गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा
There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी"
केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.
आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.
गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.
गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?
परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आता आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.
गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.
निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.
चिन्मय कुलकर्णी
चिन्मय
चिन्मय मित्रा, कृष्ण आणि शंकर याबद्दल तु जे विधान केलस आणि झक्की त्यावर घेतलेला आक्षेप हा सारासार विचार करता योग्य आहे. देवाच अनुकरण करु नये हे जे तुझ मत आहे ते मला आणि इतर बर्याच जणांना न पटण्या सारख आहे.कारण "तू म्हणाल्या प्रमाणेच प्रत्येक जण देवाबद्दल नवी थिअरी आणु शकतो" तरी पण देव हे करु शकतात आणि तुम्ही नाही करु शकत मग त्यांच अनुकरण करु नका. येथे प्रष्ण नुसत्या अनुकरणाच नसुन प्रष्ण आहे तो देवानी हे असे का केले? जर राम आणि कृष्ण अवताराचा विचार करता भगवान विष्णूनी हे दोन्ही अवतार मानव जिवन हे कस जगाव आणि ते मानव जिवन जगुन कस अंगिकारता येईल हे समस्त मानव जातीला पटवून देण्यासाठी घेतले आहेत (lead by example). जर त्याना अशक्य प्राय गोष्टी करायच्या असत्या तर ते मानव अवतार न घेता सुद्धा करु शकले असते. पण भगंवताना समस्त मानव जातीला हे पटवुन द्यायच होत की हे सर्व तुम्ही मानव असुन सुद्धा करू शकता त्या साठी देव असण गरजेच नाही पण आपल आचरण कस असाव हे दाखवण्या साठीच देवांनी हे अवतार घेतले. आणि त्यानी हेच सांगितले की माझ अनुकरण करा मग तुम्ही देखिल दैवत्वला पोहचु शकता. मानव काय करू शकतो आणि त्याला काय साध्य होउ शकत ह्याची उदाहरण आहेतच की जसे कृपाचार्य, विश्वामित्र आणि अनेक ऋशीमुनी येवधच काय तर अगदी आता आताच्य कळातली ही संतांची उदाहरण आहेतच की त्यानी जे केल ते सामान्य माणसाला शक्य आहे? आणि जादुगार जे करतो ते देखिल सामान्य माणसाला शक्य आहे का? पण म्हणुन मग जादुगार देव कींवा संत होत नाही ना आणि संत जादुगार. पण मग सत्य जाणुन घेण्यासाठी काय कराव लागेल तर त्या साठी कठोर ज्ञान साधना करावी लागेल मग विष प्राषन काय गोवर्धनही उचलू शकू कदाचित आपण . तर मुद्द असा आहे की देवानी काही गोष्टी केल्या आणि त्या का केल्या? जर गिता अर्जुनाला युद्ध कर सांगताना अंहीसा आणि त्याग ह्या बद्दल शिकवण देते तर त्यामागे काही तरी कारण नक्कीच आहे. मी आधी म्हंटल्या प्रमाणे त्या मागे सुद्धा काही prerequisites सुद्धा असावित जी आपल्याला तर्कशुद्ध विचार करून सुद्धा कळत नाही आहेत. त्यासाठी अजुन अध्ययनाची गरज नक्कीच आहे पण ते देव होते म्हणुन ते काही करु शकतात असे म्हणुन मी त्यावर सत्यशिधन न करणे म्हणजे स्वतःच स्वतःला फसवण्या सारखा नाही का? देवाना चुक की बरोबर ह्या गोष्टी लागु पडत नाही हे म्हणणे म्हणजे सत्यापासुन पाठ फीरवण्या सारखेच आहे. वेदवचने समजुन न घेता त्याची सत्यता पाडताळुन न पहाता त्याचे अनुकरण झाले तर ते अंधानुकरण आहे आणि ते फार घातक आहे. कुठल्या परीस्थीतीत काय निर्णय घ्यावा? मग वेदवचन काय आहे आणि कशा साठी आहे हे समजुन घेणे आत्यंतिक गरजेच आहे. जर प्रत्येक रुढींची आणि शास्त्र वचनांची कारण मिमांसा झाली नाही तर त्याचे अंधानुकरण होउन अनर्थ घडु शकतो. कुठ्ल्याही तत्वज्ञानावर मोकळेपणाने विचार होण खरच गरजेच आहे मग ती गिता असो कुराण असो गांधीवाद असो वा ओशोवाद असो. विचार मंथनातुनच उद्याच समाज घडणार आहे, मानव जातीचा उत्कर्ष साधणार आहे. विचारमंथनातुन प्रबोधनाची उदाहरण द्यायच झाल तर मग सती प्रथा, हुंडा प्रथा, विधवा विवाह ई. बरिच उदाहरण देता येतिल पण त्या साठी आधी मोकळ्या मनाने विचार व्हायला हवा जे नाही पटल ते सोडुन नविन अंगिकारण्याची तयारी असायला हावी.
