उत्तम

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मिनोतीने तिच्या ब्लॉग वर टॅग केले त्यालाही बराच काळ लोटला. पण लिहायला सुचत नव्हतं. सुनिता बाइंचं एक वाक्य आहे 'मण्यांची माळ' मधलं. ' माझ्या ऐहिक गरजा फार कमी आहेत.' ते एकच खनपटीला बसलंय गेले कित्येक दिवस.

अगदी साध्या साध्या गोष्टीत छळतं ते वाक्य. वयाच्या पंधरा सोळा वर्षापर्यंत लक्स साबणाने केस धुवायचे अन घरात असेल ते खोबरेल तेल लावायचं अशी सवय. कॉलेजच्या दिवसात लॅक्मे शॅम्पू ची सवय लागली. इथे आल्यावर कंडिशनर अनिवार्य झाला. मग हळू हळू मूस, जेल, लीव्ह्-इन्-कंडिशनर इत्यादींनी भुरळ घातली. काहींची सवय अंगवळणी पडली तर काही बाटल्या कालबाह्य झाल्या म्हणून टाकून दिल्या. पण परत लक्स ( किंवा इतर कोणत्याही )साबणाने केस धुवायला कससंच वाटेल. अर्थात हे कबूल करताना काही अभिमान वाटतोय असं ही नाही.

माझ्या लहानपणी निव्हिआ, लक्स, क्युटिक्युरा अन कोलगेट हेच ब्रँड घरात येत असत. अन तेही चैनीचं मानलं जात असे. माझ्या आजी -पणजींनी कधीही पावडर, क्रीम, येवढंच काय टूथपेस्ट अन ब्रश पण वापरला नसेल. हाताचं बोट अन मीठ! केस धुवायला रिठा. अंग धुवायला गरम पाणी अन सणासुदीला हळद.

आता इथे पायाच्या टाचांकरता वेगळं, हाता करता वेगळं , चेहर्‍याला वेगळं , डोळ्या भोवतीच्या काळ्या वर्तुळांकरता वेगळं ( लिप्स्टीक बरोबर फुकट मिळालेलं का असेना ) अन ओठांकरता वेगळं अशी जवळ पास अर्धा डझन क्रीम्स ! असल्या सत्राशे साठ गोष्टी वापरताना पैशाचा अपव्यय तर होतोच पणं लँडफिल पण किती होतं याचा विचार केला तर धडकीच भरते. शॅम्पू, कंडिशनर, अन इतर गोष्टी शेवटी समुद्राच्या पाण्यात किंवा स्थानिक वॉटर टेबल मधे जाउन मिसळणार. तेही चूकच.

या सगळ्या सवयी पण सहज सुटायच्या नाहीत. पुन्हा इथलं हवामान, इथल्या नोकरीकरता पाळायचे शिष्टाचार यांची भर आहेच. ऑफिसला घालायचे काळे, पांढरे अन तपकिरी शूज, उन्हाळ्यात घालायला तितकेच सँडल्स, बर्फातले बूट, देशी कपड्यांबरोबर चालतील असल्या चपला, व्यायामाला लागतील म्हणून स्नीकर्स, - इंटरव्ह्यू, महत्वाच्या मीटींग्स करता ठेवणीतले म्हणून उंच टाचांचे शूज वगैरे वगैरे. त्यात जर स्टिलेटो हील, स्क्वेअर हील, वेज हील वगैरे भानगड आली म्हणजे सगळ्या बुटांची संख्या एकदम तिप्पट! मग ह्याला आवर कसा घालायचा?

बरं सुनिता बाईंनी ऐहिक गरजा कमी आहेत म्हणून पुस्तकांची चैन परवडते असं लिहिलंय. सुदैवाने हवी असलेली पुस्तकं सापडतील तशी घेणं परवडतंय सध्या तरी. पण जी ए ंच्या पत्रात त्यांनी आपली पुस्तकं जुन्या पुस्तकांच्या दुकानात देऊन टाकल्याचं वाचलं अन जीव गलबलून गेला. साक्षेपी, चोखंदळ माणसाने आयुष्यभर जमवलेली पुस्तकं अशी पोटच्या पोराबाळांना अनाथालयात टाकण्यासारखी देउन टाकायची वेळ येणार असेल तर ऐहिक गरजा कमी करून पुस्तकांची ऐश करण्यात तरी काय हंशील?

