मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विको वज्रदंतीवाल्याच्या अतिटुकार जाहिराती बघुन हसायला येते. त्याला चांगला डायरेक्टर गाठुन दिला पाहिजे.

कधी कधी अतिटुकार जाहिराती मुळेच ती जाहिरात लक्षात राहात असेल तरी जाहिरातीचा उद्देश तसा सफल झालाच म्हणायचा.

जसं सध्या पेपर मधे जवळजवळ रोज अगदी पहिल्या पानावर मोठ्या साईज मधे टोरेक्सच्या जाहिरातीत अंजु महेन्द्रु, जगजीत सिंग आणि ओम पुरी यांचे प्रफुल्लीत चेहरे पाहून सकाळ किती प्रफुल्लीत जाते!!

>>जसं सध्या पेपर मधे जवळजवळ रोज अगदी पहिल्या पानावर मोठ्या साईज मधे टोरेक्सच्या जाहिरातीत अंजु महेन्द्रु, जगजीत सिंग आणि ओम पुरी यांचे प्रफुल्लीत चेहरे पाहून सकाळ किती प्रफुल्लीत जाते!

Proud आणि उरलेल्या दिवशी ती केटोमॅकची अ‍ॅड येते. त्या बाईचा चेहेरा पाहून पाहून वैताग आलाय अगदी. Sad त्याची रेडिओवरची अ‍ॅड तर अफलातून आहे - डॅन्ड्रफ झाला असेल तर निघून जाईल आणि नसेल तरी कधी होणार नाही Happy

विश्वकपच्या धामधुमीत दाखविल्या जात असलेल्या अनेक जाहिरातीपैकी एका विमा कंपनीची 'मुलाच्या शिक्षणा' विषयीची जाहिरात वेधक आहे. पहिली-दुसरीला असताना मुलाची २,००० रुपये फी देणे आहे असे सांगणारी पत्नी आणि ती रक्कम म्हणजे काहीच नाही अशा थाटाची मुद्रा करणारा सुखी पती. तर पुढे आता मुलगा मोठा होऊन समवयस्क मित्रांच्या गराड्यात आहे आणि आता पत्नीने 'सुनिये बंटीके कालेज फी के लिये १० लाख देने है |' असे सुनावताच आता डोक्याला टक्कल पडलेल्या पतीमहाशयांना दहा लाखाचा आकडा ऐकून झटका येऊन त्यांचे डोळे मिटतात. मग निवेदकाचा आवाज > अपत्यांच्या शिक्षणासाठी अमुकतमुक विमा पॉलिसी घ्या, इत्यादी.

यातील कौटुंबिक वातावरण एकूणच मजेशीररित्या चित्रित केले गेले आहे.

ओनिडाच्या जाहिरातीत सारखं टीव्ही आणि कॉम्युटरसमोर बसून त्या लहान मुलाचे डोळे लाल होतात तर त्यावर तोडगा काय तर म्हणे ओनिडाचा नवा टीव्ही - ज्याने डोळ्याला जास्त त्रास होत नाही. अरे त्यापेक्षा टीव्ही बघणं कमी करा ना. काय संदेश जातोय लोकांना. Sad

कॅडबरीच्या नव्या खाने के बाद कुछ मीठा हो जाए जाहिरातीत आजीचा आवाज नीना कुलकर्णीचा वाटतोय. पडद्याव्र दुसरीच बाई आहे.
आजी म्हणते कॅडबरी आहे ना आणि नात म्हणते पर जूठा है.....

जपान सुनामी हाहा:काराच्या पार्श्वभूमीवर आता ऋतिक रोशनची हीरो होंडा धक धकची जाहिरात. या वाघ्याची टोपी सुनामीच्या वादळात उडते तर हा न डगमगता हीरो होंडावर स्वार होतो आणि सुनामीच्या प्रलयांकार लाटांच्या पोटातून सुसाट वेगाने होंडा हाकतो आणि त्याच चक्रीवादळात ती लकी टोपी परत मिळवितो. त्याच्या "नीडरपणा"पुढे सुनामी 'थंड' होते.

इतरवेळी ही जाहिरात पाहताना काही तरंग उमटले नसते पण आज ते गणित बदलले आणि ही जाहिरात आता हास्यास्पद वाटू लागली आहे.

