आय वॉज देअर!!!!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

I-Was-There.jpg

अमेरीकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी समारंभ आणि मिरवणुक क्षणचित्रे.

President-Approaching.jpg

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.

President-Barack-Obama.jpg

उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन.
Joe-Biden.jpgParade-03.jpgParade-04.jpg
आणि शेवटी Proud

Arrest-Bush.jpg

काल सगळ्यांना सांगीतले होते की मी लिहीन म्हणुन या कार्यक्रमाबद्दलचे माझे २ शब्द. Happy
वॉशिंग्टन डी. सी. ला रहातोय त्यामुळे काहीच प्रवास न करता हा कार्यक्रम बघायला मिळणार या आनंदात बराक ओबामांच्या कार्यक्रमाला जायचे असे आधीच ठरवले होते पण काहीच प्लॅन केले नव्हते. शेवटी १९ तारखेला रात्री बसुन नवर्‍याने कुठली मेट्रो, कुठले रस्ते चालु-बंद असतील, हवमान कसे असेल, हा समारंभ जिथे होणार त्या नॅशनल मॉलचा नकाशा अशी सगळी माहिती गोळा केली. घरातुन सकाळी ६ वाजताच बाहेर पडायचे असे ठरवुन पहाटे चारचा गजर लावुन झोपलो. जरा उशीराच म्हणजे साडे पाचला जाग आली. आधी CNN लावुन काय चाललय ते बघीतले, नॅशनल मॉलचा परिसर जवळ जवळ संपूर्ण भरत आला होता. बरेचसे लोक तिथे रात्री १-२ वाजताच गेले होते असे टीव्हीवर कळले. म्हणजे फार फार तर सकाळी ७ वा. मॉलजवळ पोचलेल्या लोकांना तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता होती. तरीही जाऊन बघुयात असे आम्ही ठरवले. घरातुन निघुन मेट्रो स्टेशनला पोचल्यावर गर्दीची जाणीव झाली. तिथे स्टेशनच्या आत जायलाच मोठी रांग होती. ती पार करुन एकदाचे रेल्वेत घुसलो. क्षणभर आपण मुंबईच्या ट्रेनमध्ये आहोत की काय असे वाटले. मॉलच्या जवळ असलेली मेट्रो स्टेशनं सुरक्षिततेसाठी आधीच बंद केली होती पण त्याच्या पुढच्या स्टेशनवरपण प्रमाणाबाहेर गर्दी झाली म्हणुन आमची गाडी अजुन पुढे नेवुन त्याच्या पुढच्या स्टेशनला थांबवली.
तिथुन मॉल चालत बरेच दूर होता. बघावे तिकडे लोकच लोक दिसत होते. पारा -७ डीग्री से. दाखवत होता. हळुहळु थंडीची चांगलीच जाणीव व्हायला लागली. आम्ही मॉलला जात असतांनाच तिथल्या पोलीसांनी मॉलकडे जाऊ नका तिथे आत जाता येणार नाही असे सांगीतले. आणि गेलो असतो तरीही तो समारंभ इतक्या लांबुन फक्त ऐकताच येणार होता.
मग आम्ही परेड रुट वर जायचे ठरवले. अमेरीकेच्या Capitol समोर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्या नंतर राष्ट्राध्यक्ष आपल्या नवीन घरी म्हणजे White House ला समारंभपुर्वक रहायला जातात. ती परेड (मिरवणुक) ज्या रस्त्यावरुन जाते त्याला परेड रुट म्हणतात, त्या रस्त्यावर जायचे आम्ही ठरवले. तिथे जायला चार ठिकाणी सुरक्षा चेकपोस्ट ठेवले होते बाकी कुठुनच त्या रस्त्यावर जाता येत नव्हते. तिथे चेक केल्यावरच आत सोडले जाणार होते. हे कळल्यावर आम्ही तिथल्या सेक्युरीटी चेकच्या रांगेत उभे राहीलो. तिथेच आम्हाला काही जणांनी Arrest Bush लिहीलेली placards वाटली. Happy
आमच्या पुढे नक्कीच हजार-दोन हजार लोक होते. सगळे एकदम उत्साहात होते. अमेरीकेचे झेंडे हलवत जोरजोरात 'ओबामा' 'ओबामा' अश्या घोषणा देत होते. शपथविधीची वेळ झाली तरी रांग फार पुढे सरकली नव्हती पण आमच्या मागे रांगेत मात्र अजुन २-३ हजार लोक नक्कीच वाढले होते. जवळपास कुठेही मोठे स्क्रीन डिस्प्ले दिसत नव्हते. पण सेक्युरिटी पॉईंट वर आणि रांगेतल्या खूप जणांकडे रेडीओ होता. त्यामुळे तिथे उभे राहुन सगळ्या समारंभाची रनिंग कॉमेंट्री ऐकता येत होती. आम्ही उभे असलेल्या ठिकाणापासुन अगदी काही अंतरावर हा इतिहास घडत होता आणि याला आपण साक्षी आहोत ही जाणीवच खूप आनंद देणारी होती. शेवटी तो क्षण आला, सगळे जण कान देवुन अगदी शांतपणे शपथविधी ऐकत होते. ओबामांनी शपथ घेतल्याबरोबर सगळ्यांनी ओबामा ओबामा असा गजर करत आसमंत दणाणुन सोडला. रांगेतल्या खूप लोकांना आपले आनंदाश्रु आवरता आले नाहीत. सगळे अक्षरशः भारावुन गेल्यासारखे झाले होते. आम्ही उद्घाटनाचे भाषण पण तिथे रेडीओवरच ऐकले.
एवढे सगळे होईपर्यंत आम्हाला रांगेत उभे राहुन साडेचार तास उलटुन गेले होते. रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. तिकडे परेड लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा रेडीओवर झाली तरी आम्ही बाहेरच होतो. परेड रुटवर पण खूप गर्दी वाढल्यामुळे कुठल्याही क्षणी सेक्युरीटीचे दरवाजे बंद करण्यात येतील असे आम्हाला सांगीतले होते. एवढ्या थंडीत साडेपाच तास रांगेत उभे राहिल्यावर शेवटी आमचा नंबर लागला आणि आम्ही एकदाचे परेड रुट कडे निघालो. चेकींग करतांना तिथल्या पोलीसांनी परेड रुट वर कपडे आणि बुट काढायला सक्त मनाई आहे असे सांगीतले :फिदी:.
तिथे पोचल्यावर अगदी अर्ध्याच तासानी घोषणा झाली "Please welcome the President of United States of America Mr. Barack Obama". परत एकदा सगळीकडे टाळ्या, 'Yes We Can', 'Obama' घोषणा सुरु झाल्या. त्यानंतर काहीच क्षणात अमेरीकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबमा चालत येतांना दिसले. Y...e..sss. त्यांना बघुन लोक आनंदाने अक्षरशः वेडे झाले. काही फुटांच्या अंतरावर अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष चालत होते आणि आम्ही त्यांना पाहु शकलो. त्यावेळी त्यांना बघुन काय वाटले हे शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. Happy Yes, I was there.
त्यानंतर थोड्यावेळाने उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जील बायडन हे आले. शेवटी २ तास परेड बघुन एका ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार झालो या आनंदात रात्री ८ वाजता घरी आलो.

