घरी जायचे होते. तिला तसे सांगितल्यावर म्हणाली तू जा. मी थांबते, बॉसचा फ़ोन आला तर ! (त्या काळात तशी पद्धत होती. बॉस पावणेसहाला वगैरे फोन करुन चौकशी करायचा.)
मी निघालो खरा, पण मग वाटेत वाईट वाटले, तिला एकटीला सोडून आपण आलो त्याचे. मी दुसर्या दिवशी तिला म्हणालो, कि तूला लवकर जायचे तर जा, मी थांबतो. तर म्हणाली, असा वन टू वन कधीच व्यवहार नसतो. तू सिनियर होशील, तेव्हा ज्यूनियर्सना असाच ट्रिट करत जा. अगदी छोटिशी
घटना, पण मी आजपर्यंत तिचा सल्ला मानतोय.
जाईचे आणि माझे हॅंडरायटींग बरेचसे सारखे होते. त्या काळात बहुतेक अकाऊंट्स हातानेच लिहिली जात. त्यामुळे तिच्या महत्वाच्या असाइनमेंटस माझ्याकडे आल्यावर क्लायंटस पण खुश झाले. पण माझ्या लिखाणावरचा तिचा प्रभाव मला आजही नाकारता येणार नाही. माझ्या सेव्हनला आडवी रेघ नाही. रक्कम लिहिल्यावर त्यात स्वल्पविराम नाहि, असे माझ्या हातून कधीही होणार नाही. एट, सिक्स आणि नाईन यांची वर्तूळे प्रमाणबद्द काढण्यामागे तिचाच प्रभाव आहे. आजकाल हस्तलिखित तितके महत्वाचे उरलेले नाही. पण उत्तम हस्ताक्षराचे तितकेच चांगले इंप्रेशन पडते, हे नाकारता येणार नाही.
जाई खोपकरला आम्ही तिच्या तोंडावर पण जेके म्हणत असू. आणि त्यामागे खास कारणही होते. त्या काळातल्या बहुतेक हिंदी सिनेमात, स्मगलर्स लोकांचा बॉस अजित असायचा, आणि त्याचे नाव जेके असेच असायचे.
रोज संध्याकाळी, जर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असू, तर तिला फ़ोन करुन रिपोर्ट द्यावा लागे. त्यावेळी अर्थातच टेलिफ़ोन ऑपरेटर मार्फ़त हे फ़ोन करावे लागत.
मग मी फ़ोन करुन सांगायचो, "जेके माल पकडा गया, लेकिन रिटा भाग गयी."
तर ती पण खास टोनमधे सांगायची, " नंबर एक को बोलो कि वो पुराने किलेकी तरफ़ बढे. नंबर दो को बोलो हि वो हायवेपे हमारा इंतजार करे. और राबर्ट तूम फ़ौरन हेलिकॉप्टर तैयार रखो. हमे देश छोडके जाना है." हे असलं काही बोललो कि ती टेलिफ़ोन ऑपरेटर डोळे मोठे करुन बघतच बसायची.
आम्ही दोघे एका मोठ्या थिएटरचे वीकली ऑडीट करायचो. करमणूक कर भरण्यासाठी सी ए चे सर्टीफ़िकेट लागत असे. तर त्या थिएटरला पहिल्यांदा गेल्यावर, तिथल्या मॅनेजरने आम्हाला सामोसा देऊ केला. पण जाईने त्याला ठाम नकार दिला. खरे तर मला तो हवा होता. पण मग चौपाटीवर पाणीपुरी खाताना तिने एक महत्वाचा सल्ला दिला, ती म्हणाली, हे एक छोटे विकली सर्टीफ़िकेट आहे. तूला दर शनिवारी इथे यायचे आहे. आज समोसा खाल्लास तर तूला दर शनिवारी त्याने द्यावा असे वाटेल. आणि २ रुपयाच्या सामोस्याच्या बदल्यात तो तूझ्याकडून काय करवून घेईल, ते सांगता येणार नाही. त्यावेळी तिचे बोलणे आवडले नव्हते. पण आता इतक्या वर्षानंतर त्यातले तत्व नक्कीच पटले.
