जवळ जवळ ३००० वर्ष वय असलेलं हे बीजिंग शहर,ऑलिंपिक्स मुळे नव्या तरुणाईने नटले असले तरी ,शहराचे अनेक भाग,गल्ल्या आपला ऐतिहासिक चेहरा अजूनपर्यंत टिकवून आहेत. बीजिंगला कितीदा भेट दिली तरी नेहमी काहीतरी नवीन (जे वर्षोनुवर्षं जुनं आहे) दिसतं.
तर इथे सामावेश करत आहे बीजिंग च्या हेरिटेज साईट्स चा
१५व्या शतकात मिंग डायनेस्टी च्या सम्राटाने बांधलेला हा राजवाडा. जिथे पाचशे वर्षं आम जनतेला आत जाण्याची मनाई असल्याने हा राजवाडा,'फॉर्बिडन सिटी'म्हनूनच आजतागायत ओळखला जातो.
बीजिंगच्या हृदयस्थानी असलेल्या या राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'माओ'चं हे जगप्रसिद्ध तैलचित्र पाहिलं कि वेगळाच थरार वाटतो.
आत शिरायला लागलेल्या रांगा
आतमधे शिरल्यावर दोन्ही बाजूला असणार्या एकसारख्या इमारती,मधे विस्तीर्ण पटांगण.
दि फेमस तिएनानमन गेट पासून दिसणारी फॉरबिडन सिटी
या विजिट मधे पांडा दर्शन ही घडले
आमच्याकडे मुळीच लक्ष न देता उदरभरणात गुंग झालेला पांडा
या पठ्ट्याने मात्र शेवटपर्यन्त आम्हाला तोंड दाखवले नाही..
ईसवी सनापूर्वी दोनशे वर्ष, चिन शी व्हांग ती या सम्राटाने ही भिंत बांधायला सुरुवात केली. त्यानंतरच्या सम्राटांनी भिंत बांधणे सुरुच ठेवले. शेवटी १८०० वर्षांनंतर ही ग्रेट वॉल पूर्ण झाली. पूर्वेला यलो सी पासून ते पश्चिमेला गोबीच्या वाळवंटापर्यंत पसरलेली ही ८००० + किलोमीटर्स येव्हढ्या लांबीची भिंत ,लांबून एखाद्या आळसावून पडलेल्या अजगरासारखी दिसते.
या भिंतीवर चढण्यासाठी तीन ठिकाणी सोय केलेली आहे. पायी, केबल कार आणी ट्रॉली वे. त्यापैकी हे केबल कार ने जायचं स्थान.
तिकडून तीन किलोमीटर उंचावर जाऊन सोडतात . इथून भिंतीचा सर्वोच्च बिंदू साधारण ८८० मीटर्सवर होता.तिथपर्यन्त पायी चढावे लागते.
केबल कार मधून दिसणारे उंच पर्वत..बर्फ आणी कडा़क्याच्या थंडीनंतर बोडके,रुक्ष,काळवंडलेले दिसत होते
From Forbidden city
From Forbidden city
From Forbidden city
परतीचा प्रवास
सह्ही प्रकाशचित्रे
सह्ही प्रकाशचित्रे
वाह ! बघावं ते नवलच ! राजवाडा
वाह ! बघावं ते नवलच !
राजवाडा तर खासच !
ही अशी विशाल,अचाट,अजब भिंत बांधलीच का ? हे मात्र मला नीट कळालं नाही ..
हे काम किती लोकांनी केलं असेल ? त्यांना यात किती अडथळे,संकटे आले असतील ? सगळचं अजब !
अनिल्..त्यासाठी थोडा इतिहास
अनिल्..त्यासाठी थोडा इतिहास जाणून घ्यावा लागेल. चीन च्या साम्राज्याचं उत्तरेकडच्या टोळ्यांकडून संरक्षण करण्याकरता ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात ही भिंत बांधण्याचं काम चिन व्हांग ती या छिन डायनेस्टीच्या सम्राटाने सुरु केलं .लाखो मजुर(धरून आणलेले) इथे आणण्यात आले,कित्येक हे बांधकाम करताना मरण पावले . त्यांना या भिंतीतच चिणून टाकलेले आहे. शेवटी १८०० वर्षानंतर ही ८००० किमी. लांबीची भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले.
वर्षू, तुझ्या पोष्टी म्हणजे
वर्षू,
तुझ्या पोष्टी म्हणजे ना "बिना विजा बिना पासपोर्ट्..चायना की सैर". मस्त फोटो आणि त्याहून मस्त तुझ लिखाण..खूप मजा येते. गंमत म्हणजे आजच आमचे 'हे' भिंतीला भेट देता आहेत. दोन आठवडे कामानिमित्त चायना मधे गेलाय. जाम चायनावर खूष आहे माझा नवरा. भरभरून सांगतो त्यांच्या स्वच्छते बद्दल, कष्टाळूपणा बद्दल.
तुझे खाउ गल्लीतले फोटू बघून मी दोन हळदीराम, दोन खाकर्याची पाकिट टाकली त्याच्या बॅगेत. पण तो म्हणाला चायनात जेवण मस्त मिळत.
खूप दिवसांनी तुला लिहल!
माहिती हि खूपच सुंदर फोटो
माहिती हि खूपच सुंदर फोटो सुद्धा आवडले आवडले.......खूपच खर सांगायचा तर एवढी लोक येतात पण टापटीप पण होते रस्ते नाहीतर आमच्याकडे.
कल्पु, अगदी नेमकं लिहिलात
कल्पु,
अगदी नेमकं लिहिलात !
बिना विजा बिना पासपोर्ट्..चायना की सैर......वर्षु यांच्या सोजन्याने !
धन्यवाद वर्षूनील , ग्रेट
धन्यवाद वर्षूनील , ग्रेट चायनावॉल बघायची इच्छा पुर्ण केलीस , मायबोलीकरांसाठी भिंत चालवत आणलीस
Pages