सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2011 - 03:37

माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्‍यात कैद केले.

१) धामणीचा रानमेवा. पिकल्यावर हे लाल होतात आणि गोड लागतात.

२)धामणीची फुले

३) सोनमोहर

४) रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात.

५) जवळून यम्मी.

६) झाडावरच फुटलेल्या चिंचा

७) कुड्याचे झाड फुलांनी भरले होते.

८) हा पण कुडाच आहे का ? की वेगळे झाड आहे ? हे मोहाचे तर झाड नाही ना ?

९) थोड पुढे गेल की एक शंकर मंदीर लागत. त्या शंकर मंदीराच्या बाजुला बेलाची झाडे आहेत. बेल सध्या मस्त हिरवागार झाला आहे.

१०) त्या बेलाच्या झाडाला बेलफळे लागली होती.

११) रस्त्यात शिवणीचे झाड सापडले. शिवणीला फळ लागली आहेत. जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. लहानपणी शिवणीची फळे पिकुन पिवळी धम्मक झाली की ती सोलून त्याची बी खडबडीत दगडावर चोळून फोडून त्यातील रानमेवा खाण्याचा मोठा छंद होता आम्हाला.

१२) शिवणीची फळे

१३) मग भेटले भुताचे झाड (नाव बरोबर आहे ना ? की वेगळे झाड आहे हे ?) बापरे पळा पळा भुत !

१४) भुताच्या झाडाला हे फुल लागले होते.

१५) अजुन एक फुल की फळ ?

१६) त्याच्याच थोडया बाजुला काकडाला मोहोर लागला होता.

१७) मध्ये मध्ये काकडेही लागली होती.

१८) बांडगुळाला धरलेली फुले. दिनेशदांनी फोटो काढायला सांगितला होताच.

१९) सुगरणींनी घरटी बांधलेली मस्त झोके घेत होती.

२०) थोड जवळ जाउन बघा.

२१) आंबाड्या सारखी दिसणारी फळे

२२) देवचाफाही जागोजागी दिसतो.

२३) शिषिराची फुले

२४) पेरूचे फुल

२५) तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो

अजुन भरपुर झाडे आहेत ज्यांचे फोटो काढायचे राहिलेत.पुढच्या खेपेस त्यांचे फोटो कॅमेर्‍यात कैद करायचे आहेत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागु,
फोटो भारी आवडले !
ऑफीसच्या वाटेअवर अशी झाडे (स्वागताला) असल्यावर ऑफीसला सुट्टीच्या दिवशी देखील जायला कुणाला कंटाळा येईल ..?

यात काही वेगळ्या जातीच्या विलायती चिंचेची चव तर खुपच गोड/अगदी साखरेसारखी असते,काही थोडे तुरटगोड असतात.
Happy

जागू, मस्त ग फोटो. आणि धन्यवाद. (किती उशीरा हे सर्व मी पहतेय? Sad
सोनमोहरच्या आमच्याकडे सध्या पायघड्याच आहेत. प्र.ची ७ कुडा. आणि चाफा लहानपणी खूप पाहिला. (आता काहीच नाही :अओ:)पेरूचे फुल प्रथमच पाहिले.
आणि मजा म्हणजे, तु मला जळवू शकली नाहीस. कारण 'तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो' माझ्याकडे दिसतच नाही आहे. Sad

आशे धन्स. पण तुला जळवल्याशिवाय मी राहणार नाही हा घे फोटो

सुमंगल धन्स.

Pages