फेसबुक प्रोफाईल
http://facebook.com/idonotlitter
हा प्रोफाईल तुमच्या फ्रेंड लिस्ट मधे अॅड करता येईल.
अजुन तिथे मजकुर लिहिलेला नाही. पण ते काम चालू आहे.
वेगळा प्रोफाईल बनवण्याची कारणे-
- एक नविन आय्डेंटीटी देता येईल.
- वेगळे पेज बनवता येईल
- भविष्यात अजुन काही ग्रुप्स वगैरे बनवायचे असल्यास तेही शक्य होईल
- कोणा एकाच्या नावावर ओनरशीप न रहाता, सगळ्यांचा उपक्रम वाटेल.
या ग्रुप द्वारे काय साध्य करायचे आहे-
आपल्यासारखे शिक्षीत आणि सुजाण लोकही बर्याच वेळा कचरा रस्त्यात, बागेत, ट्रेनमधे टाकतात. केवळ हा कचरा टाकला नाही तरी कितीतरी ठिकाणं आहे त्या पेक्षा स्वच्छ रहातील. तर स्वतःपासुन हि सुरुवात करुन तुमच्या घरातले, मग तुमचे शेजारी, मित्र मैत्रिणी या सगळ्यांमधे हे लोण परवायचे आहे.
मान्य आहे काही लोकांना कायद्याचा बडगा हवाच, किंवा आपण हे करुनही १००% कचरा संपणार नाही. पण आपण सुरुवात तर करुयात. आपण हि सुरुवात केली तर हळुहळू बदल दिसतीलच आणि आपल्यालाही स्वच्छ परिसराची मागणी करण्याचा, कायदे दाखवण्याचा अधिकार मिळेल.
केवळ रस्त्यात कचरा आहे म्हणुन मी टाकला तर काय फरक पडणार असे प्रत्येकाने म्हटल्यास काहीच बदल होणार नाही हे आता पर्यंत पाहिलेतच ना. किंवा झाडुवाले येऊन साफ करणार आहेत, मग मी कशाला त्रास करुन घेऊ असा विचार करत राहीलो तर सगळे परिसर स्वच्छ ठेवायला दहा जणांमागे एक झाडूवाला असे प्रमाण ठेवावे लागेल. ते कुठल्याच सरकारला म्युनिसिपालटीला शक्य नाही. जर आपण परिसरात कचरा कमी केला तर कदाचित व्यवस्थेवरचा ताण कमी होऊन आणखीन सोयीही मिळू शकतात.
काय प्लान आहे -
- या प्रोफाईल वरून महिन्यातून एकदा/ दोनदा (जास्तीही चालेल) जाहिराती सदृष्य चित्रे प्रसारित करायची आहेत. ज्यामुळे हा विषय लोकांच्या लक्षात राहील, समोर येत राहील.
- तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात जर या समस्ये साठी आवाज उठवलात. किंवा अगदी स्वतः कचरा रस्त्यात टाकला नाहीत तरी ते सुद्धा इथे येऊन या वॉल वर पोस्ट करता येईल. जितक्या जास्त पोस्ट तितक्या चांगल्या.
- तुम्हाला वाईट अनुभव आले तर तेही लिहा. कदाचित तुमच्याशी वाईट वागणार्या लोकांच्या वाचनात हे येऊ शकते.
- जर तुमच्या कडे काही इंग्रजी मधुन वगरे लिखाण असेल, कचरा व्यवस्थापना बद्दल लेख असतील, अनुभव असतील तर ते इथे शेअर करा.
- तुम्ही तुमच्या आसपास, सोसायट्यांमधे, मित्र मैत्रिणींच्या ग्रुप मधे मिळुन काही उपक्रम केलात तर इथे कळवा.
- ट्रेकिंग ग्रुपने मिळुन एखादा उपक्रम केलात किंवा ट्रेकिंगला गेल्यावरही तिथे कचरा न करता स्वतःचा कचरा परत आणलात तर ते इथे लिहा.
- तुम्ही शाळा कॉलेजेसशी संबंधीत असाल तर तिथेही या ग्रुप बद्दल, आपल्या योजने बद्दल बोला. जितक्या तरुण किंवा शालेय मुला मुलींना जागरूक करता येईल तितके चांगले.
- याच कारणासाठी दुसरे ग्रुप असतील ते तेही एकत्र जोडता येतील.
- आणखी काही कल्पना आहेत या ग्रुपमधे करण्याच्या ज्या जमल्या तर हळुहळू टाकत जाईन.
अजुन काय मदत हवी आहे -
- चित्रे/ जाहीराती करण्यासाठी मदत हवी आहे. काही कल्पना आहेत. कोणाला इच्छा आणि वेळ असल्यास हे काम करता येईल
- मजकुर लिहिण्यासाठी, प्रोफाईलवर टाकण्यासाठी चांगले लिखाण हवे आहे.
- तुमच्याकडुन अजुन कल्पना हव्या आहेत.
- सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा सक्रिय सहभाग हवा आहे. हे माझे एकटीचे काम नाही.
मी अॅज अ फ्रेंड रीक्वेस्ट
मी अॅज अ फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली आहे ..
मस्त कल्पना
मस्त कल्पना
सावली, रिक्वेस्ट पाठवली आहे,
सावली, रिक्वेस्ट पाठवली आहे, मी तुला मजकूर तयार करायला मदत करु शकते.