सध्याची ती 'डेरी मिल्क" कॅडबरी ची जाहिरात फार खटकते. त्या तली ती छोटी आगाऊ मुलगी, जेवण वाढलेलं असतानाही जेवत नाही आणि तिची आई कौतुकाने कॅडबरी देते. आणि सगळ्यांबरोबर वाटून खायची वेळ आल्यावर ती मुलगी लगेचच उष्टावते.. फारच आगाऊ मुलगी ती.. आणि त्यावर कळस म्हणजे तिची आजी तिला शेवटी सॉरी म्हणते..!!!! ही जाहिरात बघून घरातली लहान मुलं अजून आगाऊ होतील... कुछ मीठा वगैरे होणार नाही..!!!

फारच आगाऊ मुलगी.... तिच्यापेक्षा शाहरुखच बरा, नेहमी पप्पूला सांगत असतो 'खाने के बाद ब्रश करना जरूरी है'..... उगाच नाही तो ईतका मोठा अ‍ॅक्टर बनला Proud

कुठल्याही टिव्हीची जाहिरात ज्यात दाखवतात की त्यांच्या टीव्हीत रंग कसे शार्प दिसतात, चित्र किती क्लीयर दिसतं. अरे जर याच माझ्या टीव्हीत मला हे रंग शार्प आणि चित्र क्लियर आहे हे दिसतय तर मी तो दुसरा टीव्ही का घ्यावा? Uhoh

>>फारच आगाऊ मुलगी

अगदी अगदी अगदी. आणि आत्ताची नवी अ‍ॅड पाहिलीत का? मला त्यात काहीतरी घोळ दिसतोय. म्हणजे साधीसरळ अ‍ॅड वाटत नाहिये ती Sad त्यापेक्षा आधीची अ‍ॅड बरी म्हणायची वेळ आली.

आजकाल जाहिराती मुलांचे गुरुवर्यपद चालवतात. कॅडबरीची ती जाहिरात बघून घरोघरच्या मुलांना जेवणाला नाके मुरडायचे आणि त्याऐवजी (एकट्याने ) कॅडबरी खायचे शिक्षण मिळेल.

एका कुठल्यातरी मोबाईलची जाहीरात आहे. कार्बॉन का कायतरी. नक्की आठवत नाही
एक मुलगा दुकानात पैसे देतो. पण त्याच्याकडे सामान्य मोबाईल असतो. काउंटरवरची मुलगी त्याला सुट्टे पैसे नसतात म्हणून चॉकलेट देते.
दुसरा मुलगा त्याच्याकडे कार्बॉन मोबाईल असतो त्याला सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट न देता कंडोमचं पाकीट देते.

काय घाणेरडा प्रकार आहे Angry
पुन्हा जी जाहीरात दिसली तर मी Advertising Standards Council of India कडे तक्रार करणार आहे.

मंद्या LAVA mobiles Proud

आणि ती १७६० वेळा दाखवतात .... अजून केली नाहीस तक्रार ??? Proud

मंदार तुझी पाहण्यात चूक झालीये...
पहिल्या सीनमध्ये तो पुरुष होऊ घातलेला मुलगा असतो आणि दुसर्यात पुरुष (संदर्भासाठी पहा...सांगायची गरज आहे का :))..
मला ती बरेच दिवस लाव्हा कंडोमची अॅड आहे असे वाटत होते. पण लिंक लागत नव्हती की पहिल्याला चॉकलेट का म्हणून दिले असेल...:G

अरे त्यांना सांगायचे असेल की १८ वर्षाखाली असाल तर चॉकलेटच खा...कायद्यानुसार ते संमत नाहीये..आणि पुरुष असाल तर मग...:)
अर्थात तो पहिला मुलगा १८ वर्षाखालच वाटत नाही. त्या बयेचे परस्पेक्टीव्ह काहीतरी वेगळे असतील. आपल्याला काय करायचे.
त्या जागी एखादा पुणेकर असता तर म्हणाला असता सुट्टे नाहीत म्हणून दुकानतली वस्तू खपवता का..
आय डोंट केअर..मला दोन रुपये सुट्टे द्या नाहीतर दुसर्या दुकानात जातो. अहो आमच्या साहेबाला सुद्धा ऐकत नाही मी..तुमचे काय म्हणून ऐकू इ.इ. Biggrin

