भावनांचा कोलाज

Submitted by विकवि_संपादक on 30 April, 2011 - 11:40

मुकुंद - 31 March, 2011 - 15:24

मला इथे अमेरिकेत असुनही नुसत्या वानखेडे स्टेडिअमच्या आठवणींनी उचंबळुन येत आहे. माझं कॉलेज (जय हिंद कॉलेज) वानखेडेच्या बाजुच्याच गल्लीत होतं. कॉलेजला असताना गावस्कर तिथे टेस्ट मॅच खेळत असताना वानखेडेच्या बाहेर घुटमळत असायचो. आत त्याने फोर मारली की तो स्टेडिअममधुन येणारा जल्लोष ऐकुन जीव वर खाली व्हायचा . . . तिकिट असायला पाहीजे होते म्हणुन. शाळेत असताना १९७८ मधे एकदा तिकिट मिळाले होते व कालिचरणच्या वेस्ट इंडिज टिम विरुद्ध गावस्करला याची देही याची डोळा पहिल्या डावात २०५ व दुसर्‍या डावात ७० धावा चोपुन काढताना बघण्याचे सौभाग्य मला लाभले होते. त्याची ती सिल्व्हेस्टर क्लार्क्,नॉर्बर्ट फिलिप्स,रफिक जुमादिन व डेरेक पॅरीला चोपुन काढलेली बॅटींग बघताना स्वर्ग २ बोटेच राहीला होता मला. परवा तेंडुलकर त्याच मैदानावर गावस्करचा त्या मैदानावरचा कित्ता गिरवेल या विचाराने मलाही गहिवरुन येत आहे.

योग - 31 March, 2011 - 16:44

कागदावर आपण भारी आहोत, मैदानावर भारी पडलो की काम फत्ते!

झक्की | 31 March, 2011 - 18:50

याहि धाग्यावर भारताविरुद्ध लिहिणे, भारतीय खेळाडूंवर टीका करणे, यास सक्त मनाई आहे. भारतच जिंकेल अशी भावना घेऊनच इथे यावे. भारतीय संघातील खेळाडूंची निवड ही योग्यच आहे, भारतीय खेळाडू जे करतील ते बरोबरच आहे, असे लिहावे. भारतीय संघ किंवा खेळाडू यांच्यावर व्यक्तिशः टीका करणे, किंवा त्यांच्या खेळाबद्दल चुका काढणे, यास सक्त मनाई आहे. इतकेच काय, सर्व खेळाडू किती सुंदर दिसतात असेच लिहावे. कुणि रडके तोंड घेऊन खेळतो, अश्या प्रकारचे लिहू नये.

प्रत्येक लिखाणात 'भारतच जिंकणार' असे असलेच पाहिजे.

भारतच जिंकणार.

भाऊ नमसकर | 31 March, 2011 - 20:51

माझे एक क्रिकेटचे खरेखुरे जाणकार मित्र नेहमी म्हणतात, " भाऊ, क्रिकेट हा बहुधा एकमेव खेळ असावा ज्यावर कुणीही, कांहीही व कितीही वेळ बोलूं शकतं; पण त्याचबरोबर, some of the best minds also derive stimulus only from this game ! " . कुणाला पटेल ,कुणाला नाही पटणार !!

योग | 31 March, 2011 - 23:14

सचिन साठी वानखेडेवर विश्वचषक फायनल म्हणजे सिंहाने घरच्या अंगणात शिकार करण्यासारखे आहे.. तेव्हा मुरली, मलींगा, मेंडीस यांची खास धुलाई होणार हे निश्चीत. तसेही सचिन ला धावा करायला मोटीवेशन लागत नाही, पण वानखेडे, मुम्बई, विश्वचषक अंतीम सामना, अन कदाचित हा त्याचा शेवटचा विश्वचषक सामना असेल . . . या एव्हड्या गोष्टी सचिन ला १००-१०० करायला आणि आपल्याला जिंकून द्यायला (one last time please!!) पुरेशा मोटीवेशन आहेत

कणखर | 1 April, 2011 - 13:22

विश्वचषक आपणच जिंकणार!! हर हर महादेव!!

मंजूडी | 1 April, 2011 - 16:50

पण उद्याचा दिवस आपला आहे.... भारतच वर्ल्डकप जिंकणार

चिमण | 1 April, 2011 - 19:14

एक एक्स्प्लोझीव्ह सेहवाग पुरे आहे. आणखी युसूफ कशाला? या एक्स्प्लोझीव्ह लोकांचा काही भरवसा नसतो. सर्दाळलेल्या फटाक्यांसारखं असतं त्यांच. वाजले तर वाजतात नाहीतर नुसती वात जळते.

पन्ना | 2 April, 2011 - 10:07

हम होंगें कामयाब, हम होंगें कामयाब
हम होंगें कामयाब, आजके दिनssss

मन में हैं विश्वास, पुरा हैं विश्वास
हम होंगें कामयाब, आजके दिन!!!

भारताच्या बलाढ्य वीरांनो, आपल्या सर्व सामर्थ्यानिशी खेळा, एकजुटीने खेळा आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्या!! आम्ही सर्व चाहते तुमच्या बरोबर आहोत! विजयश्री आपलीच आहे!!
हर हर महादेव!!!!

