वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.
नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.
बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.
तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.
तळण्यासाठी :
तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.
तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?
वाटण हे ऑप्शनल आहे.
स्स्स्स्स्स्स्स्स.........
स्स्स्स्स्स्स्स्स......... स्लर्प!!!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बापरे आता पुन्हा जावं लागेल आज मासे आणायला.. हे आमच्याइथे मिळतात
रस्सा तर टॉप च आहे
चवीला कसा असतो गं हा? मी
चवीला कसा असतो गं हा? मी कदाचित बघितला असेल मार्केटमध्ये पण आता आठवत नाहीय.
काही मासे चवीला एकदम फालतु लागतात. एकदा सुरमईसारखा दिसणारा, तशाच आकाराचा पण जरासा फुगीर शिवाय प्रचंड स्वस्त असा मासा मी घेतला. त्याचे मांस लाल होते (बहुतेक मासे पांढरे असतात). कोळणीने त्याचे नाव उपा की असेच काहीतरी सांगितले आणि वर तुम्ही हा मासा खाता म्हणुन आश्चर्य व्यक्त केले. मी तेव्हाच सावध व्हायला पाहिजे होते पण त्या दिवशी पैसे वाया जाणे नशिबी लिहिलेले. मासा घरी आणुन तळला आणि पहिला घास तोंडात घालताच फेकुन दिला. मी सहसा अन्न फेकत नाही, अगदी चवहीन असले तरी खाते. पण हा मासा अजिबातच खायच्या लायकीचा नव्हता. तसे बेचव मासे नंतरही घेतले गेले माझ्याकडुन पण मी ते खाऊ शकले. तो मासा मात्र खाताच येईना.
तेव्हापासुन अनोळखी मासे आणायला जीवावर येते. मार्केटमध्ये जागुचे फोटो (म्हणजे तिच्या माशांचे...) आठवुन, कोळणीला नाव चारचारदा विचारुन मगच घेते.
हा मासा बघितलाय मी. जागू या
हा मासा बघितलाय मी.
जागू या रेसिपीज माहेरच्या कि सासरच्या ? कोकणात खोबर्याशिवाय कालवण हि कल्पनाच सहन होणार नाही. त्या वाटणावरुनच नावे, सुके, लिपते, दबदबीत, कालवण वगैरे.
मीही नाही बघितला हा मासा कधीच
मीही नाही बघितला हा मासा कधीच .
कोकणात खोबर्याशिवाय कालवण हि
कोकणात खोबर्याशिवाय कालवण हि कल्पनाच सहन होणार नाही
आताच्या गावभेटीच्या सहा दिवसात तिन दिवस मासे खाल्ले. माशाची आमटी तर.. आहाहा.. मस्त गंधासारख्या वाटलेल्या ओल्या खोब-याच्या त्या आमट्या.. भुक लागली लोकहो.. असल्या आठवणी नको.
जागुच्या माशाच्या आमटीच्या रेसिपी आमच्याकडे एकदम बाद. कोणीही खाणार नाही.
तळलेले खायला मात्र सगळे धावतील माझ्यासकट.
कोकणात खोबर्याशिवाय कालवण हि
कोकणात खोबर्याशिवाय कालवण हि कल्पनाच सहन होणार नाही
बरोबर. कित्येक वर्ष माझं मत होतं की कांदा आणी नारळाशिवाय स्वयंपाक होवुच शकत नाही.
माझ्या एका भावाच्या घरी आजही
माझ्या एका भावाच्या घरी आजही नारळाशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागुले मला वाटल.. मासे-वडा
जागुले मला वाटल.. मासे-वडा आहे.. बटाटा वडा असतो तसा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जागू, श्री व सौ वडा यांचा
जागू, श्री व सौ वडा यांचा लग्नातला फोटो छान आलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, साधना. माझ्या रश्यात
दिनेशदा, साधना.
माझ्या रश्यात खोबर असतच. पण आमच्या इथली जी गावे आहेत त्या गावांमध्ये बिनखोबर्याची कालवणे करतात. साधना एकदा खाउन बघा माश्याची खरी चव ह्या बिनवाटणाच्या रश्याला येते.
आत्त्ता मला कळल ही चर्चा तुम्ही का करताय ते. मी वरती वाटणात खोबर लिहायला विसरलेय. मला पुरवण्यासाठीतरी खोबर घालावच लागत.
अश्वे तुला कुठे ग मुंडावळ्या दिसल्या ?
जागु, हा मासा एकदम गुबगुबित
जागु,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा मासा एकदम गुबगुबित पण दिसतोय..
कुठुन शोधुन काढतेस इतके माश्यांचे प्रकार? तु माश्यांच्या पाकृ चा क्लास उघड.
मी क्लासला नक्की येईन.. आनंदाने...
खात नाही, पण करायला शिकायला काय प्रॉब्लेम आहे?
जागू, अगं तो रिसेप्शनचा फोटो
जागू, अगं तो रिसेप्शनचा फोटो आहे.
