वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.
नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.
बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.
तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.
तळण्यासाठी :
तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.
तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?
वाटण हे ऑप्शनल आहे.
विनिता धन्यवाद. लाल मिरची
विनिता धन्यवाद.
लाल मिरची मसाल्यात असते. खोबर्याच्या वाटणात हिरवी मिरचीच घालतो.
जागू...आणखी एक नवा मासा! छान!
जागू...आणखी एक नवा मासा! छान! मी समुद्राजवळ्च्या गावी रहात असूनही पापलेट,सुरमयी,रावस,बांगडा,बोंबील,चिंबोरी,करली,कोलंबी,तिसर्या,मांदेळी यापलिकडे गेले नाही.आता तुझ्यामुळे माहितीत भर पडते आहे.
मला हा मासा खडकपालू वाटला होता पण आता नाव कळले.धन्स!
अंशा खडकपालू काळा असतो ना
अंशा खडकपालू काळा असतो ना पुर्ण ?
मला वाटतं सिंधुदूर्गात या
मला वाटतं सिंधुदूर्गात या माशाला [ 'वडा' ] "काळींद्र "म्हणतात व तिथल्या खाडीत हा मासा मिळतो [ मीं चुकत असलो तर इथल्या दर्दी मालवण्यानी माझे कान प़कडावे ] ; हौशी मासेमार व दर्दी मासेखाऊ या माशावर जीव टाकतात. तळल्यापेक्षां याचं कालवणच छान होतं, असंही आग्रहाने सांगतात.
<< उत्तर कोकणात तसाही खोबर्याचा वापर कमीच असतो >> दिनेशदा, माझाही हाच अनुभव आहे. माझ्या वडखळजवळच्या एका मित्राच्या घरीं मासे तळताना मात्र सुकं खोबरं भाजून, वाटून मसाल्याबरोबर माशाना लावतात. अर्थात, मासा ताजा व चविष्ट असेल तर करायची पद्धत व सोपस्कार दुय्यमच ठरतात. याच माझ्या मित्राबरोबर धरमतरच्या खाडीत होडीतून फिरताना पकडलेले मासे होडीतल्याच चुलीवर भाजून , वर नुसतं तिखट-मीठ टाकून खाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता !!
हो जागू...पण बरेच
हो जागू...पण बरेच दिवसांपूर्वी बघितल्याने गडबडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याच माझ्या मित्राबरोबर
याच माझ्या मित्राबरोबर धरमतरच्या खाडीत होडीतून फिरताना पकडलेले मासे होडीतल्याच चुलीवर भाजून , वर नुसतं तिखट-मीठ टाकून खाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता !!
तोपासु.
अंशा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम.आम्हि उरन्कर
अप्रतिम.आम्हि उरन्कर
पण आमच्या इथली जी गावे आहेत
पण आमच्या इथली जी गावे आहेत त्या गावांमध्ये बिनखोबर्याची कालवणे करतात. साधना एकदा खाउन बघा माश्याची खरी चव ह्या बिनवाटणाच्या रश्याला येते.>>> आमच्याकडे कालवणे बिनखोबर्याचीच असतात.... वाटण वैगरे लावले की आजी म्हणायची माश्याची सगळी चव जाते.... आणि ते खरच आहे....
पियु अरे वा उरणकर का.
पियु अरे वा उरणकर का.
गुलबकावली खर आहे. माश्याच्या ऐवजी खोबर्याची चव लागते. पण माणसे जास्त असतील तर रश्याच्या दाटपणासाठी खोबरे वापरावे लागते.
Pages