दोस्ती | 2 April, 2011 - 04:27
India! ..India!! India!!!. ऑल दी बेस्ट..

साहेब आणि विरु चला करुन टाका लन्का दहन

नादखुळा | 2 April, 2011 - 04:42

'श्रीसंत' मुबंईचा विनिंग मटका ठरणार बहुतेक.

दीपांजली | 2 April, 2011 - 04:49

अरेरे.. लंका जिंकली का टॉस पहिली बॅटिंग घेऊन
जाउ दे..
"आयी आयी टिम इंडिया आयी
लंका तेरी मौत आयी .."

बकासुर | 2 April, 2011 - 05:18
अरे, पण रात्री दिव्यांच्या उजेडात आपली टीम कशी खेळते कोणी सांगाल का?

प्रतिसादनादखुळा | 2 April, 2011 - 05:21
'काजव्या'सारखी आणि कशी?

दीपांजली | 2 April, 2011 - 05:30
श्रीशान्त $%#^$$$$%&

लंकेश्वर | 2 April, 2011 - 05:35
हाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsssहाsss अरे माझ्या लंकेच्या पोरानो, विकेट घालविली का रे.....

चला मी आलो. आता तुम्ही खेळा. माझा आशिर्वाद आहे. विजय लंकेचाच होईल. ( हा वरदान मी शंकराकडुन धोक्याने मिळविला आहे.)

नादखुळा | 2 April, 2011 - 05:38
'लंकेश्वर' म्हणजे मायबोलीचे सन्माननिय सदस्य ज्यांना अजूनही स्मायली वापरता येत नाही.
ओळखा पाहु कोण?

प्रतिसादलंकेश्वर | 2 April, 2011 - 05:39
दीपांजली, जहिरला परतवुन लावण्याची ताकद बाळगणारे आमचे लंकावीर मागे हटणार नाही. तुम्ही लोकं आमच्या लंकावीरांचं कितीही खच्चीकरण केलात तरी आम्ही मागे हटणार नाही. आठवा ती ईडन गार्डनची मॅच. आजही आम्ही तसेच खेळणार.

दीपांजली | 2 April, 2011 - 05:45
गप रे मराठी रावणा, तू कसल लंकेश्वर..रावण पीठलं खाऊन सुस्तं झाल्याने कोणाला रावणाचं बळ चढत नाही , झोप मुकाट Happy

लंकेश्वर | 2 April, 2011 - 05:50
माझ्या लंकन वीरानो, परिस्थीती जरी गंभीर असली तरी काळजी करु नका. आमची नुसती परिस्थीतीच गंभीर आहे पण खरा गंभीर तर भारताकडे आहे. म्हणुन काळजी करायचं काम त्यांचच. तुम्ही चिकाटीनं खेळा म्हणजे झालं.
तोवर मी शंकराकडे एक चक्कर टाकुन येतो. जमल्यास एखादा वरदान घेऊन येतो.

दीपांजली | 2 April, 2011 - 05:55
मला ही भारत वि भारत मॅच वाट्टेय बघताना, स्टेडियम मधली लंकन क्राउड देशीच वाट्टीय..पाकी तरी कळतात वेगळे
त्यांचे प्रेसिडन्ट तर धोतर मधे आहेत.

चीकू | 2 April, 2011 - 06:02
लन्केचे राष्ट्रगीत आवडले मला..शब्द आणि चाल छान वाटली.

अंजली | 2 April, 2011 - 06:32
मै, जोर से बोलो चक दे इंडिया!!!!!

प्रतिसादmaitreyee | 2 April, 2011 - 06:33
चक दे चक दे चक दे चक दे चक दे फट्टे !!

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 06:44
श्रीसंत्या!!! फोकणीच्या!!!!

राजेश्वर | 2 April, 2011 - 06:47
वैद्यबुवा Happy
मंत्र सुरु केले Happy

बागुलबुवा | 2 April, 2011 - 06:48
लंकेश्वराचा ईन्शुरन्स संपला बहुत्येक दहा तोंडांमुळे.

राखी. | 2 April, 2011 - 06:56
सैफ पण दिसला. बेबो नाही दिसली पण.

श्री | 2 April, 2011 - 07:06
अरे त्या पांडे बाई दिसताहेत का कुठे ? Happy

शैलजा | 2 April, 2011 - 07:10
श्री, पांडेबाई असल्या तरी तू संघात नाहीयेस. शांत बस बघू
Happy

केदार | 2 April, 2011 - 07:12
घरात असतील तर बोलवा मग. तेवढंच दोघांचं लक्ष विचलित होईल.

प्रतिसादनादखुळा | 2 April, 2011 - 07:13
घरातल्यांचं काय? Wink

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 07:18
गया रे भाऊ!!!! लै भारी! आता जरा ब्रेक लागेल स्कोअरिंग ला!! आता अगला बकरा जयवर्देने.

प्रतिसादकेदार | 2 April, 2011 - 07:18
पांडेबाईचे नाव शुभ आहे रे नंद्या / श्री.

maitreyee | 2 April, 2011 - 07:28
बायदवे राजबिंडा रजनी पाहिला की नाही सेलेब्रिटी प्रेक्षकात Happy

लालू | 2 April, 2011 - 07:34
मी पाहिला रज्जनी आणि विनोद खन्ना.

श्री | 2 April, 2011 - 07:43
विकेट पायजे !

म्हमईकर | 2 April, 2011 - 07:45
जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 07:50
अरे ह्या जहीर आणि संत्या ला कोणी सांगा, डाईव मारुन उजव्या हातनी चेंडू आडवल्यावर तो शिंचा डावा हात मध्ये घालून तो चेंडू का म्हुन परत बाऊंडरी कडे धाडून राहिलेत? तेंडल्याचा स्टॉप पाहिला का कसा होता. दोन हातांची ती घळ कशाला करायची? काय मादुक्री मागताय का आऊटफिल्डात!!

udayone | 2 April, 2011 - 07:55
धोनी बाळा काय चालु आहे...........सचीन काय विराट काय.....हजार वेळा सांगितलेले आश्विन ला घे ........त्याच्या बहीनी ने काय तुला नकार दिलेला का...........??..........................

पराग | 2 April, 2011 - 08:17
जोर से बोलो "चक दे इंडिया" !!!!!!!!!!!!!
मै, अंजली.. या एकडे पटापट.. विकेट पायजेत.. !

लालू | 2 April, 2011 - 08:26
लंकेश्वर, "गो लंका!" असं म्हणायचं.
आपल्या इनिन्गपूर्वी इथे पहाटेपासून जे पारोशे बसलेत त्या सर्वांनी आंघोळ, पूजाअर्चा वगैरे उरकून या.
धन्यवाद.

केदार | 2 April, 2011 - 08:34
२६० त्यांचासाठी विनिंग स्कोअर नाही.

maitreyee | 2 April, 2011 - 08:35
त्यांच्यासाठी जाऊदे, कुणी पण २६० केले की आपण जिंकतो

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 08:37
आपल्या इनिन्गपूर्वी इथे पहाटेपासून जे पारोशे बसलेत त्या सर्वांनी आंघोळ, पूजाअर्चा वगैरे उरकून या.>>>>>>>
आधी अंघोळ (कंठस्नान) लंकेची!!!!!

श्री | 2 April, 2011 - 08:38
लालु अंघोळीला खुप वेळ लागतो तेवढा पेशन्स न्हाई आमच्यात

फचिन | 2 April, 2011 - 09:10
फाटली आहे आपली.. टेन्शन आलंय आता..

maitreyee | 2 April, 2011 - 09:11
खल्लास !! अजून काय हवे लंकेला सगळ्या पार्टनरशिपस ४०-५० वर, शेवटच्या क्रिटिकल टाइम्स मधे योग्य वेळी बसलेल्या ४ आणि ६ !! आपल्याला याच्या वरताण जमणार का ? ........घाबरायला होतंय :नखे चावणारी बाहुली:

चातक | 2 April, 2011 - 09:19
तिच्या आयला शेवट्च्या ५ ओवर मधे ६३ रन दिले हलकटांनी... व्वा वा घाण केली सगळी

mansmi18 | 2 April, 2011 - 09:21
इथे येणारे सगळे लोक..(बुप्रा वादी असलात तरी) देव पाण्यात ठेवा. आता आपल्याला दुवांची खुप गरज आहे.

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 09:24
जे लोकं आपल्या प्लेयरांना शिव्या देतात त्यांना खरच लाज वाटायला पाहिजे. You really need to grow up.
टफ फाईट देऊन हरले जरी तरी वांदा नाही. सुरवातीच्या ओवर्स मध्ये ढिसाळ कारभार करुन जर आणखिन शेवटी इतके रन दिले असते तर मग एक वेळ ठीक होतं. चांगल्या चांगल्या बॉलरांची वाट लागते डेथ ओवर्स मध्ये. आता असं आहे, फ्री फोरम आहे त्यामुळे थोबाड कसंही चाललं तरी कानफटात द्यायला कोणी येणार नाही पण फक्त आपल्याला टेन्शन आलं म्हणजे दुसर्‍याला शिव्या द्यायचं लायसन्स नाही मिळत. !@#$ing Idiots!

रचु | 2 April, 2011 - 09:34
सेहवाग ० वर आउट

आऊटडोअर्स | 2 April, 2011 - 09:34
चला, भारताची सुरुवात दणक्यात झालेली आहे महाराजा.

नीधप | 2 April, 2011 - 09:34
सेहवाग गेला.... हरतो आपण!!

राखी. | 2 April, 2011 - 09:37
फक्त सेहवाग गेला म्हणून हरणार कसे, अजून ९ आहेत. थिंक पॉझिटिव्ह.

अंजली | 2 April, 2011 - 09:45
मै, नखं खात बसू नकोस, चलो चिअर अप... जोर से बोलो दे घुमा के
पन्ना कुठे गेली?

नीधप | 2 April, 2011 - 09:47
मी निगेटिव्ह विचार केला की आपण मॅच जिंकतो. असा गेल्या दोन्ही वेळेचा अनुभव.
गेल्या दोन्ही वेळेला आपण तिसर्‍या बॉलला ४ ने खातं उघडलं होतं यावेळेसारखंच....
केवढा तो अंधविश्वास...

