ऊठ तू आता तरी (तरही)
Submitted by रामकुमार on 22 April, 2011 - 16:52
साचले सडके ढिगारे ऊठ तू आता तरी
षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू आता तरी!
झोपल्याने संपतो का आत वणवा पेटता?
जाळती हृदया निखारे ऊठ तू आता तरी!
पश्चिमेचे भोगवादी गार वारे वाहते
पूर्व केंव्हाची पुकारे ऊठ तू आता तरी!
सूर्य ढाळी दिव्य राशी,लोपला अंधार बघ
भंगले स्वप्नील तारे ऊठ तू आता तरी!
बांधल्या मुर्दाड भिंती माणसांनी भोवती
थांबवाया क्षूद्र नारे ऊठ तू आता तरी!
रामकुमार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा