Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ढेमशांना दिलपसंद नाव
ढेमशांना दिलपसंद नाव देणार्यास दाद दिली पाहिजे
एक बाळबोध प्रश्नः ढेमसे =
एक बाळबोध प्रश्नः
ढेमसे = टिंडे = तोंडली का?
नाही. वर दिलय ना टिंड्याच्याच
नाही. वर दिलय ना टिंड्याच्याच कृतीने ढेमसं करता येतील. माझ्या माहितीप्रमाणे ढेमसं कच्च्या हिरव्या टोमॅटोसारखी दिसतात. गोल गरगरीत असतात.
प्रज्ञा, ढेमसे = टिंडे. पण
प्रज्ञा, ढेमसे = टिंडे. पण ढेमसे = तोंडली नाही. हे बघ : http://en.wikipedia.org/wiki/Tinda
ढेमस्याची साधी गोडा मसाला
ढेमस्याची साधी गोडा मसाला घालून परतून केलेली भाजी पण छान लागते. हवं तर थोडं दाण्याचं कूट घालायचं आणी अगदी उतरवताना साय घालायची. फार छान लागते अशी भाजी.
हो हो सॉरी, तोंडली म्हणजे
हो हो सॉरी, तोंडली म्हणजे ढेमसं नाही. तोंडली मुडदूस झालेल्या घोसाळ्यासारखी दिसतात.
ओहो! अब कळ्या मेरेको! माझी
ओहो!
अब कळ्या मेरेको!
माझी एक गुजराती मैत्रीण होती, तिला मी एकदा तोंडल्याचं वर्णन करून सांगितलं. हिंदीत
, आणि तिने म्हटलं 'हां हां, वो टिंडा क्या!! ओके!" त्यामुळे मला वाटलं हेच ते!
तात्पर्य:
१. उगिच पदार्थांची/भाज्यांची वर्णनं करून सांगू नयेत.
२. येत नसेल तर दुसर्या भाषेत अजिबात सांगू नयेत!
थॅंक्यु प्रज्ञा!
थॅंक्यु प्रज्ञा!
तोंडली म्हणजे कुंद्रु टिंडे
तोंडली म्हणजे कुंद्रु

टिंडे वेगळे- कच्च्या टोमॅटोसारखे दिसतात. किंचित लव(?) असते सालीवर.
प्राजक्ता, राजगिर्याच्या
प्राजक्ता, राजगिर्याच्या पिठाच्या पुर्या पण छान होतात.पिठात लाल तिखट, जिरे, मीठ, थोडं दाण्याचं कूट
घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. प्लास्टीकच्या कागदावर छोट्या छोट्या पुर्या थापायच्या आणि तेलात/ तुपात तळायच्या. उपासाच्या गोड लिंबाच्या लोणच्याबरोबर मस्त लागतात.
रचू, तुम्हाला ऑलिव ऑईल
रचू,
तुम्हाला ऑलिव ऑईल कशासाठी हवे आहे? फोडणी करण्यासाठी वापरायचे असेल तर Extra Virgin Olive Oil आणू नका.
ब्रँड कोणता चांगला हे सांगणे जरा कठीण आहे. पण जवळपास एखादे Trader Joe's किंवा Whole Foods असेल तर तिथे मिळणारी सगळ्यात लहान बाटली आणून एखादी ट्राय केली तर कळेल की तुम्हाला ते आवडेल का ते.
मखाण्याच्या रेसिपी साठी
मखाण्याच्या रेसिपी साठी सगळ्यांचे धन्यवाद.
मिनोती, मला ऑलिव ऑईल फोडणीलाच
मिनोती,
मला ऑलिव ऑईल फोडणीलाच वापरायच आहे. ईथे Trader Joe's किंवा Whole Foods जवळ नाही. जे काही स्टोर आहेत त्यात लहान बाटली नाही, म्हणुन ईथे विचारलं.