आशुचँप | 2 April, 2011 - 09:55
लोक्स, माझ्या वडीलांना काल एप्रिलफूलचा मेसेज आला होता तो याप्रमाणे...
श्रीलंका प्रथम बॅटींग करेल....
त्यांच्या ७४-४ असा स्कोअर राहील...
त्यांची टोटल २७०-२७४ च्या दरम्यान राहील...
सेहवाग पहिल्या ओव्हरला आऊट होईल...
तेंडूलकर ९५-९८ करून आऊट..
आणि भारत शेवटचे दोन बॉल बाकी असताना एक गडी राखून विजयी होईल...
यातले ७४-४ सोडले तर बाकी तीन खरे ठरले आहे. पुढचे बघुया कसे होते ते.
मी आधी तो मेसेज हसण्यावारी नेला होता. पण आता योगायोगाने त्यातल्या तीन गोष्टी खर्या ठरल्याने तुमच्याशी शेअर करण्याचे ठरवले.
पोस्ट अस्थानी वाटत असेल तर डिलीटून टाकेन..
पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे.,
आणि तो मेसेज अजून सेव्ह करून ठेवला आहे. गरजवंताना तो दाखवण्याची तयारी.

सायो | 2 April, 2011 - 10:02
तेंडुलकर गेला

अपर्णा_कुलकर्णी | 2 April, 2011 - 10:04
आता कोण तारणार ?

रोहित ..एक मावळा | 2 April, 2011 - 10:12
रजनीकांत स्टेडीयम मध्ये .. उतरवा त्याला बॅटिंगला....
घाबरु नका... आपणच जिंकु... अस माझ मन सांगतय...

दीपांजली | 2 April, 2011 - 10:18
रजनी द रोबो हताश..कुठायेत ते शॉट्स

पेशवा | 2 April, 2011 - 10:28
तेंडल्या म्हणजे भरवश्याच्य म्हशीला... घरच्य मैदानावर इतका मुर्खा सारखा फटका हइतक्या मोठ्या गेम मधे? ही इज नोट वर्थ द हाईप! अता त्याने कितीका १०० करेनात बुंदसे गै वो हौदसे कैसे आयेगी? श्या!
गो इन्दिअ गो!

चिंगी | 2 April, 2011 - 10:40
मॅच बंद करुन बसलेय..

अंजली | 2 April, 2011 - 10:42
इथे निळे चेअरे टाकणं मना आहे

आऊटडोअर्स | 2 April, 2011 - 10:49
अंजली, पन्ना, बुवा तुमच्या आशावादाचं मला खरंच कौतुक वाटतंय.

Yo.Rocks | 2 April, 2011 - 10:53
आजही गावस्कर, शास्त्री लंकेची काळजी करत बोलत आहेत !!

सीमा | 2 April, 2011 - 10:59
जंबो जेट , जंबो झेट झुईSSSSSS

स्वप्ना_तुषार | 2 April, 2011 - 11:11
अगदी अगदी मलाही वाटतय ही नवीन टीमच काहितरी करून दाखवणार सगळे म्हातारे टेन्शनने हार्टअ‍ॅटॅक येईल या काळजीने उगाचच काहितरी बकबक करतायत...
२०/२० ची टीमच आणणार वर्ल्ड कप आपल्याला

झक्की | 2 April, 2011 - 11:18
नुसतं जखडून ठेवल्यासारखे होतं आहे, हात पाय एकत्र बांधल्यासारखे वाटतं आहे. कुठे गेले ते चौकार, षटकार?
अग आई ग, काय हाणला आहे दिलशानने पाठीवर बुक्का! आम्ही नाही खेळत जा! युवराजला येऊ दे.
पण बच्चमजी, हम डरेंगे नही!! जितेगा भाई जितेगा!
भारतच जिंकेल.

योग | 2 April, 2011 - 12:01
अचानक फुलटॉस बॉल्स यायला सुरुवात झालीये... बहुतेक ड्यू/ह्युमिडीटी वाढते आहे... भारतासाठी मस्त बातमी... कारण फलंदाजी करणे सोपे होईल...
रच्याकने: लंकेचे खांदे पडायला सुरुवात झाली आहे... एकदा धोणी, गंभीर २००+ च्या पुढे गेले की मजा येईल.

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 12:03
रच्याकने: लंकेचे खांदे पडायला सुरुवात झाली आहे... एकदा धोणी, गंभीर २००+ च्या पुढे गेले की मजा येईल.>>>>> मलाही असं वाटलं बरं का पण बळच असेल बहुतेक. मनाचे खेळ असं म्हणून सोडून दिलं.
ह्या दोघं बापुड्यांनी शिंगल हातानी मॅच हाणली तर काय मजा येइल!

चातक | 2 April, 2011 - 12:14
मंडळी, जबरदस्तsss दडपणाखाली खेळाडु हा सामना खेळत आहेत.
तेवढ्याच तनावाखाली तिथे बसलेला प्रत्येक भारतीय आहे.
त्याची प्रचिती आपल्याला इथे बसुन येणार नाही.

maitreyee | 2 April, 2011 - 12:17
मला येतीय प्रचीती. भयंकर टेन्शन आता!! हात गार पडतायत .. घश्याला कोरड वगैरे छ्या जसे क्लोज जाऊ तसे फार त्रास आहे राव

नंद्या | 2 April, 2011 - 12:38
धोनी आणि गौतम दोघांच्या चेहेर्यावर केवढे टेन्शन दिस्तंय.

