अविश्वास ही...........

Submitted by कल्पी on 19 April, 2011 - 11:12

अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
खरं माहीत झाल्यास
काय प्रतिक्रिया असेल त्याची
स्विकारेल
की झिडकारेल
संभ्रमावस्थेत होती
प्रामाणिकपणा तर आपल्याला
कुणी शिकवलाच नाही
मग आज अचानक ही भावना
का आली उफ़ाळुन
कदाचीत माझं संस्कारक्षम मन
अजुनही जागे आहे
की प्रेमाची हलकी झुळुक
कारणीभुत झालीय?
काही का असेना ,मी माझा पुर्वैइतिहास
सांगणार,
माझ्या प्रेमाला अंधारात का ठेऊ मी?
अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
नाहीच मुळी..................!

...........................................................................
जागी झाले
तेव्हापासूनच
"छुणछुण" आवाजाशी मैत्री झाली
रात्रीच फ़क्त
आमच्या घरात दिवस व्ह्यायचा...........
आई विड्याचा तोबरा तोंडात भरायची.....
मी तिला "आई’ म्हणायची
पण तिच्या नजरेत तो "झरा"
मी कधीच बघितला नाही
सांज व्ह्यायला आलीना की
तबल्यावर थाप ऐकु यायची
हळूहळू ही थाप ताल धरायला लगायची
आणि रेशमी परदे
आपापासात कुजबूजू लगायचे ..........
सतत बघुन बघुन
पडद्यांची भाषा मला कळू लागली होती

.......................................................

रेशमी नाजूक पडदा
हळूवार हलायचा
अन येणारे गंध
माझ्या श्वासात मिसळायचे
त्या कोवळ्या वयात त्या
श्वासांचे अर्थ लागत नव्हते
आईने सांगेतले होते
म्हणुन परदा सरकऊन कधीच
आत बघितले नाही
मला एकटीला चौकोनी खोलीत
ठेऊन आई
परद्याआड जायची..................
मी पुन्हा एकटी
भिंतीना आपले सोबती
समजून बोलायचे
आणि मध्येच पडदेही हलून
मला प्रतिसाद द्यायचे...............
भयावह शांतता नाही....
पण घुंगरू "छुणछूण" करून
आमच्या मैत्रीची ग्वाही द्यायचे....
मला देखील घुंगरूंचा चाळा करायला
आवडत होते
भविष्यात घुंगरू हेच माझे विश्व असेल"
आईने शिकविले होतेच...........
..........................................................................

रात्र चढली की
आमच्या घरचा दरबार
मला विसरून जायचा
मला तहान लागली म्हणुन मी
आतल्या खोलीत जाते
पाणि प्यायला
पाण्याचे पातेले
एकदम उंचावर
टाचा उंच करून
मी बघते आत
पाण्याचा एक थेंबही नाही
हातातून ग्लास पडतो
कांच चकणाचूर होते
आवाजाने
आईला काय त्रास झाला
कुणास ठाऊक
परद्याआडून ओरडते
"कार्टे"
मी मला तहान लागली आहे
हे विसरूनच जाते..........

दरदरून घाम फ़ुटला
पोटात खोल खड्डा पडला
मला कळत नाही
आई तिथुनच का ओरडली
माझ्या साठी
काही करायला तयार आहे
असं नेहमी म्हणते
आणि मी घाबरलेली असताना
मला जवळ का घेत नाही
अशी असते काय आई
सारखी म्हणत असते...............
तू लवकर मोठी हो............
मला आता आराम करायचा आहे
रेशमी पडद्यात तोंड लपवून
का बोलते ही.........
.............................................................

