४ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
५-६ लसूण पाकळ्या
मीरपूड
मीठ
इटालियन सिझनिंग (ओरेगानो, थाईम, पापरीका, ओनिअन पावडर, गार्लिक पावडर यांचे मिश्रण. यात आवडत असल्यास रोझमेरी घालू शकता)
१ कप स्लाईसड मश्रूम्स
२ चमचे मैदा
मीट टेंडरायजर (ऐच्छिक)
२ टे. स्पून बटर
२/३ कप मर्साला वाईन
२ टे. स्पून बाल्सामिक विनेगर (ऐच्छिक)
२/३ कप चिकन स्टॉक
१. चिकन आडवं मधून कापून ओपन करून हातोड्यानं मारून पातळ (thin) करूण घ्या.
२. चिकनला दोन्ही बाजूने मीठ, मीरपूड, मीट टेंडरायजर, इटालियन सिझनिंग लावून १५-२० मिनीटे बाजूला ठेवा.
३. मैद्यात मीठ, इटालियन सिझनिंग घालून नीट मिक्स करून घ्या.
३. ग्रिलींग पॅनमधे १ टे. स्पून बटर घ्या
४. चिकन मैद्यात दोन्ही बाजूने घोळवून (जास्तीचे पीठ झटकून घेउन) पॅनमधे टाका.
५. दोन्ही बाजूने ग्रिल करून घ्या. प्रत्येक बाजू साधारण ३ मिनीटे.
६. झालेले चिकन एका प्लेट मधे काढून वरून त्याला नीट फॉईल लावून ठेवा. म्हणजे चिकन ड्राय, गार होणार नाही.
७. त्याच पॅन मधे उरलेले बटर घेऊन त्यात लसूण पाकळ्या ठेचून टाका. थोडं सिझनिंगपण टाका.
८. मश्रूम्स घाला. त्यातच चिकनला लावलेला मैदा एक चमचा टाका.
९. नीट हलवून मश्रूम्स मऊ झाले की मर्साला वाईन घाला.
१०. वाईन थोडी आटली की चिकन स्टॉक घालून एक उकळी येउ द्या.
१२. चव बघून मीठ घाला.
११. बाल्सामिक विनीगर घालून नीट हलवून चिकन परत पॅन मधे घाला. नीट मिक्स करून २-३ मिनीटे शिजू द्या.
लगेच सर्व्ह करा.
१. आवडत असल्यास वरून बाल्सामिक विनीगर आणि मध यांचे मिश्रण drizzle करू शकता. किंचीत गोडसर चव येते. बरोबर पास्ता, गार्लिक मॅश्ड पोटॅटो, सॅलड द्या. चिकन करताना मार्साला सॉस थोडा जास्त केला तर पास्त्याबरोबरपण घेता येईल.
२. ताजे हर्बज असतील चव अजून खुलते.
३. ग्रिल पॅन नसेल तर साध्या पॅनमधे केले तरी चालेल.
.
.
व्वा भारी दिसतंय, पाहुन एकदम
व्वा भारी दिसतंय, पाहुन एकदम![tongue0022.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31794/tongue0022.gif)
बघायला छान वाटतय. चवही उत्तम
बघायला छान वाटतय. चवही उत्तम असणार.
WOW! मस्त रेसिपी! शिवाय ते
WOW! मस्त रेसिपी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाय ते बोनलेस / स्किनलेस प्रकरण वापरायचं असल्यामुळे माझ्यासारख्या 'नॉनव्हेज-प्रथमा'वाल्यांना बेस्टच! धन्यवाद!!
एक प्रश्न , जो हमखास नंतर
एक प्रश्न , जो हमखास नंतर विचारला जाईल म्हणून आताच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. मर्साला वाईन (च) असणे आवश्यक आहे का ? नाहीतर पर्याय देऊ शकाल का ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
२. जर पर्यायी वाईन वापरली तर कृतीचे नाव बदलावे का ?