सायो | 2 April, 2011 - 12:40
गेला गंभीर...

मीपुणेकर | 2 April, 2011 - 12:43
गंभीर च्या या खेळीला शतकाचे चार चांद लागयला हवे होते..
एनीवे, वेल प्लेड!!
कमॉन युवी..
चक दे ईंडिया!!

वैद्यबुवा | 2 April, 2011 - 12:57
मां की आंख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! काय सिक्स लावला? कट ल सिक्स!!!!!!!!!! जबरी!!!!!!!
Go dhoni! Go !!!!
Light'em up!!!!
काय मुहुर्त आहे दहनाचा!!!! ???
बाबो!!! माझा जीव पार घशात येऊन बाहेर येणार होता आत्ता!!!!
परत एल बी चा रिव्यु!!!

चातक | 2 April, 2011 - 13:08
धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
एखाद चौका एखाद छक्का.......क्कमॉSSSSन

चातक | 2 April, 2011 - 13:15
आता सगळेच पेटलेय....!

प्रतिसाद
मीरा१० | 2 April, 2011 - 13:15
२ सिक्सर बस!!

प्रतिसाद
चातक | 2 April, 2011 - 13:15
ए थांबा रे जरा नजर लागेल....

प्रतिसाद
maitreyee | 2 April, 2011 - 13:15
यु हू यु हू !! चक दे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

प्रतिसाद
टिल्लू | 2 April, 2011 - 13:16
Yesssssssssssssssssssssssssssss

प्रतिसाद
वैद्यबुवा | 2 April, 2011 - 13:19
YEAAAHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHH!!!!!!!!!!!!!!
धोनी!!! धोनी!!!धोनी!!!धोनी!!!

प्रतिसाद
अथक | 2 April, 2011 - 13:19
याहू ........

योग | 2 April, 2011 - 13:22
धोणी.... सलाम बाबा तुला..................
amazing, mind blowing, beyond words..............
BIG CONGRATS TO TEAM INDIAN AND ALL MAAYBOLIKARS... TIME TO PARTY...

झक्की | 2 April, 2011 - 13:23
भारतच जिंकणार. नव्हे,
भारतच जिंकला!!!

दिनेशदा | 2 April, 2011 - 13:26
अभिनंदन, भारत आणि श्रीलंका दोन्ही टीमचे. आणि सर्व मायबोलीकरांचेही. आणि लंकेश्वराचेहि !!!

दीपांजली | 2 April, 2011 - 13:37
शँपेन... फटाके..........खूप सारे आनंदाश्रु !!!!!!!!!!!

मुकुंद | 2 April, 2011 - 14:30
माझ्याजळ शब्दच नाहीत माझा आनंद व्यक्त करायला.... मी नेहमी म्हणत होतो की मे द बेस्ट टिम विन! आणि या वर्ल्ड कपमधे आपण खरच बेस्ट टिम होतो.. आजही आपण जबरी बॅटींग करुन व बेस्ट टिमसारखे खेळुन जिंकलो.इट वॉज फिटींग फिनिश दॅट टीम इंडिया वन धिस वर्ल्ड कप!.
हॅट्स ऑफ गंभिर...हॅट्स ऑफ धोनी...आणी हॅट्स ऑफ मॅन ऑफ द टुर्नामेंट युवराज! अफकोर्स...हॅट्स ऑफ सचिन तेंडुलकर... ४९० धावा या वर्ल्ड कपमधे....!
आणि सगळ्यात शेवटी... हॅट्स ऑफ टु मायबोलिवरच्या सगळ्या पॉझिटिव्ह थिंकर्स व ऑप्टिमिस्ट क्रिकेट्प्रेमिंना..पन्ना,वैद्यबुवा,अंजली,शैलजा,भाउ नमसकर,केदार आणी बाकी सगळे... इट वॉज अ प्लेजर वॉचिंग धिस वर्ल्ड कप विथ यु ऑल मायबोलिकर....
अरे तो लंकेश्वर कुठे गेला... वेल प्लेड बट हार्ड लक लंकेश्वर... शेवटी आमच्या वानरसेनेने तुझ्या लंकेचे दहन केलेच... अरे कोणीतरी त्याने मगाशी दिलेले लाडु शिल्लक ठेवले असतील तर त्याला एक लाडु द्या रे...

प्रतिसाद
दीपांजली | 2 April, 2011 - 14:26
यार! शेवटची सिक्स काय ओढली धोनीनी!!!!!!!!!! त्याचे डोळे पाहिले का? शेवटपर्यंत पॉज होता, बॉल बाऊंडरीच्या बाहेर एरियली जाऊ पर्यंत!!!!!
<<< आय नो................ आउट ऑफ धिस वर्ल्ड !!!
व्हॉट अ कम बॅक धोनी अॅन्ड मिड्ल ऑर्डर !!!
टॉस हरला.. हु केअर्स ??.. ओप्निंग पेअर गड्बडली..हु केअर्स ??.. वर्ल्ड कप फिर भी हमारा है !!
खरच हवेत.......... दॅट्स टिम इंडिया !!!