तळटीप:
१. व्हाइट हाउस, कॅपीटॉल, लिंकन मेमोरील, वॉशिंग्टन मॉन्युमेंट, स्मिथसोनिअन म्युझीयम हे सगळे असलेल्या भागाला नॅशनल मॉल असे म्हणतात त्या नावाचा कुठल्याही शॉपींग मॉलशी काही संबंध नाही.
२. शुद्धलेखनाच्या खूप चुका झाल्या आहेत, कोणी चुका सांगीतल्या तर मी नक्कीच दुरुस्त करेन. Happy

अरे वा. खुप गर्दी होती तेथे. मी ही होतो पुर्णवेळ. (घरीच)

हो, सॉलिडच गर्दी दिसत होती तिथे. काही काही लोकांना सिक्युरीटी मध्ये ४,५ उभं राहूनही मागे फिरावं लागलं.
कसा होता एक्सपिरियन्स?/

रुनी, सही ! अशा ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार असणे म्हणजे अफाट वाटले असेल ना ? आदमाला अनुमोदन.

    ***
    भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी

    रुनी, छान फोटो. मस्त आठवण रहिली तुझ्याकडे आता. शेवटचा फोटो लय खास! Proud
    थोडं लिहायचस पण गं...

    रुनी, वृत्तांतही वाचला. मस्त लिहिलं आहेस! आवडलं! Happy

    सही फोटो आहेत...

    जो बायडन यांच्या पत्नी भलत्याच खूश दिसतायेत.. Proud

    फोटो छान आहेत. आता अस वाट्त फोटो मे जान आ गइ.

    खूपच मस्त वाटत होतं पण पायाचे पार तुकडे पडलेत आज १० तास थंडीत उभं राहुन म्हणुन काहीच लिहील नाही उद्या लिहीते माझा अनुभव. Happy

    Wow रूनी! किती नशीबवान! येणार्‍या पिढ्यांना आता तुम्हाला सांगता येईल की तुम्ही या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात म्हणून.