जाईच्या प्रामाणिकपणा बद्दल कुणालाही शंका घ्यायला जागा नव्हती. एकदा मजाच झाली, त्यावेळी आमचे टॅक्स क्लायंट आमच्याकडे सह्या करुन ब्लॅंक रिटर्न्स देत असत. आम्ही ते भरत असू. मराठीतील एका प्रसिद्ध लेखकाचा असा एक रिटर्न, तिला आयत्यावेळी सापडला नाही. आणि शेवटची तारीख जवळ आलेली, तो लेखक परदेशी गेलेला. झालं. ऑफ़िसभर शोधाशोध. आम्ही सगळेच उचकापाचक करतोय बघितल्यावर बॉसने चौकशी केलीच. त्याच्या सवयीप्रमाणे, करता काय, करता काय, असे पुटपुटून तो गेला.
बरीच शोधाशोध करुन काही तो सापडला नाही. थोड्या वेळाने बघतोय तर जाई बाथरुममधे. बराच वेळ झाला बाहेर येईना. सगळ्यांनी हाका मारुन झाल्या, तरी काही बाहेर येईना. बॉसने माझ्यावर जबाबदारी टाकली, मी तिला खोटेच सांगितले. कि रिटर्न मिळाला. तर बाहेर आली. बाईसाहेब आत जाऊन रडत बसल्या होत्या. त्यानंतर बरेच दिवस आम्हाला ते पुरले, तिला चिडवायला. दुसरा रिटर्न जून्या फ़ाईलमधे सापडलाच म्हणा.
आमच्या अकाऊंटस रायटींगच्या पण बऱ्याच असाइनमेंट्स असायच्या. तिने एखादी फ़िगर कॉल आऊट करायची आणि मी ती लिहायची असे चालायचे. अशी आम्ही एक मोठी असाइनमेंट पूर्ण केली. पण या सगळ्यात आम्ही आवर्जून ब्रेक घ्यायचो. चल रे जरा गप्पा मारु. चल जरा बाहेर जाऊन येऊ असे चालायचे. मग त्या वेळात नरिमन पॉइंटच्या टोकाशी जाऊन मासे बघणे वगैरे प्रकार आम्ही करत असू. तिथे अजिबात वर्दळ नसायची त्या वेळी.
एखाद्या अमराठी नावाचा अर्थ काय असावा, असे पण आमचे तर्क चालायचे. PREMANDH असे नाव एकदा आम्हाला एक प्रॉव्हिडंट फ़ंडाच्या मेंबर्समधे आढळले. तर त्याचा अर्थ, प्रेमाचा ज्याला नाद लागला असा तो, कि प्रेमाने अंध झाला असा तो, अशी चर्चा आम्ही करत होतो.
घटना लहानश्या होत्या, पण कामाच्या ठिकाणचे ताणतणाव कसे कमी करायचे, याचे प्राथमिक धडे मी तिच्याकडून शिकलो.
तिचा सिनियर म्हणून कधीच दरारा वाटला नाही. कधीकधी तिचा प्रामाणिकपणा जाचक वाटायचा (ट्रायल बॅलन्स मधला डिफ़रंस, बॉसचा फ़ोन आल्यास ती खरा सांगायची.) कधी कधी बॉसला उल्लू बनवायच्या छोट्या छोट्या कटात, ती आनंदाने सहभागी व्हायची.
पीजे हा प्रकार त्याच काळात सुरु झाला होता. अगदी कशातही तिला विनोद दिसायला सीएट टायर्स हा पण तिला जोक वाटायचा. तिच्या मते ते लूक अॅट टायर्स असायला हवे होते. नॉक नॉक जोक्सचा तर खजिना असायचा तिच्याकडे.
ती आणि मी पुढेमागेच क्वालिफ़ाय झालो. तिच्या लग्नाला तिने आवर्जून बोलावले होते. मग मात्र कधी नाही भेटलो.
परवा फ़ेसबूक वर तिच्या नाही तर नवर्याच्या प्रोफ़ाईलमधे दिसली. बरीच म्हातारी झाली कि भवानी. पण अजून तशीच आहे, दिसायला. स्वभावही तसाच असणार.
फेसबुकवर रिक्वेस्ट टाकीन म्हणतोय.
===
वेल, हि पण सत्यकथा. नावही खरेच. ती मला विसरलीही असेल, पण मी आजही तिला गुरु मानतो.
या तिघींना मी कधी विसरू शकणार नाही. एका ओघात हे सगळे लिहून झाले.
अगदी साध्या शब्दांत किती छान
अगदी साध्या शब्दांत किती छान व्यक्तिचित्रण उभं केलं आहे. आवडलं.
हे फारच आवडलं हो दिनेशदा!!!