मी बर्टोली चे extra light
मी बर्टोली चे extra light http://www.villabertolli.com/products/1003/extra-light-tasting.aspx
किवा capatrili che pure olive oil वापरते फोडण्याना. BJ's or pathmark मधे मिळेल.
बर्टोली, बरिला हे ब्रॅंड
बर्टोली, बरिला हे ब्रॅंड बर्याच ग्रोसरी मधे असतात. देशी स्वैपाकासाठी असेल ( फोडण्या, मोहन, तवा फ्राय किंवा त़ळणे ) तर अगदी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घेऊ नये. एक तर ते बरंच महाग असतं, स्वाद थोडा स्ट्रॉन्ग असतो अन फोडणी/ तळण प्रकारात त्याचा वास जास्त येतो.
व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल लिहिलेलं कुठंलंही तेल चालेल. अशा तेलाचा रंग अगदी फिकट पिवळा किंवा हिरवा असतो बहुतेक.
सॅलडस /पास्ता सॉस मधे घालायच्या तेलाचा रंग गडद हिरवा असतो.
जुन्या मायबोलीत दिनेशदांनी एक
जुन्या मायबोलीत दिनेशदांनी एक मायक्रोव्व्ह मधल्या सोप्या चॉकलेट केक ची रेसिपी लिहीली होती, ती मला आता सापडत नाहीये. मायक्रोवेव्ह केक मध्ये अन चॉकलेट केक मध्ये आहे ती नव्हे. बहुधा त्यांनी दुसर्याच कुठल्या तरी धाग्यावर दिली होती, पण मी त्या रेसिपीने केलेला केकच घरात आवडतो, त्यामुळे तीच हवी आहे, कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा.
मवा, हा -
मवा, हा - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/117897.html?1160995773
किंवा हा - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/122019.html?1186501471
शोधते आहेस का?
बर्टोली, बरिला हे ब्रॅंड
बर्टोली, बरिला हे ब्रॅंड बर्याच ग्रोसरी मधे असतात. देशी स्वैपाकासाठी असेल ( फोडण्या, मोहन, तवा फ्राय किंवा त़ळणे ) तर अगदी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घेऊ नये. एक तर ते बरंच महाग असतं, स्वाद थोडा स्ट्रॉन्ग असतो अन फोडणी/ तळण प्रकारात त्याचा वास जास्त येतो. >> फार अनुमोदन. ऑलिव ऑइल फक्त त्या मेडिटरेनिअन स्वयंपाकास वापरावे. हेल्दी म्हणून वापरायचे असेल तर सर्वच मेडि. डायेट फॉलो करावी लागेल. देशी स्वयंपाकात त्या ऑलिव ऑइलचे नाजूक फ्लेवर नष्ट होतात. महागाईचा मुद्दा पण अगदी बरोबर आहे.
नाही गं, हे दोन्ही पाहीले
नाही गं, हे दोन्ही पाहीले होते मी, ते नाहीत.
मी जे शोधतेय त्यात त्यांनी आधी लोणी + साखर फेटून घ्यायची, मग दुसर्या भांड्यात अंडी फेटून द्यायची, मग हे लोणी + साखर वालं मिश्रण त्यात टाकयचं. दुसरीकडे परातीत मैदा+बेकींग पावडर्+कोको पावडर हे चाळून घ्यायचं आणि हे सगळं हळूहळू थोडं थोडं घालत एकत्र करुन मग ८ मिनीट मायक्रोव्व्ह करायचं असं होतं. पण आता प्रमाण आणि इतर डीटेल्स आठवत नाहीये. म्हणून शोधतेय.
दही नव्हतं त्यात.
मवा, ही लिंक बघितली आहेस का?
मवा, ही लिंक बघितली आहेस का? http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/104098.html?1141089019
कुठे ठेवू गं तुला मंजू. अगदी
कुठे ठेवू गं तुला मंजू.
अगदी हेच हवं होतं, कित्ती कित्ती गुणाची बाय गं ती माझी.
.. खूप धन्यवाद.
