Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काजू मसालाची कृती कुठे मिळेल?
काजू मसालाची कृती कुठे मिळेल?
अकु, डोक्यावर बर्फाची लादी
अकु, डोक्यावर बर्फाची लादी ठेवण्याचा पराक्रम केल्याबद्दल तुला एक मोठ्ठा बाऊलभरून दहीपोहे बक्षीस
पनू, वर हेडरमधे वेगवेगळ्या लिंका दिल्या आहेत तिथे शोधलंस तर शैलजाने लिहिलेल्या ओल्या काजुच्या उसळीची पाककृती मिळू शकेल.
नेहमीच्या साखरेत थोडे मोलॅसिस
नेहमीच्या साखरेत थोडे मोलॅसिस (काकवी) घालून हि साखर करतात. गूळाच्या ऐवजी वापरता येते.
(गवारीची भाजी, पंचामृत, शिरा वगैरे पदार्थात चांगली लागते, पण चहा / कॉफिमधे नाही चांगली लागत.)
काहि बेक्ड पदार्थात वापरतात. बेक्ड पदार्थात वापरल्या जाणार्या घटकांपैकी, हा एकमेव घटक असा आहे को जो मोजताना, कप दाबून भरायचा असतो.
कमळबियांचा जोक मस्तच !
जवस उर्फ फ्लॅक्स सीड्स च्या
जवस उर्फ फ्लॅक्स सीड्स च्या चटणीची रेसिपी आहे का मायबोलीवर कुठे? मला सापडत नाहीय.
मधुरिमा विपू पहा.
मधुरिमा विपू पहा.
जवसाची चटणी इथे आहे
जवसाची चटणी इथे आहे -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/03/blog-post_9998.html
हीच रेसिपी मी जुन्या मायबोलीत टाकलेली होती फारा वर्षांपूर्वी.
दहीपोहे/ताकपोह्यांची माझ्या भावाची रेसिपी इथे आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/06/taak-pohe.html
अल्पना तुला ती साखर केक
अल्पना
तुला ती साखर केक बेकींगसाठी वापरता येईल ब्राऊन शुगर म्हणून. साध्या साखरेच्या प्रमाणातच वापरायची.
धन्यवाद मिनोती.........
धन्यवाद मिनोती.........
धन्यवाद अरूंधती....... खूपच
धन्यवाद अरूंधती....... खूपच छान आहे ही पद्धत........ आता करूनच बघते....
ओके. थँक्स दिनेशदा, रुनी.
ओके. थँक्स दिनेशदा, रुनी.
चपात्या आणि पुर्यांसाठी
चपात्या आणि पुर्यांसाठी वेगळा धागा काढलाय तसा पोह्याच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी पण काढा.
मला मेन्गो आइस क्रिम चि
मला मेन्गो आइस क्रिम चि रेसिपि हवि आहे? उन्हाला स्पेशल

ओल्या हरभर्यांचे काय करता
ओल्या हरभर्यांचे काय करता येईल ?कच्चे खाणे सोडून?
सिंडीने सोलाणे घालून
सिंडीने सोलाणे घालून वांग्याची रेसिपी लिहिलीये ती करता येईल .
उसळ करता येईल, दिनेशदांनी जैसलमेरी चणे लिहिले होते -( बहुतेक जुन्या माबोत ) ते करता येतील.
धन्यवाद्,मेधा. वांगे नाहीत
धन्यवाद्,मेधा. वांगे नाहीत घरी. उसळ नेहमीच्या मसाल्याची,की हिरव्या?
ओल्या हरभर्याच्या कचोर्या
ओल्या हरभर्याच्या कचोर्या खूप मस्त लागतात. हेच सारण पेस्ट्री शीट मध्ये भरुन पण मस्त लागेल.
झाडाला खूप पपया लागल्या आहेत.
झाडाला खूप पपया लागल्या आहेत. इतक्या काही गोड नाहीत. तर १/२ कच्च्याच काढण्याचा बेत आहे. या कच्च्या पपईचे सांडगे कसे घालतात, तीळ वगैरे घालून ...कुणाला माहिती आहे का? किंवा इतर काही टिकाऊ पदार्थ?
मानुषी, पपई सोलून ती जाडसर
मानुषी, पपई सोलून ती जाडसर किसायची. आतला भाग व बियाही काढून टाकायच्या. मग हा किस किंचीत वाफवून घ्यायचा. त्यात आवडिप्रमाणे भेंडी, गवारी, चिंच, धणे, तिळ, तिखट मिठ घालून जरा कुटायचे. पिठ फार पातळ झाले तर त्यात थोडे पोहे घालायचे. मग त्याचे लिंबा एवढे गोळे, अलगद हाताने वळून ते वाळवायचे.
