गेली २ वर्षे मी मायबोलीवर वाचनमात्र आहे. सद्ध्या थोडा मोकळा वेळ मिळत असल्यामुळे लेखन करायची इच्छा आता पूर्ण करुन घ्यावी म्हणतोय
आता आपल्याला ज्या विषयात गती आहे त्यातच सुरुवात करावी. फोटोग्राफी हा तसा जिव्हाळ्याचा विषय आणि काही मेंदूला ताण देऊन शब्दांचा पिट्ट्या पाडायची पण गरज नाही
अशीच काही चित्रे डकवतोय; पहिलाच लेखनाचा प्रयत्न असल्याने सांभाळून घ्यावे
१.
हे छायाचित्र १० सेकंद अॅपर्चर घेउन काढलेले आहे. पाण्याला आलेला स्मूथ इफेक्ट त्यामुळेच दिसतो. भरदुपारी असे अॅपर्चर ठेवल्यास फोटोमध्ये फक्त पांढरा प्रकाश येईल. म्हणून लेन्स समोर एक वेल्डिंग काच ठेवून त्याचा उपयोग १२ स्टॉप एन डी फिल्टर सारखा केला आहे. फोटोशॉप मध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाईट करून थोडा सेपिआ टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा डाउनटाउन चा फोटो फोटोशॉप मध्ये HDR प्रकारचे टेक्निक वापरून बनवला आहे. मुळात दोन फोटो काढून (१ अंडरएक्सपोज आणि दुसरा ओव्हरएक्सपोज) ते मर्ज केले आहेत आणि त्यानंतर इमेज च्या टोन, कलर वगैरेच्या कर्व्हज ठीक ठाक केल्या आहेत. (इमारती आणि आकाशाचे रंग मुख्यत्वे)
३ आणि ४ पुन्हा एकदा वेल्डिंग काच वापरून ३० सेकंद अॅपर्चर ठेवून काढलेले आहेत. एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट तर दुसरा कलर एडिट केला आहे.
हे चित्र फोटोशॉप मध्ये कलर मधून ब्लॅक अॅण्ड व्हाईट करून नंतर बाकीच्या रंगांचा परिणाम शून्य केला आहे. म्हणून काळ्या पांढर्या चित्राला एक स्मूथ इफेक्ट आला आहे.
वसंतातले पहिले उमललेले फूल टिपून फक्त तेवढेच फोटोत उठावदार करुन बाकीचे रंगहीन छायाचित्र सरलेल्या उदास हिवाळ्याचे प्रतीक आहे. (फोटोशॉप सॉफ्ट फोकस)
छायाचित्रे ७ व ८ ही ३ व ४ प्रमाणेच. फक्त ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रात ४ सेकंदाचा शटर स्पीड असल्याने लाटा दिसतात तर रंगीत चित्रात ४५ सेकंद शटर स्पीड असल्याने समुद्राला स्मूथ इफेक्ट येतो.
आपणही जर निरनिराळी टेकनिक्स वापरून छायाचित्रे काढली असल्यास येथे शेअर करावीत. तेवढीच आपणा सर्वांच्या फोटोग्राफी ज्ञानात मोलाची भर पडेल.
जबरदस्त !!!!! पाण्याचा फोटो
जबरदस्त !!!!!
पाण्याचा फोटो तर सर्वात टॉप..
सुरेख. फोटोग्राफीतले फारसे
सुरेख. फोटोग्राफीतले फारसे कळत नाही पण फोटो आवडले.
छान फोटो. ७ आणि ८
छान फोटो. ७ आणि ८ आवडले.
मायबोलीवर स्वागत
खालिद, सुरेख फोटो आहेत.
खालिद,
सुरेख फोटो आहेत. कल्लोळाला नक्की या. तुम्हाला इमेल करत आहे.
वॉव्..अप्रतिम फोटोग्राफी..
वॉव्..अप्रतिम फोटोग्राफी.. माबो वर स्वागत!!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त फोटोग्राफी व
मस्त फोटोग्राफी व टेक्निक्सही. पहिला व सातवा सर्वात आवडला.
असंच शिकवत जा 'बॉक्स' कॅमेरा
असंच शिकवत जा 'बॉक्स' कॅमेरा कवटाळून बसलेल्या माझ्यासारख्याना ! फारच छान !!
वा वा ! मस्त फोटोज. आणि
वा वा ! मस्त फोटोज. आणि टेक्निक लिहील्याबद्दल विशेष आभार !
पहिला फोटो खूप आवडला.
पहिला फोटो खूप आवडला.
जबरदस्त!
जबरदस्त!
मस्त आलेत फोटो , आणि माहितीही
मस्त आलेत फोटो , आणि माहितीही छन सांगितलीय.
चांगली टेक्निक्स. वेल्डींग ची
चांगली टेक्निक्स. वेल्डींग ची काच ND फिल्टर म्हणुन वापरायची कल्पना आवडली.
मस्त , छान , आवडली ..
मस्त , छान , आवडली ..:स्मित:
अप्रतिम!!
अप्रतिम!!
खालिदसाहेब, आणखी एक गुरु
खालिदसाहेब, आणखी एक गुरु लाभला हो आम्हाला !
मस्त फोटोग्राफी व टेक्निक्स
मस्त फोटोग्राफी व टेक्निक्स
ख र च जबरी... मस्त आहे
ख र च जबरी...
मस्त आहे फोटुग्राफी तुमची... पहिल्याच बॉलला सिक्सर...
अजुन येऊ द्या..
मस्त फोटो ! फोटोग्राफीतलं
मस्त फोटो ! फोटोग्राफीतलं काहीच कळत नाही....आणि इतकं सुंदर कळणार्यांबद्दल आदर वाटतो !
एकदम भारी आहेत हो प्रचि.
एकदम भारी आहेत हो प्रचि.
व्वाह! झकासच! फोटोवर हलकेसे
व्वाह! झकासच!
फोटोवर हलकेसे वॉटरमार्क टाकत चला मालक.
एखादा हिरो आपल्याच नावावर तुमचे फोटो खपवण्याचा प्रकार घडू शकतो इंटरनेट वर... माहिती असेलच.. तरीही....
मस्तच
मस्तच
प्रयत्न "अप्रतिम" आहे.
प्रयत्न "अप्रतिम" आहे.
आवड्ले सर्व प्रचि.
अप्रतिम फोटो. वॉटरमार्कसाठी
अप्रतिम फोटो.
वॉटरमार्कसाठी ऋयामला अनुमोदन.
व्वाह खालिद मिंया व्वाह
व्वाह खालिद मिंया व्वाह !
तुम्हारे हाथ किधर है ?
खालिद.. छानच प्रयोग केले
खालिद.. छानच प्रयोग केले आहेत.. नि त्याबद्दल लिहीले हे विशेष !!! आवडले सगळे फोटो
फोटो आवडले. वॉटरमार्कबद्दल
फोटो आवडले. वॉटरमार्कबद्दल अनुमोदन.
छान आहेत सगळे फोटो
छान आहेत सगळे फोटो
वाह छान
वाह छान प्रयोग...
वेल्डींगच्या काचेला अजून काही पर्याय आहेत का...
फिल्टर म्हणून वापरण्यासाठी
पहिल्या फोटोमधले सेपिया ट्च
पहिल्या फोटोमधले सेपिया ट्च देण्याआधीचा फोटो टाकू शकाल का ? welding glass ची क्लुप्ती मस्त आहे.
Pages