प्रतिसाद
रुणुझुणू | 2 April, 2011 - 14:27
हूssssssssssssss हूssssssssssssssssss
कधी उतरायची आता ही नशा ??? उडावंसं वाटतंय.......
मस्त ! जबरी मॅच !

बागुलबुवा | 2 April, 2011 - 16:01
भन्नाट झाली मॅच लोकहो.
नेट गंडल होतं, जेव्हढे वेळा कनेक्ट करायला गेलो तेव्हढ्यांदा विकेटस् गेल्या. मग एका जागी बसून चरणं सुरु केलं, आणि रन्स बनत गेल्या. ईमाने ईतबारे चरत राहिलो म्हणून तर आपण जिंकलो.

आता पोटाला तडस लागलीये

धोनीची छकडी अफलातून. विजय साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग.

Adm | 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

प्रतिसादयोग | 3 April, 2011 - 02:57
आणि युवराज हसला:

ईतका तणावपूर्ण सामना सुरू असताना (लंका आपल्याला शेवटच्या षटकात कुटत होते तेव्हा), युवी चा प्रेक्षकात ऊपस्थित डुप्लिकेट दाखवला. अगदी तासाच रंगीत चष्मा घालून आला होता. मोठ्या स्क्रीन वर त्याला पाहिल्यावर मैदानात युवी ने देखिल एक मस्त स्माईल दिली... that was million dollar! (कुणि पाहिले का?)
तो एक छोटासाच क्षण- रणरणत्या उन्हात एखादी गार झुळूक यावी तसा वाटला.
युवी हसतानाच अधिक चांगला दिसतो हे त्याला पुन्हा सांगितले पाहिजे. त्याच्या चेहेर्‍यावर आता ते जुने हसू परतेल अशी आशा. त्याच्या खेळाला असे आनंदी रहाणे अधिक मानवते

(मुरली ला देखिल त्याच्या संघाने खांद्यावर घेवून एक फेरी मारायला हवी होती असे वाटतेल. आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच त्याला सन्मान दिला असता. he deserved better send off!)

प्रतिसादनीधप | 3 April, 2011 - 03:07
धोनीची शेवटची सिक्स त्याच्या एक्स्प्रेशन्ससकट कुठे मिळेल बघायला. स्टार क्रिकेटच्या हायलाइटसमधे पण नाही दिसली.

प्रतिसादमीरा१० | 3 April, 2011 - 03:15
धोनीची सिक्सर
http://www.youtube.com/watch?v=ULGN2UD7ovE

प्रतिसादयोग | 3 April, 2011 - 04:20
>>धोनीची शेवटची सिक्स त्याच्या एक्स्प्रेशन्ससकट कुठे मिळेल बघायला. स्टार क्रिकेटच्या हायलाइटसमधे पण नाही दिसली.
अगदीच कुठे नाही सापडली तर सांग.. क्लिप पाठवून देतो its worth watching... dhoni's approach to his whole innings is in that "look". very subtle, very definitive, very determined, and very focussed! as they say "its all in the eyes"

नीधप | 3 April, 2011 - 09:25
योग पाठवच रे लिंक.
ध्वनीने दिलेल्या लिंकमधे तो पॉज, ती नजर काहीच नाहीये.

बी | 3 April, 2011 - 09:43
नीधप, ही १६ मिनिटांची लिंक पहा आणि १३ ते १४ मिनिटा दरम्यानचे दृश्य पहा. त्यात धोनीचा तो स्थिर पापण्यांचा चेहरा दिसेल.
http://www.youtube.com/watch?v=Q21TA4HHfM4

नीधप | 3 April, 2011 - 10:36
पाह्यली पाह्यली... धोनीची ती नजर.... तो आत्मविश्वास.... खल्ल्लास!!!!!
आता काही दिवस रोजचे रोज ही लिंक बघितली जाईल...

नीधप | 4 April, 2011 - 00:47
मी कालपासून परत परत धोनीची नजर पाहतेय त्या शेवटच्या सिक्सच्या वेळची. केवळ कातिल!!

श्री | 4 April, 2011 - 22:26
आडो काय हे !
मला मॅच मध्ये आवडलेले ( शेवटची अत्युच सिक्स सोडुन) दोन मोमेंट्स जेव्हा वाटत होतं की हे आता धु धुणार , एक विराट हातातल्या हातात बॅट गरगर फिरवत असताना , आणि धोनी जेव्हा बॅटींगला आला तेव्हा फक्त कॅप घालुन आला , तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरुनच वाटत होत की आता हा धु धुणार .

udayone | 4 April, 2011 - 23:24
कप खोटा नाही आहे म्हणुन जर आय सी सी सांगत आहे तर.......खरा कप कस्टम ड्युटी न भरता भारतात आलाच कसा........................??????????????????????????