आता मला स्पर्षाची
मायेच्या मायेची गरज आहे
किती एकटे एकटे
डोक्यावर सावली नसल्यासारखे
वाटते मला
माझ्या मनात काहीतरी सुरु आहे
मोठ्यान रडाव का
ओरडावं
काहिच नाही समजत
ईतकी आई कैदासीन असते
नाही नाही .............
हे माझी आई नसलच
नाहीतर माझ्या डोक्यावरुन हात
फ़िरवला असता
मला पोटाशी घेऊन
"बाळे काय झालं" ईचारल असतं ना
तिचा परदा हालला का
माझ्या पोटात धस्स काऊन होते............

क्रमश:

गुलमोहर: 

कल्पे, छान लिहले आहेस, कथा नयिकेची परिस्थिति कळंत आहे, आपल्या प्रिय 'व्यक्तिविशेष' ला उद्देशुन ती तिची वास्तविक परिस्थिति 'कवितेतुन' "कथन" करत आहे. कारण,

अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
नाहीच मुळी..................!

कल्पी.., नक्की तुला हेच सुचवायचे आहे ना..?

{पुढचा भाग प्रकाशित करशील तेव्हा माझ्या "विपुत" लिंक देण्याचा त्रास घेशील का..?}

फारच सुंदर!

हिला कविता म्हणावे असे का म्हंटले जात असावे हे मला माहीत नाही.

उलट अनेक कवितांना कथा म्हणायची वेळ आलेली आहे असे मी एक कडवट विधान करतो.

हो तेच, सेम पिच 'भुषणराव'..!

फक्त ' ओळ्यांची रचना' कविते प्रमाणे आहे, म्हणुन ती 'कविता' होत नाही.

कवितेतुन 'कथा' (इथे 'कविता' म्हणणेही चुकचेच आहे) कथन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कल्पीने उत्तमरीत्या केला आहे.
पण उपरोक्त काहींनी या 'कथेचा' 'अर्थ' 'कविता' असा लावलेला आहे असे दिसते.
[अगदी वयक्तिक मत]

पोटात धस्स अन खोल खोल
खड्ड्यात पडत आहोत असे
भास तर नेहमिच होतात
निपचित चिडीचूप
मछ्चरदाणित पडून
मी फ़क्त खिडकीतून
जेवढं आभाळ दिसतं तेवढच
आणि नजरेत उतरतिल तेवढ्याच
चांदण्या
मनात उतरवत जाते
रात्रभर सताड उघडे डॊळॆ
अन सावध कान
उगाच रेशमी परद्याआडचे आवाज
एकट्यात ऐकत असते
मनात अनामिक
कुतरओढ
वाढवत जाते
घामाचे थेंब अन आसवाची ओल
उशी माझी ओली करत राहते ............
कल्पी जोशी
03/01/2010

तेव्हापासून "ती " मला
(ती नाहीतर काय
मला ती का माहीत नाही
माझी आई वाटतच नाही)
डोक्याला तांब्या पेला
तोही पितळेचा
काळवंडलेला..........चकाचक नसलेला
माझ्या उशाला ठेवायला सांगते
"राम्याला"
राम्या न विसरता हे काम
चोखपणे बजावतो........
जाताना मिणमिण्या छोटा दिवा
बंद करायला पण विसरत नाही
कारण रेशमी परद्याआडून आवाज
देते नी ती ............
राम्या अर राम्या
तोंडावर उजेड पडलाय बघ
तिच्या या वाक्यावर
कोण ते ?फ़िदीफ़िदी हसलं
अन म्हणतो ...............नाही सांगता येत
मी धापा टाकू लागते
आपसूकच ..........
अन तरीही
कान टवकारलेच................मी
कल्पी

ऑर्कूटवर ही काव्यश्रूंखला वाचली होती.

आता या काव्यश्रूंखलेचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. कल्पीताईंचे त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !

कल्पी, पुस्तकाबद्दल अभिनंदन Happy

हे काव्य आहे की गद्य आहे त्याबद्दल काही बोलणार नाही कारण मला त्यात जास्त कळत नाही. पण जे काही यात कथन केलं जात आहे त्याचा अंत काय असावा याची उत्सुकता मात्र लागली.