मंजू, हे मला पण आठवत नव्हतं !
मंजू, हे मला पण आठवत नव्हतं !
कमाल आहे मंजू तुझ्या यादताश्त
कमाल आहे मंजू तुझ्या यादताश्त ची आणि शोधण्याच्या कौशल्याची. _/\_
मंजू _/\_ माझ्याकडे या
मंजू _/\_
माझ्याकडे या महिन्यापर्यंत संपवायला लागेल असा एक कंडेंन्सड मिल्कचा डबा आणि एक कॅडबरीचा चॉकलेट पावडरचा डबा आहे. मिल्क पावडर वैगरे आहे. पण मलई बर्फी नाही करायचीये या वेळी. काहीतरी दुसरं सुचवा.
सुक्या खोबर्याचे कंडेन्स्ड
सुक्या खोबर्याचे कंडेन्स्ड मिल्क घालून लाडू आणि त्याला अर्ध्यावर चॉकलेटचे कोटींग. किंवा आत चॉकलेट आणि बाहेरून खोबर्याचे कोटींग.
मिल्क रोज चहात घालून संपविता
मिल्क रोज चहात घालून संपविता येइल. नाहीतर चॉकोलेट आइसक्रीम. रेडिमेड मिक्स मिळते त्यावर सूचना असतातच व वरील पदार्थ त्यात खपतील नक्की. नाहीतर त्यासर्वाचा चॉकोलेट सॉस बनवून त्यात मेरी बिस्किटे डिप करतात व फ्रीज करतात. केक, लॅमिंग्टन्स किंवा खरेतर नुसतेच.
दिनेशदा, थोडंसं किचकट वाटतंय.
दिनेशदा, थोडंसं किचकट वाटतंय.

मामी, नुसतंच संपत नाहीये, दुधात घालून द्यायचा प्रयत्न चाललाय. पण तरीही या महिन्याअखेरपर्यंत संपायची चिन्हं नाहीत.
काही सोप्पं नाही सुचलं तर शेवटचा ऑप्शन केक आहेच.
बरं अजून एक. नवरा गुजासाठी खवा घेवून आलाय. खवा जरा जास्तंच आहे, किमान पाऊण किलो तरी असेल. सगळ्याचे गुजा केले तर संपणार नाहीत. थोडासा काढून ठेवतेय. येताजाता खाण्यात संपेल थोडा अन बाकी भाज्यांमध्ये घालेन. पण किती दिवस फ्रिझमध्ये ठेवता येईल खवा? मी कधीही २-३ दिवसांपेक्षा जास्त ठेवल्याचं बघितलं नाहीये.
सख्यांनो, गोडा मसाला
सख्यांनो,
गोडा मसाला फ्रीजरमधे किती दिवस टिकतो? आमच्याकडे केप्रचा इंडियन दुकानात दिसला म्हणून घाईने बरीच पाकिटे घेतली नि आता सर्रास मिळतोय. घेतलेला परत करणंही शक्य नाहीय. फ्रीजरमधे ठेवला तर टिकेल का वर्षभर?
सुमॉ, नीट सील केलेलं पॅकेट
सुमॉ, नीट सील केलेलं पॅकेट असेल तर टिकेल आरामात.
अल्पना, खवा फ्रिजमधेही ३
अल्पना, खवा फ्रिजमधेही ३ दिवसाच्या वर ठेवू नयेच.
आणि लाडवाचे काही कठीण नाही. सुक्या खोबर्याच्या किसात, दूध आणि थोडेसे तूप टाकून आटवायचे. लगेच घट्ट होते. मग त्याचे लाडू वळायचे.
कोरडी पावडर आणि थोडी आयसिंग शुगर एकत्र करुन ताटात घ्यायची व त्यात ते लाडु एका बाजूने घोळवायचे.
मधुरिमा, गोडा मसाला फ्रिजरमधे हवाबंद अवस्थेत सहज टिकेल वर्षभर.
Pages