माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्यात कैद केले.
१) धामणीचा रानमेवा. पिकल्यावर हे लाल होतात आणि गोड लागतात.
४) रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात.
७) कुड्याचे झाड फुलांनी भरले होते.
८) हा पण कुडाच आहे का ? की वेगळे झाड आहे ? हे मोहाचे तर झाड नाही ना ?
९) थोड पुढे गेल की एक शंकर मंदीर लागत. त्या शंकर मंदीराच्या बाजुला बेलाची झाडे आहेत. बेल सध्या मस्त हिरवागार झाला आहे.
१०) त्या बेलाच्या झाडाला बेलफळे लागली होती.
११) रस्त्यात शिवणीचे झाड सापडले. शिवणीला फळ लागली आहेत. जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. लहानपणी शिवणीची फळे पिकुन पिवळी धम्मक झाली की ती सोलून त्याची बी खडबडीत दगडावर चोळून फोडून त्यातील रानमेवा खाण्याचा मोठा छंद होता आम्हाला.
१३) मग भेटले भुताचे झाड (नाव बरोबर आहे ना ? की वेगळे झाड आहे हे ?) बापरे पळा पळा भुत !
१४) भुताच्या झाडाला हे फुल लागले होते.
१६) त्याच्याच थोडया बाजुला काकडाला मोहोर लागला होता.
१७) मध्ये मध्ये काकडेही लागली होती.
१८) बांडगुळाला धरलेली फुले. दिनेशदांनी फोटो काढायला सांगितला होताच.
१९) सुगरणींनी घरटी बांधलेली मस्त झोके घेत होती.
२१) आंबाड्या सारखी दिसणारी फळे
२३) शिषिराची फुले
२५) तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो
अजुन भरपुर झाडे आहेत ज्यांचे फोटो काढायचे राहिलेत.पुढच्या खेपेस त्यांचे फोटो कॅमेर्यात कैद करायचे आहेत.
मस्त फ्रेश वाटतय एकदम
मस्त फ्रेश वाटतय एकदम
जागू, मस्त सफर आहे
जागू, मस्त सफर आहे
जागू, त्या राघूचिंचांना एवढे
जागू, त्या राघूचिंचांना एवढे एक्पोजर देऊन जळवायची गरज होती का?
मस्त गं जागुतै.... अगदी
मस्त गं जागुतै.... अगदी निसर्गाजवळ.
रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात. >> मी त्या इतक्या लाल होई पर्यंत झाडावर ठेवल्या नसत्या
आम्ही त्यांना 'आमली" नावाने ओळखायचो. म्हंणजे अत्ताही.
अ प्र ति म!!! अमेझिंग!!!!!!
अ प्र ति म!!! अमेझिंग!!!!!! सुप्परब जागु
सुरेख ग जागू. अशा निसर्गरम्य
सुरेख ग जागू. अशा निसर्गरम्य ठिकाणी तू ऑफिसला जातेस? किती भाग्यवान.
मस्त ग जागू
मस्त ग जागू
खुपच छान!!! एकदम चाबुक!!
खुपच छान!!! एकदम चाबुक!!
पेरूचे फुल पहिल्यांदाच पाहिल..
जागु अप्रतिम फोटो.. हापिस
जागु अप्रतिम फोटो..
हापिस जंगलात वगैरे आहे की काय?
मस्त बांडगुळांच्या फुलांचा
मस्त
बांडगुळांच्या फुलांचा सडा आजोळच्या अंगणात असायचा आंब्याखाली. बंद कळ्यांसारखी पण फुलं पडायची. मग ती चिमटीने दाबली की उमलायची.
पेरुचं फुल एवढं सुंदर असतं?
जागु धामणी च झाड पाहुन
जागु धामणी च झाड पाहुन लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ग
मस्त फोटो
जागु मस्तच ग , रच्याकाने
जागु मस्तच ग , रच्याकाने अलिबाग वारी झाली का ?
पेरुचं फुल मस्त! ते पांढरं
पेरुचं फुल मस्त!
ते पांढरं पर्जन्यवृक्षाचं फुल लिहिलय ते शिरिषाचं आहे.