मिलींदा मर्साला वाईनच हवी
मिलींदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मर्साला वाईनच हवी असं नाही. कुठलीही सेमीस्वीट वाईन वापरून करता येईल. मग अर्थातच नाव बदलावं लागेल आणि चवही थोडी वेगळी येईल.
सोपीये कृती. मुहुर्त लागला की
सोपीये कृती. मुहुर्त लागला की करेनच
मिलिंदा, वाईन ऐवजी काय चालेल विचार की.
तेच विचारणार होतो, पण त्या
तेच विचारणार होतो, पण त्या ऐवजी एक ( हुकमी) प्रतिक्रिया लिहीतो.
मी सगळं असंच केलं, पण मी चिकन खात नाही म्हणून फ्लॉवर उकडून घेतला आणि मी दारू पीत नाही म्हणून त्या ऐवजी नारळाच दूध आणि थोडा सोया सॉस एकत्र करुन घातलं.. अगदी फर्मास झाली होती डीश![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
( आता मार पडायच्या आत पळतो)
(No subject)
मिलींदा, यू टू? आता तुला
मिलींदा, यू टू?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता तुला कुणी समज द्यायची- इथे टाइमपास करू नका :).
मिलिंदा, तुझं आणि टण्याचं
मिलिंदा, तुझं आणि टण्याचं अगदी जमेल बघ. पुढच्या वेळी वांगंही करुन बघ.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मिलींदाने बरेचसे प्रश्न कव्हर
मिलींदाने बरेचसे प्रश्न कव्हर केलेत पण तरीही मला एक प्रश्न आहे अंजली .. :p
चिकन ब्रेस्ट्स पाउंड करून घेतल्यावर मग टेंडरायजरची गरज असेल का? मूळात चिकनला टेंडरायजर ची गरज असते का? तू आधीही मलई की रेशमी कबाब च्या कृतीत टेंडरायजरबद्दल लिहीलं होतंस बहुदा .. (मीही मीट कूक करण्यातली अज्ञानीच .. तेव्हा प्लीज प्लीज सांग .. )
फोटो आणि रेसिपी मस्त आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिकन ब्रेस्ट्स पाउंड करून
चिकन ब्रेस्ट्स पाउंड करून घेतल्यावर मग टेंडरायजरची गरज असेल का?>>> गरज नाही, पण मला थोडा फरक जाणवला. नुसतं पाऊंड केलेले चिकन कट करताना हार्ड वाटलं म्हणून पुढच्या वेळेस टेंडराजर लावून केलं तर चिकन सॉफ्ट, जूसी वाटलं.
नुसतं पाऊंड केलेले चिकन कट
नुसतं पाऊंड केलेले चिकन कट करताना हार्ड वाटलं
>> म्हणजे कूक करून झाल्यावर हार्ड, ड्राय वाटलं का? जास्त वेळ राहिलं असेल का ग्रिल वर? माझा एक मित्र चिकन ग्रिल करताना वाटीत पाणी भरून ठेवतो ग्रिल वर आणि कव्हर करतो .. त्याच म्हणणं असं की वाफेमुळे ड्राय होत नाही चिकन ..
जास्त वेळ राहिलं असेल का
जास्त वेळ राहिलं असेल का ग्रिल वर>>> ग्रिलवर केलं नाहीये, ग्रिलपॅनमधे केलंय. जास्त वेळ कुक केलं नाही /नव्हतं. तू करून बघ (आधी)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त! मिलिंदा
मस्त!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मिलिंदा
झकास !!!
झकास !!!
वा! सही गंअँजे! खूप
वा! सही गंअँजे! खूप दिवसापासून हमखास यशस्वी रेसिपी हवी होती चिकन मर्सालाची. आता करून पहाणार नक्की
अंजली, ते हातोड्यानी
अंजली,
ते हातोड्यानी ठोकण्याच्या टेक्निक बद्दल सांग, नेक्स्ट टाइम बनवताना व्हिडिओ वगैरे करून शेअर केलास तर उत्तम :).
इथे आहे बघ व्हिडिओ Preparing
इथे आहे बघ व्हिडिओ
Preparing Chicken Breasts - Butterfly, Pounding
(No subject)