विषय: 
प्रकार: 

शोनू, माझ्या मते पुस्तकं पण ऐहिक गरजेमध्ये येतात. वर लिहिलंस ते क्रीम आणि लॅंड्फील बद्दल वाईट वाटतं. जीएंचा खजिना कवडीमोलाच्या भावात गेला, हे वाचून तर फारच वाईट वाटले. ऐहिक गरजा कमी करायचा विचार किती चांगला असला तरी अमलात आणणे म्हणजे सुखावलेल्या जीवाला तपस्या करायला लावणे झाले!

शीर्षकाला साजेसे लिहिलयस एकदम. एकूण पुस्तका.न्चे काय घेऊन बसली आहेस. आपण ज्या तर्‍हेने वाढलो, घडलो ते जग कधीच मागे राहून गेलय. बदलणे हा स्थायीभाव आहे हे मान्य आहे फक्त वाईट एव्हढेच वाटते की आहे त्यापेक्षा वेगळे जग होते हे येत्या पिढीला कळणारच नाही. म्हणजे आपल्या लहानपणाची स्थायी मूल्ये एव्हढी कालबाह्य झाली आहेत सध्या की सा.न्गून सुद्धा कळणार नाही पोरांना कि असे पण असू शकते. Sad आपले आई वडील कदाचीत असेच म्हणाले असतील ......

ऐहिक गरजांबद्दल लिहीले आहे ते. आपणच आपल्या गरजा वाढवतो. माझा एक मित्र म्हणतो," जेव्हा आपल्याला रु. २०००० महिना पगार असतो तेव्हा आपण त्यात भागवतो. पण तो ५०००० झाल्यावर मात्र परत २०००० मध्ये भागणे शक्य होत नाही आपल्याला." म्हणजे महागाई, चलनवाढ इ. गोष्टी धरल्या तरी.... status symbols येतात, वाढत्या status बरोबर वाढती जागरुकता येते तिची शब्दशः किंमत मोजावी लागते. अडकून पडणे हे फारच सोपे झाले आहे. एका विशिष्ट वयानंतर आतून अगदी अलिप्त असावे असे मनापासून वाटते. ते बी आतापासूनच रुजवावे लागेल ना.... अचानक कसे येईल ?! आताच ती अलिप्तता दाखवली नाही तरी आत तिचे भान पाहिजे, आम्ही आमच्या गरजा वाढवून आता हे भान येणेसुद्धा अवघड करत आहोत.

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
-

माझ्या मनातदेखील असेच काहिसे विचार गेले कित्येक दिवस चालु आहेत. एक जोडा वर्ष-सहा महिने वापरायचे दिवस कधीच मागे पडलेत Sad ह्या देशात एकेका जोड्याची किम्मत $५०-६० वगैरे बघुन आईवडीलान्चेच काय माझेपण डोळे पांढरे पडायला लागलेत आजकाल. एक साधे क्रिम चालत नाही. कित्येक प्रकारचे बॉडीवॉश आणि पेर्फ्युमची आवड सुटत नाही आणि अस्थायी वाटत रहाते. बर हे येवढे सगळे वापरुन केस गळणे, त्वचा कोरडी पडणे हे कमी झालेय का? नाहीच म्हणायला हवे. चैन आणि गरज यातली सीमारेषा खूप धुसर झालीय हेच खरे. ह्या ट्रॅपमधुन कसे बाहेर यायचे हे थरवावे लागेल आता.

~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

शोनू, हे जे काही लिहिले आहेस ते मला माहिती नाही कधी लिहिलेस. अभिप्रायांसकट 'उत्तम' आवडला आहे. पण हे शीर्षक का निवडलेस हे मात्र काही कळले नाही..
बी

शोनू, तुझे रंगीबेरंगी मधील अन्य लिखाण दिसत नाही. अगदी चार पाच लिखाण दिसतं आहेत फक्त. इतर शोधून दे..