सध्या आयपीएलच्या धबडग्यात दाखविल्या जात असलेल्या विविध जाहिरातीतील 'एअर टेल' ची जाहिरात सुंदरच आहे. मिलिटरीतील कॅप्टन मोबाईलवरून प्रेयसीसमवेत लाईव्ह चॅट करताना 'इथे तुझ्या खांद्यावर एक तीळ होता ना?' असे विचारल्यावर तीळ दाखविता दाखविता ती त्याला मिलिटरीच्या कॅप्टनचे आपले लक्ष सर्वत्र किती चोख असले पाहिजे हे सुनावते व तो वरमतो.

सुंदरच !

>>अर्थात तो पहिला मुलगा १८ वर्षाखालच वाटत नाही.

आणि ज्या माणसाला ती Condom देते त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव इतके इनोसन्ट आहेत की पहिल्यांदा ही अ‍ॅड पाहिल्यावर हा माणूस तिला "हे काय?" म्हणून विचारेल असं वाटलं मला Proud Separates Boys From The Men म्हणे. कैच्या कै.

फॅन्टाची अ‍ॅड - अ‍ॅनिमेटेड - टुकार आहे. नोकियाची अ‍ॅड तर इतकी भिकार आहे की त्यांच्या कल्पनादारिद्र्याची कीव यायला लागते. Sad तसंच कोकाकोलाची ती Burrrr ची अ‍ॅड पण वैताग आणते.

यज्ञात हवन नवर्‍याने करायचं आणि बायकोने त्याच्या उजव्या हाताला आपला हात लावायचा अशी "प्रथा" आहे ना? Havells च्या नव्या अ‍ॅडमध्ये बायको होमात तूप घालतेय आणि नवरा तिच्या उजव्या हाताला आपला हात लावतोय असं दाखवलंय.

ह्प पण हॅवेल्सच्या सगळ्या जाहिराती मस्त आहेत. आधी ती भाकर्‍या भाजणार्‍या आईची सुद्धा.उत्तरपत्रिकेने /वर्तमानपत्राने वारा घेण्याची पण.

आजकाल एक अभिषेक बच्चन बघवत नाही तर आयडीया ३जी च्या जाहिरातीत तिघे तिघे दिसतात.

कॅडबरीची केस सुकवणारी बायको आणि बुट पॉलिश करणारा नवरा यांची मीठे में क्या है पण मस्त.

विश्वचषकाचे सामने आम्हाला इथे एका पाकिस्तानी चॅनेलवर दिसत होते. अर्थात जाहिराती पाकिस्तानी.
त्यांच्याकडची मॉडेल्स फक्त भारतातल्या कुणा नटासारखा दिसतो, यावर निवडत असावेत. त्यांच्याकडचा रणवीर कपूर (लूक अलाईक), शाहिद कपूर (लूक अलाईक ) अशी मॉडेल्स असतात.
पण एक बाब मात्र नक्कीच प्रशंसनीय, कुठल्याही जाहीरातीत स्त्रियांचे अंग प्रदर्शन नव्हते. आक्षेपार्ह अशी एकही जाहिरात दिसली नाही.

कॅडबरीची केस सुकवणारी बायको आणि बुट पॉलिश करणारा नवरा यांची मीठे में क्या है पण मस्त.

>>
अनुचमोदन...
ती केस धुवून येते आणि त्याच्या तोंडावर थेम्ब उडवते. तो विचारतो 'खानेमे क्या है?' ती हळू आवाजात काय म्हणते तेच कळत नव्हते (पलिकडे सा.बा. फ्रीजमधून काहीतरी काढीत असतात :))
आता कलले ती म्हणते 'करेला...'. नन्तर तो विचारतो 'मीठेमे क्या है?' फारच लोभस जाहिरात आहे.

हो खरंच. फारच 'मीठी' जाहिरात Happy
ती आणि एअरसेल ३ जी- फौजी मैत्रिणीबरोबर व्हिडियो चॅट करत असतो ती- दोन्ही खूप आवडल्या

Pages