जागू अतिशय माहिती पुर्ण
जागू अतिशय माहिती पुर्ण फोटो
मस्तच
मस्त फोटो!! तो पाच नंबरचा
मस्त फोटो!! तो पाच नंबरचा फोटो पाहून 'चिंचांचे आकडे' का म्हणतात हे नक्कीच कळले
पेरूच्या झाडाला इतके सुंदर
पेरूच्या झाडाला इतके सुंदर फुल येते !!!!!!
अरे देवा... सुट्टीच्या दिवशी
अरे देवा...
सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने >> वाटलं रिकाम्या रस्त्याचे फोटो टाकलेत की काय...
कुठे आहे ऑफिस? ते, चिंचांचे फोटो काढुन टाका बघू. पाप लागेल हो, केवढ्या जवळुन काढले आहेत चिंचांचे फोटो.
लाल गर्रेदार चिंचा, खोपा,चाफा नी काय नी काय.. केवढे ते सुंदर फोटो.
पण चिंचांचे फोटो फार सुंदर, डिलीट करा पाप लागेल. नजर हटत नाही आहे, मॉनिटर खाउ की काय अस झालं आहे.
जागु, वाह ! काय छान फोटो आहेत
जागु,
वाह ! काय छान फोटो आहेत !
झाडांचा तर एकदम फ्रेश मुड (तुमचापण) दिसतोय, सकाळी ६ वाजता काढल्यामुळे ..
जागू, मस्त आहेत फोटो.
जागू, मस्त आहेत फोटो.
मस्त गं जागू!
मस्त गं जागू!
मस्त फोटू
मस्त फोटू
तुम्हाला जळवण्यासाठी अजुन एक
तुम्हाला जळवण्यासाठी अजुन एक फोटो
घरी जाउन फोडलेल्या चिंचा.
सहीच.. गोड चिंच खरोखरच यमी...
सहीच.. गोड चिंच खरोखरच यमी...
ही जागु सुट्टीच्या दिवशी पण
ही जागु सुट्टीच्या दिवशी पण ऑफीसच्या वाटेवर जाते?
आम्हाला त्या वाटेकडे बघावसं सुद्धा वाटत नाही!
जागुबै!! सगळेच फोटो भारी! चिंचेचा फोटु तोंपासुं!!
कारस्थान म्हणतात ते यालाच
कारस्थान म्हणतात ते यालाच
नुतन काल लगेच आले ग
नुतन काल लगेच आले ग अलिबागवरुन. फक्त गाडीतुनच अलिबाग दर्शन केल वेळ नसल्याने.
मामी धन्स.
सत्यजित अजुन दोन फोटो आहेत जळवण्यासाठी पण नेट खुप स्लो झाल्यामुळे पाणी पडतय जळणावर.
शर्मिला धन्स शिरीषाच नाव सांगितल्याबद्दल.
आर्या माझ ऑफिस अशा निसर्गरम्या ठिकाणी असल्यामुळे खास फोटो काढण्यासाठी मी गेले.
जागू, तुम्हारी ये चाल याद
जागू, तुम्हारी ये चाल याद रख्खी जाएगी..
वा जागू तो कुडाच. आणि
वा जागू तो कुडाच. आणि शिरीषाचेच नाव सांगायला आलो होतो.
भूताच्या झाडाच्या फळातील बिया पण खातात. पण त्या फळावर खुप कुसळे असतात.
पण फोटो छानच. (आता मला भारतात नवे डोळे मिळाल्यासारखे वाटताहेत.)
यापैकी काहि झाडेच इथे दिसतात.
वा! धामणीची फळे खाता येतात हे
वा! धामणीची फळे खाता येतात हे मला माहीतच नव्हते!!
चिंच म्हणताय तीला, आमच्याकडे विदर्भात, "चिजबिलाई" म्हणतात, इकडे मुंबईला "विलायती चिंचा."
मात्र, काय पण त्यांचे फोटो काढले आहेत. खूप दिवसांनी लहानपणची आठवण झाली.
आता मला भारतात नवे डोळे मिळाल्यासारखे वाटताहेत.>>>>> अगदी. अगदी.
गजानन दिनेशदा धन्यवाद. पण
गजानन
दिनेशदा धन्यवाद.
पण त्या दोन्ही फुलांमध्ये फरक वाटतो.
Pages