मी जामनगरला कच्च्या पपईचे लोणचे पण खाल्ले होते. आपण कैरीचे ताजे लोणचे करतो तसेच. फक्त भरपूर लिंबू पिळायचा.
अर्थात त्याची भाजी व फरसाणाबरोबर मिळतात तशा काचर्या पण करता येतात.
ठांकू दिनेशदा ..करून
ठांकू दिनेशदा ..करून बघते.
आपली आंबोशी इन प्रोसेस बरं का! बरीच वाळत आलीये.
फरसाणाबरोबर मिळतात तशा
फरसाणाबरोबर मिळतात तशा काचर्या
मला ह्या खुप आवडतात. कशा करायच्या?? (काय पण प्रश्न... )
दिनेश, मी सन ड्राईड टोमॅटो
दिनेश, मी सन ड्राईड टोमॅटो करण्यासाठी एकाचे चार तुकडे करुन त्यावर मिठ भुरभुरवुन बाहेर उन्हात ठेवले (भयानक कडक उन पडलेय या वर्षी). पहिल्या दिवशी संध्याकाळी ठिक होते पण नंतर त्यांच्यावर पांढरा पातळ थर जमला. दोन दिवसांनी मुलीने 'बुरशी लागली' असे म्हणत सगळे टोमॅटो कुंडीत फेकुन दिले. आता टोमॅटोची रोपे यायची वाट पाहतोय.
नक्की कसे करायचे सन ड्राईड टोमॅटो?
साधना, तसेच करायचे असतात.
साधना, तसेच करायचे असतात. रात्री फ्रिजमधे ठेवायला हवे होते. रात्री ओलसर राहिले असतील, तर बुरशी रुजली असेल. किंवा जर फार मोठे असतील तर आणखी बारिक तूकडे केले असते तरी चालले असते.
जरा ढग आले, सावली पडली किंवा पाणी लागले तर असेच होते. माझी पण इथे २ किलो कैरी फूकट गेली. पण इथे उनच पडले नाही.
कच्च्या पपईच्या काचर्या, रुचिरामधे आहेत, मी पण लिहिल्या आहेत इथे. नेहमीप्रमाणे क्वीक रेफरन्स साठी,
पपईचे पातळ काप करुन ते गरम पाण्यातून काढायचे. मग तेलाची हिरवी मिरची, हळद, हिंग, मोगरी फोडणी करुन त्यावर ते परतायचे. मीठ टाकायचे, व थोडे बेसन पेरायचे. मग उतरुन लिंबू पिळायचा. वरुन हवे तर ओले खोबरे टाकायचे.
मला भोकराच्या लोणच्याची कृती
मला भोकराच्या लोणच्याची कृती सांगू शकता का कोणी?
http://www.maayboli.com/cgi-b
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=1023877#P...
इथे आहे भोकराचे लोणचे. अधिक माहितीसाठी मधुरिमा नावाच्या व्यक्तीला विचारा.
मला पण सर्च केल्यावर हेच पान
मला पण सर्च केल्यावर हेच पान सापडलं, पण ते ओपन होत नाहीये. स्क्रिप्ट एरर येतेय. धन्यवाद!!
रात्री फ्रिजमधे ठेवायला हवे
रात्री फ्रिजमधे ठेवायला हवे होते
रात्री विसरुनच गेले फ्रिजमध्ये ठेवायला. गच्चीत ठेवलेले ते तिथेच राहिले
तरी मला वाटलेले ठेवावे असे पण कामाच्या धांदलीत विसरले.
आता परत एकदा प्रयत्न करुन पाहते.
हे लिहीले आहे तेथे, मधुरिमा
हे लिहीले आहे तेथे, मधुरिमा ने
भोकराचे लोणचे नागपूरकडे सीझनमधे अगदी करतातच. माझ्या मोठ्या जाऊबाई तर त्यातली बी काढून, त्यात लसणाची एकेक पाकळी भरून मग लोणचे घालतात. आई कैरीचा कीस नि भोकराचे अर्धे तुकडे असे एकत्र करून लोणचे घालते. फ़ारच रुचकर होतात ही लोणची.बोरीवलीला भाजीबाजारात कधी कधी बघितली आहेत भोकरे. पण त्याच्या चिकटपणा घालवून मग लोणचे करावे लागते. त्यामुळे तो खटाटोप केला नाही कधी.
मिलींदा वरची सूचना वाचली
मिलींदा वरची सूचना वाचली नाहीस का इथे कृती लिहू नयेत
रूनि, पण कृती कुठे आहे त्यात?
रूनि, पण कृती कुठे आहे त्यात?
वाचली, पण दुवे चालत नसतील तर
वाचली, पण दुवे चालत नसतील तर त्याचा पर्याय म्हणून काय करावे हे सांगितलेले नाहीये
Pages