तेंव्हा इथे मांडलेले विचार कींवा घेतले आक्षेप हे वयक्तीक नसुन ते वैचारिक आहेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि काहीतरी चांगला विचार पुढे यावा आणि तो तर्कशुद्धपणे सगळ्यांना समजवुन देता यावा म्हणुनच आहे. तेंव्हा सगळ्यांनाच विनंती वयक्तीक ताशेरे नको.
चिन्मय मित्रा तुझा लेख खरच छान आहे आणि जर तुला कुठले सत्य गवसले असेल तर ते तर्कशुद्ध रित्या इतरांना कसे पटवुन देता येईल ते बघ, वाद नको विचारांची देवाण-घेवाण महत्वाची.
शाकाहारा बद्दल मला बी चे म्हणणे पटले शाकाहारा मागची मुख्य संकल्पना त्यानी छान मांडली आहे.
देव-धर्म
देव-धर्म ही चर्चा बाजूला ठेवून चिन्याने लिहिलेल्या अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेखाकडे वळुया का जरा! (सध्या वेळ नाहिये पण एक-दोन वाक्यात मला जे वाटले/वाटते ते लिहितो)
गांधिजींची अहिंसा ही विचारपद्धती माझ्या मते एका अतिशय मूलभूत पायावर उभी आहे (हा पाया योग्य की अयोग्य हा भाग नंतर बघता येइल).. हा विचार संक्षिप्तरीत्या असा मांडता येइलः
१. गांधीजींच्या मते त्यांची विचारसरणी (value system) आणि मोरल/एथिकल बैठक ही योग्य आहे.
२. ही बैठक जगातील प्रत्येक मनुष्याला पटु शकते व प्रयत्नांती पटवता येते.
३. एकदा का ही विचाराची बैठक सर्वांनी अंगीकारली की मग सद्यस्थितीत दिसणारे बहुसंख्य प्रश्णच उद्भवणार नाहीत. जोपर्यंत जगात किमान एक मनुष्य देखील ह्या विचारपद्धतीच्या विरोधात/बाहेर जाउन विचार करतोय तोपर्यंत प्रश्ण राहणार. पण पुन्हा मुद्दा क्रं२ इथे येतो.
--------------------------
बहोतसे आधे बुझे हुए दिन पडे है इसमें
बहोतसी आधी जली हुइ राते गिर पडी है
ये ऍशट्रे भरती जा रही है
वाद म्हणून
वाद म्हणून नाही पण कुठेतरी वाचलय की स्वामी विवेकानन्द म्हणायचे, " मनुष्य हाच एकेकाळी देव होता आणी तोच पुन्हा देव बनणार आहे" जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा ही नम्र विनंती
ट्ण्या तू
ट्ण्या तू म्हणतोस ते मान्य पण तुझा मुद्दा २. हा जर खरा असता तर फाळणी झाली नसती आणि होउनही लाखो लोक मेली नसती. त्याकाळाचा विचार करता सर्वात जस्त नुक्सान कोणाच झाल असेल तर ते गांधीवाद्याच (म्हणजेच हिंदूच) आणि त्यांच्या बरोबरच सर्व भरतियांच. कधीही न भरुन निघणार नु्कसान, त्याचे परीणाम आपण आजही भोगतोच आहोत त्याच काय? त्यावेळ्ची परिस्थिती पाहुन आणि गांधीचे उद्दात विचार सहन न होउन नथुराम सारख्या कट्टर गांधीवाद्यानीच त्यांना मारण्याचा विचार केला.
