बीजिंग आणी आसपास

Submitted by वर्षू. on 7 April, 2011 - 08:24

जवळ जवळ ३००० वर्ष वय असलेलं हे बीजिंग शहर,ऑलिंपिक्स मुळे नव्या तरुणाईने नटले असले तरी ,शहराचे अनेक भाग,गल्ल्या आपला ऐतिहासिक चेहरा अजूनपर्यंत टिकवून आहेत. बीजिंगला कितीदा भेट दिली तरी नेहमी काहीतरी नवीन (जे वर्षोनुवर्षं जुनं आहे) दिसतं.

तर इथे सामावेश करत आहे बीजिंग च्या हेरिटेज साईट्स चा

१५व्या शतकात मिंग डायनेस्टी च्या सम्राटाने बांधलेला हा राजवाडा. जिथे पाचशे वर्षं आम जनतेला आत जाण्याची मनाई असल्याने हा राजवाडा,'फॉर्बिडन सिटी'म्हनूनच आजतागायत ओळखला जातो.
बीजिंगच्या हृदयस्थानी असलेल्या या राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'माओ'चं हे जगप्रसिद्ध तैलचित्र पाहिलं कि वेगळाच थरार वाटतो.

आत शिरायला लागलेल्या रांगा

आतमधे शिरल्यावर दोन्ही बाजूला असणार्‍या एकसारख्या इमारती,मधे विस्तीर्ण पटांगण.

दि फेमस तिएनानमन गेट पासून दिसणारी फॉरबिडन सिटी

या विजिट मधे पांडा दर्शन ही घडले

आमच्याकडे मुळीच लक्ष न देता उदरभरणात गुंग झालेला पांडा

या पठ्ट्याने मात्र शेवटपर्यन्त आम्हाला तोंड दाखवले नाही..

ईसवी सनापूर्वी दोनशे वर्ष, चिन शी व्हांग ती या सम्राटाने ही भिंत बांधायला सुरुवात केली. त्यानंतरच्या सम्राटांनी भिंत बांधणे सुरुच ठेवले. शेवटी १८०० वर्षांनंतर ही ग्रेट वॉल पूर्ण झाली. पूर्वेला यलो सी पासून ते पश्चिमेला गोबीच्या वाळवंटापर्यंत पसरलेली ही ८००० + किलोमीटर्स येव्हढ्या लांबीची भिंत ,लांबून एखाद्या आळसावून पडलेल्या अजगरासारखी दिसते.

या भिंतीवर चढण्यासाठी तीन ठिकाणी सोय केलेली आहे. पायी, केबल कार आणी ट्रॉली वे. त्यापैकी हे केबल कार ने जायचं स्थान.

तिकडून तीन किलोमीटर उंचावर जाऊन सोडतात . इथून भिंतीचा सर्वोच्च बिंदू साधारण ८८० मीटर्सवर होता.तिथपर्यन्त पायी चढावे लागते.

केबल कार मधून दिसणारे उंच पर्वत..बर्फ आणी कडा़क्याच्या थंडीनंतर बोडके,रुक्ष,काळवंडलेले दिसत होते

From Forbidden city

From Forbidden city

From Forbidden city

परतीचा प्रवास

गुलमोहर: 

सगळेच छान आहेत, पण दुसरा फोटो विशेष आवडला Happy
खाऊगल्ली बघून ईईईईईई झालं होतं पण हे फोटो बघून परत चीन भेटीची इच्छा बळावलीये. वर्षू माझा विजा? Wink

धन्स लोक्स..
ऐ नितिन.. शब्द म्हंजे शॉर्ट अ‍ॅण्ड अ‍ॅप्ट असले पाहिजेत ना.. 'कोकणस्थांना लाजवतील इतके''.. Rofl पण मी ही कोकणस्थ असल्याने असं दिसू का आता Blush

ओ.हां.. आडो.. सरकारी शो रूम्स मधल्या वस्तू १००% जेन्युइन असतात.. मी स्वतः अश्या एंपोरियम्स मधून घेते. हे लोकं गॅरंटी कार्ड,सर्टीफिकेट,रीसीट इ.इ. सर्व वस्तू व्यवस्थित देतात. मात्र या ठिकाणीही बार्गेनिंग चालतं..

वर विचारण्याचा उद्देश्य एवढाच होता की आम्ही पर्ल फॅक्टरीमध्ये गेलो होतो तेव्हा बरोबरच्या एका मुलाला त्याच्या गर्लफ्रेंड्साठी अंगठी आवडली होती. त्याची किंमत त्यांनी ७०० डॉलर सांगितलं. त्याने आमच्या बरोबरच्या इतर लोकांना विचारलं. सगळ्यांनी त्याला सांगितलं की किंमत खूप जास्त होतेय. त्याने परत त्यांना जाऊन सांगितलं की मला नकोय, तेव्हा त्यांनी त्याला तीच वस्तू ३००-३५० डॉलर मध्ये दिली. Sad

वर्षुजी,
मस्त प्र चि.

सहजच, पायर्‍या चे प्र चि बघुन असं वाटलं कि महाराष्ट्रातल्या कोणत्यातरी डोंगरा वरचे देऊळाचे पायर्‍या आहेत कि कॉय. Happy

फोटोंच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळी ठिकाणं पहायला मिळतायंत... ती फक्त तुझ्यामुळे... (खाऊ(??)चे फोटो सोडून अर्थात... Proud

मस्त फोटो. पांडाचे तर लै खास. एक फेक ग्रेट वॉल शहराच्या बाहेर बांधली आहे खास टुरिस्ट लोकांसाठी !असे मी एका डॉक्युमेंट्रीत पाहिले होते. ते खरे आहे का? फोटो बरोबर वर्णन पण हवे बाई. Happy

अश्विनी.. म्हंजे तसं फेक गोष्टी बनवण्याबाबत चायनीज चा कुणी हात धरू शकत न्हाय..पण ,'फेक ग्रेट वॉल,''???

फेक ग्रेट वॉल संबंधी इथे पाहा
http://www.maayboli.com/node/24921

तुझ्यामुळे घरबसल्या चीनदर्शन होत आहे.पण एक सांग,तिथल्या राजकर्त्यांप्रमाणे तिथल्या लोकांनाही भारत द्वेष वाटतो का? फोटो छानच.

इथल्या लोकांच्या मनात भारतीयांबद्दल अजिबात द्वेष नाही .. उलट खूप कौतुक आहे. इकडे शाळांमधून हिन्दी चीन च्या वॉर बद्दल काहीही शिकवले जात नाही. चाळीशी च्या लोकांनाही या वॉर्बद्दल काही माहिती नसते.. Happy

वर्षु नील -अतिशय भव्य दिव्य आणि निव्वळ अप्रतिम वास्तू.तसेच अति उत्तम फोटो.मन तृप्त झाले
भव्य दिव्य आकार. नजर खूप लांबवर फिरवावी लागतेय एवढे भव्य दिव्य .! गंगटोकला अशा भव्य वास्तू बघितल्यात. आठवण झाली .
खूप प्रसन्न मन झालेय हे सर्व बघून .अगदी मनापासून आभार ..!!

धन्स प्रकाश
@ छाया.. इकडे थंडीचे दिवस असून हजारोंच्या संख्येने लोकं आली होती.. आम्ही लौकर गेल्याने अजून या चौकापर्यंत जास्त लोकं पोचले नव्हते Happy

Pages