भाऊ नमसकर | 2 April, 2011 - 21:57
आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे २५-३० धावा निश्चितच वांचल्या व शेवटी मारलेल्या षटकाराचं ग्लॅमर नसलं तरीही सामना जिंकण्यात त्या न दिलेल्या धावांचं मोल अधिक होतं. [ नाहीतर ३००+ चं दडपण आलंच असतं]. क्षेत्ररक्षणाचं महत्व अधोरेखित झालं हाही कालच्या विजयाचा दूरगामी लाभ आहेच. कालच्या क्षेत्ररक्षणामुळे अधिकच अभिमान वाटला आपल्या संघाचा !
भारताला विश्वविजेतेपद मिळाल्याने दोनदा नाचायचं भाग्य माझ्याही नशीबी होतं ! १९८३ ला जिंकण्याचं स्वप्नातही नसून आपण जिंकलो [ अर्थात गुणवत्तेवरच], तो आनंद वेगळा; व आपण चँपियनच आहोत व म्हणून जिंकणारच या निर्धाराने जिंकणं याचा आनंद आगळा. मला वाटतं यावेळचं अपेक्षांच्या दडपणाखाली खेळून जिंकणं अधिक कौतुकास्पद आहे. पण त्यावेळचं आमचं नाचणं मात्र अधिक आनंददायी होतं कारण ... वय !!!

<< भाऊ, lol... तुम्ही काढलय हे? >> ध्वनीजी, मी वय झालं म्हटलं, तरी रनर घेऊन नाही बॅटींग करत मी !

डॉ.कैलास गायकवाड | 2 April, 2011 - 22:49
विराट कोहलीचे शब्द डोळ्यात पाणी आणणारे होते.

तो म्हणाला,ज्याने २१ वर्षे क्रिकेटचं ओझं भारतासाठी आपल्या खांद्यावर वाहीलं आहे,आज त्याला खांद्यावर उचलून आनंद साजरा करण्याचा क्षण आहे.

भरत मयेकर | 31 March, 2011 - 15:10

कालची मॅच टीव्हीसमोरून न हालता पाहिली. माबोला कुलूप. आज 'त्या' धाग्यावरच्या कमेंट्स वाचताना खूप मनोरंजन झाले. शिव्या आणि काय काय!
काल मुनाफ पटेल बर्‍याच लोकांना रणवीर कपूरसारखा आणि नेहरा शाहिद कपूरसारखा वाटायला लागला.(ज्याने त्याने आपल्याला हवे ते नाव घालावे).

बाळू जोशी. | 3 April, 2011 - 02:30
बिस्मिलाह इर रेहमान इर रहीम....

हमारे सभी बच्चे अच्छे खेले. माही ने कमाल दिखाया. जहीर ने भी अच्छा किया. गौतमनेभी कमाल दिखाया . सभी अच्छे खेले. इन्शा अल्लाह हम ऐसेही जीतते रहेंगे. अल्लाहका शुकर है.

योग | 3 April, 2011 - 02:57
आणि युवराज हसला:

ईतका तणावपूर्ण सामना सुरू असताना (लंका आपल्याला शेवटच्या षटकात कुटत होते तेव्हा), युवी चा प्रेक्षकात ऊपस्थित डुप्लिकेट दाखवला. अगदी तासाच रंगीत चष्मा घालून आला होता. मोठ्या स्क्रीन वर त्याला पाहिल्यावर मैदानात युवी ने देखिल एक मस्त स्माईल दिली... that was million dollar! (कुणि पाहिले का?)
तो एक छोटासाच क्षण- रणरणत्या उन्हात एखादी गार झुळूक यावी तसा वाटला.
युवी हसतानाच अधिक चांगला दिसतो हे त्याला पुन्हा सांगितले पाहिजे. त्याच्या चेहेर्‍यावर आता ते जुने हसू परतेल अशी आशा. त्याच्या खेळाला असे आनंदी रहाणे अधिक मानवते

(मुरली ला देखिल त्याच्या संघाने खांद्यावर घेवून एक फेरी मारायला हवी होती असे वाटतेल. आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच त्याला सन्मान दिला असता. he deserved better send off!)

भरत मयेकर | 3 April, 2011 - 09:19
ब्रेकिंग न्युज : धोनीचा केशसंभार गायब.

बाळू जोशी. | 4 April, 2011 - 00:15
पुण्यातले रस्ते फुलून गेले होते ते विविध राज्यातील आलेल्या तरुणाईमुळे . स्थानिक 'वरणभात ' मंडळी एकदा गच्चीत येउन पुन्हा आत जाऊन तोन्डावर पांघरूण घेऊन झोपली.

मंजूडी | 4 April, 2011 - 01:32
श्रीलंकेची बॅटींग चालू असताना यर्टेलने जीपीआरेस बंद पाडलं होतं, त्यामुळे इथे येता आलं नाही. आपली बॅटिंग चालू झाल्यावर दोनदा आले तर आधी वीरूची आणि नंतर सचिनची विकेट पडली म्हणून मग नंतर आलेच नाही.