हे फारच आवडलं हो दिनेशदा!!! तुमच्या आयुष्यात येणारे लोक छान असतात की तुमची दृष्टी छान असते, असा प्रश्न पडायला लागलाय हल्ली!!!!
पण जाई खरोखर ग्रेट आहे... समोसा प्रसंग अगदी भीडला मनाला... तुमची गुरु खरंच तुमच्याचसारखी महान!!!!
छान....आवडलं हेही
छान....आवडलं हेही
मस्त शब्दचित्र .
मस्त शब्दचित्र .
मस्त रेखाटलय
मस्त रेखाटलय
वा मस्त रेखाटलय. अगदी
वा मस्त रेखाटलय. अगदी डोळ्यासमोर उभी राहीलीय तिलाही पाठवा हा लेख!
मला वाटतं काही माणसं स्वतः इअतकी गुणी असतात अन मुळात इतकी गुणग्राहक असतात की त्यांच्या आजूबाजूची सगळी गुणी माणसं येतातच त्यांच्या सोबतीला ... फुला भोवती सुवास जसा दरवळत असतो तशी
मित्रत्वाने, मनमोकळेपणाने
मित्रत्वाने, मनमोकळेपणाने वागणार्या गुरूचा (सिनियरचा) तुमच्या जडणघडणीत
निश्चितच महत्वाचा वाटा असणार. म्हणूनच जाईला गुरू म्हटलंत तुम्ही.
अर्थात् गुरूकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करायला शिष्यदेखील पात्र असावा लागतोच..... तुमच्यासारखा
अवल, खोपकर आडनावाची सगळी
अवल, खोपकर आडनावाची सगळी माणसं अशीच गुणी असतात का गं?
सानी नाही गं मी चित्रे
सानी नाही गं मी चित्रे असल्यापासून आहे तशीच आतापर्यंत. हा आता "खोपकर" ला ( माझ्या नवर्याला ) विचारलस तर उत्तर वेगळं मिळेल...
हे ही मस्तच.
हे ही मस्तच.
अवल
अवल
दिनेशदा, खूप मनापासून
दिनेशदा, खूप मनापासून लिहिलंत हो. एवढ सरळ, साधं आणि सोप्या भाषेत लिहायला कसं काय जमतं बुवा तुम्हाला !! वेगवेगळ्या वेळी, तुमच्यावर झालेले संस्कार तुमच्या लिखाणातून दिसतातच!!!
फारच छान, सहजसुंदर,ओघवती शैली
फारच छान, सहजसुंदर,ओघवती शैली ! छान व्यक्ती, छान मैत्री !
मला वाटतं, अशा मोकळ्या, खळखळीत मैत्रीचं अधिष्ठान असावं - ' नो हँगअप्स ' !
सुरेख!
सुरेख!
मस्तच.
मस्तच.
मस्त! आवडल.
मस्त! आवडल.
फारच छान व्यक्तीचित्रण..
फारच छान व्यक्तीचित्रण.. जेके,राबर्ट,रीटा..
अशी/असा बॉस असल्यावर काम करायलाही हुरूप येतो..
ती ही नक्कीच तुम्हाला विसरली नसणार..काँटॅक्ट ठेवून राहा. आजकाल जेन्युईन माणसांची वनवा झालीये या प्लॅनेटवर
मग मी फ़ोन करुन सांगायचो,
मग मी फ़ोन करुन सांगायचो, "जेके माल पकडा गया, लेकिन रिटा भाग गयी."
तर ती पण खास टोनमधे सांगायची, " नंबर एक को बोलो कि वो पुराने किलेकी तरफ़ बढे. नंबर दो को बोलो हि वो हायवेपे हमारा इंतजार करे. और राबर्ट तूम फ़ौरन हेलिकॉप्टर तैयार रखो. हमे देश छोडके जाना है." हे असलं काही बोललो कि ती टेलिफ़ोन ऑपरेटर डोळे मोठे करुन बघतच बसायची.>>>>>>>>>>>>>>
मस्त..... अशी आणि तुमच्यासारखी माणसं सगळ्यांना भेटो
दिनेशदा तुमचे मागील ३ ही ललित
दिनेशदा तुमचे मागील ३ ही ललित वाचले , चांगल लिहिताय , पण विथ ड्यु रिस्पेक्ट , मला एक कळत नाही की तुमच्या आयुष्यात फक्त स्त्रियाच आल्यात का ? की तुम्ही पण बेफिकीरांशी स्पर्धा करत आहात ? तुम्ही जेव्हा झाडांवर , फुलांवर लिहित होतात तेव्हा आम्ही सगळ्यांनी तुम्हाला भरघोस प्रतिसाद दिले आहेत, पर ये बात कुछ हजम नही हुवी, तुम्हाला एकही मित्र नाही का ज्याच्याविषयी तुम्हाला लिहावसं वाटलं , की तुमच्या आयुष्यात फक्त स्त्रियाच आल्यात ?