छान आहे................माझ्या
छान आहे................माझ्या ग्रुपच्या लोकांना सुध्दा सांगेन............४५ आहेत आता पर्यत ............ लोचा असा आहे कि मी अॅड करु शकत नाही ............३० दिवसांसाठी मी ब्लोक आहे फेसबूक वर............
सावली, प्रोफाईल पेक्षा पेज
सावली, प्रोफाईल पेक्षा पेज तयार केलं असतं, तरी चाललं असतं ना?
म्हणजे सगळ्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट मॅनेज करायला लागणार नाहीत.
पेज वर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. मायनस फ्रेंड रिक्वेस्ट मॅनेजमेंट. ते लाईक केलं, की झालं..
रिक्वेस्ट अप्रुव्ह केल्या
रिक्वेस्ट अप्रुव्ह केल्या आहेत.
उदयवन हरकत नाही, तुम्ही ३० दिवसांनीही जॉईन होऊ शकता.
शैलजा, तुला वेगळे इमेल पाठवतेय. प्लिज बघशिल का?
ऋयाम पर्सनल आणि हा उपक्रम वेगळा ठेवण्यासाठी मी वेगळे प्रोफाईल केले. शिवाय अजुन जास्त लोकांना अक्सेसही देता येईल. इमेल पत्ताही नविन केला आहे. यातही पेज तयार केले तर ते पब्लिकली बघता येईल ना? आणि लाईक बटन टाकता येईल ना? खरच प्रोफाईल पेक्षा पेज बेटर असेल तर सांग, अजुन सुरुवातच आहे. किंवा बेटर मॅनेजमेंटसाठी काही असेल तर सांग प्लिज.
धन्स ग आठवणीने रि. पाठवल्या
धन्स ग आठवणीने रि. पाठवल्या बद्दल.
माझ्या कडून करण्यासारखी (मला जमण्यासारखी :P) कोणतीही मदत करायला मी तय्यार आहे
ट्रेक मधे तर आम्ही कटाक्षाने "कचरा न करणे आणि करुही न देणे " हे पथ्य पाळतोच. पण मलाही अगदी त्रयस्थ व्यक्तीला सांगायला संकोच वाटतो हे खरय.
कविता धन्यवाद तुम्ही जे काही
कविता धन्यवाद
तुम्ही जे काही ट्रेकमधे वगरे करता ते या ग्रुपच्या वॉल वर नक्की लिही. (मराठी, इंग्लिश कसेही चालेल.) त्याने इतरांना इन्स्पिरेशन मिळेल हे नक्की.
शिवाय तु सानिकाच्या शाळेत याबद्दल बोललीस किंवा तिथे काही करत असतील तर तेही लिही.
इंग्लिश मजकूर आणि इमेजेस टाकेन तिथे लवकरात लवकर.
मी देखील पाठवली आहे
मी देखील पाठवली आहे रिक्वेस्ट.
आणि हो वरचं टायपाच्या आत
आणि हो वरचं टायपाच्या आत अप्रूव देखील झाली.
उद्यवन तुम्हांला का फेसबुकने
उद्यवन तुम्हांला का फेसबुकने ब्लॉक केलंय बर?
रिक्वेस्ट अप्रूव झाली.
रिक्वेस्ट अप्रूव झाली.
छान उपक्रम
छान उपक्रम
ka...block kele...karan
ka...block kele...karan ki.... anolkhi lokkanna request pathalelya tya jast nakar milala... mhanun
धन्यवाद!
धन्यवाद!
सावली, मेल पहाशील?
सावली, मेल पहाशील?
(No subject)
शैलजा, धन्यवाद. पाहाते आणि
शैलजा, धन्यवाद. पाहाते आणि तुला रिप्लाय करते
सावली.. मस्त मस्त
सावली.. मस्त मस्त
सावली, फ्रेंड रिक्वेस्ट
सावली, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे.
मी (इकडे न विचारता) माझ्या
मी (इकडे न विचारता) माझ्या प्रोफाईलवर, या प्रोफाईलला अॅड करा असा तत्सम मेसेज टाकलाय. आय होप असे केलेले चालेल.
फ्रेंड्स लिमिट वगैरे असते का? तसे असेल तर काय करणार?
नक्कीच चालेल बस्के लिमिट
नक्कीच चालेल बस्के
लिमिट नाही असे मला वाटते.
जितके जास्त लोक बघतिल आणि बघत रहातील तितके चांगले त्यामुळे प्लिज प्रमोट करत रहा
मायबोलीबाहेरच्या
मायबोलीबाहेरच्या उपक्रमांची/वेबसाईटची माहिती देण्यासाठी कानोकानी विभागाची सोय केली आहे. ही माहिती तिथे भरून आपण पुढे चालू ठेवू शकता. उपक्रम कितीही चांगला असला तरी तो अशा रितीने इथे चालू ठेवणे मायबोलीच्या धोरणात बसत नाही.
फेसबुकवर तुम्हाला जो प्रतिसाद मिळू शकेल तो मायबोलीवर मिळू शकणार नाही याची कल्पना आहे.
मायबोलीवरच्या या ग्रूपची मूळ संकल्पना, अशा प्रकारचे उपक्रम इथे मायबोलीवर राबवता येणे सोपे व्हावे अशी होती. पण त्याऐवजी या ग्रूपचा उपयोग दुसरीकडे आणखी एक वेगळा ग्रूप सुरु करणे असा होत असेल तर या ग्रूपचा मूळ उद्देश बाजूला रहातोय.