अरे संसार संसार वर प्रतिसाद
बी | 9 April, 2014 - 13:52
मेधा, खूप छान!

पुन्हा प्रश्नवर प्रतिसाद
बी | 9 April, 2014 - 13:54
स्लार्टी, जामोप्या, फा - तुमची उत्तरे आवडलीत.

ऊत्तमवर प्रतिसाद
बी | 9 April, 2014 - 13:55
परत वाचले..

असे एकेक- दोनदोन मिनिटात जुने लेख शोधून, पूर्ण लेख प्रतिक्रियांसहित वाचून, आवडून आणि पुन्हा प्रतिसादसुद्धा देऊन कसा काय होतो हो तुमचा. लेख न वाचताच नुसते मस्कामारू टाईप्स प्रतिसाद लिहिलेत ना! भलते लब्ब्बाडच आहात की हो तुम्ही.
असा मस्का मारून लोकांना गटगला आमंत्रण देण्याचा डाव होता ना? तुम्ही स्वतःला मायबोली स्वीटहार्ट समजता, पण सगळ्यांना सगळे कळते बरं.

कॉस्मेटिक्स मध्ये जी केमिकल्स असतात ते बघितले तर त्यामुळे काही सौंदर्यवृद्धी होईल अशी शंका पण वाटत नाही. मिलिटरी माफिया सारखाच ब्यु टी माफिया पण असतो. क्ष वयाच्या बायकांना सौंदर्य जाणार म्हणून असुरक्षित वाटते व त्यांच्यावर हा असा हर प्रकारची कॉस्मेटिक्स घेण्याचा मारा केला जातो पीअर प्रेशरही असते. पण आपल्या मेधा पाटकर बाई बघा साध्या पण किती छान दिसतात त्या. एक प्रकारची इनर स्ट्रेन्ग्थ
दिसून येते. ( राजकारणाच्या संदर्भातून नाही बोलत मी. )

अँटी एजिंग कॉस्मेटिक्स हा तर अतिशय महाग प्रकार आहे. सर्व जागतिक मोठे ब्रँडस तसेच अ‍ॅमवे
ओरिफ्लेम प्रकरणे हे विकतात. नुसते एक क्रीम नाही. डे क्रीम, नाइट क्रीम फेस वॉश ( हे तर एकदम भों गळ प्रोडक्ट कॅटेगरी आहे. ) अंडर आय क्रीम वगैरे एक महिन्याचे पॅकेज १२- १३ हजारावर नक्की जाते. बॉ डी शॉप
लश इत्यादी उत्पादने मस्त असतात पण किती ती महाग. मी एकदा हैद्राबादेत लाइफ स्टाइल मध्ये एका
अँटी एजिन्ग क्रीमची किंमत विचारली होती त्या सुरेख तरूण विक्रेतीने, ( जिला निदान अजून वीस व वर्शे तरी हे काही लागणार नाही ) तिने साडेपाच हजार सांगितल्यावर न राहवून अगं पण डबल पे केले तर तळवलकरची वर्शाची मेंबरशिप येइल की. असे म्हटले. तेव्हा माझे पॅकेज तिच्या लक्षात आले व तिने मला इग्नोर केले. Happy

फॉर्मल इन्फॉर्मल फ्रायडे ड्रेसिन्ग स्पेशल ड्रेसेस फॉर मीटिन्ग्स इथे पण आहे. बोर्ड रूम साठी खास सूटेबल कांजीवरम साड्या मिळतात. लहान पणचे क्यु टसी इंडिअन ब्रँडस आता रिट्रो म्हणून इथे आवडतात काही लोक्स ना. पण तरुणाई मॅक, आणि इतर मध्ये दंग आहे.

बाकी जीएंचे म्हणाल तर आपल्या माघारी कोण ह्या पुस्तकांना जीव लावून संभाळणार म्हणून त्यांनी देउन
टाकली असतील. निवृत्त होताना करायची एक सहज गोष्ट आहे ती. त्याचा वरील चैनीशी काही संबंध जुळत नाही. ह्या व्यक्तींना पावडर लावून सुंदर दिसायची गरज कधी भासली होती का?