हे फारच आवडलं हो दिनेशदा!!!
हे फारच आवडलं हो दिनेशदा!!! तुमच्या आयुष्यात येणारे लोक छान असतात की तुमची दृष्टी छान असते, असा प्रश्न पडायला लागलाय हल्ली!!!! >>>>>> अगदी. अगदी.
मस्तच दिनेशदा! माझ्या
मस्तच दिनेशदा!
माझ्या आर्टिकल्शीपच्या वेळेच्या किश्श्यांची आठवण झाली.
त्या वेळी 'सिनीयर' असलेले, आता जिगरी दोस्त आहेत (१० वर्षे झाली आता आर्टिकल्शीप संपून..) ..
मनापासुन लिहाला आहे हा लेख.
मनापासुन लिहाला आहे हा लेख. आवडला.
आणि खोपकर मॅडमचा स्वभावही.
दोस्तांनो, चांगलीच माणसे
दोस्तांनो, चांगलीच माणसे भेटली असे नाही. पण त्यांचे प्रमाण नक्कीच जास्त होते. वाईट अनुभवांना (माणसे वाईट नसतात ) जर मी विसरु शकलो नाही, तर नीताकडून काय शिकलो ?
=======================================
गब्बर, यापुर्वीच मित्राबद्दल लिहिले होते.
आणि बेफींशी "त्या"बाबतीत स्पर्धा नक्कीच नाही.
या स्त्रियांशी मी मैत्री करायला गेलो नाही, कामाच्या ठिकाणी आम्ही भेटलो आणि मैत्री जूळली.
स्त्री आणि पुरुषाची मैत्री केवळ "त्या" एकाच हेतूने होते, होऊ शकते या आपल्या मनातल्या किंतू बद्दल फारफार चिंता वाटते हो. इथेही मायबोलीवर मी ज्यांना भेटलेलोही नाही अशा अनेक स्त्री सभासद माझ्या मैत्रिणी आहेत. मित्र तर आहेतच आहेत. आणि माझी मैत्री, केवळ माझ्या आणि त्या सभासदापुरती न राहता, कुटुंबियांपर्यंतही पोहोचली आहे.
या आणि इतरही मित्रत्वाच्या नात्यात मी कधीही स्त्री / पुरुष असा भेद करत नाही, करणारही नाही.
आपल्याला हे नाव घेऊन फक्त ३/४ आठवडेच झालेले दिसताहेत. यापुर्वी आपला प्रतिसाद वाचल्याचे आठवत नाहि. (कुठल्या नावाने दिला होतात ?) आणि पाने फूले च नव्हेत तर मी अनेक विषयांवर लेखन केलेय.
वेल, आणि आपली कधी मैत्री झाली तर आपल्याबद्दलही लिहिन !!! पण खर्या नावाने भेटा हो.
दिनेशदा, तुस्सी ग्रेट हो...
दिनेशदा, तुस्सी ग्रेट हो... तुमच्या प्रतिसादांवरुनसुद्धा शिकण्यासारखं बरच काही आहे
(कुठल्या नावाने दिला होतात ?)
(कुठल्या नावाने दिला होतात ?) >>
आम्ही सगळ्यांनी तुम्हाला भरघोस प्रतिसाद दिले आहेत, >> अब तेरा क्या होगा..गब्बर? कितने आयडी है रे... हां..कितने?
बहुत होसियारी कर रहा था, ससुर क नाती..!
मस्त लिहिलेय दिनेश.. एका
मस्त लिहिलेय दिनेश.. एका दमात लिहुन काढलेले तिनही लेख अतिशय छान झालेत.
चातक
अरे ओ चातक , इतना खुले आम
अरे ओ चातक , इतना खुले आम लिखने के बावजुद भी रो रहा है ? तेरा क्या होगा रे कालिया ?
खुप मस्त, दिनेश दादा...
खुप मस्त, दिनेश दादा... :स्मितः
आवडला हा लेख आणि जाई खोपकर
आवडला हा लेख आणि जाई खोपकर पण!
मस्तच दिनेशदा.. हाही लेख
मस्तच दिनेशदा.. हाही लेख आवडला
Pages