आज पाकिस्तानात कीती हींदु आहेत? आणि हिंदुस्तानात किती मुसलमान? फाळणी झालीच होती ना आणि हिंसेचा डोंब उडालाच होता ना. गांधी उपोशणाला बसले म्हणुन हींदूंनी शस्त्र टाकली आणि भारतातले मुसलमान इथेच राहीले आणि पाकिस्तानातले हिंदू मारले गेले. चला तेंव्हा जे झाल गेल म्हणुन ते संपल आहे का?
आरक्षण, हज यात्रा आणि काय नी काय चोचले अजुन चालूच आहेत ना.. मी म्हणतो जर आपण खरच निधर्मी देश आहोत तर हे चोचले बाकी धर्मांचे का नाहीत? ख्रिती, सिख, पारस्यानी काय घोड मारलय? हा खेळ सगळा मतांचा आहे, गांधीना इथे विचारतो कोण. आज गांधी हे निव्वळ भारतियांची दिशाभुल करण्याच साधन आहे.
गांधीच्या शिकवणी प्रमाणे त्यानी एक मारला तर आम्ही दोन हींदू उभे राहु मरायला मग तू म्हणतोस त्या प्रमाणे "सद्यस्थितीत दिसणारे बहुसंख्य प्रश्णच उद्भवणार नाहीत". जगभर गांधी तत्वांचा पोकळ उदोउदो करायला कुणाच काय जातय.आज खादी घालुन मिरवले की लोक गांधीवादी होतात. आजच्या परीस्थीतीत खादीला काहीतरी महत्व आहे का? गांधीतत्वाचा उदोउदो करुन आपण आपलच नुकसान करुन घेत आहोत. तेंव्हा भारत पारतंत्र्यात होता सामान्या माणासाला शस्त्र उचलण शक्य नव्हत आणि आज ही जेव्हा एखाद्या आंतर्गत गोष्टीचा निषेध नोंदवायचा असेल आणि सरकारला जाब विचारायचा असेल तर हे तत्व योग्य आहे. कारण जो मागतो आहे तो पण आपलाच आणि देणारा सुद्धा आपलाच आहे पण जेंव्हा परकीय सत्ता येते तेंव्हा समिकरण बदलतात.
गांधीनी शिवाजी महाराजावर टिका करावी येवढी लायकी त्यांची नक्कीच नव्हती ना त्याच्या तत्वांची. त्यावेळी शिवा़जी महाराजांनी शस्त्र उचलल नसत तर आज हा सगळा मुघलीस्तान झाला आसता, गांधीच्या पाकिस्तानच उदाहरण आहेच. तुम्हाला काय वाटत की गांधीच्या तत्वामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल? तर ते पुर्ण सत्य अजिबात॑ नाही इंग्रजां येवधे व्यवहारात तरबेज कुणीच नाही. त्यावेळीच्या सत्ताभिलाशी काँग्रेसने ही समस्त भारतियांच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी आहे. इतके वर्ष ही पट्टी म्हणजेच सत्य आहे अस वाटू लागल आहे कारण त्या बाहेर काही आहे हे आम्ही शोधायचा प्रयत्नच केला नाही. जग म्हणतय गांधी ग्रेट म्हणुन आम्ही सुद्धा गांधी ग्रेट. आजही जर कोणी सत्यशोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मुर्खात काढुन आम्ही अमेरिकेचे आणि उनोचे तळवे चाटतो आहे की आम्ही गांधीवादी आहोत त्यामुळे तुम्ही पाकीस्तानला धमकवा, दाउदल आणि इतर आतंकवाद्याना आमच्या हवाली करायला सांगा, काश्मिर आमचा आहे.