दक्षे नक्की. तुझ्यासाठी
दक्षे
नक्की. तुझ्यासाठी स्पेशल क्लास घेईन.
अश्विनी गिप्ट आणलस का ?
गोव्याची (समुद्राची) तिकिटं
गोव्याची (समुद्राची) तिकिटं दिल्येत पाकिटात घालून.
>>.खात नाही, पण करायला
>>.खात नाही, पण करायला शिकायला काय प्रॉब्लेम आहे?>>> दक्षे तुझ्यातलो ह्यो आमूलाग्र बदल बघून मन भरुन ईला
जागु सगळी शाकारी आवर्जून तुझ्या बाफ ला भेट देतात.. तो दिवस दूर नाही.......
बरं जागु तुझ्या घरी गटग करुया म्हणतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना एकदा खाउन बघा माश्याची
साधना एकदा खाउन बघा माश्याची खरी चव ह्या बिनवाटणाच्या रश्याला येते.
येते येते बाई. मी तुझ्या कृतीनेही केलेय कालवण...
अर्थात तुझ्या हातची चव येणार नाही पण तरी....
अश्विनी - इश गोवा म्हणजे
अश्विनी - इश गोवा म्हणजे त्याना आजोळी गेल्यासारख वाटेल. फॉरेनची पाठव.
नीलु - कधी करायचा ती तारिख तुम्ही ठरवा आणि मला कळवा.
भांड्यात तेल मस्त तापवा.
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. >>>अहाहहाह...! काय फोडणी दरवळीली इथ प्रर्यंत.
तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?
>> ।नको जागु माते अंत असा पाहु.।
तो शेवटचा प्रचि :![3D%20Smiles%20(46).gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31794/3D%2520Smiles%2520%2846%29.gif)
अत्ता लगेच मेस गाठतो, पण अशी चव असेल का..?
जागू, नाही मला नाही वाटलं कि
जागू, नाही मला नाही वाटलं कि खोबरे लिहायला विसरलीस असे. पण उत्तर कोकणात तसाही खोबर्याचा वापर कमीच असतो. कोकणात, नवी सून नारळ खोवते कसा आणि किती बारिक वाटते, यावर तिचा सुगरणपणा ठरतो.
डावीकडच्या माश्याचा चेहरा, गांधीजींसारखा वाटतोय का ?
मला तर दोघेही जागुकडे
मला तर दोघेही जागुकडे पाहताहेत अणि मनात 'मै तवे पे फ्राय होगा के वाटण मे उकळेगा?' असा विचार करताहेत असे वाटतेय..
'मै तवे पे फ्राय होगा के वाटण
'मै तवे पे फ्राय होगा के वाटण मे उकळेगा?>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जागू, हा स्कॅट, खाडीत मिळतो
जागू, हा स्कॅट, खाडीत मिळतो बहुधा. पाण्यातले मीठाचे प्रमाण कमी करत करत हळूहळू गोड्या पाण्यात सेट करता येतो.
हा टॅन्कमध्ये पाळता येउ शकतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाबु, तू पाळ तुझ्या टँकात आणि
बाबु, तू पाळ तुझ्या टँकात आणि मोठे झाले की मग गट(म्म)ग करु आपण!
साधना, "तो" मासा मी पाहिलाय. माझ्यामते ओरीसा भागातले लोकं खातात तो.
डावीकडच्या माश्याचा चेहरा,
डावीकडच्या माश्याचा चेहरा, गांधीजींसारखा वाटतोय का ?
चश्मा लावुन खात्री करावी लागेल.
'मै तवे पे फ्राय होगा के वाटण मे उकळेगा?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बागुलबुवा प्रयोग करुन बघ.
चातक मग घरी आणुन कर. रेसिपी वर आहेच.
चातक मग घरी आणुन कर. रेसिपी
चातक मग घरी आणुन कर. रेसिपी वर आहेच.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>>जागुतै हक्काचे 'किचन' नाही गं.
जागू प्रयोग नाय. खरच सांगतोय,
जागू प्रयोग नाय. खरच सांगतोय, आणि हो त्याला वाडा म्हणतात.....
भ्रमा, आयडीया काही वाईट नाहीये![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वाडाचे कोळणिंनी वडा केल असेल.
वाडाचे कोळणिंनी वडा केल असेल. पण आमच्याइथे वडाच म्हणतात.
हक्काचे किचन नाही ? मग हक्क दाखवणारी आली की हक्काने करुन माग.
साधना.. आपल्याकडे त्याला
साधना.. आपल्याकडे त्याला 'बुगडी' म्हणतात बहुतेक.. कापल्यावर लालभडक दिसतो म्हणून खात नाहीत बहुतेक लोक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तळलेला मासा भारी दिसतोय.
तळलेला मासा भारी दिसतोय.
जागुडे, कसली ग एकेक वर्णनं
जागुडे, कसली ग एकेक वर्णनं टाकतेस? इथे जीव हुळहुळतो.
डावीकडच्या माश्याचा चेहरा, गांधीजींसारखा वाटतोय का ? >>> हे काय दिनेशदा?
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
Pages