या कातरवेळी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हा कार्यक्रम म्हणजे अगदी 'अपेक्षाभंग' होता.
.
'त्या कातरवेळी' हे नांव ऐकून तरी शहाण्यासारखे घरी बसायला हवे होते.
.
शुभारंभाचा प्रयोग जरी असला तरी जेव्हा आपण तिकिट लाऊन कार्यक्रम करतो, तेव्हा मध्ये मध्ये पूर्णपणे थाम्बून आठवणे (Blank होणे) हे अक्षम्य असते. वयापरत्वे असं होतें हे लक्षात घेतलं तरी. (त्यांचे वय ६७ वर्षे आहे).
.
कार्यक्रम Pessimistic आहे, हे नावावरून आपल्या लक्षात यायला हवे होते. पण तरी 'कणेकर' आहेत त्याअर्थी 'मृत्यू सारख्या विषयावरही' मस्त बोलतील अशी अपेक्षा होती. (भाऊसाहेब पाटणकर आठवा). Ann Frank ची रोजनिशी पण Depressing आहे, पण त्यात कुठेतरी आशेचा किरण दिसत असतो. माणसाची लढाऊ वृत्ती, एकामेकाना मदत करणे इत्यादी गोष्टी असल्यामुळे आपण ती वाचतो. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात देखील अशी काही कलाटणी मिळेल अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे 'दुसर्‍याला झालेले दु:ख' यापलिकडे त्यात काहीही जाणवले नाही.
.
एकदा म्हणतात की आमच्या आधीच्या पीढीने आमच्यावर राज्य केले, आता आमची मुलं करतात. आम्ही मात्र दोन्हीकडुन भरडलो गेलो. (बापाला प्रश्न विचारायची टाप नव्हती, आणि मुलाला प्रश्न विचारायची हिम्मत नाही). पण लगेच 'वडील कसे महान' यावर बोलणं, काय म्हणायचं आहे तेच कळत नव्हतं. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर 'रडवायचं आहे ना तर नीट रडू तरी द्या'.
.
मध्ये मध्ये जुने 'कणेकर' डोकावतात तेवढाच भाग बरा वाटला.
.
त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे 'अर्जूनाने शरसंधान करावं हा त्याचा धर्म आहे, विंचवाने नांगी मारावी हा त्याचा धर्म आहे'. मग त्यानी विनोदी बोलावं हा धर्म नाही का? असे विचारावेसे वाटले.
.
त्यांनी विनोदीच बोललं पाहीजे अशी काही जबरदस्ती नाही (अपेक्षा होती), पण जे ऐकलं ते 'दिशाहीन', Pessimistic आणि Pointless वाटलं, आणि तिथे निराशा(च) झाली...
.
आयुष्याच्या कातरवेळी माणसांचे विचार बदलतात. कणखर असलेली माणसं मऊ पडतात. नास्तिक माणसं आस्तिक आणि आस्तिक माणसं नास्तिकही होतात. हे सगळं मला मान्य आहे. पण अत्यंत विस्कळीत विचार, मी लेखक, व्याख्याता आहे, म्हणून लोकांनी ऐकावेत हे मान्य नाही. आणि नुसतंच दुसर्‍याचं रडगाणं ऐकायचंच असेल तर त्यासाठी मला भरपूर मित्र आणि नातेवाईक आहेत, असं मला वाटलं.

विनय देसाई

विषय: 
प्रकार: 

कनेक्टीकटला गेला होतास की काय प्रोग्रॅमकरता?

अगं कुठे आहेस..? शुभारंभाचा प्रयोग इथे बा. रा. त झाला की.....

ह्म्म, असेल असेल. मला काही कल्पना नाही. कुठे झाला बा.रा.त प्रयोग? कणेकरांना हसवणं आता झेपत नाही असं दिसतंय. पूर्वी त्यांची कणेकरी कधी कधी मस्त वाटायची आणि कधी कधी प्रचंड बोअर.

ह्म्म्म... सायोनाराला अनुमोदन. कणेकर कधी कधी अती करतात आणि पडतात. आमच्या कॉलेजमध्ये त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या दृष्टीने 'विद्यार्थ्यांना आवडतील' असे विनोद करायला सुरूवात केली, थोड्या वेळाने लोक उठून जाऊ लागले.

*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***

कोणीतरी लिंक पाठवली होती कणेकरांच्या त्यांच्या वडिलांवरच्या लेखाची. मला तरी तो लेख आवडला होता. कणेकर मेडिकल ला न गेल्याने वडिलांना झालेलं दु:ख, आई मागे मुलांना वाढवताना त्यांना आलेल्या अडचणी, कणेकरांचं सिनेमा अन क्रिकेटचं वेड यामुळे त्यांना वाटणारी काळजी अन या सगळ्याबद्दल कणेकरांना आता वाटणारा पश्चात्ताप अशी थीम होती लेखाची. अतिशय मन हेलावून टाकणारं लिहिलं होतं.
का कार्यक्रम म्हणजे त्याचीच ( पाणी घालून वाढवलेल्या आमटीसारखी) न्यू ऍन्ड इम्प्रूव्हड आवृत्ती असणार असं वाटतंय.

हो तो लेख मीही वाचला होता. छान होता.
विनय म्हणतो त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या शीर्षकावरूनच बोध घ्यायला हवा होता.
हे तर मालती पांडेच्या भावगीताचे शब्द आहेत.

मला नाही वाटत तुम्ही वाचलेला हा लेख असावा. 'ह्या कातरवेळी' हा लेख त्यांच्या चापटपोळी ह्य पुस्तकात सगळ्यात शेवटचा लेख आहे.
आणि कबुल आहे शिर्षक वाचुन बोध घ्यायला हवा होता पण हे काहि रडक किंवा depressing शिर्षक नव्हे. आयुष्याच्या संध्याकाळी कणेकर त्यांच्या शैलीत काय बोलतात हे ऐकायची उत्सुकता होती.
पण अतिशयच negative प्रवाहात कार्यक्रम पुढे सरकत होता. जर एखादी व्यक्ती वाईट मनःस्थितीत असेल तर ते सगळ ऐकुन तिच्यावर वाईट परिणाम होउ शकतो.
शेवटतरी आशादायी असेल अस वाटलेल.
असो.