    फोटो मस्तच आहेत! शेवटचा पण. Proud

    रुनी, मस्तच. एव्हढ्या मोठ्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार म्हणजे एकदम मस्त वाटत असेल ना ? आता पाय दुखायचे थांबले की पटपट लिहुन काढ Happy म्हातारपणी रंगवुन सांगण्यासारखी आठवण बांधलीत की गाठीशी Wink

    रूपाली
    मस्तच! छान आहेत फोटो.........! आम्ही इकडे एच बी ओ वर लाइव्ह टेलेकास्ट पहात होतो.
    वृत्तांत लेखनाची वाट पहाते..

    रुनी, मी तुला जेंव्हा शपथ विधी होत होता त्यावेळी पाहिलं. अगदी ओझरते तुम्ही दोघे दिसले होते. तू काळा कोट घातला होता ना..

    फोटो छान आहेत.

    क्या बात है रुनी.....अशा ऐतिहासिक क्षणाला तू साक्षीदार होतीस.....ग्रेट !! तुझ्या अनुभवाची वाट बघतेय.

    अरे वा मस्तच रुनी.
    वृत्तांताची वाट बघतेय.

    अरे वा.....छानच रुनी...हो खरेच, वृतांत लवकर टाका....:)
    किती ग्रेट असेल ना तो अनुभव....तुम्हांला पण किती छान फिल होत असेल.....पाय दुखतायत ते होतिल कमी पण हा अनुभव विस्मरणात कधी च जाणार नाही तुमच्या.....you were eye-witness there....:)

    रुपाली, मस्त फोटो! काल टी व्ही वर बघतानाच 'आपण काहीतरी अभूतपूर्व बघतोय' असं वाटंत होतं. तुला प्रत्यक्षात बघताना काय वाटलं असेल!!!
    नक्की लिही. वाचायची उत्सुकता आहे.

    अरे व्वा रूपाली ...
    ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाल्याबद्दल अभिनंदन... आणि आम्हालाही तो आनंद वाटल्याबद्दल धन्स Happy

    अरे वा! रुनी, मस्तच. लिही अजून.
    मॉलवर कुठेतरी लांब उभे रहाण्यापेक्षा तुम्ही परेड रुट वर उभे राहिलात ते बरं झालं.

    अरे वा! मस्तच. आणि हे सगळ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ग.

    असं काय ऐतिहासिक आहे यात कुणी सांगेल काय?

    काल तुम्हाला सगळ्यांना इथे सांगीतल्याप्रमाणे मी चित्रांच्या खालीच थोडक्यात(!) या कार्यक्रमाचा वृतांत लिहीलाय.
    बी, अरे बराक ओबामा हे अमेरीकेचे पहीलेच कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणुन ही घटना ऐतिहासिक आणि महत्वाची मानली जाते. तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? Happy

    वा!..खुप छान लिहिले आहेस रुनी...वाटलं, आपण ही तिथे उभा राहुन बघतोय...अक्षरशः अंगावर रोमांच अभे रहिले....सही अनुभव ...:)

    अरे वा रूनी... बर झालं लिहिलसं...
    मला गेल्यावर्षी यु.एस. ओपन मधे टेनिस प्लेयर ना काही फुटांवर पाहून पण खूप भारी वाटलं होतं.. !!!
    तू तर दस्तुरखुद्द अमेरीकन अध्यक्षांना पाहिलसं.. !! सहीच.. Happy

    छान फोटो रुनी Happy
    तो शेवटचा फोटो कल्लास Happy
    भारतात अशी किती बॅनर्स बनवावी लागतील ? Proud

    रुनि, हे माहिती होत की ते कृष्णवर्णीय आहेत. पण अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहुन असे विशेषण कुणाला लावणे खटकले मला.

    नविन माहिती खंग्री वाटली पण मिशेलच्या ड्रेसबद्दल काहीतरी लिहायला हवे होते Happy धन्यवाद रुनि!

    वा! मस्त लिहिलंस रुनि Happy
    ------------------------------------------
    A good listener is not only popular everywhere, but after a while he knows something.

    मस्त लिहिलंस रुपाली ! फोटोपण मस्त आलेत. आणि हे सगळ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

    वॉव रूनी, कसली लकी आहेस गं!! ओबामाला पाहीलेस?? मला त्याला टीव्ही वर पाहायला/ऐकायलाही आवडते, प्रत्यक्ष काय वाटत असेल.. इतकी गर्दी, तो उत्साह.. जब्बरी!! हेवा वाटला तुझा!

    Pages