गांधीनी राम, कृष्णाला मानत असत आणि गितेचा प्रचार करत तुम्ही जे म्हण्ताय तेही खरे नाही कारण तेव्हा जर गांधीनी राम कृष्णाला जर नाव ठेवली असती तर हींदुनीही गांधीना आणि त्यांच्या तत्वांना किंमत दिली नसती आणि हे गांधीना चांगल माहित असाव.
जेंव्हा मनगटात ताकद नसेल किंवा लढाई स्वकीयांशी असेल तेव्हा गांधीतत्व ठीक आहेत.
गांधीजीनी महान कार्य केल मान्य, त्यांची तत्व महान होती हे ही मान्य पण त्या तत्वांना आता उगळत बसण्यार काही अर्थ आहे असे मला वाटत नाही.त्या तत्वासाठी आजतोवर मोजलेली कीमंत खुप आहे आतातरी पुरे करा आणि डोळे उघडा. हां जर "यदा यदा ही .." म्हणत जर आपण कृष्ण येण्याची वाट बघत असु तर गांधी तत्व बेस्ट आहेत. जर मी आज स्वदेशी चळवळ चालू केली आणि म्हंटल की भारतिय कंपन्या अमेरिकेची काम करता आहेत म्हणुन अमेरि़केत काम होता आहेत आज जर आपण अमेरिकन कंपनीची काम बंद केली तर अमेरिकेची गळचेपी होईल मग अमेरिकेला आपल्या समोर नाक घासाव लागेल. तर तुम्ही मला मुर्खात काढाल की नाही. तसच तेंव्हा स्वदेशी चळवळ यशस्वी झाली म्हणुन आजही तेच तत्व अंगिकारल तर चालेल का?
कुठल्याही विहिरीच पाणी गोड आहे म्हणुन त्यात बुडुन मरण्यात काही अर्थ नाही, जर लोक त्या विहित बुडुन मरत असतील तर ती विहीर बुझवण जास्त योग्य. मग भले त्यात त्या विहिरीचा काही दोष नसला तरीही आणि पाणि गोड असल तरीही... पण मग तुम्ही म्हणाल बुझवुया नको त्या भवती जाळी बांधुन घेउ हो ना.. तसच आ़ज गांधी विचारां भोवती एक जाळी बाधुंन घ्यायची वेळ आली आहे जेणे करुन अजुन बळी जाता कामा नये.
सत्यजीत,
सत्यजीत, मी तुझी सर्व पोस्ट वाचली नाही..पण रोख कळला.. मुळात तू माझ्या पोस्टचा preamble वाचलेला नाहीस.. मी गांधींची विचारसरणी अमुक अमुक गोष्टींवर आधारीत होती असे म्हटले आहे.. तो आधार बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा आहे असे मी आधीच नमूद केले आहे.
--------------------------
बहोतसे आधे बुझे हुए दिन पडे है इसमें
बहोतसी आधी जली हुइ राते गिर पडी है
ये ऍशट्रे भरती जा रही है
नाही रे मी
नाही रे मी तुझ्या पोस्टवर ही दिलेली प्रतिक्रिया नाही आहे, तू ज्या मुद्द्याला हात घातला नाहीस त्याच मुद्द्याला मी हात घालुन बरळलो आहे.
तू पास केलेला रीले घेउन मी पुढे धावलो इतकच... म्हणुन सुरवात तुझ्या नावाने इतकच
गांधीजींच्या मते त्यांची विचारसरणी (value system) आणि मोरल/एथिकल बैठक ही योग्य आहे. >> आणि यातली गांधीजींच्या मते हे सुचक होत म्हणुन मुद्दा २ घेउन रिले पुढे चालु केला...
अरे अजूनही
अरे अजूनही चालूच आहे का ही रिले, मॅरेथॉन..जे काही आहे ते..?:) कधी संपणार..?
>>>>> तसच आ़ज
>>>>> तसच आ़ज गांधी विचारां भोवती एक जाळी बाधुंन घ्यायची वेळ आली आहे जेणे करुन अजुन बळी जाता कामा नये.
अचूक! अफलातून!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
कारण "तू
कारण "तू म्हणाल्या प्रमाणेच प्रत्येक जण देवाबद्दल नवी थिअरी आणु शकतो"
माझ म्हणन आहे की प्रत्येक जणाची थिअरी वेगळी असेल्.मग कोणीतरी बरोबर असणार कोणीतरी चुक असणारच्.तुम्ही पुर्ण आत्मविश्वासाने हे सांगु शकता का की तुम्ही जे म्हणताय ते चुकण शक्यच नाही???नाही तुम्ही तसे म्हणु शकत नाही.मग तुमचे विचार इतरांनी का मानावेत जर ते चुकही असु शकतात्??म्हणुन देव आणि माणुस यांच्याबद्दलचे द्वैत कमीत कमी आत्मसाक्षात्कार न झालेल्या सामान्य माणसाने तरी मानावे.
अवतार मानव जिवन हे कस जगाव आणि ते मानव जिवन जगुन कस अंगिकारता येईल हे समस्त मानव जातीला पटवून देण्यासाठी घेतले आहेत
हे तुम्हाला कोणी सांगितल??हे अवतार म्हणजे भगवंताची लीला होती.
पण भगंवताना समस्त मानव जातीला हे पटवुन द्यायच होत की हे सर्व तुम्ही मानव असुन सुद्धा करू शकता त्या साठी देव असण गरजेच नाही
या वक्तव्याला कुठलिही पार्श्वभुमी नाही,बेस नाही.असे कुठल्याही देवानी सांगितलेले नाही.जर असेच असते तर भगवंतानी एकही चमत्कार केला नसता.
त्यानी हेच सांगितले की माझ अनुकरण करा मग तुम्ही देखिल दैवत्वला पोहचु शकता.
अस कुठ सांगितलय्???माझ अनुकरण करा असे भगवंत सांगतच नाही.ते सांगतात की मी जो मार्ग तुम्हाला सांगतोय त्यावर चाला.आणि मी मागेही हा प्रश्न विचारला होता ज्याला कुणीच उत्तर दिले नाही की कृष्णाच्या रासलीलेबद्दल तुमचे काय म्हणने आहे??आपणही तशी रासलीला करण्याचा प्रयत्न केला तर ती बरोबर ठरेल काय??
त्या साठी कठोर ज्ञान साधना करावी लागेल मग विष प्राषन काय गोवर्धनही उचलू शकू कदाचित आपण .
तुम्ही उचलुन दाखवु शकता का??जर नाही तर तुम्ही हे कशावरुन म्हणता की हे आपणही करु शकु???आणि कुणीतरी ते करुन दाखवाव मग आम्ही सांगु काय ते.
तर मग सती प्रथा, हुंडा प्रथा, विधवा विवाह ई. बरिच उदाहरण देता येतिल
तेच तर मी सांगतोय की जे पुराणांमधील देव अथवा इतर देवाच्या लीलेने काही लोकांनी केले आहे त्याचे अंध आचरण करु नका.सती जाण ही पार्वतीची लीला होती ती सामान्य महीलेवर थोपवु नका.पार्वती ही देवी आहे आणि सामान्य महीला देवी नाही.
टन्या, कमीत कमी शब्दात समर्पक आढावा.जीयो!!!!
" मनुष्य हाच एकेकाळी देव होता आणी तोच पुन्हा देव बनणार आहे"
स्वामी विवेकानंद अद्वैतवादी होते त्यांचे म्हणने त्यांच्या जागी बरोबर आहे.पण ते ही देवत्व प्राप्त करा असे सांगतात.
सत्यजीत्,गांधीजींबद्दल तुम्ही लिहिलेल्या पोस्टमधे तथ्य आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
चिन्या,
चिन्या, तुझ्या तोंडी ते शब्द घालायचा उद्देश नव्हता. गैरसमजुतीबद्दल क्षमस्व. पण तसे बोलणारे इतर काही लोक असतात, त्यांना (जे इथे दिसले नाहीत) त्यांना उद्देशून म्हंटले.
राम हा माणुस नव्हता तो देव होता.त्यानेच हे जग निर्माण केले आहे त्यामुळे ते जग तो नष्ट करु शकतो असेच गांधीजींचे मत होते.
तेंव्हा गांधीजींनी सांगितले कृष्ण हा देव होता त्यामुळे त्यानेच जग निर्माण केल्याने त्यानेच ते नष्ट केल्यास त्यात चुक नाही.
हे असे गांधीजींनी खरेच म्हंटले असेल असे वाटत नाही.
वास्तविक श्री चिन्मयानंदांच्या गीतेवरील भाष्यात असे स्पष्ट केले आहे की, जरी अहिंसा परमो धर्मः, तरी असत्य नि अन्याय यांच्या समोर काही न करता स्वस्थ बसणे हा धर्म नव्हे. जे जे साधन तुमच्याजवळ आहे, ते वापरून तुम्ही त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. गांधीजींनी सुद्धा हेच सांगितले आहे.
महाभारताच्या वेळी युद्ध हा एकच उपाय उरला होता. पण गांधीजींच्या काळी बलाढ्य इंग्रजांविरुद्ध लढायला त्यांच्या इतके सामर्थ्यवान सैन्य, आयुधे आपल्याकडे नव्हती. तेंव्हा गांधीजींना अहिंसा हा मार्ग स्वीकारणे भाग होते.
त्यानंतर, जेंव्हा अण्वस्त्रे नि त्यांचे भयानक दुष्परिणाम पाहिल्यावर त्यांना असे वाटणे साहाजिकच आहे, की हिंसा हा मार्ग नव्हे, अहिंसा हाच मार्ग. रशियाचा पराभव हा युद्धाने झाला नाही.
आजसुद्धा कदाचित् पाकीस्तानशी अहिंसेने वागून हा प्रश्न सुटावा. त्याचे कारण तेच एक संघटित लोक आहेत जे दहशतवाद पसरवतात. ते थांबले तर जगातले इतर लोक थांबतील. नाहीतरी पाकीस्तानवर हल्ला केला तर हिंसा जास्त, नि लोक परत तेच करतील.
हे असे
हे असे गांधीजींनी खरेच म्हंटले असेल असे वाटत नाही.
हेच गांधीजींनी म्हटलेय्.ज्या यंग इंडीयामधल्या लेखात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग ,शिवाजी महाराज्,राणा प्रताप यांना मिसगाईडेड पॅट्रीऑट्स म्हटलेय त्याच लेखात ते लिहितात-
"I believe in Krishna perhaps more than the writer. But my Krishna
is the Lord of the Universe, the creator, preserver and destroyer of us all. He
may destroy because He creates. But I must not be drawn into a philosophical
or religious argument with my friends.
ते वापरून तुम्ही त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. गांधीजींनी सुद्धा हेच सांगितले आहे.
नाही गांधीजींनी हे सांगितलेले नाही.त्यांनी पुर्ण अहिंसेवर भर दिला होता.सावरकर त्याला उत्तर देताना म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे पण पुर्ण अहिंसा हा गुन्हा आहे'.त्याच्या पुढे सावरकर कृष्ण ,रामच नाही तर जैन तिर्थंकार आणि भगवान बुध्दांच उदाहरण देउन हे सांगतात की या सर्वांनी पण अहिंसा शिकवली पण वेळ पडल्यावर हिंसा ही न्याय्य आहे हे सांगितले.
त्यानंतर, जेंव्हा अण्वस्त्रे नि त्यांचे भयानक दुष्परिणाम पाहिल्यावर त्यांना असे वाटणे साहाजिकच आहे
अण्वस्त्रांच्या फार पुर्वीपासुन गांधीजींनी अहिंसेचा आग्रह धरला होता.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
छान
छान
कशाला उगाचच बुडबुडा आणला ?
कशाला उगाचच बुडबुडा आणला ?
Pages