मुंबईतलं वर्णन काय करू महाराजा? रस्ते ओस पडलेले, गल्ल्या सुनसान असलं काही वातावरण नव्हतंच मुळी. बर्‍याच ठिकाणी प्रोजेक्टर लावून मोठ्या स्क्रिनवर एकत्रितपणे मॅचचा आनंद लुटणं चालू होतं. ३० बॉलमधे ३० रन्स हव्यात अश्या परीस्थितीत युवराज बॅटींगला आला तेव्हा शब्दशः सगळे डोळ्यात प्राण आणून बसले होते. त्यात ४ बॉल्स मेडन.... कोणीतरी १० किलोचा लोखंडी गोळा पोटात ढकलतोय अशी सगळ्यांची भावना होती. पुढच्या बॉलला स्कोअरबोर्ड जरा हलल्यावर सगळे जरा हुश्य झाले. मग धोनीकडे स्ट्राईक आल्यावर चौकार तडकावल्यावर आपला विजय निश्चित झाला आणि लगेच ढोल-ताशे बडवत गुलाल उधळत लोकांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली.
धोनीच्या विनिंगशॉटनंतर काय झालं ते मला आता आठवतच नाहिये. खरीखुरी कॅप्टन्स इनिंग!!

पूर्ण ९ मॅचेसमधे सचिनच्या सोबतीने झहिर, युवी, रैना, गौतम गंभीर, सेहवाग, भज्जीने जो खेळ केला त्याला तोड नाही. एकूण एक खेळाडू बोलताना सचिनला श्रेय देत होता. जिंकल्यानंतर आधी धोनी आणि मग युवीने सचिनला मारलेली घट्ट मिठी बरंच काही सांगून गेली.

अविस्मरणीय वर्ल्डकप!!

रोहित ..एक मावळा | 4 April, 2011 - 02:45
येथे आमच्या येथे ठाण्याला कॉलनीमध्ये पडद्यावर मॅच बघत होतो.. शेवटी शेवटी प्रत्येक रनावर चिअर करत होतो अन प्रत्येक चौकारला फटाके फुटत होते.धोनीने विजयी षटकार मारल्यानंतर एकच जल्लोश झाला.लहानापासुन मोठ्यापर्यंत सारे दंग होऊन संगीताच्या तालावर नाचायला लागले.१० मिनिटे बेफान होऊन नाचले.. एक अनोखी झिंग सगळ्यात पसरली होती.
शेवटी जागतिक चषक आपला झालाच.सचिनचे स्वप्न पुरे झाले.भारत जिंकला.

पण आज गुढीपाडवा.. म्हणुन काल बारा वाजेपर्यंत जागलो मराठी नववर्षाचे स्वागत करायला.पण फक्त तुरळक फटाक्याशिवाय काय घडलच नाही.

एक होती वर्ल्ड कप जिंकल्याची रात्र अन दुसरी कालची रात्र... किती तो फरक ?

बाळू जोशी. | 4 April, 2011 - 09:40
एका मेलमध्ये आले आहे. स्त्रोत ;अज्ञात

पात्रांची बॉडी लँग्वेज अप्रतिम आहे. गिलानीच्या चेहर्‍याव्र म्हणू की नको म्हणू की नको. म्हनतोच आता असा लोचट भाव. मनमोहनची दाढी मस्त. अंगठे चाळविण्याची लकब सुन्दर. विशेष म्हनजे मनमोहनांचे बूट देखील विचारात पडून गोंधळून गेले आहेत. जितके बारकाइने पहाल तेवढी सौंदर्यस्थळे त्यात अधिकाधिक दिसतात.

मंदार_जोशी | 5 April, 2011 - 07:25
आपण जिंकलो हे एका कारणाने खूपच महत्वाचे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेला क्रीडा संस्कृतीचा संपूर्ण अभाव (आणि शासनाने आखलेल्या क्रीडा धोरणाचा सर्व पातळ्यांवर वाजलेला बोर्‍या). प्रत्येक क्रिकेटपटू किंवा इतर खेळतला खेळाडू हा एखाद्या दुसर्‍या खेळाडू कडून किंवा १९८३ सारख्या विश्वचषक विजयासारख्या मोठ्या घटनांतून स्फूर्ती घेऊनच पुढे येतो आणि स्वतःच्या कुवतीनुसार मोठा होतो - शासनाने आखलेल्या क्रीडा धोरणाचा परिपाक म्हणून नव्हे. म्हणूनच कदाचित म्हणतात की Kapil Dev was not born because of the system, he was born in spite of the system.

उदय | 6 April, 2011 - 08:13
मला सुरक्षा यंत्रणेचे कौतुक वाटते... मोहाली तसेच मुंबई या दोन्ही ठिकाणी अतिशय महत्वाच्या अनेक व्यक्तींची हजेरी अपेक्षीत होती. कुठेही एक छोटा फटाका फुटला असता तर आंतरराष्ट्रिय बातमी झाली असती. सुदैवाने तसे काहीही झाले नाही, सोहळा व्यावस्थित पार पडला.

दिवस रात्र राबणार्‍या त्या सुरक्षा यंत्रणेचे प्रथम अभिनंदन, तसेच धोनीच्या संघाचे विश्वचषक भारतासाठी फिक्स केल्याबद्दल अभिनंदन.

उल्हास भिडे
भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन. आपण वर्ल्ड कप जिंकला; आनंदाची अभिमानाची, गौरवाची गोष्ट. अशा प्रसंगी प्रत्येक भारतीय, ’मी’, ’आम्ही’ या संज्ञा विसरून ’आपण’ होतो. किंचित् कालापुरती उफाळून आलेली ही राष्ट्रीय एकात्मता चिरकाल टिकून रहावी ही अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. भारत माता की जय.

Sachin.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy