Submitted by रामकुमार on 22 April, 2011 - 16:52
साचले सडके ढिगारे ऊठ तू आता तरी
षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू आता तरी!
झोपल्याने संपतो का आत वणवा पेटता?
जाळती हृदया निखारे ऊठ तू आता तरी!
पश्चिमेचे भोगवादी गार वारे वाहते
पूर्व केंव्हाची पुकारे ऊठ तू आता तरी!
सूर्य ढाळी दिव्य राशी,लोपला अंधार बघ
भंगले स्वप्नील तारे ऊठ तू आता तरी!
बांधल्या मुर्दाड भिंती माणसांनी भोवती
थांबवाया क्षूद्र नारे ऊठ तू आता तरी!
रामकुमार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाहते हे गार वारे पश्चिमेचे
वाहते हे गार वारे पश्चिमेचे भोगवादी
पूर्व केंव्हाची पुकारे ऊठ तू आता तरी!
बांधल्या मुर्दाड भिंती माणसांनी भोवताली
थांबवाया क्षूद्र नारे ऊठ तू आता तरी!
मस्तच! हे शेर आवडले.
वाह... छान झालीये गझल.
वाह... छान झालीये गझल.
पहिली ओळ खटकली .बाकी गझल मस्त
पहिली ओळ खटकली .बाकी गझल मस्त .
मस्त. मनाला भिडली.
मस्त. मनाला भिडली.
वाहते हे गार वारे पश्चिमेचे
वाहते हे गार वारे पश्चिमेचे भोगवादी
पूर्व केंव्हाची पुकारे ऊठ तू आता तरी!
kyaa baat hai ramkumarji mast sher utara hai...
sundarach...
प्राजू,कैलासजी,छायाताई,निशिका
प्राजू,कैलासजी,छायाताई,निशिकांतजी,विद्यानन्दजी,
सर्वांचे आभार!
छायाताई,पहिल्या ओळीत-
'(अंतर्मनात) साचलेले (वासनांचे) सडके ढिगारे (उपसून काढण्यासाठी) तरी तू आता ऊठ'
असा अर्थ घेऊन पहा.
'साचले पुढती ढिगारे'
आणि 'आस सृजनाची विहारे'
हे २ पर्याय बाजूला सारून ती ओळ 'साचले सडके ढिगारे' अशी लिहिलेली.
छान!!
छान!!
ekach naavachya kiti
ekach naavachya kiti gajala....kaay ha prakaar....?
रामकुमारजी, खूपच छान बांधलीय
रामकुमारजी,
खूपच छान बांधलीय गझल.
सुरुवातीला मलाही पहिली ओळ खटकली पण तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आवडली.
मिसरे मस्तच! काही ठिकाणी
मिसरे मस्तच! काही ठिकाणी वृत्त वेगळे आले असावे असे वाटले.
धन्यवाद बेफिकीर, आता पहा.
धन्यवाद बेफिकीर,
आता पहा.
धन्यवाद कणखर,
धन्यवाद कणखर, नाहिदजी,मुक्ता,
मनःपूर्वक आभार!
udayone,
याला तरही गझल असे म्हणतात.
दर आठवड्याला गझलकारांपैकीच एकजण ओळ सुचवतो.
त्यावर सर्वजण गझल रचतात आणि सादर करतात.
या आठवड्याची ओळ-
षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू आता तरी.
तुम्हीही प्रयत्न करा,कठिण नाही!
छान झालीये.
छान झालीये.
रामकुमार अवघड रदीफ वर एक
रामकुमार अवघड रदीफ वर एक चांगला प्रयत्न... पुलेशु
सुरेखच ! आवडली......
सुरेखच ! आवडली......